आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
ज्याकाळात पृथ्वीवर सर्वत्रच राजेशाही होती तेव्हा साम्राज्य विस्ताराच्या लालसेने यु*द्धं केली जात. आजही काही देश इतर देशाच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी आपापल्या देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक देशावर कधी ना कधी यु*द्ध करण्याची वेळ येतेच. पूर्वीच्या काळातील यु*द्धे ही घोड्यावर बसून तलवारी, भाले, दांडपट्टा, बरची, तोफा, अशा ह*त्यारांच्या सहाय्याने केली जात तर आधुनिक काळात बंदूक, रण*गाडे, बॉ*म्ब अशी आधुनिक शास्त्रे वापरली जातात एवढाच काय तो फरक!
यातील प्रत्येक शस्त्र वापरण्याची एक खास पद्धत आणि तंत्र असते. यु*द्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक सैनिकाला प्रत्येक शस्त्र निष्णातपणे हाताळता येईलच असे नसते. पूर्वीच्या काळी निष्णात धनुर्धर असलेला यो*द्धा तलवारबाजीतही तितकाच निपुण असेल असे नव्हते. आजच्या काळातही प्रत्येक सैनिकाची आपापली काही खास शास्त्रे आहेत. ज्यात ते तरबेज असतात. बंदुकीचा नेम साधून शत्रूला टिपण्याची कला प्रत्येक यो*द्ध्याकडे असतेच असे नाही. त्याला अचूक नेमबाजाचीच गरज असते.
आज आम्ही अशाच एका आधुनिक यो*द्ध्याची गोष्ट घेऊन आलो आहोत, ज्याच्या बंदुकीच्या अचूक निशाण्याने शत्रू जागीच नामोहरम होत असे. त्या धाडसी यो*द्ध्याचे नाव आहे क्रिस काईल.
क्रिस काईल हा एक अमेरिकन स्नायपर होता ज्याने एका अत्यंत कठीण यु*द्धाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली आखलेल्या या यु*द्धात मिळालेल्या विजयामुळे अमेरिकेचा दबदबा वाढला होता.
क्रिस काईलचा जन्म १९७४ साली अमेरिकेतील टेक्सास येथे झाला. त्याचे पूर्ण नाव क्रिस्टोफर स्कॉट काईल असे होते. अमेरिकन लष्करात भरती झाल्यानंतर त्याला क्रिस काईल म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
क्रिस आठ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांना त्याला एक रायफल आणून दिली. या रायफलच्या सहाय्याने छोटे पक्षी आणि जनावरांची शिकार करणे शक्य होते. त्यानंतर क्रिस आपला सगळा वेळ नेम धरण्यात आणि शिकार करण्यातच घालवू लागला. इथूनच त्याने नेमबाजीत कुशलता मिळवण्यास सुरूवात केली. त्याच्या याच छंदाने त्याला भविष्यात मोठी ओळख मिळवून दिली.
शाळा, कॉलेजात गेल्यावर क्रिसला आपल्या या छंदाला विशेष वेळ देता आला नाही. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने टेक्सासच्या टेरलटन विद्यापीठात कृषी पदवीसाठी प्रवेश घेतला. याचवेळी अमेरिकेत बुल रायडींग हा साहसी खेळ प्रकार खूप लोकप्रिय होत होता. बुल रायडींगच्या स्पर्धा भरवल्या जात. तरुणांमध्ये तर याचे विशेष आकर्षण होते. मग क्रिस तरी यात कसा मागे राहील? त्याला तर लहानपणापासूनच साहस आणि थरार यांचे जबरदस्त आकर्षण!
क्रिसनेही एका बैलावर स्वार होण्याची करामत करून दाखवली. असेच एक दिवस एका रागीट बैलावर नियंत्रण मिळवत असताना क्रिसचा छोटा अपघात झाला आणि यात त्याचा हात फॅक्चर झाला. यानंतर पुन्हा कधीही त्याने या खेळात सहभाग घेतला नाही. पदवी पूर्ण झाल्यावर क्रिस देखील नोकरीसाठी प्रयत्न करू लागला. त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली पण तिथे त्याचे मन रमत नव्हते. सतत आव्हानांशी सामना करण्याची हौस असणाऱ्या क्रिसला सध्या सरळ नोकरीत मन रमले असते तरच नवल.
त्याला साहसपूर्ण, धोकादायक आणि त्याच्या कौशल्याची कसोटी लागेल असेच काम हवे होते.
एक दिवस त्याला अमेरिकेतील सैन्य भरतीची बातमी लागली आणि तो थेट सैन्य भरतीसाठी पोहोचला. पण त्याला इथे थेट प्रवेश मिळणे कठीणच होते. कारण ही भरती नाविक दलासाठी होती आणि त्याचा एक हात तर फॅक्चर झालेला होता. या कारणाने त्याला लष्करात भरती करून घेण्यास नकार दिला गेला.
पण जिथे इच्छा असेल तिथे मार्ग तर सापडतोच. फॅक्चर झालेला हात घेऊन त्याला नौदलात प्रवेश मिळणे शक्यच नव्हते. पण त्याला नौदलातील एका अधिकाऱ्याने SEAL मध्ये भरती होण्याचा सल्ला दिला. त्याच्या सांगण्यावरून क्रिसने SEAL ची परीक्षा दिली. यासाठीचे विशेष प्रशिक्षणही घेतले. १९९९मध्ये तो SEAL मध्ये भरती झाला.
SEAL मध्ये पशिक्षण सुरू असताना प्रशिक्षणार्थींना नेमबाजीचे प्रशिक्षणही दिले जात होते. क्रिसची नेमबाजी तर लहानपणापासूनच अचूक होती. आपल्या अचूक निशाणेबाजीने त्याने वरिष्ठांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याच्या या अचूक नेमबाजीने भारावून गेलेल्या अधिकाऱ्यांनी त्याला स्नायपिंगसाठी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. इथूनच क्रिसचा जगप्रसिद्ध स्नायपर होण्याचा प्रवास सुरू झाला.
लष्करातून स्नायपरचे प्रशिक्षण घेतलेल्या क्रिस काईलचा एकही नेम आता वाया जात नव्हता, तेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली २००३ साली इराकमध्ये SEAL कमांडो पाठवण्याचे ठरवले गेले. इराकमध्ये अमेरिकन सैन्याला नेहमीच एका समस्येचा सामना करावा लागत होता तो म्हणजे तिथे कोण आतंकी आहे आणि कोण सामान्य नागरिक आहे याचा अंदाज बांधणेच अवघड होते.
इराकमध्ये जाताच क्रिसने दूरवरून ग्रे*नेड घेऊन सैन्याच्या दिशेने येणाऱ्या एका महिलेवर आपला अचूक निशाणा साधून तिला ठार केले. क्रिसच्या या निशाण्याने संपूर्ण जगाचे लक्ष त्याने वेधून घेतले. जिकडे तिकडे क्रिसच्या या निशाण्याची चर्चा होऊ लागली.
क्रिसने सांगितले की, ती बाई हातात ग्रे*नेड घेऊन येत होती. तिच्यावर निशाणा साधला नसता तर तिने अमेरिकन सैन्यातील सैनिकांचा बळी घेतला असता.
क्रिसच्या संपूर्ण करिअरमध्ये त्याला चार वेळा इराकला पाठवण्यात आले. आपल्या अचूक निशाण्याने त्याने एकूण १६० लोकांचा बळी घेतला होता. यावरून त्याचा निशाणा किती अचूक होता याचा तुम्हाला अंदाज येईल. इराकच्या रमादी शहरात तर त्याच्या नावाची द*हश*तच निर्माण झाली होती. याच शहरात क्रिसने त्याचे अनेक अचूक निशाणे लावले होते.
रमादीमध्ये क्रिसने अशी काही द*हश*त निर्माण केली होती की त्याला ‘रमादीचा सैतान’ असे नावच पडले होते.
इराकमध्येच त्याने २१०० यार्ड अंतरावरून एक अचूक निशाणा साधला होता. त्याचा हा निशाणा सर्वश्रेष्ठ निशाणा म्हणून ओळखला जातो. त्याच्या या निशाण्याने एका इराकी स्नायपरचा बळी घेतला होता. अमेरिकी सैनिकांचा वेध घेणाऱ्या या इराकी स्नायपरचा बळी घेऊन त्याने मोठी कामगिरी केली होती.
म्हणूनच त्याला अमेरिकेचा सर्वात घातक स्नायपर म्हटले गेले.
२००९मध्ये त्याने अमेरिकन लष्करातून निवृत्ती घेतली. २०१२ मध्ये हार्पर कॉलिन्स या प्रकाशन संस्थेने क्रिस काईलवर ‘अमेरिकन स्नायपर’ नावाचे एक पुस्तक छापले होते. या पुस्तकात क्रिसने आपल्या स्नायपर होण्याच्या प्रवासाबद्दल बरेच काही सांगितले आहे.
आपल्या गोळ्यांनी शत्रूच्या सैनिकांचा अचूक वेध घेणाऱ्या क्रिसचा अंतही एका मनोरुग्णाच्या बंदुकीतून गोळीनेच घेतला. अमेरिकन सैन्यातील एडी रुथ या अधिकाऱ्याने ३८ वर्षाच्या क्रिसला आपला निशाणा बनवला होता. क्रिससह त्याची सहकारी चेड लिटिलफिल्डलाही त्याने आपला निशाणा बनवले होते.
लष्करातून निवृत्त झाल्यावर क्रिस लष्करातील इतर सैनिकांना निशाणा साधण्याचे प्रशिक्षण देत असे. अशाच एका प्रशिक्षणावेळी रुथने त्याला आपले शिकार बनवले. अमेरिकन सैन्यात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या या स्नायपरच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण अमेरिकेवर शोककळा पसरली होती.
इराकी द*हश*तवाद्यांना धडकी भरवणाऱ्या या स्नायपरचे संपूर्ण आयुष्य म्हणजे जणू एक चित्तथरारक कथाच. त्याची ही कथा पडद्यावरही साकार झाली होती. म्हणूनच क्रिसचे अमेरिकन जनतेच्या मनावर एक गारुड निर्माण झाले होते.
पण एका माथेफिरूच्या कृत्यामुळे या निष्णात स्नायपरला अवेळीच हिरावून नेले. नियतीच्या क्रू*र खेळापुढे शेवटी सगळेच हतबल आहेत. क्रिसची ही चित्तथरारक कथा मात्र साहसी आणि आव्हानाचा सामना करण्याचा शौक असणाऱ्या तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










