The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातला सर्वात मोठा तोतया, ज्याने नौदलात सर्जन म्हणून काम केलं होतं..!

by Heramb
9 October 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एखाद्याची हुबेहूब नक्कल करता येत असेल तर तो माणूस अनेकांचं लक्ष वेधून घेतो, त्याचा प्रभावही तसा प्रचंड प्रमाणात पडतो. एखाद्या माणसाची नक्कल करणे अनेकांना जमते, पण एखाद्या प्रोफेशनची नक्कल करणं..? याचा आपण आजवर कदाचित विचारही केला नसेल. पण मानवतेच्या इतिहासात असा एक माणूस होऊन गेला ज्याने डॉक्टरकीसहित अनेक प्रोफेशन्स उत्तम पद्धतीने वठवले होते. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

एक व्यावसायिक म्हणून घालवलेल्या २३ वर्षांमध्ये, तो असंख्य व्यवसायातील लोकांची तोतयागिरी करण्यात सक्षम होता. पेनसिल्व्हेनियामधील महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाचा डीन, वकील, नौदल सर्जन, बाल-संगोपन तज्ज्ञ, तुरुंगातील सहाय्यक वॉर्डन, प्राणीशास्त्र पदवीधर, कर्करोग संशोधक, रुग्णालयातील एक वृद्ध, शिक्षक, मानसशास्त्राचे डॉक्टर, सिव्हिल इंजिनिअर आणि अशाच अनेक प्रोफेशन्सची त्याने तोतयागिरी केली.

फ्रेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फर्डिनांड वाल्डो डेमारा ज्युनियरची ही कथा आहे. त्यालाच ‘द ग्रेट इम्पोस्टर’ म्हणूनही ओळखले जाते. अफाट बुद्धिमत्ता असलेल्या फ्रेडकडे ‘फसवणुकीच्या’ कलेचे उत्तम कौशल्य होते. त्याला कदाचित इतिहासातील सर्वात मोठा कपटी मानलं जात असत. कारण त्याच्या कारकीर्दीत त्याने केलेल्या तोतयागिरीची यादी लांबलचक होती.

१९२१ साली इंग्लडमधील मॅसॅच्युसेट्स येथील लौरेन्समध्ये फ्रेडचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला. १९३०च्या आर्थिक महामंदीच्या काळात त्याच्याही कुटुंबाला काही आर्थिक संकटांना सामोरे जावे लागल्याने त्याच्या कुटुंबाने स्थलांतर करण्याचे ठरवले. या संकटाच्या काळात अवघ्या १६ वर्षांचा फ्रेड साधू होण्याच्या इच्छेने रोड आइसलँडमधील सिस्टरियन साधूंमध्ये सामील होण्यासाठी घरातून पळून गेला. ट्रॅपिस्ट साधूंचे फादर डेस्मारायस यांनी फ्रेडच्या पालकांना चिंता न करण्याचे सांगितले. ते म्हणाले, “तो जगातील सर्वात जास्त मागणी असलेल्या धार्मिक व्यवस्थेत सामील झाला आहे आणि तो काहीच आठवड्यांत घरी परत येईल.”



यानंतर फ्रेड काही आठवड्यांसाठी साधूंच्या सहवासात राहिला. फ्रेडचा आवेगपूर्ण स्वभाव आणि बिनधास्त वर्तन पुढील वर्षांमध्ये अधिक स्पष्ट झालाच. १९४१ साली तो अमेरिकन सैन्यात भरती झाला. पण काही काळानंतर तो सैन्यात अधिकृत रजेशिवाय अनुपस्थित राहिला. काहीच महिन्यांत त्याने अमेरिकन नौदलात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्याने व्हॉर्जिनियाच्या नॉरफॉकमधील नेव्ही डॉक्समध्ये हॉस्पिटल कॉर्पसमन म्हणून प्रशिक्षण घेतले. पण तो पुन्हा अधिकृत रजेशिवाय अनुपस्थित राहिला. पण यावेळी त्याने आत्मह*त्येचा बनाव केला.

फ्रेडचे कौशल्य प्रामुख्याने खोटी ओळख पटवून देणे आणि नोकरीवरील मुलाखतदारांना त्याच्या तो खरंच त्या प्रोफेशनमध्ये आहे हे पटवून देणे होते. त्याच्या या तोतयागिरीच्या सामर्थ्याने त्याने संपूर्ण देशातील व्यवसाय क्षेत्रात सामील होण्याचे ठरवले, पण या सर्व क्षेत्रापैकी त्याच्याकडे कोणतेही श्रेय किंवा आवश्यक कौशल्य नव्हते.

कालांतराने फ्रेड कॅनडातील न्यू ब्रांस्वीकला गेला. तिथे त्याने डॉक्टर जोसेफ सायर या युवकाची नक्कल केली. यापूर्वी प्रत्यक्ष डॉक्टर सायरला भेटताना त्याने एका अमेरिकन वकिलाची, डॉक्टर सेसिल हॅमनची भूमिका वठवली होती. तथाकथित डॉक्टर सेसिलला म्हणजेच फ्रेडला अमेरिकन वैद्यकीय परवाना मिळविण्यात मदत व्हावी या उद्देशाने फ्रेडने डॉक्टर सेसिल बनून सायरची भेट घेतली होती. डॉक्टर सायरच त्याला वैद्यकीय परवाना मिळवून देण्यात मदत करणार होता. अखेर फ्रेडच्या हुशारीला सायर बळी पडला. त्याने कागदपत्र घेऊन अमेरिकेतून पळ काढला आणि रॉयल कॅनेडियन नेव्हीमध्ये (आरसीएन) सर्जन-लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळवले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

हॅलिफॅक्समधील आरसीएन रुग्णालयात सर्जन-लेफ्टनंट म्हणून, फ्रेडला आजारी लोकांच्या वैद्यकीय गरजांची पूर्तता करण्यासाठी नियुक्त केले गेले. त्याला औषधाचे काहीही ज्ञान नसल्याने हे काम करणे कठीण जात होते. पण त्याने यावरही उपाय शोधून काढला. त्याच्या संपर्कात काही डॉक्टर्स होते, तो त्यांनाच रुग्णांच्या समस्या सांगत असत आणि त्यांच्याकडून त्या समस्यांचे निराकरण करून घेत असत. वेगवेगळ्या डॉक्टरांकडून माहिती गोळा करताना आणि त्याला फोन करणाऱ्या रुग्णांना उपचार देताना फ्रेडने उत्तम कौशल्य दाखवले.

या ‘द ग्रेट इम्पोस्टर’ने त्याच्या तीक्ष्ण आणि समृद्ध स्मरणशक्तीच्या मदतीने वैद्यकीय प्रक्रियांचे शिक्षण वैद्यकीय पुस्तकांमधून घेतले हे उल्लेखनीय आहे. त्याच्या सर्वात उल्लेखनीय घटनांपैकी एक म्हणजे डेंटल उपचार. कॅनडाच्या यु*द्धनौकेचा, कयुगाचा कर्णधार कमांडर प्लॉमरवर फ्रेडने डेन्टल उपचार केले.

भुलीच्या म्हणजेच अनेस्थेटिक औषधाचे प्रमाण किती असावे तसेच याबद्दल पूर्णतः अनभिज्ञ असूनही त्याने प्लॉमरला भूल देऊन त्याचे अनेक दात काढले.पण, ही शस्त्रक्रिया बरीच यशस्वी ठरली कारण प्लॉमरने सायरचे कौतुक करून असे म्हटले की “माझ्या एकूण अनुभवांपैकी सर्वात चांगल्या प्रकारे दात काढण्याचा हा अनुभव होता.”

हॅलिफॅक्स खाडीतील विमानवाहू जहाज एचएमएससी मॅग्निफिसेंटवर तथाकथित डॉक्टर सायबरची नेमणूक करण्यात आली. पण तेव्हा “त्याच्याकडे औषध आणि शस्त्रक्रिया, विशेषत: वैद्यकीय समस्यांच्या निदानाच्या प्रशिक्षणाची कमतरता आहे.” असे कमांडिंग वैद्यकीय अधिकाऱ्याने सायरबद्दल सांगितले. फ्रेडची योजना नेहमीच व्यवस्थितपणे पार पडत नाही हे यावेळी उघड झाले. केयुगा नावाच्या कॅनेडियन यु*द्धनौकेचा एकमेव वैद्यकीय अधिकारी म्हणून फ्रेड एकूण २११ नामांकित नाविक (सेलर्स) आणि आठ अधिकाऱ्यांचा वैद्यकीय प्रभारी होता.

फ्रेडने केलेली कदाचित सर्वात सुप्रसिद्ध आणि पूर्णपणे अपमानास्पद तोतयागिरी याच काळात त्याने केली होती. केयुगा कोरियाच्या थर्टी एठथ पॅरलल जवळ कोरियन किनारपट्टीवर गस्त घालत असताना, त्याने १९ जखमी सैनिकांनी भरलेल्या लहान कोरियन जंकशी संपर्क साधला. सुरवातीला सर्व काही ठीक झाले आणि नंतर जेव्हा कोरियन प्रजासत्ताकाचे लोक बाहेर पडले, तेव्हा त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. केयुगावर प्रवास करणारे पीटर गॉडविन म्हणतात, “अनेक लोक जखमी झाले होते तर काहींचा त्याठिकाणी येताच मृत्यू झाला, पण आमचे डॉक्टर सायर हे ‘हिरो’ होते. डॉक्टर सायर केयुगा यु*द्धनौकेच्या वरच्या डेकवर आपले काम करण्यासाठी खाली-वर करीत होता आणि यामुळेच आम्ही सर्व खूप प्रभावित झालो.”

या डॉक्टर सायर नावाच्या वैद्यकीय ‘तज्ञा’ने छातीवर शस्त्रक्रिया करणे, शरीरातून बंदुकीची गोळी काढण्यासह अधिक महत्वाची कामे केली. याबद्दल संशयास्पद किंवा अनैसर्गिक काहीही आहे यावर बहुधा कोणाचाही विश्वास नव्हता. डॉ. सायर यांना त्यांच्या वरिष्ठांकडून प्रशंसाही मिळाली होती. द कॅनेडियन प्रेस, द असोसिएटेड प्रेस आणि रॉयटर्ससह सर्व मोठ्या माध्यमांनी डॉ. सायर यांच्या बहुमूल्य कामांची प्रशंसा करण्यासाठी नौदलाच्या जनसंपर्क तज्ञाशी संपर्क साधला.

यानंतरच खऱ्याखुऱ्या डॉ. सायरला परदेशात त्याच्या वैद्यकीय कामगिरीबद्दल माहिती मिळाली. हे कळल्यावर त्याने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, आणि एक अहवाल जारी करण्यात आला ज्यामध्ये केयुगावर फ्रॉड होत असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर सायर बनावट असल्याचे आरसीएनच्या लक्षात आल्यानंतर फ्रेडला कॅनेडियन सैन्यातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे अखेर त्याची खरी अक्षमता उघड झाली आणि या गूढ माणसाची पूर्वीची ओळखही उघड झाली.

१९६१ साली अभिनेता टोनी कर्टिस अभिनीत ‘द ग्रेट इम्पोस्टर’ चित्रपटात त्याचे अजब कारनामे अमर झाले. १९७१ साली, हे प्रसिद्ध “डॉक्टर” व्हँकुव्हर बेटावरील एस्क्विमल्ट येथे आयोजित ‘ब्रिटिश कोलंबिया’ परिषदेत उपस्थित होते आणि अनेकांनी त्याचे स्वागत केले गेले. फर्डिनांड वाल्डो डेमारा जूनियर यांचे १९८२ साली वयाच्या साठाव्या वर्षी निधन झाले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एकेकाळी खेळाचे पत्ते छापणारी कंपनी आज ६५हुन अधिक देशांच्या नोटा छापतेय

Next Post

मंगोल राजकुमारी ‘खुटुलुन’ त्याकाळातली सर्वात शक्तिशाली महिला होती..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

मंगोल राजकुमारी 'खुटुलुन' त्याकाळातली सर्वात शक्तिशाली महिला होती..!

चिकॅनो चळवळीने मेक्सिकन अमेरिकन लोकांना त्यांचा सन्मान मिळवून दिला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.