The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नक्षलवादाविरुद्ध छेडलेल्या सलवा जुडूम या जनआंदोलनाचं पुढं काय झालं?

by Shripad Kulkarni
4 April 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


छत्तीसगड म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले काय येतं? अर्थातच नक्षलवाद! तिथे होणाऱ्या क्रू*र घटना, आपला स्वतःचा जीव वाचवणारे लोक.

इथल्या जंगलांमध्ये सहज फिरायला म्हणून जाण्याचा कोणी स्वप्नातही विचार करणार नाही.

तर आपण आज जाणून घेणार आहोत की हे सलवा जुडूम नेमकं काय आहे ? जरी ही नक्षलवादाविरोधात चालू झालेली मोहीम नेमकी काय होती, तिच्यासाठी कोण लढलं होतं व या सलवा जुडुममधून कोणाला फायदा झाला व त्याचे परिणाम काय झाले हे तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून वाचायला मिळेल.

छत्तीसगडमधल्या दंतेवाडा या भागाला नक्षलवाद्यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते. दंतेवाडा येथे खू*न करण्याची संधी मिळणे म्हणजे नक्षलवाद्यांच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट मानली जाते.

स्वातंत्र्यापासूनच इथे असलेला भयंकर नक्षलवाद ही इथल्या स्थानिक राजकारण्यांच्या डोकेदुखीचे कारण ठरला होता.



पोलीस प्रशासन, मिलिटरी, सुरक्षा यंत्रणा सगळ्यांनी प्रयत्न करूनही नक्षलवादी काही आटोक्यात येत नव्हते. तेव्हाच छत्तीसगडच्या सुमारे २०० गावांनी एक एक मोहीम सुरू केली होती जिचं नाव होत सलवा जुडूम.

‘सलवा जुडूम’ हा गोंदी भाषेतील एक शब्द असून त्याचा अर्थ शांतीचा समूह असा होतो. या सलवा जुडूमच्या अंतर्गत स्वयंरोजगार तयार करणे, सुरक्षा कार्यक्रम घेणे असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम व नक्षलवादाविरुद्ध गावकाऱ्यांमध्ये हिम्मत वाढवण्याचे कामे करण्यात येत होती.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या अभियानाचे नेतृत्व छत्तीसगडमध्ये टायगर म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस नेता महेंद्र कर्मा हे करत होते. ते २००४ पासून २००८ पर्यंत पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे नेते मानले जात होते. त्यांचा जन्म दंतेवाडाच्या दाराबोडा कर्मा या गावात झाला होता. तिथेच वाढल्याने त्यांना नक्षली समस्यांची माहिती होती.

त्यांनी फार पूर्वी देखील नक्षलवाद्यांच्याविरोधात जनजागृतीचं काम सुरु केलं होतं. पण २००५ साली सलवा जुडूमची स्थापना करून या जनजागृतीचा अर्थच बदलला.

सलवा जुडूम हे शांतता अभियान आहे हा तर्क हा महेंद्र कर्मा यांचाच होता पण हा तर्क खरंच तसाच होता ?

हे खरंतर अहिं*सेच्या नावाखाली एक हिं*सक आंदोलन होते.

सलवा जुडूम अभियानात नक्षल प्रभावित गावांच्या रहिवाशांना व आदिवासी समाजाला सामील करून घेतलं गेलं होतं व त्यांना असा विश्वास दाखवण्यात आला होता ही हे सगळं अहिंसेच्या मार्गाने होईल जसं की उपोषण, मोर्चे, विरोध प्रदर्शन वगैरे. पण थोड्याच दिवसांत या सगळ्या आंदोलनाची प्रतिमाच बदलायला सुरवात झाली.

गावकाऱ्यांकडे तलवारी, चा*कू, धनुष्यबाण व शेवटी बं*दुका पोहोचवल्या गेल्या. त्यांना बेकायदेशीर गणवेश दिला गेला व सांगण्यात आलं की ते आजपासून पोलीस विभागाचा एक भाग आहेत.

दोन वेळ पोटासाठी जेवणसुद्धा न मिळवू शकणाऱ्या गावकऱ्यांना हे सगळं कुठल्या पार्टीपेक्षा काही कमी नव्हतं. कारण त्या सगळ्यांना या कामाचे पैसे मिळत होते. आता प्रश्न असा होता की केवळ महेंद्र कर्मा हे अभियान चालवत होते? तर नाही! हे इतकं सोपं नव्हतं.

मानवाधिकार संघटनेने आपल्या अहवालात असा दावा केला की, सलवा जुडूम या अभियानाला केंद्र व राज्य सरकारचा संपूर्ण पाठिंबा होता व त्यांनी या अभियानासाठी अतिरिक्त सुरक्षा बळसुद्धा दिलं होतं. अधिकाऱ्यांनी व हवालदारांनी गावकऱ्यांना नेमबाजीसुद्धा शिकवली होती.

एवढंच नाही तर यांना पोलीस विभागात SPOचं पदसुद्धा दिलं गेलं. हे एक असं पद होतं ज्याला अधिकारी स्तरावर जास्त काही अधिकार नव्हते. या अभियानात बरीच कामे करून घेतली जात होती ज्यांच्यासाठी गावकऱ्यांना २१०० रुपये मासिक वेतन दिलं जात होतं. व इतर गोष्टींमध्ये सहभाग असेल तर ही रक्कम तीन हजारांपर्यंत होती.

सलवा जुडूम अभियानातल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी व राखीव पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी कित्येक नक्षलवाद्यांना पकडलं होतं तर काहींचे एन्काऊंटर झाले होते.

कालांतराने या सालवा जुडुमबद्दल नक्षलवाद्यांच्या मनात भीती निर्माण होऊ लागली होती. पण या अभियानामुळे महेंद्र कर्मा यांच्यावर नक्षलवाद्यांचा राग वाढत होता.

असं वाटतच होतं की छत्तीसगडमधून नक्षलवाद कायमचा संपेल पण हे कदाचित नियतीला मान्य नव्हतं.

नंतर सलवा जुडूम हे अभियान एक प्रकारचा असंविधानीक करार तयार झाला.

नक्षलवाद्यांच्या आणि सलवा जुडुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आता संघर्ष चांगलाच पेटला होता. यात हानी एकाच बाजूची होत नव्हती. सलवा जुडुममधल्या कार्यकर्त्यांवरही वार होऊ लागले होते. नक्षलवाद्यांना शेवटी आपल्या साथीदारांच्या झालेल्या मृत्यूचा बदला तर घ्यायचाच होता. नंतर २००६ साली नक्षलवाद्यांनी ड्रोनपालमध्ये तब्बल ३० सलवा जुडूमच्या कार्यकर्त्यांची लँडमाईनचा स्फो*ट घडवून त्यांची ह*त्या केली होती.

पण हे सगळं इथेच थांबणार नव्हतं, त्याच वर्षी गंगापूर गावात ७ SPO ना अत्यंत वाईट पद्धतीने मारण्यात आलं होतं. या घटना दिवसेंदिवस सामान्य होत होत्या. हा संघर्ष काही केल्या संपत नव्हता हे पासून सरकारने आदिवासी लोकांचं मत न घेताच सुमारे ६०० गावे खाली करण्याचा निर्णय घेतला होता. यात झालं असं की १ लाखापेक्षा जास्त आदिवासी बेघर झाले व काही लोकांनी तर राज्यातूनही पलायन केले.

जे अभियान सुरवातीला शांततेत चालू झाले होते, त्याने आता हिं*सक वळण घेतले होते. २००५ साली राज्यात भाजपाचे सरकार आले आणि रमण सिंह मुख्यमंत्री बनले. त्यांना या सलवा जुडूमच्या अभियानाची अडचण नव्हती. काँग्रेस नेत्यांच्या बळावरच राज्यातून नक्षलवाद संपेल असं त्यांना वाटलं होत पण असं झालं नाही.

महेंद्रसिंग कर्मा यांना आदिवासी समाजाचा एक मोठा गट खलनायकाच्या भूमिकेत पाहू लागला. कर्मा यांच्यामुळेच कित्येक आदिवासी लोकांचं राज्यातून पलायन झालं होतं पण कर्मा या आरोपाचं साफ खंडन करत.

२००८च्या निवडणुकीपूर्वी कर्मा यांचा रुबाब व त्यांचा वचक मुख्यमंत्री रमणसिंग यांच्यापेक्षा कमी नव्हता. पण २००८च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर त्यांचा हा रुबाब संपला व त्यांनी सलवा जुडूममधून काढता पाय घेतला.

राज्यात चाललेल्या संघर्षाला मानवाधिकार संघटनेने सुप्रीम कोर्टात पोहचवले होते. पण शेवटी सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलं की माओवाद्यांशी निपटण्याचं काम हे पोलीसयंत्रणा व प्रशासनाचं आहे.

या सगळ्या प्रकरणात स्थानिक प्रशासन आपला कमीपणा झाकण्यासाठी कोणाचाही जीव देऊ शकत होतं. अशा बऱ्याच घटना घडल्या व शेवटी हे आंदोलन असंविधानीक आहे हे नमूद करून बंद करण्यात आले.

काही लोकांना असं वाटलं की हे आंदोलन बंद करणं म्हणजे नक्षली संघटना जिंकल्या आणि याच भावनेतून सलवा जुडूमचे कार्यकर्ते व नेते अचानक रस्त्यावर उतरले. राज्य व केंद्र सरकारने आपलं समर्थन काढून घेतलं.

आता झालं अस होत की हे अभियानकर्ते पोलीस व नक्षलवादी या दोघांच्याही निशाण्यावर आले होते. आता त्यांना कुठलच संरक्षण नव्हतं हे पाहून नक्षलवाद्यांनी सलवा जुडूमच्या नेत्यांना आपला निशाणा बनवला होता.

या निशाण्यावर असणाऱ्या लोकांत सर्वात आधी होते ते महेंद्रसिंग कर्मा. कारण नक्षलवाद्यांना ही भीती होती की जर हे कर्मा टिकले ते हे पुन्हा सलवा जुडूम अभियान चालू करू शकतात.

महेंद्र कर्मा यांच्यावर नक्षवाद्यांनी कित्येक वेळा ह*ल्ला केला होता. पण त्यांना असलेल्या Z+ सुरक्षेमुळे ते आजवर वाचले होते.

२५ मे २०१३ रोजी नशिबाने त्यांची साथ दिली नाही व ते मारले गेले. हा ह*ल्ला काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर मोठा ह*ल्ला होता ज्यात कर्मा यांच्यासह २३ लोकांचा मृत्यू झाला होता. ही ती घटना होती जिथे सलवा जुडूमचा पुनर्जन्म होईल अशी चर्चा जागीच बंद झाली होती.

आजच्या घडीला सलवा जुडूमचे कित्येक जुने कार्यकर्ते भीतीखाली आपलं जीवन जगत आहेत. २००८ पासून आजपर्यंत नक्षलवाद्यांनी तब्बल १५० पेक्षा जास्त सलवा जुडूमच्या लोकांना मारलं आहे आणि असे अजून कित्येक बाकी आहेत.

गावे पुन्हा वसली आहेत पण मध्यंतरी दंतेवाडा येथे झालेल्या नक्षली ह*ल्ल्याने सलवा जुडूमला पुन्हा जिवंत करण्याचा आवाज दिला आहे.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

म्हणून लिंकन यांची अमेरिकेच्या महान राष्ट्रपतींमध्ये गणना होते

Next Post

या सैनिकाने पहिल्या महायु*द्धातल्या लाखो भारतीय सैनिकांची व्यथा जगासमोर मांडलीय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या सैनिकाने पहिल्या महायु*द्धातल्या लाखो भारतीय सैनिकांची व्यथा जगासमोर मांडलीय

पाण्यासाठी या देशात यु*द्ध झालंय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.