The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फ्रेंच आणि अमेरिकन लोकांच्या क्राउड फंडिंगमधून ‘स्टॅचू ऑफ लिबर्टी’ उभा राहिला

by द पोस्टमन टीम
12 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


अमेरिकेचा मानबिंदू असलेला स्वातंत्र्य देवतेचा पुतळा अर्थात ‘स्टॅचू ऑफ लिबर्टी’, हा जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. न्यूयॉर्क शहराच्या मॅनहॅटन बेटावर हा पुतळा आहे. अमेरिकेला फ्रान्सने हा पुतळा भेट म्हणून दिला होता. फ्रेंच लोकांनी रक्कम जमवून हा पुतळा बांधल्याचे मानले जाते.

पण जेव्हा पुतळा अमेरिकेला आणण्यात आला त्यावेळी हा पुतळा एका दगडी मनोऱ्यावर उभा केला गेला, ज्याची निर्मिती अमेरिकेत करण्यात आली होती.

जोसेफ पुलित्झर नावाच्या एका वृत्तपत्र प्रकाशकाने यासाठी अमेरिकेत देणगी गोळा केली होती.

फ्रेंच लेखक आणि कवी एदुआर्ड दी लॅब्युले याने सर्वप्रथम अमेरिकेला स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला पुतळा फ्रान्सकडून देण्यात यावा असा विचार मांडला.

फ्रेडीक ऑगस्ट बार्थोडी नावाचा फ्रेंच मूर्तिकार ह्या कल्पनेने प्रभावित झाला आणि त्याने त्या पुतळ्याच्या निर्मितीसाठी आपली कल्पना शक्ती लावून एक डिझाईन तयार केली.



तो पुतळा बांधायला तयार होता फक्त अडचण होती की कोण त्या पुतळ्याच्या बांधकामासाठी पैसे देईल?

या स्टॅच्यूच्या निर्मितीसाठी एका फ्रेंच अमेरिकन युनियनने १८७५ साली पुढाकार घेतला. या युनियनने एक सार्वजनिक पत्रक काढलं, ज्यात त्यांनी पुतळ्याच्या निर्मितीसाठी लोकांना पुढाकार घेण्याची मागणी केली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

त्यांनी त्या पत्रात स्पष्ट केलं होतं की फ्रान्सच्या जनतेकडून फक्त पुतळ्याची निर्मिती होईल पण हा पुतळा ज्या दगडी मनोऱ्यावर उभारला जाईल त्यासाठी लागणारा पैसा अमेरिकन लोक गोळा करतील.

अटलांटिक माहासागराच्या दोन्ही बाजूंना डोनेशन ड्राइव्ह घेण्यात आले. १८७५ साली पैसे जमविण्याची संकल्पना सर्वमान्य झाली आणि फ्रान्स सरकारकडून देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळाली. फ्रान्सच्या वेगवेगळ्या शहरांच्या वतीने देखील यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उभारला होता. गावं आणि वस्त्यांवरून देखील यासाठी निधी गोळा करण्यात आला होता. हजारो फ्रेंच शाळकरी मुलांनी यासाठी देणगी दिली होती. अमेरिकन राज्यक्रांतीच्या लढ्यात बलिदान दिलेल्या फ्रेंच सैनिकांच्या वारसांनी देखील ह्या पुतळ्याच्या निर्मितीसाठी निधी दिला होता. एका तांब्याच्या निर्मात्याने तांब्याचे पत्रे ह्या पुतळ्याच्या निर्मितीसाठी दिले होते.

जेव्हा ह्या पुतळ्याच्या हाताचे आणि दिव्याचे अनावरण १८७६ साली अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथे आणि नंतर न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध मेडिसन चौकात करण्यात आलं त्यावेळी ह्या पुतळ्याच्या निर्मितीसाठीच्या देणगीत तिप्पट वाढ झाली. परंतु पुतळा बांधण्यासाठी लागणाऱ्या पैशाची गरज जरी पूर्ण होत असली तरी दिवसेंदिवस पुतळ्याची किंमत वाढत चालली होती.

पुढे पुतळ्याच्या निर्मितीसाठी पैसे कमी पडू लागल्याने फ्रेंच अमेरिकन युनियनने नवीन मार्ग पत्करला, त्यांनी पॅरिस शहरात लॉटरी काढायला सुरुवात केली. यात त्यांनी अनेक भेटवस्तू आणि जत्रेची तिकिट लोकांना वाटली. लॉटरीची योजना यशस्वी झाली आणि पैसे उभे देखील राहिले तरी ते पुरेसे नव्हते. अखेरीस बार्थोडीने पुढाकार घेऊन पुतळ्याच्या काही छोट्या प्रतिकृतींची निर्मिती करून लोकांची नावे टाकून त्यांना विकायला सुरुवात केली.

अखेरीस १८८० मधे फ्रेंच अमेरिकन युनियन यांनी पुतळ्याच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी उभा राहिल्याची घोषणा केली.

पुतळ्याच्या निर्मितीची एकूण किंमत ही २० लाख फ्रॅंक इतकी होती. पण पुतळ्याला न्यूयॉर्कमध्ये उभं रहायला अजून सहा वर्षांचा कालावधी लागला होता. आज स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेतील एक स्टेट्स सिम्बॉल बनला असला तरी त्या त्याला उभं करण्यासाठी त्यावेळी अमेरिकेतल्या लोकांना एकत्र करायला मोठा संघर्ष करावा लागला होता.

१८७१ साली बार्थोडी अमेरिकेत पुतळ्याच्या प्रमोशनसाठी गेला होता, त्याने १८७६ सालापर्यंत तिथल्या लोकांत पुतळ्याविषयी कुतूहल निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने ४ जुलै ह्या अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी पुतळ्यासाठी संभाव्य पर्यायी जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याने बेडलो बेटावरील पुतळ्याच्या संभाव्य जागेची पाहणी देखील केली.

बार्थोडीच्या प्रयत्नानंतर देखील त्याचा पुतळ्याची कल्पना लोकांच्या पसंतीस उतरत नव्हती. न्यूयॉर्क टाईम्स ह्या प्रसिद्ध वृत्तपत्राने तर ह्या पुतळ्याच्या बांधकामाला विरोध देखील केला होता.

जेव्हा फ्रेंच लोकांनी १८८० साली पुतळ्याला आवश्यक ते पैसे जमले असल्याची घोषणा केली, त्यावेळी १८८२ सालापर्यंत त्या पुतळ्या खालचा दगडी मनोरा उभारण्यासाठी लागणारा निधी अमेरिकन लोकांनी उभा केला नव्हता.

फिलाडेल्फियाला आधी पुतळ्याच्या काही अंगांचे प्रदर्शन भरवल्यामुळे न्यूयॉर्कच्या लोकांना वाटलं की हा पुतळा फिलाडेल्फिया शहरात बांधला जाईल आणि न्यूयॉर्कला काहीच मिळणार नाही. मग बार्थोडीने एक युक्ती केली त्याने घोषणा केली की जर न्यूयॉर्कचे लोक पुतळा घेण्यासाठी तयार नसतील तर हा पुतळा बोस्टनचा लोकांना देण्यात येईल, जे त्याचा स्वीकार करण्यासाठी तयार आहेत.

बार्थोडीच्या या कल्पनेला यश आलं, पुतळा आपल्या हातून कायमचा जाईल या भीतीने न्यूयॉर्कच्या लोंकानी त्या दगडी मनोऱ्याच्या निर्मितीसाठी पैसे गोळा करायला सुरुवात केली.

 

pulizer the postman

यासाठी अडीच लाख डॉलर्सचा खर्च येणार होता. अगदी न्यूयॉर्क टाईम्सने देखील पुतळ्याला असलेला विरोध यामुळे मागे घेतला. विविध प्रकारचे कार्यक्रम, कला प्रदर्शन, यांच्या माध्यमातून पैसे उभारण्याचा प्रयत्न हाती घेण्यात आला.

१८८० साली एका  माध्यमातून पुतळ्यासाठी पैसे उभे करण्याचे प्रयत्न सुरू झाले. इमा लझारुस नावाच्या कवियत्रीने ह्या पुतळ्यावर कविता देखील लिहली. पण एवढं असूनही पैसे उभे राहिले नव्हते.

तिकडे फ्रान्समध्ये पुतळा बांधून तयार होता आणि इकडे त्याच्यासाठी आवश्यक बांधकाम देखील झालेलं नव्हतं.

अखेरीस न्यूयॉर्कचा एक प्रकाशक जोसेफ पुलित्झर मदतीसाठी पुढे आला, ज्याने नुकतंच न्यूयॉर्क सिटी डेली हे वृत्तपत्र विकत घेतलं होतं, त्याने घोषणा केली जो कोणी ह्या पुतळ्यासाठी निधी देईल त्याचे नाव तो पेपरात छापेल, भले त्या व्यक्तिने केलेली मदत ही अत्यल्प का असेना.

पुलित्झरच्या कल्पनेला यश आलं, आणि असंख्य लोकांनी लाखों रुपयांची देणगी ह्या पुतळ्याच्या निर्मितीसाठी देऊ केली. अमेरिकेच्या शाळकरी मुलांनी देखील ह्या पुतळ्यासाठी पैसे उभारले.

एका केजीमध्ये शिकणाऱ्या आयोवा नावाच्या मुलीने देखील १ डॉलर ह्या स्मारकासाठी दिला होता. पुलित्झर आणि न्यूयॉर्क वर्ल्ड ह्या त्याच्या दैनिकाने घोषणा केली, १ लाख डॉलर्सचा निधी दगडी मनोऱ्याच्या उभाणीसाठी उभे करण्यात यश आले आहे.

एका वर्षात हा मनोरा उभा राहिला आणि त्याच्या पुढच्या वर्षी न्यूयॉर्कच्या जनतेला त्यांच्या मनातील स्मारक मिळाले.  आज हे स्मारक न्यूयॉर्कमध्ये दिमाखात उभे असून ह्या स्मारकासाठी कष्ट घेणाऱ्या लोकांची नावे इतिहासात अजरामर झाली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एका दरोडेखोराचं अर्धवट जळालेलं प्रेत कामाला आलं आणि शरीरशास्त्राचा पाय रचला गेला

Next Post

एका वृत्तपत्रात छापलेल्या चुकीच्या ओळीमुळे महात्मा गांधींचा नोबेल हुकला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

एका वृत्तपत्रात छापलेल्या चुकीच्या ओळीमुळे महात्मा गांधींचा नोबेल हुकला होता

भारतीय चहावर ब्रिटिशांनी कर लावला आणि अमेरिकन राज्यक्रांतीला तोंड फुटले

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.