The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील सायकल रिपेअर करणारा मुलगा मुंबईत येऊन डॉन बनला होता.

by द पोस्टमन टीम
26 February 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारताच्या अंडरवर्ल्डचे अनेक गुंड आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे अबू सालेम!

उत्तर प्रदेशातील एका छोट्या शहरातून मुंबईत येऊन अबू सालेमने आपली द*हश*त निर्माण केली होती. त्याला बॉलिवूडचा कप्तान म्हणून देखील ओळखले जात होते.

चला नजर टाकूया अबू सालेम, डॉन अबू सालेम कसा बनला या प्रवासावर..

अबू सालेमचा जन्म एका सधन घरात झाला होता, त्याचे वडील पेशाने वकील होते. त्या भागात त्याच्या वडिलांचे चांगले नाव होते. ज्याकाळात लोकांना सायकल घेणे दुरापास्त होते, त्यावेळी त्याचे वडील काळ्या राजदूतवरून फिरायचे. अबू सालेमचे आयुष्य सुरळीत चालू होते. पण, एकदा कोर्टातून परत येताना अबू सालेमच्या वडिलांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर अबूवर जबाबदारी येऊन पडली.



घराची परिस्थिती बिघडत चालली आहे, हे बघून अबूने नोकरी करण्याचा निर्णय घेतला.

तो एका सायकलच्या दुकानावर काम करू लागला. त्या दुकानात तो सायकलला पंक्चर लावायचे काम करत होता. पण एवढ्या कमी उत्पन्नात घराचा गाडा हाकण्यात त्याला अडचणी येत होत्या. अबू त्यानंतर दिल्लीला गेला, पण तिथे देखील त्याला निराशा हाती आली. अखेरीस त्याने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

मुंबईत आल्यावर तो एका चाळीत वास्तव्य करू लागला. तिथे राहून तो छोट्या मोठ्या सामानाची विक्री करत होता. ही गोष्ट आहे १९९० सालची, ज्यावेळी दाऊद इब्राहिमच्याच नावाची चर्चा सगळीकडे असायची. या चर्चा ऐकूनच तो गुन्हेगारी विश्वाकडे आकर्षित झाला. अबू सालेमला देखील दाऊदसारखं डॉन व्हायचं होतं. याच काळात दाऊदचा लहान भाऊ अनिस इब्राहिम व त्याची भेट झाली आणि तो अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय झाला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

अबू दिवसा एक आयुष्य जगायचा आणि रात्री दुसरे. पूर्ण दिवस काम केल्यावर तो रात्री अनिससोबत सोन्याच्या तस्करीत भाग घेत होता. अनिसने प्रभावित होऊन अबूला आपला उजवा हात बनवले. आता अबूचे दाऊदच्या घरी येणे जाणे वाढले होते. दाऊद देखील त्याच्यावर खुश होता.

२-३ वर्षात अबू सालेम दाउदचा खास माणूस बनला. दाऊदसाठी त्याने हप्ता वसुली करायला सुरुवात केली. तो अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याकडून खंडणी वसूल करायचा, यामुळे त्याच्या नावापुढे ‘भाई’ ही पदवी जोडली गेली.

१९९३ साली संजय दत्तने अनिस इब्राहिमला फोन केला आणि काही ह*त्यारांची मागणी केली. अनिसने अबु सालेमला त्याच्याकडे पाठवले.

संजय दत्तला भेटायला गेला त्यावेळी त्याचे हातपाय थरथर कापत होते व तो घामाने ओला झाला होता. संजयने जसे अबू सालेमला पाहिले, त्यानंतर त्याने सरळ त्याची गळा भेट घेतली. या घटनेनंतर अबू सालेमच्या नावाचा बॉलिवूडमध्ये मोठा दबदबा निर्माण झाला.

लोक त्याचा आदर करू लागले. तो अनेक पार्टीजमध्ये सहभागी होऊ लागला. अनेकांकडून त्याने पैसे वसूल करण्यास सुरुवात केली.

तेव्हा गुलशन कुमारचे नाव सिने इंडस्ट्रीत गाजत होते, हे बघून सालेमने त्यांच्याकडे ५ लाखाची खंडणी मागितली. पण गुलशन कुमार यांनी देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या सालेमने शार्प शूटर्सला गुलशन कुमारांच्या ह*त्येची सुपारी दिली. काही काळातच सालेमच्या गुंडांनी गुलशन कुमार यांची अंधेरीतील जितेश्वर महादेव मंदिराच्या आवारात तब्बल १६ गोळ्या मारून ह*त्या केली. या घटनेनंतर सालेमच्या नावाचे भय बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्री यांच्या मनात निर्माण झाले. अबू सालेम आता डॉन म्हणून ओळखला जाऊ लागला.

अबू सालेमने मुंबईत आपला दरारा निर्माण केला, त्याने बॉलिवूड सिनेतारकांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केली. या दोन नंबरच्या पैशातून त्याने दुबईला मोठे गाड्यांचे शोरूम उघडले, याच्या ओपनींगसाठी अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. अबू सालेम दिवसेंदिवस मोठा होतो आहे, हे बघून त्याचे अनेक शत्रू निर्माण झाले, त्यात दाऊद इब्राहिमचे नाव देखील होते.

दाऊद इब्राहिमशी अबू सालेमचे भांडण झाले होते. या भांडणानंतर दाऊदची गँग आणि पोलीस त्याच्या मागावर होते. तो दुबईतून निसटून पोर्तुगालला गेला. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड मोनिका बेदी देखील होती, पण दोघेही पोर्तुगालमध्ये जीव मुठीत धरून वावरत होते. अखेरीस पोर्तुगालच्या लिस्बन येथे त्याला अटक करण्यात आली. पोर्तुगालतून त्याला भारतात आणले गेले आणि त्याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

उत्तर प्रदेशच्या एका छोट्या गावातून आलेला अबू सालेम गुन्हेगारी मार्गाने श्रीमंत तर झाला पण ही श्रीमंती अधिक काळ टिकली नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आयुर्वेदाचे जनक मानले जाणारे धन्वंतरी कोण होते..?

Next Post

भारताची पहिली क्रिकेट टीम घेऊन हा राजा इंग्लंडला गेला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

भारताची पहिली क्रिकेट टीम घेऊन हा राजा इंग्लंडला गेला होता

बैद्यनाथने १९४२ च्या छोडो भारत चळवळीत मोलाची भूमिका बजावली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.