The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आग्र्याच्या तुरुंगात काम करणाऱ्या अब्दुलसोबत राणी व्हिक्टोरियाचं अफेअर असल्याच्या चर्चा होत्या

by द पोस्टमन टीम
17 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


२२ जून १८८७.

लंडनच्या बकिंगहम पॅलेसमध्ये एकच गोंधळ उडाला होता. पारंपरिक वेशभूषा परिधान करून भारतीय राजे-महाराजे आणि प्रमुख ब्रिटिश अधिकारी येऊन पोहचले होते. आयर्लंडवर शासन प्रस्थापित करण्याला ५० वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या महाराणीने हा स्वर्णजयंती उत्सव आयोजित केला होता.

सर्व पाहुणे एकमेकांशी चर्चा करण्यात व्यस्त असताना, काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून महाराणी व्हिक्टोरियाचे दरबारात आगमन झाले. सर्वांनी राणीला मुजरा केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका भारतीय युवकाने देखील महाराणीचे स्वागत केले. दोघांची ही पहिली भेट होती.

त्या युवकाचे नाव होते हाफिज मोहम्मद अब्दुल करीम, या युवकाला काही महिन्यापूर्वीच बंकिंगहम पॅलेसमध्ये पाठवण्यात आले होते. पण काही काळातच त्याने राणी व्हिक्टोरियाशी अशी काही जवळीक साधली की तो महाराणीचा उर्दु भाषेचा शिक्षक व एक सल्लागार बनला होता. पण कसा? ते जाणून घेऊ



अब्दुलचा जन्म झाशीच्या ललितपूर येथे १८६३ मध्ये जन्म झाला. त्यावेळी भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात होता. अब्दुल मोठा झाल्यावर तसा तो मध्य प्रदेशातील एका राजाकडे नोकरी करू लागला. १८८० साली त्याने नोकरी सोडली आणि आग्र्याला गेला. तिथे सेंट्रल जेलमध्ये त्याने नोकरी स्वीकारली.

अब्दुल आग्र्याला पोहोचल्याच्या ४ वर्ष अगोदर भारतावर महाराणी व्हिक्टोरियाची सत्ता प्रस्थापित करण्यात आली होती व ईस्ट इंडीया कंपनीच्या हातून सत्ता काढून घेण्यात आली होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१० वर्षांनी २८ जून १८८६ रोजी महाराणीने जॉन विल्यम टेलरला आग्र्याच्या तुरुंगाचा जेलर म्हणून नियुक्त केले.

महाराणी व्हिक्टोरियाचा जन्म अब्दुल करीमच्या जन्माच्या ४४ वर्षांअगोदर २४ मे १८१९ रोजी झाला. माता पित्याचे पाचवे अपत्य असलेल्या महाराणी व्हिक्टोरियाच्या वडिलांचे त्या एक वर्षाच्या असताना निधन झाले. तिच्या आईवर तिच्या पालनपोषणाची जबाबदारी येऊन पडली. त्यांनी अत्यंत कठोर अनुशासनात व्हिक्टोरियाचे पालन पोषण केले. त्यांना कधीच इतरांमध्ये मिसळू दिले नाही. अत्यंत कठोर व गर्भश्रीमंत घराण्यात व्हिक्टोरिया वाढली. २० जून १८३७ रोजी राणी व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राजगादीवर आरूढ झाली.

भारतावर राज्य करण्याच्या अगोदर राणी व्हिक्टोरियाने इंग्लंड आणि आयर्लंडवर राज्य केले होते. भारतावर राज्य केल्यानंतर दशकभराने महाराणीच्या कारकीर्दीची स्वर्णजयंती होती. यासाठी तिने भारतातील काही निवडक राजघराण्यांना आमंत्रित केले होते. पण समस्या अशी होती की महाराणीला इंग्रजी वगळता इतर कुठली भाषा येत नव्हती. यामुळे इंग्रजांनी भारतातील अशाच राजांना निमंत्रण पाठवले ज्यांना इंग्रजी भाषेचे सामान्य आकलन तरी असेल. भारतातील अर्धा डझन राजांना आमंत्रित करण्यात आले. एवढे राजे येतायत म्हटल्यावर भारतीय नोकरांची देखील गरज निर्माण झाली होतीच.

राणीने तिच्या भरवशाच्या जॉन टेलरला या कामात लक्ष घालण्यास सांगितले. टेलरने भारतातून नोकर पाठविण्याचे आदेश देण्यात आले.  १८८७ च्या जून महिन्यात याविषयावर पत्रव्यवहार झाला होता. जॉन टेलरने आग्र्याच्या तुरुंगात काम करणाऱ्या मोहम्मद बख्श आणि अब्दुल करीम याची या कामासाठी निवड केली. त्याला अशा युवकांची निवड करण्यास सांगण्यात आले होते ज्यांना कपडे घालण्याचा सेन्स असेल.

विल्यम टेलरने पारखून या दोघांची निवड केली होती. त्यांना १७ जून रोजी विन्स्टनच्या राजवाड्यात आणण्यात आले.

ज्या राणीच्या साम्राज्यात सूर्य मावळत नाही असे म्हणायचे अशा राणीच्या सेवेत हे दोघेही दाखल झाले.

२० जून १९८७ रोजी अब्दुल आणि मोहम्मद बख्श दोन्ही बंकींगहम पॅलेसमध्ये पोहचले. राणी व्हिक्टोरियाने सगळ्यांची भेट घेतली. दिवस त्यातच गेला आणि रात्रीच्या वेळी मेजवानी आयोजित करण्यात आली. भारतीय राजांसोबत राणी व्हिक्टोरिया या मेजवानीला आली. व्हिक्टोरियाच्या पावलांचे अब्दुल आणि मोहम्मदने चुंबन घेतले.

यानंतर मोहम्मद बख्श भारतात परतला. पण अब्दुल तिथेच थांबला. अब्दुल हळूहळू राणी व्हिक्टोरियाच्या जवळ गेला. तो एखाद्या सावलीप्रमाणे राणीच्या सोबत राहू लागला आणि तिला सल्ले देऊ लागला, तिला हिंदी आणि उर्दू भाषेतील शब्दांचे अर्थ समजावून सांगू लागला.

भारताच्या विषयात राणी त्याचा सल्ला घ्यायची. इतकेच नाही, महाराणीने त्याची भारतीय विषयांचा सल्लागार म्हणून नेमणूक केली.

२० जून १८८७ च्या काळापर्यंत दोघांचे नाते फार घट्ट झाले होते. राणी व्हिक्टोरिया अब्दुलच्या नजरेतून भारताकडे बघू लागली होती. एवढंच काय तर, राणीने त्याला एक महाल देखील दिला होता. त्यावेळी त्या दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चाही ऐकू येत होत्या.

राणी आणि अब्दुल यांची जवळीक इतर लोकांना सहन होत नव्हती, त्यांनी अब्दुलचे चारित्र्य हनन करण्यास सुरुवात केली.

पुढे २२ जानेवारी १९०२ रोजी महाराणीचे निधन झाले. यानंतर इतरांनी अब्दुलचा काटा काढला आणि त्याची पुन्हा आग्र्याला रवानगी केली. इथेच अब्दुलने आठ वर्षांनी शेवटचा श्वास घेतला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या मंदिरातील झुलत्या खांबांचं रहस्य अजूनही शास्त्रज्ञांना उलगडलेलं नाही !

Next Post

डान्सिंग प्लेग – त्या रात्री एक अख्खं शहर शब्दशः नाचून नाचून मेलं होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

डान्सिंग प्लेग - त्या रात्री एक अख्खं शहर शब्दशः नाचून नाचून मेलं होतं

आपल्या फेव्हरेट स्वीप शॉटवर बंदी घालायची मागणी गोलंदाजांनी ICCकडे केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.