The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हृदयविकाराचं औषध शोधायचं होतं पण शोध ‘व्हायग्रा’चा लागला

by Heramb
19 September 2025
in विश्लेषण, आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मानवी सभ्यतेच्या इतिहासातील काही सर्वोत्तम शोध अपघाती ठरले आहेत. पेनिसिलिन, टेफ्लॉन, रेडिओएक्टिव्हिटी, अगदी सर्वांचा आवडता कोका-कोला हे सर्व अपघाती शोध आहेत. अपघाती शोध हा एक असा प्रकार आहे, ज्यात शास्त्रज्ञ समस्या A वर उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत असतात, पण काही कारणाने वेगळ्याच B समस्येचं निराकरण होतं. इरेक्टाइल डिसफंक्शनवर उपचार करणाऱ्या मानवजातीच्या अत्यंत प्रिय औषधाच्या बाबतीत असेच घडले आहे.

भारतीय समाजव्यवस्थेत सहसा उघडपणे लैंगिक समस्या किंवा रोगांवर चर्चा केली जात नाही. बहुतेकदा हा विषय टाळला जातो. आजपर्यंत शाळा-कॉलेजेसमध्ये लैंगिक शिक्षण देण्याच्या फक्त ‘चर्चाच’ झाल्या आहेत. या विषयावर विद्यार्थी सोडाच पण डॉक्टर्स आणि प्रौढ नागरिकही सहजपणे किंवा उघडपणे बोलायचं टाळतात.

१९८९ साली, इंग्लंडमधील केंट येथील फाइझर संशोधन केंद्रातील काही रसायनशास्त्रज्ञ उच्च रक्तदाब आणि एंजिना पेक्टोरिस (हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे छातीत दुखणे) यावर उपचार करण्यासाठी नवीन औषध शोधण्याचे काम करत होते. सिल्डेनाफिल (यूके ९२४८०) नावाचे एक नवीन कंपाऊंड तयार केले गेले.

कालांतराने पुरुषांच्या एका गटावर सिल्डेनाफिलची चाचणी केली गेली. क्लिनिकल चाचण्यांमध्ये, या कंपाऊंडचा उच्च रक्तदाबावर काही परिणाम झालेला दिसला नाही आणि हृदयाच्या स्नायूंचा विस्तार करण्यासही या कंपाऊंडने मदत केली नाही. शिवाय वारंवार क्लिनिकल चाचण्या केल्यानंतरही हृदयावर काहीही परिणाम झाला नाही.



तरीही, जेव्हा प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर होता, तेव्हा या कम्पाउंडचा एक असामान्य दुष्परिणाम समोर आला. क्लिनिकल चाचण्या घेतलेल्या पुरुषांना अचानक इरेक्शनचा अनुभव येऊ लागला. चाचण्यांमधील अनेक रुग्ण पोटावर झोपलेले परिचारिकांच्या लक्षात आले, बहुधा अचानक झालेल्या इरेक्शनमुळेच ते पोटावर झोपले असावेत.

सिल्डेनाफिल कंपाउंड पुरुषाच्या जननेंद्रियातील रक्तवाहिन्या पातळ करत असल्याने इरेक्शन होत असल्याचे निरीक्षणातून समोर आले. हृदयविकाराच्या औषधावर संशोधन करताना मानवी चाचण्यांच्या या परिणामांकडे फायझरने दुर्लक्ष केले नाही. खरंतर हा मोठा आर्थिक फायदा मिळवून देणारा शोध होता.

नोंदवल्या गेलेल्या अनुमानांवरून कंपनीने इरेक्टाइल डिसफंक्शनवरील औषधांसाठी चाचण्या सुरू केल्या. पुढील तीन वर्षांच्या कालावधीत, १९९३ ते १९९६ पर्यंत, एकूण २१ चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील तीन हजारांहून अधिक रुग्णांचा समावेश होता. रुग्ण १९ ते ८७ वयोगटातील होते. काहींना व्हायग्रा देण्यात आला आणि काहींना प्लेसबो गोळ्या देण्यात आल्या. रुग्णांना किंवा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सना व्हायग्रा आणि प्लेसबो गोळ्या दिल्या गेल्या आहेत याचा थांगपत्ताही लागू दिला गेला नाही.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

सर्व टेस्ट्सचा एकच रिजल्ट होता – व्हायग्राचा इरेक्टाइल फंक्शनवर लक्षणीय परिणाम झाला. आता त्याची ओळख जगाला करून देण्याची वेळ आली होती. हे औषध सहज पद्धतीने शरीरात सोडण्यात येते, या औषधाने जननेंद्रियामध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि इरेक्शन होते. 

खरंतर नायट्रिक ऑक्साईडच्या प्रकाशाद्वारे हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह वाढवणे हे या सिल्डेनाफिल औषध निर्मितीमागील मूलभूत कारण होते. रासायनिक नायट्रिक ऑक्साईड शरीरातील गुळगुळीत स्नायूंना आराम देण्याचे काम करते. जसजसे स्नायू शिथिल होतात, त्यांच्यामधून जास्त रक्त वाहते.पण सिल्डेनाफिलचा परिणाम हृदयाच्या स्नायूंवर होण्याऐवजी जननेंद्रियाच्या स्नायूंवर झाला आणि व्हायग्राचा शोध लागला.

सिल्डेनाफिल हे एक ॲलोपॅथिक औषध असून इतर ॲलोपॅथिक औषधांप्रमाणे याचेही साईड इफेक्ट्स दिसून येतात. डोकेदुखी आणि छातीत जळजळ हे त्याचे शॉर्ट टर्ममधील साईड इफेक्ट्स असून त्याचा अतिरेक झाल्यास मानवी कानांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्लेबॉय किंग ह्यू हेफनर या औषधाचे नियमित सेवन करीत असे. व्हायग्राच्या अति वापरामुळे तो एका कानाने बहिरा झाला असे मानले जाते. त्याने आपल्या कानापेक्षा विषयसुखाला अधिक प्राधान्य दिले, हे त्याने स्वतः मान्य केले होते. तथापि व्हायग्राचा निरोगी पुरुषांवर लिमिटेड साईड इफेक्ट होतो हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे.

चाचण्या यशस्वीपणे पार पडल्यामुळे फायझर या शतकातील सर्वोत्तम ‘ॲक्सिडेंटल इन्व्हेंशन’ बाजारात आणण्यास तयार होता. १९९६ साली कंपनीला व्हायग्राचे पेटंट मिळाले. कंपनीने १९९७ साली यु. एस. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनकडे (एफ.डी.ए.) परवान्यासाठी अर्ज केला. एफडीएने त्यांना प्रायोरिटी बेसिसवर परवाना दिला आणि २७ मार्च १९९८ रोजी व्हायग्रा अधिकृतपणे लाँच झाला. स्पष्ट सांगायचं झालं तर, अनेकजण इरेक्टाइल डिसफंक्शन या समस्येवर प्राथमिक उपचार घेण्यासाठी उतावीळ होता.

आज, व्हायग्रा हे इरेक्टाइल डिसफंक्शन असलेल्या पुरुषांसाठी एका वरदानासारखे आहे. विशेषतः तरुण लोकांमध्ये ‘आधुनिक जीवनशैली’मुळे इरेक्टाइल डिसफंक्शनसारख्या समस्या वाढल्या आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

राणी अमिनाच्या शौर्याच्या कथा आफ्रिकेच्या घराघरात आजही सांगितल्या जातात

Next Post

थेट ना*झी अधिकाऱ्यांशी सौदा केला आणि हंगेरीतल्या १६०० ज्यूंना हॉलोकॉस्ट पासून वाचवलं

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

थेट ना*झी अधिकाऱ्यांशी सौदा केला आणि हंगेरीतल्या १६०० ज्यूंना हॉलोकॉस्ट पासून वाचवलं

कम्प्युटरमधील एका एररमुळे नासाची अपोलो-११ मोहीम धोक्यात आली होती! 

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.