The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खाण कामगारांसाठी बनवलेल्या जीन्सला हॉलिवूडने जगभर फेमस केलं

by द पोस्टमन टीम
22 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


एखाद्या छोट्या देशाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात दहा बाय दहाच्या खोलीत राहणारी व्यक्ती आणि लंडन-अमेरिकेत मोठ्या “अपार्टमेंट”मध्ये राहणारी व्यक्ती, एखाद्या ऑफिसमध्ये ऑफीसबॉय म्हणून काम करणारा माणूस आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेला एखादा अभिनेता, या सगळ्यांच्या राहणीमानात, कपड्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे “जीन्स”. एकही “जीनची पँट” नाही अशी व्यक्ती विरळंच.

बाजारात विविध प्रकारचे कापड उपलब्ध आहेत. पण त्यातही सगळ्यात टिकाऊ आणि जास्ती मागणी असलेले कापड म्हणजे डेनिम. डेनिम जीन्स दररोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या सगळ्यांच्या आवडीची जीन्स आली कुठून? तिचा इतिहास काय आहे?

जीन्सची उत्पत्ती हा एक योगायोगच होता. डेनिम हा शब्द Serge de Nîmes या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ निम्सचे कापड असा होतो. हे कापड पहिल्यांदा फ्रान्सच्या Nîmes या शहरात बनवले गेले.  अठराव्या शतकात इटलीमधील जेनोवा या शहरात बनवल्या जाणाऱ्या Serge या कापडासारखे कापड फ्रान्समध्ये बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. तसे कापड तर बनले नाही पण एक नवीन कापड त्यांनी तयार केले. त्याचं नाव त्यांनी ठेवलं “Serge de Nîmes”. मग पुढे यालाच लोकं डेनिम म्हणू लागले. अशा प्रकारे डेनिमचे कापड अस्तित्वात आले.

आता आपण आपल्या लाडक्या जीन्सकडे वळूया. डेनिम किंवा डंगरी या कापडापासून बनलेली ही पँट. इटलीच्या जेनोवा शहरात या कापडाला जीन म्हणत म्हणून नाव पडलं “जीन्स”. याचा शोध जैकब डेविस आणि लीवाई स्ट्रॉस यांनी लावला. त्यांनी खरतर ही पँट एका विशिष्ट वर्गासाठी बनवली होती. पण आता ही जगात सगळ्यात जास्ती परीधान केली जाणारी पँट आहे.



१८५१ मध्ये लीवाई स्ट्रॉस आपल्या मोठ्या भावाला व्यवसायात मदत करण्यासाठी जर्मनीहून न्यु यॉर्कला आले. दोन वर्ष त्यांनी भावाला मदत केली. १९५३ मध्ये सोन्याच्या नवीन खाणी शोधायची, खणण्याची सगळ्यांमध्ये चढाओढ सुरु झाली. बरेचसे पश्चिमी देश याच कामात लागले होते.

जेव्हा लीवाईला याबद्दल कळाले त्याने सॅन फ्रान्सिस्कोला जाऊन आपला व्यवसाय वाढवायचा निर्णय घेतला. तिथे त्याने कापडाच्या सोबतच तयार सुती कपडे विकायला देखील सुरुवात केली. तिथे एक जेकब डेविस नावाचा शिंपी होता त्याच्याकडे एकदा एक महिला आली आणि तिने त्याला एक मजबूत कापडाची पँट शिवून मागितली जेणेकरून मेहनतीच्या/मजुरीच्या कामाच्या वेळी तिला काही अडचण येणार नाही.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

जेकबच्या डोक्यात यासाठी डेनिमची पँट शिवायची कल्पना आली. तसे कापड घेण्यासाठी तो लीवाई कडे गेला. पँटला मजबूत करण्यासाठी त्याने खिशांना वगैरे तांब्याचे छोटे छोटे खिळे ठोकले जेणेकरून पँट फाटणार नाही.

ही कल्पना लोकांना फारच आवडली आणि जेकबने जीन्सचे पेटंट घेण्याचे ठरवले यासाठी त्याने लीवाईला पार्टनर म्हणून घेतले.. दोघांनी मिळून एक फॅक्टरी उघडली. आणि अशाप्रकारे जीन्स बाजारात आली.

जीन्समध्ये सगळ्यात जास्ती चालणारा रंग म्हणजे निळा. डेनिमचे कापड दोन धाग्यांनी बनते. एक निळा आणि एक पांढरा. भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या नीळ पासून निळा रंग बनवला जायचा. पुढे मोठ्या प्रमाणात सिंथेटिक इंडिगो बनवायला सुरुवात झाली ज्याचा निळा रंग जास्त टिकाऊ आणि स्वस्त होता. म्हणून बहुतांश करुन निळा रंग वापरला जात असे.

जीन्स सुरुवातीला खाणीत काम करणारे मजूर आणि काऊबॉइज वापरायचे. मग हळूहळू त्याचा प्रसार होत गेला आणि पोलो खेळणाऱ्या लोकांमध्ये जीन्स आवडीचा विषय बनली. म्हणून की काय आजही पोलो खेळणारे मॅच असली की निळी जीन्सच वापरताना दिसतात.

जगात सगळ्यात उत्तम प्रतीच्या जीन्स जपानमध्ये बनवल्या जातात. पण तरीही तिथे आणि नॉर्थ कोरियामध्ये जीन्सची मागणी १०% आहे, याउलट नॉर्थ अमेरिकेमध्ये जगात सगळ्यात जास्ती जीन्सची मागणी असते.

जीन्स सगळीकडे प्रसिद्ध होण्यामागे सगळ्यात महत्वाचा हात Hollywood च्या सिनेमांचा आहे. १९५५ साली जेम्स डीन आपल्या Rebel Without a Cause या सिनेमात जीन्स, टी-शर्ट आणि लेदर जाकेट घालून दिसले. प्रेक्षकांना तो लूक फारच आवडला. आणि त्यानंतर लोकांनी जीन्स खरेदी करायला गर्दी केली.

महिलांमध्ये जीन्सची आवड निर्माण होण्याचे श्रेय अभिनेत्री मर्लिन मनरोला दिले पाहिजे. Misfits या त्यांच्या चित्रपटात त्यांनी जेम्ससारखाच लूक केला होता. आणि त्यानंतर महिलांमध्ये निर्माण झालेली जीन्सची क्रेझ आजतागायत कायम आहे.

८०च्या दशकात बूट-कट्सच्या जीन्सची खूप फॅशन आली होती. याची प्रेरणा खलाशांकडून आली होती. जीन्स खालच्या बाजूने पूर्ण बंद असल्याने त्यांना बूट घालायला अडचण यायची. त्यासाठी खालून कट देऊन त्यांच्या दृष्टीने आरामदायक अशा जीन्स बनवण्यात आल्या आणि लवकरच ग्राहकांनी याला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली. पुढे याला बेल-बॉटम म्हणून ओळखले जाऊ लागले.

तेव्हा पँटलून म्हणून ओळखली जाणारी जीन्स म्हणजेच आजची स्किनी जीन्स फ्रांसनंतर इंग्लंड आणि सगळ्याच युरोपात लाडकी ठरली. खासकरून श्रीमंत लोकांमध्ये ही जीन्स जास्त प्रसिद्ध होती. नंतर मात्र काही काळानी लोकांनी ही जीन्स वापरणं बंद केलं. बॉब डिलन आणि दी बीटल्स यांच्यासारख्या म्युझिक स्टार्समुळे ही जीन्स विशेष फेमस झाली.

डेनिम जीन्सबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊयात-

१. जीन्सचा शोध अमेरिकेत लागला होता परंतु सुट्टीवर असताना सैनिक बाहेर जीन्स घालून फिरायला निघायचे परिणामी अमेरिकेबाहेर लोकप्रियता वाढली.

२. “जीन्स” या शब्दाला ५०च्या दशकात लोकप्रियता मिळाली. त्याआधी, त्यांना सहसा ओवरऑल असे म्हटले जात होते.

३. जीन्सच्या पुढच्या खिशात असलेले लहान खिसे मुळात पॉकेट वॉचसाठी डिझाइन केले होते. आजकाल, मनगट घड्याळे बरेच लोकप्रिय आहेत, परंतु घड्याळ खिशात बर्‍याच जीन्सवर स्टायलिस्टिक स्पर्श आणि त्यांच्या इतिहासाची खुण म्हणून कायम ठेवले आहे.

इतक्या वर्षांपूर्वी चुकून शोध लागलेल्या या कापडाच्या पँटची क्रेझ आजही तितकीच आहे. फिरून फिरून तिच फॅशन पुन्हा येते पण तरीही लोक प्रत्येक वेळी तितक्याच उत्साहाने त्याची खरेदी करतात. कितीही जीन्स असल्या तरी त्या कमीच पडतात.

अशा या आगळ्यावेगळ्या पण लोकप्रिय शोधाबद्दल आज इतकंच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

म्हणून या हंगेरियन शास्त्रज्ञांना ‘द मार्शियन्स ऑफ सायन्स’ म्हणतात

Next Post

गोर्टा कांड – हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवाला बाग

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

गोर्टा कांड - हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवाला बाग

युरोपातून आलेला पाव आज आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.