The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्काट्रेझ जेल आता बंद झालंय पण तिथले किस्से आजही जगभर प्रसिद्ध आहेत…!

by Heramb
4 January 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तुरुंग म्हटलं की त्या ठिकाणी कठोरता, सुरक्षेच्या कठोर उपाययोजना, निर्दयता, विलगीकरण या गोष्टी येणारच. भारतातील अंदमानमधील सेल्युलर जेल एखाद्या कठोर तुरुंगाचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबरच अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी सेल्युलर जेलची आणि तेथील कठोरतेची केलेली वर्णने वाचल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

विदेशातही असेच काही ‘मॅक्सिमम सिक्युरिटी जेल्स’ असतात. अशा जेल्समधूनही अनेक कैदी पळून गेल्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत. पण अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्को जवळ एक असं जेल आहे, जिथून आजवर केवळ तीनच कैदी पळून जाण्यास यशस्वी ठरले आहेत. त्या तिघांचाही पुढे काही थांगपत्ता लागलेला दिसत नाही.

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका एक विशाल आणि सुंदर देश आहे. मोठ्या शहरांची गजबज, नैसर्गिक शांतता, तुम्हाला हवं ते सगळं इथे आरामात मिळू शकतं. संपूर्ण अमेरिकेत प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाच्या मनात स्वतःचा प्रवासाचा कार्यक्रम तयार असतो आणि त्यांना जे काही अनुभवायचे आहे, ते त्यांना निश्चितपणे अनुभवता येते. पण कुप्रसिद्ध अल्काट्रेझ बेट याठिकाणी कोणत्याही पर्यटकाला जायला आवडणार नाही.

अल्काट्रेझ जेलमधून २९ वर्षांत ३६ कैद्यांनी पलायन करण्याचे प्रयत्न केले. त्यापैकी २३ कैद्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले, सहा कैद्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले तर दोघे जण या जेलमधून पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना समुद्रात बुडाले. फ्रँक मॉरिस, जॉन अँग्लिन आणि क्लेरेन्स अँग्लिन यांनी आतापर्यंत आखलेल्या सर्वांत गुंतागुंतीच्या सुटकेच्या योजनांपैकी एक योजना यशस्वीपणे अंमलात आणली. पण या तिघांचे पुढे काय झाले याचा तपास एफबीआयला देखील करता आला नाही.

अल्काट्रेझ जेल अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून सुमारे १ मैल अंतरावर आहे. सॅन फ्रॅन्सिस्कोचा उन्हाळाही एखाद्या बाहेरील पर्यटकासाठी भयाण हिवाळा ठरतो इतकं तिथलं हवामान थंड असतं. त्यामुळे इथल्या समुद्राचं पाणीसुद्धा हाडं गोठवणारंच आहे. या समुद्राच्या मधोमध २२ एकर बेटावर असलेलं हे तुरुंग जगातील सर्वांत भीतीदायक तुरुंगांपैकी एक मानलं जातं.



या तुरुंगातून एखादा कैदी सुटला तरी हाडं गोठवणाऱ्या समुद्राच्या थंड पाण्यातून सॅन फ्रॅन्सिस्कोच्या मुख्य भूमीवर जाणं जवळ जवळ अशक्यच! कारण या जेलमध्ये कैद्यांना रोज फक्त गरम पाण्याने अंघोळ करण्याची परवानगी असे. कोणतीही सहानुभूती म्हणून नव्हे तर त्यांची गार पाण्याची सवय सुटावी यासाठी. शिवाय या बेटाच्या आसपासच्या समुद्रांत मोठ्या प्रमाणात शार्क्स असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे कोणताही कैदी या अशक्यप्राय जेलमधून सुटला तरी तो जिवंत राहील याची खात्री देता येणार नाही.

अल्काट्रेझ तुरुंगापूर्वी या ठिकाणी एक किल्ला होता. त्याचा वापर अमेरिकन गृहयु*द्धामध्ये करण्यात आला. त्यानंतर याठिकाणी अमेरिकेच्या फेडरल सरकारने ‘मॅक्सिमम-सिक्युरिटी प्रिजन’ उभारलं. गृहयु*द्धातील किल्ल्याच्याही आधी या बेटावर ओसाड वाळवंटाशिवाय आणखी काहीही नव्हतं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सॅन फ्रॅन्सिस्कोच्या आसपास राहणाऱ्या मूळ अमेरिकन लोकांनी या बेटावर वास्तव्य करणं किंवा याठिकाणी येणं टाळलं. त्यांच्यामते हे बेट म्हणजे मृतात्म्यांचं आपापसांत भेटण्याचं ठिकाण होतं. ओहलोन म्हणून ओळखल्या जाणार्‍या मूळ अमेरिकन जमातीनेही या बेटाचा उपयोग एखाद्याला शिक्षा देण्याचे ठिकाण म्हणून केला. जे लोक जमातींच्या नियमांचे उल्लंघन करीत असत त्यांना या निर्जन बेटावर पाठवण्यात येत होते. 

या निर्जन बेटाला भेट देणारे पहिले युरोपियन्स स्पॅनिश लोक होते. १७७५ साली, एक्सप्लोरर ‘जुआन मॅन्युएल डी आयला’ हा सॅन फ्रान्सिस्कोचे आखात ओलांडणारा पहिला युरोपीय ठरला. जुआनने या बेटाला “इसला डे लॉस अल्काट्रेसेस” किंवा “पेलिकन बेट” असे नाव दिले. पुढे याच नावाचे संक्षिप्त रूप, अल्काट्रेझचा वापर होऊ लागला. स्पॅनिश लोकांनी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये मोहिमेला सुरुवात केली तेव्हा ओहलोन जमातीच्या अनेक लोकांनी जबरदस्तीच्या ख्रिश्चन धर्मांतरणापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी या बेटाचा वापर केला.

बेटाचा पहिला नोंदणीकृत मालक ‘ज्युलियन वर्कमन’ होता. जून १८४६ मध्ये ज्युलियनची मेक्सिकन गव्हर्नर ‘पियो पिको’ यांनी लाईट हाऊस बांधण्यासाठी नियुक्ती केली होती. १८४८ साली, अमेरिकन-मेक्सिकन यु*द्धानंतर अल्काट्रेझ बेट युनायटेड स्टेट्सची मालमत्ता बनली.

१८६०च्या दशकाच्या सुरुवातीस, गृहयु*द्ध सुरू झाले. यावेळी अल्काट्रेझ बेटाचा वापर ‘सॅन फ्रॅन्सिस्कोचे शस्त्रागार’ म्हणून करण्यात आला. काही काळातच याठिकाणी किल्ला बांधण्यात आला आणि त्यावर तब्बल ११ तोफा ठेवण्यात आल्या. या बेटाचा ‘तुरुंग’ म्हणून प्रवास सुरु झाला तो १८६८ साली. त्याच वर्षी याठिकाणी विटांचा तुरुंग उभारण्यात आला. अल्काट्रेझ आता फक्त लष्करी कैदी ठेवण्यासाठी वापरण्यात येणार होते.

१९०९ ते १९११ पर्यंत नवीन आणि सुधारित तुरुंग बांधले गेले. जेल प्रशासनाने “द रॉक” नावाची नवीन इमारत कैद्यांकरवी बांधून घेतली होती. १८५० ते १९३३ पर्यंत हे बेट ‘युनायटेड स्टेट्स आर्मी’च्या ताब्यात होते. त्यानंतर अल्काट्रेझ हे न्याय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. सध्या याचा वापर ‘फेडरल ब्युरो ऑफ पेनिटेन्शियरी’द्वारे केला जात आहे. ‘फेडरल ब्युरो ऑफ पेनिटेन्शियरी’कडे याचा ताबा आल्यानंतर अल्काट्रेझ हे अमेरिकन भूमीवरील सर्वात धोकादायक कैद्यांना ठेवण्यासाठी वापरण्यात येईल असे ठरले. या तुरुंगात येणाऱ्या कैद्याला अतिशय कमीत कमी किंवा काहीच अधिकार नसत.

अल्काट्रेझ तुरुंगात सर्वांत पहिल्या कैद्यांना १९३४ साली, साखळदंडांनी बांधून आणि एफबीआय एजण्ट्सच्या देखरेखीखाली आणले गेले. त्यावेळी तुरुंगाचा मुख्य संचालक ‘जेम्स ए. जॉन्स्टन’ होता. या कठोर संचालकाने १९३४ पासून १९४८ पर्यंत जेलवर नियंत्रण ठेवले. याठिकाणी पत्रकार किंवा कोणत्याही मीडियाशी संबंधित व्यक्तींना येण्यास बंदी होती.

सुरुवातीला तुरुंगातील कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १५० होती. तुरुंगाचे कर्मचारी आपल्या कुटुंबासमवेत याच बेटावर वास्तव्यास होते. या जेलमध्ये एकावेळी सुमारे अडीचशे कैद्यांना ठेवलं जात असे. येथे होणाऱ्या विक्षिप्त आणि भयंकर घटनांमुळे या बेटाला “सैतानाचे बेट” असेच नाव पडले होते. 

गुन्हेगारांना थेट अल्काट्रेझ तुरुंगात पाठवले जात नव्हते. इतर कारागृहांमध्ये त्यांची वर्तुणूक नीट नसली तर त्यांना अल्काट्रेझ तुरुंगात पाठवले जात होते. अल्काट्रेझ तुरुंग कठोर असल्याने एखाद्या गुन्हेगाराला सामान्य फेडरल तुरुंगात परत पाठवण्यापूर्वी त्याला शिस्त लावण्याचे काम याठिकाणी होत असे.

पण अनेकदा याउलट गोष्टी घडत असत. या कारागृहामुळे अनेक कैद्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले. एका कैद्याने काम करताना आपली बोटे कापली आणि बहुतेक कैदी वेडे झाले होते. याचा अर्थ दैनंदिन जीवनातील क्रू*रतेमुळे आणि एकटेपणाच्या भावनेमुळे कैद्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत होता. 

इतकेच नाही तर अनेकदा रात्रीच्या वेळी जेलचे गार्ड्स डमींवर गोळीबाराचा सराव करत असत. हा फक्त गोळीबाराचा सराव नसून कैद्यांना गोळीबाराचा तो आवाज ऐकू जावा आणि त्यांनी पलायनाची हिंमत करू नये हे त्यामागील प्रमुख उद्दिष्ट होते. दुसऱ्या दिवशी सर्व कैद्यांना या डमीवर चालण्याची आज्ञा दिली जात जेणेकरून त्यांना गार्ड्सच्या अचूक नेमबाजीचा अंदाज येईल. याचासुद्धा अनेक कैद्यांवर गंभीर मानसिक परिणाम झाला.

अल्काट्रेझ तुरुंगातील कैद्यांना फक्त चार अधिकार होते. अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय सेवा. उघड्यावर काम करणे, कुटुंबाशी पत्रव्यवहार करणे, नातेवाईकांच्या भेटी, ग्रंथालयात प्रवेश, चित्रकला, लेखन आणि व्यायाम यांसारख्या सुविधा किंवा विशेषाधिकार कैद्यांना आपल्या वर्तुणुकीच्या माध्यमातून कमवावे लागत असत.

अल्काट्रेझ तुरुंगात अनेक भयानक शिक्षा दिल्या जात होत्या. १९४२ पर्यंत एका अंधारकोठडीत, कैद्यांना साखळदंडाने बांधले जात असे. काही दिवस त्यांचा अन्न-पुरवठा बंद करून त्यांना नियमित मारहाण केली जात असे. ही शिक्षा अनेकदा १४ दिवसांपर्यंत चालायची. १९४२ साली सरकारने अंधारकोठडीची शिक्षा अनावश्यक आहे असे सांगून ती बंद केली.

सेल ब्लॉक डीला “द होल” असे नाव देण्यात आले होते. कारण या सेल्समध्ये शौचालय म्हणून फक्त एक छिद्र असत. ‘सेल ब्लॉक डी’मध्ये असणाऱ्या कैद्यांना अतिशय कमी आणि अयोग्य आहार देण्यात येत असे, प्रचंड मारहाणीमुळे त्यांच्या शरीराला संवेदना होणे कायमचेच बंद झाले. इथल्या सेल्स ५ फूट बाय ९ फूट इतक्या कमी आकाराच्या असत.

याशिवाय अल्काट्रेझ तुरुंगात कोणतीही स्त्री कधीही कैदी किंवा गार्ड म्हणून आली नाही. बहुसंख्य कैद्यांनी सरासरी सहा ते आठ वर्षे स्त्रीचा आवाजच ऐकला नाही. काही कैद्यांनी तुरुंगात २० ते २५ वर्षे व्यतीत केली.

युनायटेड स्टेट्सच्या झपाटलेल्या तुरुंगांपैकी एक म्हणून या तुरुंगाची ओळख आहे. १८५९ ते १९६३ या काळात लष्करी आणि फेडरल तुरुंग या दोन्ही रूपात वापरण्यात आले होते. याशिवाय स्थानिक मूळ अमेरिकन जमातींच्या मते, या बेटावर अनेक मृतात्मे होते. या तुरुंगात अनेक अमानवीय आणि क्रू*र गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे अनेक कैद्यांचे आत्मे अजूनही याठिकाणी असल्याचा अनुभव अनेकांना येऊ शकतो.

तुरुंगाला भेट देणाऱ्या अनेक लोकांनी याठिकाणी आल्यानंतर विचित्र भावना अनुभवल्याचा आणि विचित्र घटना घडल्याचे सांगितले आहे. भेट देणाऱ्यांपैकी एकाने आपण बुचर नावाच्या व्यक्तीशी बोलत असल्याचे सांगितले. बुचरचा अल्काट्रेझ तुरुंगात खून करण्यात आला होता. शिवाय एका पार्क रेंजरने शॉवर रूममध्ये बँजो ऐकल्याचेही सांगितले.

१९६३ साली अल्काट्रेझ तुरुंग रॉबर्ट एफ. केनेडी यांनी बंद केले. कारण त्यावेळी अल्काट्रेझ बेटापासून सॅन फ्रॅन्सिस्कोच्या मुख्य भूमीपर्यंत वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत होता. सध्या हे बेट पर्यटकांसाठी खुले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या माणसाने रिस्क घेतली आणि होलोकॉस्टपासून पळालेल्या ज्यूंना त्याच्या ‘झू’मध्ये आश्रय दिला

Next Post

जगभरात वाढणारी बालगुन्हेगारांची संख्या आपल्या चिंतेचा विषय बनलीय..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जगभरात वाढणारी बालगुन्हेगारांची संख्या आपल्या चिंतेचा विषय बनलीय..!

अमेरिकेच्या CIAने एक सिक्रेट 'हार्ट अटॅक ग*न' बनवली होती...!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.