The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फाशीच्या शिक्षेवर असलेले सहा कैदी ‘मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन’मधून पळाले होते..!

by Heramb
29 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आधुनिक जगात तुरुंगवासाच्या संकल्पनेवर अनेकदा टीका केली जाते. तुरुंगवासाच्या नियमांबद्दल “तुरुंगातील या नियमांमुळे” कैद्यांवर होणाऱ्या विपरीत परिणामांवर अनेक बुद्धिजीवी वाद घालतात. त्यांच्या मते गुन्हेगारांना कैद करणे हा व्यवहार्य उपाय नाही, कारण कारागृहे एखाद्या व्यक्तीमध्ये सुधारणा करत नाहीत.

बहुतेक कारागृहातील परिस्थिती इतकी वाईट आहे की रक्षक आणि इतर कैद्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ झाल्यावर, कैदी मानसिकदृष्ट्या असह्य होतात. ते पुन्हा समाजात मिळून मिसळून राहू शकत नाहीत किंवा तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांची गुन्हेगारी अशीच सुरु ठेवण्याचा निश्चय करतात.

ज्या कैद्यांना फाशीची शिक्षा होणार असते ते कैदी जास्त सुरक्षा असलेल्या तुरुंगातून यशस्वीपणे पळून जाऊ शकत नाहीत. तुम्ही सिल्वेस्टर आणि अरनॉल्डचा “एस्केप प्लॅन” हा चित्रपट पाहिला असेल, तर आधुनिक कारागृहे सहसा किती सुरक्षित असतात याची कल्पना तुम्हाला आली असेल.  पण तरीही १९८४ साली, मोठ्या प्रमाणात सुरक्षा असलेल्या मेक्लेनबर्ग करेक्शनल सेंटरमधून कैद्यांनी पळ काढला, हे प्रकरण नेमकं कसं घडलं याबद्दल आजचा हा विशेष लेख..

मेक्लेनबर्ग करेक्शनल सेंटर:

१९७६ साली मेक्लेनबर्ग करेक्शनल सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी तब्बल २ करोड डॉलर्सचा खर्च आला आणि हे कारागृह ३६० कैद्यांना ठेवण्यासाठी डिझाइन केले गेले होते. एके दिवशी अचानक हे तुरुंग “अपयशाचे स्मारक” आहे असे गव्हर्नर मिल्स ई. गॉडविन ज्युनियर यांनी घोषित केले. कारण तुरुंगातील कैदी एखाद्या दिवशी सर्व कायदे-नियमांचे पालन करणारे सुजाण नागरिक बनतील याची आशा सगळ्यांनी गमावली होती.



विशेष म्हणजे हे तुरुंग अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून बनवले गेले होते. तरीही, फाशीची शिक्षा होणार असलेल्या सहा कैद्यांनी आपल्या बुद्धीचा योग्य वापर केल्यास काहीही अशक्य नाही हे सिद्ध केले होते. लिनवुड ब्रिली, जेम्स ब्रिली, अर्ल क्लॅंटन, डेरिक पीटरसन, विली लेरॉय जोन्स आणि लेम टगल यांनी मेक्लेनबर्ग करेक्शनल सेंटरमधून त्यांच्या पलायनानंतर एक प्रकारे इतिहासच घडवला.

पलायन:

कैद्यांनी काही दिवस रक्षकांच्या वागणूकीचे निरीक्षण केले आणि ते खूप आळशी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कैदी मनोरंजनाच्या वेळेनंतर आपापल्या ब्लॉकमध्ये परतत असताना अर्ल क्लॅंटन बाथरूममध्ये लपला. कोणत्यातरी शिपायाकडून नियंत्रण कक्ष थोडावेळ उघडे राहिल्यावर अर्लने संधी साधून आत धाव घेतली. त्याने गार्डला बाहेर काढले आणि सेलचे सर्व दरवाजे उघडले.

कैद्यांनी त्वरीत मिळेल त्या गोष्टींनी तयार केलेल्या शस्त्रांचा वापर करून पहारेकऱ्यांवर ह*ल्ला केला आणि ते योजनेच्या पुढील टप्प्यावर गेले. तुरुंगात बॉ*म्ब निकामी करण्यासाठी योग्य व्यवस्था नसेलच असा ब्रिली बंधूंचा विश्वास होता. त्यांनी दंगलीच्या वेळी वापरण्यात येणारे हेल्मेट आणि रक्षकांचे कपडे घातले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

ते पुढच्या गेटकडे निघाले. पुढच्या गेटवर उभ्या असलेल्या गार्ड्सना त्यांनी कैद्यांनी बनवलेले घरगुती बॉ*म्ब निकामी करायचे आहेत असे सांगितले आणि बॉ*म्ब निकामी करण्यासाठी व्हॅन मागवली. त्यांनी दोन्ही दरवाजे एकाच वेळी उघडण्यास सांगितले. हे मात्र यापूर्वी तुरुंगात कधीच घडले नव्हते.

कैद्यांनी बॉ*म्ब म्हणून एक टीव्ही घेतला आणि तो स्ट्रेचरच्या सहाय्याने व्हॅनमध्ये नेला. जे काही घडत आहे ते कोणालाही कळू नये यासाठी त्यांनी अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आजूबाजूला फवारणी केली. गोंधळाच्या मदतीने ते सहा कैदी व्हॅनचा वापर करून तुरुंगातून पसार झाले.

पलायन झाले पण पुढे काय?

सहा जण लवकरच पुन्हा मोकळा श्वास घेऊ लागले. त्यांची पुढील वाटचाल ठरवण्यासाठी ते वॉरेंटन शहरात थांबले. पुढे काय करावे याबद्दल त्यांच्यात मतभेद होते. त्यामुळे त्यांनी आपापल्या स्वतंत्र मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. एकत्र राहण्याने त्यांचे बुध्दिबल वाढले होते पण आता त्यांचे हे सुदैव लवकरच संपुष्टात येणार होते.

अर्ल आणि डेरिक दुसऱ्याच दिवशी पकडले गेले. त्यांनी तुरुंग प्रशासनाला आणि पोलिसांना हलक्यात घेतले असावे आणि ते एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये चीज आणि वाईनचा आनंद घेत होते. त्यांनी तुरुंगाच्या रक्षकांचे बॅज फाडलेले जॅकेट घातले होते. तर लेम, विली आणि ब्रिली बंधूंनी काही काळ एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.

ब्रिली बंधू फिलाडेल्फियाला गेले. तेथे त्यांच्या काकांनी त्यांना गॅरेजमध्ये नोकरी दिली. लेम आणि विलीने कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला कारण तेथे मृत्युदंडाच्या कैद्यांचे प्रत्यार्पण केले जात नाही असा त्यांचा विश्वास होता. ते व्हरमाँटपर्यंत पोहोचले, त्यानंतर लेमला एक दुकान लुटताना पकडले गेले.

विली लेरॉय जोन्स फारच आजारी होता. त्याला सर्दी झाली होती, पिसूसारख्या कीटकांमुळे तो त्रस्त झाला होता आणि बरेच दिवस उपाशी होता, म्हणून त्याने आपल्या आईला बोलावले आणि त्यानंतर तो पुन्हा पकडला गेला. ब्रिली बंधूंनी न्यूयॉर्कला केलेला फोन कॉल ट्रेस केल्यानंतर त्यांना पकडण्यात आले. अखेर सहाही कैदी पुन्हा कोठडीत आले.

योजनेचे दस्तऐवजीकरण:

सहा कैदी ते जिथे होते तिथे परत गेले. त्यांच्या संपूर्ण योजनेचे दस्तऐवजीकरण त्यांचा सहकारी कैदी डेनिस स्टॉकटनने केले होते. डेनिसने त्यांच्यासोबत पळून जाण्याची योजना आखली होती, परंतु तरीही त्याला त्याचे अपील विचारात घेतले जाईल आणि त्याची केस रिओपन होईल अशी आशा होती.

त्याने संपूर्ण योजना आणि त्याच्या अंमलबजावणीचे मिनिटा-मिनिटाचे दस्तऐवजीकरण केले होते. हे दस्तऐवज व्हर्जिनियन पायलटमध्ये प्रकाशित झाले होते. शेवटी डेनिस स्टॉकटनचे नशीबही त्याच्या मित्रांसारखेच निघाले. त्याचे अपील फेटाळले गेले आणि १९९५ साली त्याला फाशी देण्यात आली.

पलायनानंतर, तुरुंगात विविध खटले आणि सुधारणा झाल्या. कारागृह कायमचे बंद करण्याची सूचना अनेकवेळा करण्यात आली. तरी, त्याऐवजी या कारागृहाचे रूपांतर मिडीयम-सिक्युरिटी कारागृहात करण्यात आले. कैद्यांना त्यांच्या कायमस्वरूपी तुरुंगवासात पाठवण्याआधी तेथे अल्प कालावधीसाठी ठेवण्यात येत होते. अखेर २०१२ साली हे तुरुंग कायमचे बंद करण्यात आले आणि २०१७ मध्ये ते पूर्णतः पाडून टाकले गेले.

डेनिसच्या प्रयत्नांमुळे कैद्यांना प्रचंड कीर्ती मिळाली. जगाच्या संपूर्ण इतिहासात अनेक कैदी तुरुंगातून पळून गेले आहेत, परंतु मेक्लेनबर्ग तुरुंगातील पलायनाप्रमाणे कोणत्याही पलायन योजनेचे दस्तऐवजीकरण नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हे आहेत आजवर न सापडलेले खजिने, ज्यांच्या शोधात लोक आजही आपलं आयुष्य पणाला लावतात

Next Post

एकाच वेळी दोन्ही बाजूंना खेळवणारा हा सर्वात चलाख गुप्तहेर होता..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

एकाच वेळी दोन्ही बाजूंना खेळवणारा हा सर्वात चलाख गुप्तहेर होता..!

या एका स्टॉकमुळे 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज' सलग तीन दिवस बंद होते!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.