The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्कर जिंकल्यामुळे चित्रपटाचा काय फायदा होतो..?

by सोमेश सहाने
12 May 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


कुठल्याही चित्रपटासाठी ऑस्कर मिळवणं हा त्याचा सर्वोच्च बहुमान असतो. जगभरातल्या चित्रपट रसिकांना ऑस्करबद्दल आदर आहे. फक्त पुरस्कारच नाही तर तो सोहळा ही तितकाच दैदिप्यमान असतो. जगातला त्यावर्षीचा सर्वश्रेष्ठ सिनेमा कुठला? हे कसं निवडलं जातं? पुरस्कार मिळविण्यासाठी काय करावं लागतं? याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

1) पुरस्कार कोण देतं? आणि कधीपासून ?

अमेरिकेच्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अँड सायन्सेस या संस्थेकडून हा पुरस्कार 1929 पासून दिला जातो, म्हणजे 90 वर्षांपासून. या पुरस्काराला “अकॅडमी अवॉर्ड फॉर बेस्ट मेरिट” असं म्हटलं जायचं, नंतर यालाच “ऑस्कर” हे नाव प्रचलित झालं.

पुरस्कार म्हणून दिली जाणारी मूर्ती जॉर्ज स्टॅनली यांनी डिजाईन केली आहे तर सेड्रीक गिब्सन यांनी त्या मूर्तीला घडवलं आहे. या मूर्तीत एक योद्धा स्वतःची तलवार धरून एका फिल्म रीलवर उभा आहे. या फिल्म रीलची पाच भोकं ही चित्रपटाचे पाच मूलभूत अंग दर्शवते – निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक आणि तंत्रज्ञ.



ही मूर्ती सोन्याची नसून ब्रॉन्झची आहे, ज्यावर सोन्याचा लेप चढवलेला असतो. ही मूर्ती 13.5 इंच उंचीची असून 3.8 किलो एवढी जड असते.

Academy Awards -

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

एक मूर्ती बनवायला साधारणतः 23,000/- रुपये लागतात. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सोनं नसल्यामुळं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या द्याव्या लागल्या होत्या. मात्र तीन वर्षानंतर त्या बदलून मूळ ब्रॉन्झच्या मूर्त्या देण्यात आल्या.

सोहळ्यामध्ये विजेत्यांचं नाव जाहीर करेपर्यंत गोपनियता पाळता यावी म्हणून सोहळा झाल्यावर त्यांच्या पुरस्कारांवर त्यांचं नाव कोरून दिलं जातं. त्याआधी स्क्रीनवर पुरस्कार मिळतो तेव्हा त्यावर नाव कोरलेलं नसतं.

ऑस्कर्स पुरस्काराच्या मूर्तीसोबत कुठलीच रक्कम दिली जात नाही. पुरस्काराचा लिलाव करून मोठी रक्कम मिळवता येऊ शकते पण तसं करणं 1950 नंतर गुन्हा ठरवलं आहे. पुरस्कार विकला जाऊ नये असं विजेत्यांकडून लिहूनच घेतलं जातं. सांभाळायचा नसल्यास संस्थाच तो पुरस्कार एका डॉलरला विकत घेते.

आतापर्यन्त एकाच ऑस्कर पुरस्काराचा लिलाव झाला आहे, जो प्रसिद्ध कलाकार मायकल जॅक्सन यांनी खरेदी केला होता.

2) ऑस्करामुळे चित्रपटाला काय फायदा होतो?

जर तुम्हाला पुरस्काराची सुंदर ट्रॉफी विकता येऊ शकत नाही, त्यासोबत काही रक्कमही मिळत नाही तर फक्त प्रतिष्ठा मिळते म्हणून हा सोहळा महत्वाचा आहे का? तर नाही, पुरस्कार मिळाल्यामुळे होणारा आर्थिक फायदा आणि त्याने बनलेली एक सिस्टीम मोठी आहे.

एका चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर त्याचा प्रेक्षकवर्ग वाढतो. अंदाजे ऑस्कर जिंकल्यांनतर पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला 100 कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई करता येते. यामुळं अर्थातच निर्माते या फायद्यासाठी स्वतःच्या चित्रपटाला ऑस्कर मिळावा म्हणून प्रयत्न करतात.

हॉलिवूडमध्ये पहिल्या फळीतल्या अभिनेत्यांना एक चित्रपट करण्याचे साधारणतः 6-8 मिलियन यू एस डॉलर्स मिळत असतात. जर त्यांना ऑस्कर मिळाला तर त्यांची फिस 4 मिलियन यू एस डॉलर्सने वाढते, म्हणजे 30 कोटी रुपयांनी वाढते.

ही फिस अभिनेत्रींसाठी अर्ध्या मिलियनने वाढते. अशाच प्रकारे मानांकन मिळालेल्या चित्रपटांना आणि कलाकारांनाही आर्थिक फायदा होतो. म्हणून या शर्यतीत धावण्याला महत्व आहे.

बऱ्याचदा ऑस्कर मिळालेल्या चित्रपटांपेक्षा मानांकन यादीत असलेला एखादा चित्रपट जास्त प्रसिद्ध होतो आणि खूप कमाई करतो. उदा. यावर्षी आलेला जोकर किंवा ला ला लँड. यांना सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार नसतानाही इतर पुरस्कारांमुळे त्यांची कमाई खूप वाढली.

3) पुरस्कार मिळवायला काय करावं लागतं ?

इतर कुठल्याही पुरस्काराप्रमाणे इथेही तुम्हाला तुमचा चित्रपट या संस्थेकडे पाठवावा लागतो. चित्रपटात इंग्रजी सबटायटल असावेत, सेन्सॉरच्या प्रमाणपत्रासह किमान एक आठवडा चित्रपटगृहात चाललेला असावा, अशा काही तांत्रिक अटी पूर्ण करून चित्रपट अकॅडमीला सबमिट होतो.

अकॅडमीमच्या जवळपास 6000 परिक्षकांसाठी या चित्रपटांचं अमेरिकेत लॉस इंजेलीस या शहरात स्क्रिनिंग होतं. चित्रपटाशी निगडित 17 विभागांमधल्या जगभराच्या तज्ञ मंडळींना यामध्ये स्थान असतं. प्रत्येक परीक्षक फक्त त्याच्या विभागाबद्दलच गुण देऊ शकतो. उदा. परीक्षक अभिनेता असेल तर तो लिखाण विभागाला गुण देऊ शकत नाही. फक्त सर्वोत्तम चित्रपटासाठी सगळेच जण मत देऊ शकतात.

भारतातून आतापर्यंत बऱ्याच कलाकारांना परिक्षणाची संधी मिळाली आहे. अनुराग कश्यप, गुणीत मोंगा, अनुपम खेर, झोया अख्तर, शाहरुख खान, तबु, अली फझल, अनिल कपूर, विक्रम बतरा अशी बरीच नाव घेता येतील.

जवळजवळ दोन महिने या स्क्रिनिंग चालतात. जगभरातून आलेले सगळेच चित्रपट सगळ्या परीक्षकांना बघता येतीलच असं नाही. म्हणून त्यांचं लक्ष तुमच्या चित्रपटाकडे जावं यासाठी तुम्हाला जाहिरातबाजी करावी लागते. चित्रपटाची मांडणी आकर्षक वाटेल, त्याची चर्चा तिथे होईल, जागतिक पातळीवर पत्रकार यावर लिहितील यासाठी ठरवून प्रयत्न करावे लागतात.

यासाठी काही दलाल प्रसिद्ध आहेत, ते या चित्रपटांना प्रसिद्धी मिळवून देतात. परिक्षकांसाठी आलिशान पार्टीचं आयोजन करणं, त्यांना प्रलोभन देणं किंवा सहज भेटून तुमच्या चित्रपटा विषयी चर्चा करणं आणि त्यांना हा चित्रपट बघायला भाग पाडणं, ही प्रक्रिया खूप खर्चिक असते. यासाठी किमान दोन महिने चित्रपटाच्या टीमसह तिथं जाऊन रहावं लागतं. आणि एवढं सगळं करून तुम्ही फक्त परीक्षकांना चित्रपट बघायला लावू शकता, यातून जिंकण्याची हमी नसते.

अशा या खर्चिक चक्रामुळ सगळ्याच चांगल्या चित्रपटांची ऑस्कर्सला जाऊन नीट समीक्षा होईल याची शक्यता नसते. म्हणूनच 2019 ला इतर जास्त चांगले चित्रपट वगळून गली बॉय’ला ऑस्करला पाठवण्यात आलं, कारण त्याची दिग्दर्शिका झोया अख्तर त्यावर्षी अकॅडमीच्या परीक्षक विभागात होती, यामुळं चित्रपटाला तिथे प्रसिद्धी मिळू शकली असती.

शेवटी 10 मानांकन निवडली जातात. त्यांना एक ते दहा असा क्रम परीक्षक देतात आणि यात सर्वात जास्त गुण असणाऱ्या मानांकनाचं नाव लिहून लिफाफ्यात सीलबंद केलं जातं. डॉल्बी थिएटरमध्ये जगभरातून आलेले सिनेमाक्षेत्रातील दिग्गज कलाकार रेड कार्पेटवरून आत येतात. जगभरात या सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू होतं, कार्यक्रम सुरू होतो, आणि घोषणा होते, And the Oscar Goes To…


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

बराच लांबचा प्रवास करून गुलाब जामून आपल्या ताटात आलाय

Next Post

वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी देशासाठी शहीद झालेले अमर क्रांतिकारक हेमू कलानी

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी देशासाठी शहीद झालेले अमर क्रांतिकारक हेमू कलानी

नानासाहेब पेशव्यांच्या खजिन्याचं नंतर काय झालं..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.