The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तिकडे नामिबियात ‘ॲडॉल्फ हिटलर’ चक्क नगरसेवक झालाय..!

by द पोस्टमन टीम
15 September 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


नव्याने जन्मलेल्या बाळाचे नामकरण सहसा उच्च अर्थ असलेल्या शब्दांवरून, देवाच्या नावांवरून किंवा इतिहासातील नायकांच्या नावावरून होते. जगामध्ये सहसा इतिहासातील खलनायकाच्या नावावरून नामकरण होत नाही. म्हणजे आजवर भारतात भरपूर राम आणि शाम झाले पण रावण आणि कंस झाल्याचं कुठेही दिसून येत नाही.

आफ्रिकेतील नामिबिया देशात मात्र एका राजकारणी व्यक्तीचे नाव चक्क ॲडॉल्फ हिटलर वरून ठेवण्यात आलेलं आहे, होय हा तोच नाझी जर्मनीचा ॲडॉल्फ हिटलर, ज्याने एकेकाळी युरोपात वर्णवादाच्या नावाखाली प्रचंड नरसंहार केला होता. 

जर्मन तसेच गोऱ्यांच्या सत्तेविरुद्ध लढलेल्या आणि सध्या सत्ताधारी असलेल्या स्वॅपो पक्षाकडून ॲडॉल्फ हिटलर युनोना ८५% मतांनी निवडून आला आहे.

ॲडॉल्फ हिटलर युनोनाने गेल्या आठवड्यात ही स्थानिक निवडणूक जिंकली, तेव्हा काही आंतरराष्ट्रीय माध्यमांशी बोलताना ॲडॉल्फ हिटलर सारखा जगावर सत्ता प्रस्थापित करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्याने स्पष्ट केले. ॲडॉल्फ हिटलर युनोनाने ओंपुंडजा मतदारसंघाची सल्लागार पदाच्या सदस्यत्वाची (कौन्सेलर) निवडणूक जिंकल्यानंतर त्याने जर्मन वृत्तपत्र ‘बिल्ड’शी बोलताना त्याचा नाझी विचारसरणीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. 



१९१५ पर्यंत जर्मन वसाहत असलेल्या या देशात जर्मन संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. तेथे अजूनही नव्याने जन्मलेल्या मुलांना जर्मन नावं देण्याची पद्धत रूढ असल्याने तिथल्या मुलांना ॲडॉल्फ हे नाव सर्रासपणे दिलं जातं.

त्याच्या वडिलांनी ॲडॉल्फ हिटलरच्या नावावरून त्याचे नाव ठेवल्याचे ॲडॉल्फ हिटलर युनोनाने हे स्पष्ट केले, पण त्याच्या म्हणण्यानुसार कदाचित त्याच्या वडिलांना ॲडॉल्फ हिटलरचं उद्दिष्ट काय होतं हे माहीत नसावं. ॲडॉल्फच्या मते लहानपणापर्यंत त्याच्यासाठी हे नाव अतिशय सामान्य होतं. वय वाढेपर्यंत या माणसाचे जगावर सत्ता प्रस्थापित करण्याचे इरादे आहेत हे ॲडॉल्फला माहीतही नसल्याचं त्याने सांगितलं आणि तसे काही हेतू नसल्याचं त्याने वारंवार स्पष्ट केलं. 

जनमानसामध्ये ॲडॉल्फ नावाने प्रसिद्धी मिळाल्याने, सर्व सरकारी कागदपत्रांत हेच नाव असल्याने आणि महत्वाची बाब म्हणजे त्याची पत्नी त्याला ‘ॲडॉल्फ’ या नावाने हाक देत असल्याने नाव बदलण्याची कोणतीही योजना नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.

१८८४ ते १९१५ दरम्यान नामिबियावर जर्मन वसाहतवाद्यांचं राज्य होतं, तर १९०४ ते १९०८ या चार वर्षात जर्मन साम्राज्याने तेथे मोठा नरसंहार केला होता, याच नरसंहाराला अनेक इतिहासकार “फॉरगॉटन जेनोसाइड (विसरलेला नरसंहार)” म्हणतात. १९०४ ते १९०८ दरम्यान स्थानिक नामा, हेरेरो आणि सॅन लोकांनी जर्मन साम्राज्याविरुद्ध बंड पुकारलं होतं. या वर्षाच्या सुरुवातीला, नामीबियाने जर्मनीने दिलेली १० मिलियन युरोजची भरपाई नाकारली आणि त्यांनी आणखी सुधारित ऑफर साठी वाटाघाटी सुरु ठेवल्या होत्या.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पहिल्या वैश्विक महायुद्धानंतर नामिबियावर साऊथ आफ्रिकेचं राज्य आलं, अखेर १९९० मध्ये नामिबिया देश स्वतंत्र झाला. तरी नामिबिया मधील अनेक शहरांची नावं जर्मन भाषेतून प्रेरित असून तेथे आजही एक लहानसा समूह जर्मन भाषा बोलणारा आहे. तसेच तेथे आजही अनेक जर्मन चर्चेस आहेत आणि जर्मन वसाहतवाद्यांची स्मारकंही.

ॲडॉल्फ हिटलर युनोना ज्या स्वॅपो पक्षातून निवडून आला, तो पक्ष नामिबियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे १९९० पासून सत्तारूढ आहे. पण मागच्या काही वर्षांत मासेमारी उद्योगात भ्रष्टाचार केल्याचे आरोप त्यांच्यावर लागल्यामुळे स्वॅपोच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची घट बघायला मिळाली. मागच्या महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये स्वॅपो पक्षाने ३० मोठ्या शहरांवर असलेली आपली सत्ता गमावली. 

नावावरून झालेला वाद हा नामिबियाचा पहिला वाद नाही. या पूर्वीही तब्बल पाच वर्षांपूर्वी नामिबियातील एका शहराचं नाव बदलण्याची मागणी होत होती. जर्मन वसाहतींच्या काळात, जर्मन लोकांनी हेररो आणि नामा लोकांना ‘लुडरिट्झ’ शहर बांधण्यास भाग पाडले. आता तेथील रहिवासी जर्मन वसाहतीच्या युगातील नावाला “ǂNamiǂNûs” या नामा नावाने बदलायचे की नाही या वादात आहेत. 

ज्या देशांची सत्ता युरोपीय वसाहतवाद्यांनी आणि अन्य परकीय सत्तांनी कपटबलाने हिरावली आणि फक्त त्या देशाच्या, त्या संस्कृतीच्या अपमानासाठी त्यांतील शहरांचे नामकरण केले, त्या शहरांची नावं पुन्हा जशी होती तशी देणं यात काही कमीपणा वाटायला नको. गैरसमजुतीमुळे आणि अज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीचं नाव परकीय शासकाच्या नावावरून जरी ठेवलेलं असलं तरी मनात हेतू शुद्ध असायला हवा, इतकंच यातून लक्षात येतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अगाथा ख्रिस्तींच्या गुप्तहेर कादंबऱ्यानी कित्येक पिढ्यांचं बालपण समृद्ध केलंय

Next Post

जप्त केलेला तीन टन गां*जा पोलिसांनी उघड्यावर जाळला आणि आख्या गावाला ट्रिप दिली

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जप्त केलेला तीन टन गां*जा पोलिसांनी उघड्यावर जाळला आणि आख्या गावाला ट्रिप दिली

या ११ वर्षाच्या मुलाने अँटवर्प विद्यापीठातून फिजिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलं तेही एकाच वर्षात

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.