The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात तो तब्बल १३ वर्ष जेलमध्ये होता!

by द पोस्टमन टीम
24 February 2020
in वैचारिक
Reading Time: 1 min read
0
fake rape feature
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

एका माणसाने आयुष्याची तेरा वर्ष एखाद्या तुरंगात काढली आणि नंतर सिद्ध झालं त्याने तो गुन्हा केलाच नव्हता, तर त्याची काय अवस्था होईल? आश्चर्यजनक असला तरी हा प्रकार चीनमध्ये घडला आहे.

चीनच्या शेंडोंग प्रांताचा रहिवासी असलेल्या झेंग झिकाओ ह्याची नुकतीच खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

त्याच्यावर गाओ नामक मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २००६ साली हा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला होता. तो तेव्हा १६ वर्षांचा होता आणि कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा केली होती. त्याला चीनच्या लिन्सी म्युन्सिपल कोर्टाने मुक्त केले आहे. कुठलाही सबळ पुरावा नसतांना त्याला जबरदस्तीने कोर्टाने शिक्षा केली, याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.



गाओ नावाची मुलगी जानेवारी २००५ साली आपल्या पुपील शाळेतून अचानकच गायब झाली. मग तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी त्यांची तपास यंत्रणा कामी लावून शोध घ्यायला सुरुवात केली. तिचा मृतदेह शाळेच्या स्वछतागृहात सापडला. दोन दिवसांनी पोलिसांनी झेंगला अटक केली.

पुढे त्याला लिन्सी म्युनिसिपल कोर्टात हजर करण्यात आले. त्याला कोर्टाने २००६ साली ह्या गुन्ह्यात आरोपी म्हणून दोषी घोषित केले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याच्यावर असा आरोप होता की त्याने गाओचा बलात्कार केला, तिला मरेपर्यंत गळफास लावला आणि तिच्या शरीराला ओढून त्याने स्वच्छतागृहात आणून फेकले.

हे देखील वाचा

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

१५ वर्षाच्या मुलीने लिहिलेली प्रौढ कादंबरी ‘द आउटसायडर्स’ इंटरनॅशनल बेस्ट सेलर बनलीय

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

 

या कामात त्याचा मित्र वांग याने मदत केली म्हणून त्याला देखील शिक्षा करण्यात आली.

त्याला २००६ साली तीन वर्षांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनवण्यता आली. झेंग आणि वांगने पोलिसांना दिलेल्या जबाबात आपला गुन्हा कबूल केला होता. पण त्याच्या घरच्यांना त्याने सांगितलं की त्यावेळी पोलिसांनी जबरदस्तीने त्याच्याकडून तो गुन्हा कबूल करवून घेतला होता. हे ऐकल्यावर त्या परिवाराला धक्काच बसला.

२०११ साली त्याच्या परिवाराने त्याच्या मुक्ततेसाठी कोर्टात याचिका दाखल केली. पण लिन्सी कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. पण आपल्यावर झालेला अन्याय सहन करण्याची झेंगच्या कुटुंबीयांची अजिबात मानसिकता नव्हती, त्यामुळे त्यांनी झेंगसाठी न्यायालयीन लढा देण्यास सुरुवात केली.

त्यांनी शॅडोन्गच्या मुख्य न्यायालयात अर्ज याविरोधात अर्ज केला. परंतु त्याठिकाणी देखील त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. पुढे २०१६ आणि २०१७ साली ततीनवेळा कोर्टात याचिका दाखल केली. तिन्ही वेळा याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली ती देखील फेटाळण्यात आली, अखेरीस त्यांनी बीजिंग येथील चिनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले पण ह्या ठिकाणी देखील त्यांच्या नशिबी उपेक्षाच येत होती.

 

सलग दोन वर्ष प्रयत्न केल्यानंतर देखील त्यांची याचिका सुप्रीम कोर्टाने मान्य केली. अखेरीस २०१९ साली सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका मान्य केली.

सुप्रीम कोर्टाने झेंग यांच्या याचिकेत घेतलेले आक्षेप असण्याची तपास यंत्रणेला ह्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले. जेव्हा तपास यंत्रणेने ह्या प्रकरणाची चौकशी सुरु केली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. झेंगचे वीर्य देखील गाओच्या शरीरात सापडले नाही.

अजून तपास केल्यावर झेंगचा गाओ वर झालेल्या बलात्काराशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आणि तपास यंत्रणेने तत्कालीन लिन्सी पोलिसांना त्यांच्या चुकीच्या तपासासाठी व खोट्या गुन्ह्यात निर्दोष व्यक्तीच्या आयुष्याचा बळी घेतल्याचा आरोपाखाली दोषी सिद्ध केले.

सुप्रीम कोर्टाला जेव्हा ह्या प्रकरणात तपास यंत्रणेचा रिपोर्ट हाती लागला, तेव्हा त्यांना देखील मोठा धक्का बसला. सुप्रीम कोर्टाने झेंगची निर्दोष मुक्तता केली आणि त्याचा मित्र वांग गुंगझो याची देखील कोर्टाने मुक्तता केली.

शिवाय झेंगवर झालेल्या अन्यायासाठी झेंग आणि त्याची आई मा युपिंग यांची माफी देखील मागितली आणि प्रशासनाला झेंग आणि वांग यांना नुकसान भरपाई देण्याचे देखील आदेश देऊ केले आहे.

कोर्टाने पोलिसांनी चांगलीच फटकार लगावत अक्षम्य चूक केली म्हणून तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांना दंड ठोठावला आहे. ह्या एका केसमुळे माझ्या मुलाचे भविष्य अंधकारात गेले असल्याची भावना मा युपिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली. आपल्या संघर्षाला अखेर विजय मिळाला असल्याची भावना झेंग यांनी व्यक्त केली आहे.

चीनमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतर निर्दोष मुक्तता करण्याची ही तिसरी वेळ आहे.

अगदी मागच्याच आठवड्यात चीनच्या शिनझियांग प्रांतात ली जियांगॉन्ग नावाच्या तरुणाला एका ७५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून त्या महिलेची हत्या केल्याच्या गुन्ह्यात दिलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.

त्याने देखील आपल्या मुक्ततेसाठी ११ वर्षांचा संघर्ष केला आहे. चीनमधील न्यायपालिकेने याची गंभीर दखल घेतली आहे. खोट्या बलात्काराच्या अथवा खुनाच्या गुन्ह्यात एखाद्या व्यक्तीला शिक्षा होण्याचा हा पहिलाच प्रकार नसून ह्या आधी देखील जगभरात अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली अनेक निर्दोष व्यक्तींना शिक्षा करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. भारतात देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात १९८९ साली एका बलात्काराच्या गुन्ह्यात पाच कृष्णवर्णीय तरुणांना असंच खोट्या आरोपाखाली तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

 

त्यांच्यावर देखील खोटा जबाब दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना पुढे निर्दोष सिद्ध करण्यात आलं होतं.

त्यांच्या आयुष्यावर नेटफ्लिक्सने एक वेब सिरीज देखील बनवली असून त्या वेबी सीरिजला पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे. ओप्रा विन्फ्रे ही प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही सेलिब्रिटी ह्या सीरिजची सहनिर्माती आहे.

उशिरा का होईना पण न्याय मिळाला आपण असं म्हणत जरी असलो तरी त्या व्यक्ती त्यामुळे जो त्रास होतो त्याची तुलनाच होऊ शकत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: China
ShareTweet
Previous Post

घटनेच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलेचा विस्मृतीत गेलेला इतिहास

Next Post

हंबीरराव मोहिते – आपल्या चाणाक्ष बुद्धीने स्वराज्याला श्रीमंत करणारा सरसेनापती

Related Posts

विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
वैचारिक

१५ वर्षाच्या मुलीने लिहिलेली प्रौढ कादंबरी ‘द आउटसायडर्स’ इंटरनॅशनल बेस्ट सेलर बनलीय

11 November 2024
इतिहास

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

14 January 2026
विश्लेषण

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी महान शास्त्रज्ञ ‘निकोला टेस्ला’सुद्धा प्रभावित झाला होता

21 September 2025
इतिहास

मॅकीयावेलीचे विचार ऐकून हि*टल*र, मुसोलिनीचे पण फ्युज उडाले असते..!

28 January 2025
वैचारिक

थोर तत्वज्ञ प्लेटोला राजकारणात यायचं होतं पण…

25 December 2025
Next Post

हंबीरराव मोहिते - आपल्या चाणाक्ष बुद्धीने स्वराज्याला श्रीमंत करणारा सरसेनापती

जसुबेन शिल्पी - भारताची ब्राँझ क्वीन

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.