The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पारलेने देशाला फक्त स्वदेशी कोलाच नाही दिला तर ‘रेखा’सारखी सदाबहार अभिनेत्रीही दिली

by द पोस्टमन टीम
10 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


पारले हे नाव ऐकलं की, आपल्याला आठवतं ग्लुकोज असलेलं बिस्कीट “पारले-जी”. भारतीय लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या पारले कंपनीनं आपलं एक शीतपेय बाजारात आणलं होतं असं आजच्या तरुण मुलांना विचारलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४९मध्ये पारले कंपनीनं आपलं शीतपेय भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलं होतं.

आधीच बिस्कीट क्षेत्रात आपलं वर्चस्व निर्माण केल्यानंतर १९४९ मध्ये पारले कंपनीनं याचाच फायदा घेऊन आपलं शीतपेय बाजारात आणलं. संत्र्याच्या चवीचं हे पेय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छापील जाहिरातीचा आधार घेण्यात आला.

ही जाहिरात छापण्यासाठी प्रसिध्द व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची मदत घेण्यात आली.

शीतपेय बाजारात येण्याची तयारी पूर्ण झालेली असतानाच अमेरिकन कंपनी, कोकाकोलानं मध्येच विघ्न आणलं.

पारलेनं आपल्या शीतपेयाचं नाव ठेवलं होतं – ग्लुको कोला.



कोका कोलानं अजून आपलं शीतपेय अजून बाजारात आणलं नसलं तरी त्यासाठी रजिस्टर केलं होतं. यामुळे पारलेला आपल्या शीतपेयाचं नाव बदलण्यास सांगण्यात आलं. पारलेनी ग्लुको कोला बदलून पारले कोला असं केलं. तरीही कोका कोलाने ही गोष्ट मान्य केली नाही. न्यायालयीन खटल्यात पैसे आणि वेळ दोन्ही खर्च या कारणानी पारलेनं आपलं शीतपेय १९५१ साली बंद केले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पण इतक्यात हार मानेल ती पारले कसली. पारलेने १९५२मध्ये संत्र्याच्या चवीचं नवीन शीतपेय ‘गोल्ड स्पॉट’ नावानं बाजारात आणलं. पारलेच्या प्रसिध्द पेपरमिंटचा प्रकार असलेल्या पारले गोल्ड स्टार यावरुन हे नाव ठेवण्यात आलं होतं.

गोल्ड स्पॉट लगेच लोकांच्या पसंतीस उतरलं. मुख्यतः लहान मुलांच्या. संत्र्याची चव असल्याने हे पेय लहान मुलांना जास्त आवडायला लागलं. पुढे याची प्रसिध्दी वाढतच गेली.

पुढच्या काही वर्षांत शीतपेय व्यवसायात पारलेने जास्त लक्ष दिलं. संपूर्ण भारतात बाटल्यांच्या निर्मितीचे कारखाने आणि छोट्या छोट्या खेड्यात माल पोहोचवण्यासाठी तयार केलेलं व्यवसायिकांचं जाळं यामुळे पारलेचा व्यवसाय भरभराटीस आला. १९७०च्या दरम्यान पारलेने आपलं दुसरं शीतपेय बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. लिंबाच्या चवीच्या या शीतपेयास त्यांनी ‘लिमका’ असं नाव दिलं.

सुरुवातीला साबणाच्या पाण्यासारखं दिसतं म्हणून लोकांनी लिमकावर टीका केली. नंतर मात्र याच लिमकानं धुमाकुळ घातला. विशेषत: स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून लिमकाची जाहिरात करण्यात आली होती.

७०च्या दशकाच्या मध्यात गोल्ड स्पॉट आणि लिमकाने भारतीय बाजारात आपला जम बसवला होता. त्याचबरोबर कोका कोलासुध्दा भारतात आपला पाय रोवण्यात यशस्वी झाली होती.

कोका कोला आणि पारलेमधील हे यु*ध्द तीव्र होत चाललं होतं. दोन्ही कंपन्या जाहिरातींवर अमाप पैसा खर्च करत होत्या. त्यावेळच्या तरुण वर्गावर विदेशी वस्तूंचा असलेला प्रभाव यामुळे कोका कोला या शर्यतीत नक्की पुढे होती. पारलेसुध्दा आपल्या जाहीरातीत विविध बदल करून या शर्यतीत पुढे राहण्याचा प्रयत्न करत होती.

जम बसला असला तरी पारलेने हे यश आपल्या डोक्यात जाऊ न देता जाहीरात विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. अजून नवीन शीतपेय घेऊन आलो तर कोका कोलाशी स्पर्धा करणं अवघड जाईल हे पारलेला कळालं. त्यामुळे त्यांनी पुन्हा कोणतंही नविन शीतपेय बाजारात न आणण्याचा निर्णय घेतला.

आधीच असलेल्या गोल्ड स्पॉट आणि लिमका या दोन पेयांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं काम पारलेनं मनावर घेतलं. फक्त लहान मुलं आणि स्त्रियांसाठी मर्यादित न राहता प्रत्येक वर्गातील लोकांसाठी जाहिरात बनवण्यात आली.

जाहिरातीत मसालेदारपणा आणण्यासाठी त्यावेळी पारलेनं एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला आपल्या जाहीरातीत दाखवलं. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारची जाहीरात प्रसिध्द केली गेली होती. पुढे या जाहिरातीत असलेल्या अभिनेत्रीची चर्चा सर्वत्र सुरु झाली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आज बॉलीवुडमधील एक दिग्गज अभिनेत्री असलेली रेखा होती. या जाहिरातीतूनच त्यांनी बॉलीवुड क्षेत्रात पदार्पण केले.

“लिव लिटल हॉट, सिप गोल्ड स्पॉट” या वाक्याबरोबर असलेला रेखाचा शीतपेय पितानाचा फोटो अशी ती छापील जाहिरात होती.

अजून पुढे जात पारलेनं रस्त्यावर विविध महत्त्वाच्या ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पाट्या लावल्या. पाट्यांवर लिहिलेल्या वाक्यांमधून लोकांना गोल्ड स्पॉट पिण्यासाठी उत्तेजित करण्यात येत असे.

१९७५ साली आणीबाणी लागू करण्यात आली. आणीबाणीमुळे लोकांच्या उत्पन्नात विलक्षण घट झाली साहजिकच लोकांचा खर्च कमी झाला. परिणामी शीतपेय व्यवसायात मंदी आली. यात कोका कोलासारखी मोठी विदेशी कंपनी तग धरु शकली. पण पारले मात्र या मंदीच्या काळात तग धरण्यात अयशस्वी ठरली.

आणीबाणी उठल्यानंतर कोका कोला पुन्हा भारतात परत आली. त्यावेळी पेप्सीनेसुद्धा भारतात प्रवेश केला. वाढत चाललेल्या या शर्यतीत आपला निभाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर पारलेनं कोकबरोबर ४ करोड अमेरिकन डॉलर्सचा करार केला आणि शीतपेयांचं उत्पादन थांबवलं.

कोका कोलाने गोल्ड स्पॉट बंद करून आपलं स्प्राइट आणि फंटा हे नविन शीतपेय बाजारात आणलं. शेवटी टक्कर देण्यात यशस्वी न ठरताही कोका कोलासारख्या मोठ्या कंपनीला एवढे वर्ष धारेवर धरण्यासाठी मात्र पारलेच्या गोल्ड स्पॉटची वाहवा करावीच लागेल एवढं नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक कोल्हापूरच्या मातीनं मिळवून दिलंय

Next Post

महाराष्ट्रातील या आगळ्यावेगळ्या गणपतींबद्दल जाणून घ्या…

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

महाराष्ट्रातील या आगळ्यावेगळ्या गणपतींबद्दल जाणून घ्या...

न्यूटन आणि आईन्स्टाईनपेक्षाही मोठे योगदान असणारा हा शास्त्रज्ञ कधीच प्रकाशझोतात आला नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.