The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अघोरी साधूंबद्दल आपल्याला माहित असलेल्या निम्म्या गोष्टी अफवा आहेत..!

by द पोस्टमन टीम
18 June 2025
in मनोरंजन, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारत अनेक जात-धर्म-पंथ-संप्रदाय यांनी विणलेले एक वस्त्र आहे पण तरीही या सगळ्यांचेच स्वतःचे खास वैशिष्ट्य आहे. अध्यात्मिक चिंतन हा सगळ्याच धर्माचा आणि संप्रदायांचा पाया आहे असेच आढळते. यातील प्रत्येक धर्माचे, संप्रदायाचे ईश्वराची प्राप्ती, मुक्ती, मोक्ष आणि त्यासाठी लागणारी साधाना याचे वेगवेगळे मार्ग आहेत.

असाच एक पंथ आहे तो अघोरी साधूंचा. यांच्यासाठी वापरला जाणारा शब्दच किती नकारात्मक आहे पहा, अघोरी! अघोरी म्हणजे काही तरी भयानक असतील असेच वाटते. त्याशिवाय का त्यांना अघोरी म्हणत असतील? हो ना? पण हे अघोरी साधू नेमके करतात तरी काय? यांचे तत्वज्ञान तरी काय असते? आणि यांना नेमके काय शोधायचे असते?

तर, अघोरी पंथ ही शैव संप्रदायाची एक शाखा आहे. अघोरी साधू म्हटले की डोळ्यासमोर झटकन एक चित्र उभे राहते. डोक्यावर जटा असलेला, अंगाला राख फसलेला, फक्त लज्जाराक्षणापुरते कपडे घालणारा, हातात चिलीम घेऊन धूर सोडणारा साधू!

साधू-संतांचे आपण वाचलेले, ऐकलेले किंवा पाहिलेले कुठलेही लक्षण या अघोरी साधूंमध्ये दिसत नाही. अघोरी हा भारतातील एक अकर्मठ संप्रदाय आहे. ते स्वतःला शिवाचे भक्त म्हणवतात. कर्मठ हिंदूंपेक्षा अघोरी साधू खूप वेगळे असले तरीही अघोरी हे संतच आहेत.

जरी ते भगवी कफनी घालत नसले, केशवपन करत नसले, लोकांमध्ये जाऊन प्रवचन देत नसले, इतरांना सतत शहाणपणाचे उपदेश देत नसले, ते शाकाहारी नसले तरी, तरीही ते संतच आहेत.



अघोरींचे तत्वज्ञान आहे तरी काय?

जिथे इतर हिंदू साधू आणि साध्वी लोकांना देवत्वापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात पण तिथेच हे अघोरी साधू मात्र अशा सगळ्या प्रकारापासून कोसो दूर असतात. अघोरींचे स्वतःचे एक वेगळे तत्त्वज्ञान आहे. या जगातील प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती ही शिवाचीच प्रतिकृती आहे, अशी त्यांची धारणा असते. चांगलं, वाईट, सुंदर, कुरूप जे काही आहे ते सगळंच शिव आहे. त्या सगळ्यात शिव तत्व वसलेले आहे. त्यामुळे यातील कुठल्याही एका गोष्टीला नाकारणे म्हणजे साक्षात शिवाला नाकारणे होय असे ते म्हणतात.

ते नेहमीच अशा गोष्टी करत असतात, ज्या सामान्यत: हिंदू आणि इतर धर्मातही निषिद्ध आणि अपवित्र समजल्या जातातत. 

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

प्रत्येक व्यक्तीत शिव असला तरी तो एका अदृश्य शक्तींनी बांधलेला आहे. लोभ, मोह, माया, मत्सर, द्वेष, राग, तिरस्कार, अशा सगळ्या विकारांच्या जंजाळात अडकलेल्या शिवाला बंधनमुक्त केले पाहिजे. म्हणूनच ते टोकाची साधना अवलंबतात. त्यांच्या साधनेचे जे मार्ग असतात त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

त्यांचा फक्त एकच ध्यास असतो. मोक्ष मिळवणे, स्वतःतील शिवाला भेटणे, स्वतःतील शिव तत्त्व जागृत करणे. थोडक्यात काय तर पुनर्जन्माच्या चक्रातून स्वतःची सुटका करून घेणे!

अघोरींची अघोरी साधना काय असते?

अघोरी साधूंचा वेश जरा विचित्रच असतो. ते संपूर्ण शरीराला राख फासतात, तीही स्मशानातील! अंगावर पुरेसे कपडे देखील नसतात. याने त्यांच्यातील शरम नाहीशी होते. जिथे जिवंत राहण्यासाठी कमीत कमी साधने असतील तिथेच हे अघोरी साधू राहतात. कठीणातील कठीण परिस्थितीत राहणे यांना आवडते. एखाद्या पर्वताचे टोक, गुहा, स्मशान, ज्याठिकाणी राहण्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही.

शवावर बसून ते ध्यानसाधना करतात. इतकेच काय पण या शवासाठी रचलेल्या चितेवर ते मासिक पाळी आलेल्या स्त्रीशी संभोग करतात. अघोरी साधू हे काळ्या जादूत आणि मंत्रतंत्र विद्येत माहिर असतात. सामान्य लोकांना त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो. त्यामुळे त्यांच्याप्रती स्वत:ला समर्पित करणाऱ्या स्त्रियाही असतात.

अघोरी हे प्रेताशीही संभोग करतात अशी त्यांची ख्याती आहे. अ*फू आणि दारू घेतल्याने त्यांची एकाग्रता वाढते असाही दावा ते करतात.

अघोरी साधूंबद्दल पसरलेल्या अफवा

अनेकांचा असा समज असतो की हे साधू काळी विद्या आणि तंत्रमंत्रात माहिर असतात. काही जण म्हणतात यांच्याकडे कुठलाही आजार बरा करण्याची शक्ती असते. आपण कल्पनाही करू शकणार अशा वातावरणात राहूनही अघोरी साधूंचे आरोग्य एकदम ठणठणीत असते. त्यांचा आहारही तितकासा पौष्टिक नसतो. उलट ते अतिरिक्त प्रमाणात मादक पदार्थांचे सेवन करतात. तरीही हे साधू शंभर वर्षे जगतात अशाही अफवा पसरतात.

हे साधू न*रभ*क्षक असतात असाही एक समज आहे. मृतदेहाचाच काही भाग ते ग्रहण करतात. अर्थात प्रत्येक अघोरी साधू हा न*रभ*क्षक असतोच असे नाही.

पण ते जिवंत माणसांना कसलीही हानी पोहोचवत नाहीत.

तुमच्या शेजारी जरी बसून राहिले तरी त्यांचा तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. कारण त्यांना या भौतिक जगाशी काहीही देणेघेणेच नसते. त्यामुळे अ*फू, गां*जा ओढून, राख फासून ध्यानधारणा करणाऱ्या या साधूंना घाबरण्याची काहीच गरज नाही. त्यांच्यापासून तुम्हाला कसलाही धोका असण्याची शक्यता नाही.

आपल्या विश्वात मग्न राहून फक्त मुक्ती मिळवणे, मोक्ष साधणे, एवढेच त्यांचे ध्येय असते.

हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की अघोरी साधू इतरांशी कसलेही अघोरी वर्तन करत नाहीत. फक्त त्यांची जीवनशैली अघोरी असते म्हणून त्यांना अघोरी म्हटले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अवघ्या ८ अमेरिकन सैनिकांनी १३ तास किल्ला लढवून आपल्या नागरिकांचं रक्षण केलं होतं

Next Post

हि*टल*रच्या ‘या’ कमांडरनेच त्याला मारण्याचा धाडसी प्रयत्न प्रयत्न केला होता..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

हि*टल*रच्या 'या' कमांडरनेच त्याला मारण्याचा धाडसी प्रयत्न प्रयत्न केला होता..!

जगाचं सगळ्यात जास्त नुकसान कोणी केलं तर या माणसाने..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.