The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकदोन नव्हे, तब्बल ७४ वेळा इस्लामी ह*त्याकांडाचे बळी ठरलेत ‘या’ जमातीचे लोक!

by Nachiket Shirude
12 June 2025
in वैचारिक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


इराकच्या उत्तरेकडील भागात असलेल्या डोंगराळ प्रदेशाला जगाच्या इतिहासात खूप महत्वाचे स्थान आहे. याच डोंगराळ भागात आजच्या मानवी सभ्यतेचे अवशेष सापडतात. इराकच्या या डोंगर रांगांमध्ये कुर्दिश लोक राहत असून, याच कुर्दिश लोकांमध्ये जगातला सर्वात अल्पसंख्या असलेला एक धर्म देखील अस्तित्वात आहे.

आजूबाजूला चारी दिशांनी इस्लामी राज्यसत्तांनी वेढलेल्या या प्रदेशात हा धर्म आणि त्या धर्माचे लोक अस्तित्व टिकवून आहे. ह्या धर्माला याझिदी म्हणून ओळखले जाते.

इस्लामच्या उदयाच्या अनेक वर्षांपूर्वी आजच्या इराकच्या भागात मेसोपोटेमियाचे साम्राज्य होते. ह्या साम्राज्यातच आजच्या अनेक धर्मांच्या आणि धर्म कल्पनांच्या उगमाचे स्त्रोत सापडतात. याच साम्राज्याचा काळात याझिदी अस्तित्वात आले.

याझिदी लोकांच्या धर्म संकल्पना झोराष्ट्रीयन लोकांच्या धर्म संकल्पनांशी समानता बाळगून आहेत. 

झोराष्ट्रीयन लोकांना आपला देश सोडून पळ काढावा लागला आणि इतर देशात आसरा शोधावा लागला होता पण याझिदी मात्र तिथेच राहिले. त्यांनी तो देश सोडला नाही. झोराष्ट्रीयन लोक भारतात स्थायिक झाले. इथे त्यांना आश्रय मिळाला.



आज भारतात हा समुदाय पारसी समुदाय म्हणून ओळखला जातो. भारताच्या नवनिर्माणात पारसी समुदायाने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.

याझिदी धर्माची ऐतिहासिक दृष्ट्या स्थापना आणि विस्तार ११ व्या शतकात उमय्याद शेखच्या नेतृत्वाखाली झाला असे म्हटले जाते.

याझिदी आणि पारसी यांच्यात बरीच साम्यस्थळं असली तरी त्या दोन्ही वेगवेगळ्या धर्मकल्पना आहेत. याझिदी लोक हे एकेश्वरवादी असून त्यांच्या धर्मंमान्यतेनुसार ते ६ प्रेषितांना पूजतात, त्यांच्यातील एका प्रेषिताला ते आपला पिता म्हणतात.

हे देखील वाचा

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

१५ वर्षाच्या मुलीने लिहिलेली प्रौढ कादंबरी ‘द आउटसायडर्स’ इंटरनॅशनल बेस्ट सेलर बनलीय

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

ह्या प्रेषिताचे नाव मेलेक तावूस असून त्याचं रूप हे मोरासारखं असल्याने तो पिकॉक एंजल म्हणून ओळखला जातो.

या पिकॉक एंजलची पूजा अर्चना हे लोक करतात म्हणून ते अग्निपूजक झोराष्ट्रीयन, ख्रिश्चन आणि इस्लाम यांच्याहून वेगळे सिद्ध होतात. पण ह्या पिकॉक एंजलमुळे याझिदि लोकांच्या नशिबात एक दुख:द पर्व निर्माण झालं आहे.

ह्या पिकॉक एंजल्सला याझिदी लोक प्रेषित मानत असले तरी कुराणच्या काही उल्लेखांच्या अनुसार हा पिकॉक एंजल म्हणजेच सैतान असल्याचं म्हटलं जातं.

ह्या एका कारणामुळे इस्लामी लोक त्यांचा प्रचंड द्वेष करत असतात. त्यांना सैतानाचे पूजक काफिर म्हणून त्यांच्यावर अनन्वित अ*त्याचार करण्यात आले असून, एक दोन नव्हेतर तब्बल ७४ वेळा ह्या समुदायाला न*रसं*हाराचा सामना करावा लागला आहे.

याझिदी लोकांची संस्कृती बऱ्यापैकी हिंदू धर्माच्या मूळ तत्वांच्या विरोधात असली तरी हिंदू धर्म आणि याझिदी धर्मियांच्या प्रार्थनास्थळात आणि पूजा पद्धतीत बऱ्यापैकी साम्य आढळून येतं. ख्रिश्चन धर्माच्या तत्वानुसार जरी मानवाचा उगम हा आदाम आणि ईव्हच्या समागमातून झाला असला तरी याझिदी लोकांच्या धर्म कल्पनांच्या अनुसार त्यांचा जन्म फक्त आदमच्या वीर्यातून झाला आहे.

याझिदी लोक स्वतःला देवाचे प्रचारक म्हणतात. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे याझिदी ससमुदायात देखील हिंदू धर्माप्रमाणे जातिसंस्था अस्तित्वात आहे.

याझिदी समुदाय सिंझार, मोसूल आणि सीरिया – इराकच्या सीमेवरील काही भागात मर्यादित असून या भागातच त्यांचे अस्तित्व होते. इराक सरकारच्या स्वातंत्र कुर्दिश प्रांतात हे लोक निवास करायचे. त्यांची घरं, मंदिरं आणि शाळा देखील ह्या भागात होत्या.

याझिदी लोकांचा समूह हा बऱ्यापैकी धर्म परायण आणि आपल्या पंचतत्वातील देवतांना पुजणारा आहे, त्यामुळे त्यांचं अस्तित्व तिथल्या मुसलमानांना सहन होत नव्हतं.

इराणमध्ये झालेल्या धार्मिक क्रांतीचे परिणाम जगभर दिसून आले. एकेकाळी उदारमतवादी असलेला इराकसुद्धा यामुळे धार्मिक राजकारणात पोळून निघाला होता. इराकमध्ये सद्दामची सत्ता आल्यावर हे प्रकरण अजूनच वाढीस लागलं. इराकमध्ये याझिदींवर अ*त्याचारांची मालिका सुरु झाली ती तेव्हापासून, पण ह्या सर्वात यझिदींना खरा फटका बसायला सुरवात इस्लामिक स्टेटच्या उदयानंतर झाली.

२०१४ साली इस्लामिक स्टेटचा उदय झाला. सर्वात आधी त्यांनी कुर्दीश लोकांवर आपला मोर्चा वळवला. त्यातल्या त्यात याझिदी हे कुर्दांमधले काफिर म्हणून त्यांच्या निशाणावर होते.

इस्लामिक स्टेटच्या जिहाद्यांनी काही काळातच सिंजार, मोसुल ह्या याझिदी लोकांचं प्राबल्य असलेल्या भागांवर ताबा मिळवला.

त्यांनी त्या ठिकाणी तथाकथित खिलाफतीचं राज्य आणलं, ह्या राज्याअंतर्गत त्यांनी सर्वात आधी यझिदींचे शिरकाण करायला सुरवात केली. आपण सुन्नी म्हणून शिया मुस्लिमांचे अस्तित्व मान्य न करणाऱ्या ह्या जिहादी गटाने याझिदी स्त्रियांवर तर अ*त्याचाराच्या सीमा गाठल्या.

एका याझिदी महिलेवर दिवसातून किमान ७ ते ८ वेळा जिहादी बला*त्कार करत होते. पुढे याच महिलांचा वापर इस्लामिक स्टेटच्या वेश्या म्हणून केला जाऊ लागला.

जेवढी दयनीय अवस्था याझिदी महिलांची होती. तितकीच दयनीय अवस्था लहान मुलांची होती. लाखभर लहान मुले ह्या रक्तपातात मारली गेली होती. जबरदस्तीने काही लहान मुलांचे धर्मांतरण करून त्यांना जिहादी बॉ*म्ब म्हणून वापरले जाऊ लागले तर अनेक मुलांना गोळया घालून संपवण्यात आले.

याझिदी अत्यंत मोठ्या संकटात होते. अनेक याझिदी आपलं घर सोडून डोंगर रांगांतील गुहांमध्ये आश्रय घेत होते. अनेक याझिदी कुटुंब यात उद्ध्वस्त झालेत.

२०१६-१७ मध्ये अमेरिकेने इस्लामिक स्टेटवर हवाई ह*ल्ले केले. अमेरिकेने कुर्दिश सैन्याचा मदतीनेच हा प्रदेश आयसिस मुक्त करायला घेतला. कुर्दिश सैन्य आणि अमेरिकेच्या स्पेशल डिफेन्स ग्रुपने धडक कारवाई करून मोसुलला इस्लामिक स्टेटच्या सर्व छावण्या बरबाद केल्या.

२०१८ मध्ये रक्काचा ताबा मिळवून कुर्दिश सैन्याने इस्लामिक स्टेटला यशस्वीरित्या मागे रेटले. काही काळातच कुर्दिश सैन्याने एक कॉरिडॉर तयार करून यझिदींना जायला एक पळवाट करुन दिली. याझिदी या वाटेने मोठ्या संख्येने युरोपात पळाले.

अनेक याझिदी पून्हा इराकमध्ये स्थायिक झाले असून छावणीत आपले जीवन कंठत आहेत.

जे परिवार आणि मुलं या इस्लामिक स्टेटच्या अ*त्याचारापासून बचावले, त्यांना आता कुठलंच भविष्य उरलेलं नाही. १९१९ साली वेगळा कूर्दस्तान बनवला असता तर आज ही वेळ आली नसती, अशी भावना याझिदी व्यक्त करतात.

त्यांच्या पवित्र स्थळांपैकी फक्त एक किंवा दोन स्थळं सुस्थितीत असून बाकी जागांची अवस्था फार बिकट झाली आहे.

आपला धर्म आणि माणसं वाचवण्याची जबाबदारी आमची असून, हा खेळ असाच सुरु राहीला तर आमचा विनाश अटळ असल्याची भावना याझिदी धर्मगुरू व्यक्त करतात.

याझिदी महिलांच्या वाटेला तर याहून मोठे दुःख आलेले आहे. याझिदी धर्मानुसार परपुरुषासोबत महिलेने शरीरसंबंध ठेवले तर त्या महिलेला याझिदी वाळीत टाकतात. आजही याझिदी इस्लामिक स्टेटच्या अ*त्याचाराला बळी पडलेल्या आपल्या महिलांचा स्वीकार करत नाहीत.

ह्या महिला आपली व्यथा कथन करतात तेव्हा त्यांच्या नशिबात केवळ स्त्री म्हणून आलेली उपेक्षा व्यथित करणारी आहे. केवळ ७ लाख लोकसंख्या असलेले याझिदी अजूनही आपल्या हक्कांच्या शोधात आहेत.

गेल्या शतक भरापासून त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतला गेला आहे. ते आज विस्कळीत स्वरूपात आयुष्य जगत आहेत. मध्य पूर्वेतील अशांतता अजून वाढत चालली असून जर असंच चालू राहिलं तर एकदिवस याझिदी लोकांची संस्कृती इतिहासजमा होईल, जे निश्चितच एकविसाव्या शतकातील मनुष्य जातीस लांच्छनास्पद असणार आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: AmericaInternational Politics
ShareTweet
Previous Post

स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी धडपडणारी भारतातील पहिली महिला बॅरीस्टर…

Next Post

“प्रिय, मेरी क्युरी…” : दोनदा नोबेल मिळवणाऱ्या कर्तृत्ववान संशोधिकेला हृद्य पत्र

Related Posts

विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
वैचारिक

१५ वर्षाच्या मुलीने लिहिलेली प्रौढ कादंबरी ‘द आउटसायडर्स’ इंटरनॅशनल बेस्ट सेलर बनलीय

11 November 2024
इतिहास

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

14 January 2026
विश्लेषण

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी महान शास्त्रज्ञ ‘निकोला टेस्ला’सुद्धा प्रभावित झाला होता

21 September 2025
इतिहास

मॅकीयावेलीचे विचार ऐकून हि*टल*र, मुसोलिनीचे पण फ्युज उडाले असते..!

28 January 2025
वैचारिक

थोर तत्वज्ञ प्लेटोला राजकारणात यायचं होतं पण…

25 December 2025
Next Post

"प्रिय, मेरी क्युरी..." : दोनदा नोबेल मिळवणाऱ्या कर्तृत्ववान संशोधिकेला हृद्य पत्र

अडॉल्फ सॅक्स - सॅक्सोफोनची निर्मिती करणारा जॅजप्रेमी अवलिया संशोधक

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.