The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विमानांच्या खिडक्या गोलाकार असतात त्यामागे हा किस्सा आहे..!

by Heramb
26 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


बस असो वा कार किंवा ट्रेन, कोणत्याही वाहनात असलो तरी खिडकीत बसायचा मोह काही आवरत नाही. अगदी तसाच मोह विमानात बसल्यावर हमखास होतो. विमानाच्या खिडकीतून तर आपल्या नजरेखाली सबंध जग असल्याचा भास होतो, अर्थात ढगाळ वातावरण नसेल तर. पण तुम्ही एका गोष्टीचं बारकाईने निरीक्षण केलंय का?

आपल्या अवतीभोवतीच्या सर्व वाहनांच्या खिडक्या  चौकोनी असतात, मग ती कार असो वा बस. अगदी मोठ-मोठ्या क्रुझ जहाजांच्या खिडक्या देखील चौकोनी असतात. पण हवेतून प्रवास करणाऱ्या विमानांच्या खिडक्यामात्र गोलाकार असतात. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आज विमानाच्या गोलाकार खिडक्या अनेक दुर्दैवी घटनांच्या मालिकेमुळे अस्तित्वात आहेत. 

आपण अनेकदा तंत्रज्ञानातील काही गोष्टी हलक्यात घेतो, आपल्याला अनेकदा ही गोष्ट अशी का आहे याची पुसटशी कल्पनाही नसते. पण अशाच प्रकारे विमानांच्या त्या गोलाकार खिडक्यांबद्दलही माणूस अनभिज्ञ होता. जर या खिडक्यांचा आकार गोलाकार नसता तर कदाचित प्रत्येक विमान ‘अपघातग्रस्त’ झालं असतं.

१९५० च्या दशकापर्यंत बहुतांश आंतरराष्ट्रीय प्रवास हा समुद्रमार्गे जहाजांनी होत असे. पण  त्यात वेळही जात असे आणि भरपूर खर्चही होत असे. मग यावर उपाय म्हणून, १९५० च्या दशकात विमान प्रवासात क्रांती झाली. ‘डी हॅविलँड कॉमेट’ हे ब्रिटीशांनी बनवलेले जगातील पहिले कमर्शियल जेटलाइनर बनले. कॉमेटमुळे लांब पल्ल्याचा प्रवास अतिशय कमी वेळेत शक्य झाला.

२ मे १९५२ रोजी ‘ब्रिटिश ओव्हरसीज एअरवे कॉर्पोरेशन’च्या मालकीच्या ‘डी हॅव्हिलँड कॉमेट’ने दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गसाठी प्रस्थान केले. आपल्या गंतव्यस्थानावर उतरण्यापूर्वी लंडनहून निघून हे विमान पाच वेगवेगळ्या ठिकाणांवर थांबले. या विमानाने ३५ हजार फूट उंचीवर उड्डाण केले आणि इतर कोणत्याही कमर्शियल विमानापेक्षा कॉमेटने प्रचंड वेग पकडला. ब्रिटीश ओव्हरसीज एअरवे कॉर्पोरेशनने आठ नवीन विमानांची ऑर्डर दिली आणि इतर एअरलाईन कंपन्यांनी त्याचे अनुकरण केले.



कॉमेटच्या केबिनवर दबाव होता त्यामुळे प्रवाशांना ऑक्सिजन मास्क वापरावे लागले नाहीत. विमान जसजसे उंचीवर पोहोचले तसतसे केबिनमधील दाब वाढला त्यामुळे आतील दाब बाहेरील पेक्षा जास्त झाला आणि जसजसे विमान कमी उंचीवर आले तसतसे दाब कमी होत गेला. दबावातील सततच्या बदलामुळे विमानाच्या संपूर्ण स्ट्रक्चरवर बराच ताण पडतो.

तंत्रज्ञानात नवी प्रगती झाल्यावर काही समस्यांना सामोरे जावे लागते. अशा अनेक समस्या निर्माण होतात आणि त्यांचं निराकरण करत गेलं की आपण म्हणतो ‘याचं व्हर्जन बदललंय’! असाच प्रकार कॉमेट या विमानाबरोबरही घडला होता. नोव्हेंबर १९५२ मध्ये रोम येथे कॉमेटचे उड्डाण होऊ शकले नाही. पाकिस्तानमध्ये एक अपघात झाला. त्या अपघातात ११ प्रवासी आणि क्रूचा मृत्यू झाला. पायलटची चूक आणि विंगच्या पुढच्या लिफ्टचे नुकसान झाल्यामुळे हा अपघात झाला. समस्या दुरुस्त करण्यासाठी डी हॅव्हिलँडने विंगच्या पुढच्या लिफ्टची पुनर्रचना केली.

मे १९५३ मध्ये, भारतात, कॉमेटचा गडगडाटी वादळादरम्यान दुसरा जीवघेणा अपघात झाला. या अपघातात विमानातील सर्व ४३ लोक ठार झाले. चौकशीमध्ये क्रॅशचे कारण विंगवरील लिफ्टचे नुकसान होणे आणि विमानावर जास्त ताण निर्माण होणे अशी होती. या क्रॅशनंतर, कॉमेटवर वेदर रडार आणि  पायलटला विमानावरील भार माहीत होईल अशी सिस्टीम बसवण्यात आली. एवढे बदल करूनही कॉमेटच्या समस्या संपतच नव्हत्या.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

जानेवारी १९५४ मध्ये, अर्थात कॉमेटच्या पहिल्या उड्डाणानंतर दीड वर्षांहून अधिक काळाने, कमर्शियल कॉमेट अचानक हवेत विखुरला गेला आणि इटलीजवळ असताना भूमध्य समुद्रात कोसळला. या अपघातात विमानात असलेल्या सर्व ३५ जणांचा मृत्यू झाला. रिकव्हरी सुरु असताना सर्व कॉमेट्सची उड्डाणं थांबवण्यात आली. कोसळलेल्या विमानाचे अनेक भाग रिकव्हर झाले, तरीही तज्ज्ञांना मूळ समस्या काय आहे हे समजलेच नाही. त्यानंतर कॉमेट्सची उड्डाणं पुन्हा सुरु करण्यात आली.

या घटनेच्या अगदी काहीच महिन्यांनंतर एप्रिल १९५४ मध्ये, दक्षिण आफ्रिकन एअरवेजद्वारे ऑपरेट केले जाणारे दुसरे कॉमेट विमान देखील भूमध्य समुद्रात क्रॅश झाले. याचे कारण उंचीमुळे एटीसीशी संपर्क तुटण्याने अपघात झाला असे देण्यात आले होते. विमानातील सर्व २१ प्रवासी आणि क्रूचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर काही महिन्यांतच सर्व कॉमेट्सची उड्डाणं पुन्हा थांबवण्यात आली. ब्रिटीश ओव्हरसीज एअरवे कॉर्पोरेशनच्या कॉमेटच्या ताफ्याची ‘एअरवर्दीनेस’ म्हणजेच वायुयोग्यता रद्द केली गेली आणि कॉमेट्सची उड्डाणं कायमचीच थांबवण्यात आली.

ऑक्टोबर १९५४ मध्ये कॉमेट्सच्या क्रॅशची कारणे शोधण्यासाठी ‘कोहेन’ समितीची स्थापना करण्यात आली. इटलीजवळील भूमध्य समुद्रातील क्रॅशमधून सापडलेल्या काही अवशेषांवरून ‘मेटल फटिग’मुळे क्रॅश होत असावेत असा निष्कर्ष काढण्यात आला. *मेटल फटिग म्हणजे धातूवर काही कारणाने तडा जायला सुरुवात होणे आणि शेवटी त्या धातूचे विभाजन होणे. त्यांनी कॉमेट्सच्या फ्यूजलेजवर दबावाच्या चाचण्या करून या सिद्धांताची सत्यासत्यता शोधण्यास सुरुवात केली.

फ्युसेलेजसह पाण्याच्या टाकीचा वापर करून, टेस्टर्स केबिनमधील उड्डाण परिस्थितीचे सिम्युलेशन करण्यासाठी टाकीत आणखी पाणी टाकून केबिनच्या आत दाब वाढवू शकले. याची अनेक वेळा पुनरावृत्ती करण्यात आली. हजारो सिम्युलेटेड प्रेशराइज्ड फ्लाइट्सनंतर, टेस्टर्स आणि तज्ज्ञांनी विमान क्रॅश होण्याच्या समस्येचे खरे कारण शोधून काढले. ‘स्क्वेअर फॉरवर्ड एस्केप हॅच’ या खिडकीच्या कोपऱ्यात बिघाड होत होता.

जानेवारी १९५४ मध्ये झालेल्या अपघाताच्या अवशेषांवरून शोधाला बळ मिळाले. पायलट केबिनच्या समोरील रेडिओ नेव्हिगेशन डिव्हाईस असणारी खिडकी मेटल फटीगमुळे तुटली होती. ती खिडकीही विमानाच्या अन्य खिडक्यांप्रमाणे चौकोनी आकाराची होती. खिडक्यांचे हे क्षेत्र जलद ‘डीकंप्रेशन’चे कारण ठरले होते. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, जेव्हा वर जाताना विमानावर दबाव येत होता आणि नंतर खाली जाताना दबाव कमी होत होता, तेव्हा शेवटी सगळ्यात जास्त दाब येत होता तो या खिडक्यांच्या हाय-स्ट्रेस पॉइंट्सवर..

कॉमेटच्या चौकोनी खिडक्यांच्या कोपऱ्यांवरचा ताण खूप कॉन्सन्ट्रेटेड होता. या कोपऱ्यांवर दबाव असताना ७० टक्के ताण येत असे. आधुनिक गोलाकार खिडक्यांमुळे तणावाचे हे क्षेत्र तयार होत नाही आणि गोल आकारामुळे तो स्ट्रेस समसमान प्रमाणातून वाहून नेला जातो. म्हणूनच आज तुम्हाला विमानांमध्ये गोल खिडक्या दिसतात.

या समस्येमुळे कॉमेट एअरलाईन्स मात्र कायमचीच संपली. कॉमेटचे पुढचे उत्पादन होईपर्यंत, बोईंग आधीच बाजारात आले होते आणि एअरलाइनर्सच्या निर्मितीमध्ये ते एक मोठे प्लेयर होते आणि आजही आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ग्रीक गणितज्ञ आणि तत्वज्ञानी ‘पायथागोरस’ हा शाकाहाराचा सर्वात जुना पुरस्कर्ता आहे.

Next Post

जोसेफ मेडिसिन क्रो – अमेरिकेच्या मूलनिवासी रेड इंडियन्सचा ‘लास्ट वॉर चीफ’

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जोसेफ मेडिसिन क्रो - अमेरिकेच्या मूलनिवासी रेड इंडियन्सचा 'लास्ट वॉर चीफ'

अमेरिकेच्या CIA ने क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोला मारायचे ६३८ असफल प्रयत्न केले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.