The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अगाथा ख्रिस्तींच्या गुप्तहेर कादंबऱ्यानी कित्येक पिढ्यांचं बालपण समृद्ध केलंय

by द पोस्टमन टीम
14 September 2024
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


डिटेक्टिव नॉव्हेल्स म्हटलं की क्षणार्धात ‘अगाथा ख्रिस्ती’ हे नाव समोर येतं. जगाच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय लेखकांपैकी अगाथा एक आहेत. आतापर्यंत त्यांच्या कादंबऱ्यांच्या तब्बल चार अब्ज प्रती जगभरात विकल्या गेल्या आहेत! रहस्यमयी कथानक लिहिण्यात या बाईचा कुणीही हात धरू शकत नाही.

अगाथानं आपल्या कल्पनाविश्वातून निर्माण केलेली हरक्यूल पोयरोट आणि मिस मार्पल ही दोन पात्रं तर इंग्रजी साहित्यात अजरामर झालेली आहेत. गूढ साहित्याची निर्मिती करणाऱ्या अगाथा यांचं आयुष्य नेमकं कसं होतं, याबाबत हा विशेष लेख…

इंग्लंडमधील डेव्हन या ठिकाणी १५ सप्टेंबर १८९० रोजी अगाथाचा जन्म झाला. अगाथा मेरी क्लेरिसा मिलर हे तिचं पूर्ण नाव होतं. तिचे वडील फ्रेडरिक अल्वा मिलर न्यूयॉर्कमध्ये स्टॉक ब्रोकर होते तर आई क्लारा ही एका लष्करी अधिकाऱ्याची मुलगी होती.

अगाथाला मार्गारेट आणि लुई नावाची दोन मोठी भावंडं होती. डेव्हनमध्ये वाढलेल्या अगाथा वयाच्या पाचव्या वर्षी स्वतःचं वाचायला शिकली. तिच्या दोन भावंडांना त्यांच्या शिक्षणासाठी बाहेर पाठवलं गेलं होतं. अगाथाचं मात्र, होमस्कूलींग झालं.



लहानपणापासूनच तिला वाचन, कविता लिहिण्याची आणि संगीताची आवड होती. १९७७ मध्ये प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात अगाथाने आपल्या बालपणाविषयी लिहिलं आहे. आपलं बालपण अतिशय आनंदात गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नोव्हेंबर १९०१ मध्ये हृदयविकाराचे झटके आल्यानं तिच्या वडिलांचा मृत्यू झाला.

वडिलांच्या मृत्यूनंतर १९०२ मध्ये अगाथाला मिस गायर्स गर्ल्स स्कूलमध्ये पाठवण्यात आलं. १९०५ मध्ये पुढील शिक्षणासाठी ती फ्रान्सला गेली आणि पाच वर्षांनी म्हणजे १९१० मध्ये इंग्लंडला परतली. या दरम्यान अगाथानं तिची पहिली लघुकथा ‘द हाउस ऑफ ड्रीम्स’ लिहायला सुरुवात केली होती.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

त्याकाळात ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात बॉल्स(नृत्याचे कार्यक्रम) आयोजित केले जात. या ठिकाणी कितीतरी लोकांच्या जोड्या जुळत. अगाथाच्या बाबतीत देखील हेच झालं. १९१२ मध्ये अगाथा आणि रॉयल फ्लाइंग कॉर्प्समधील अधिकारी आर्ची ख्रिस्ती यांची भेट झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

जुलै १९१४ मध्ये पहिल्या महायु*द्धाचा उद्रेक झाला आणि आर्चीला फ्रान्समध्ये लढण्यासाठी जावं लागलं. तर अगाथा टॉरक्वेच्या रेड क्रॉस हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून रुजू झाली. डिसेंबरमध्ये आर्ची सुट्टीसाठी परत आला. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर दोनच दिवसांनी आर्ची पुन्हा फ्रान्सला गेला. महायु*द्धामुळं या जोडप्याचं सुरुवातीचं वैवाहिक जीवन विस्कळीत झालं. नोव्हेंबर १९१८ मध्ये यु*द्ध संपल्यानंतर आर्चीला लंडनमध्ये लष्करी फायनान्स विभागात पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांना स्थैर्य मिळालं.

पहिल्या महायु*द्धानं अगाथाच्या आयुष्यात निर्णायक भूमिका निभावली. या काळातच तिच्या आणि आर्चीच्या नात्याचा कस लागला आणि याच काळात तिनं गुप्तहेरांच्या कथा लिहायला सुरुवात केली. 

१९१६ मध्ये तिनं ‘द मिस्टेरियस अफेअर अ‍ॅट स्टाईल्स’ ही पहिली कादंबरी लिहिली आणि चार वर्षांनंतर ती प्रकाशित झाली. त्यानंतर १९२२ मध्ये ‘सिक्रेट अडव्हायजरी’ नावाची दुसरी कांदबरी प्रकाशित झाली. त्याला वाचकांची आणि समिक्षकांची दाद मिळाली. त्याच वर्षी, आर्चीला ब्रिटिशांच्या वसाहती असलेल्या ठिकाणांचा दौरा करण्यास सांगितलं. अगाथा देखील आपल्या पती सोबत गेली. हा मधला काळ अगाथासाठी निवांत गेला. मात्र, १९२६ हे वर्ष तिच्या आयुष्यात वादळी ठरलं.

१९२६ मध्ये अगाथाच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यामुळं ती मानसिकदृष्ट्या उन्मळून पडली. त्यावर्षी तिच्या आईचा मृत्यू झाला. त्यातून सावरत असतानाच अचानक तिच्या पतीनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आपला पती एका दुसऱ्या महिलेसाठी आपल्याला सोडून जात आहे, या गोष्टीनं अगाथा कमालीची अस्वस्थ झाली होती.

३ डिसेंबरच्या रात्री ती अचानक घर सोडून निघून गेली. आपण यॉर्कशायरला जात असल्याची चिठ्ठी तिनं मागे सोडली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अगाथाची कार तिच्या घरापासून कित्येक मैल अंतरावर असलेल्या खडूच्या खाणीजवळ सापडली. त्यानंतर मात्र, तिला शोधण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली. न्यूयॉर्क टाइम्ससह अनेक वृत्तपत्रांमध्ये तिचं छायाचित्र छापलं गेलं होतं. प्रसिद्ध कांदबरीकारासोबत नेमकं काय झालं, याबाबत पत्रकारांनी आपापले कयास लावण्यास सुरुवात केली.

ठिकठिकाणी शोधाशोध केल्यानंतर ११ दिवसांनी हॅरोगेटमधील एका हॉटेलमध्ये अगाथा सापडली. विशेष म्हणजे त्याठिकाणी ती आपल्या पतीची प्रेयसी असलेल्या थेरेसा नीलच्या नावाखाली राहत होती. अगाथाच्या अचानक बेपत्ता होण्याला नेमक कारण काय होतं. ११ दिवसांमध्ये तिच्या सोबत काय झालं, याबाबात अगाथा कधीही जाहीरपणे बोलली नाही.

पोलीस, प्रेस आणि अगाथाच्या कुटुंबातील सदस्यांनी याबाबत असंख्य अंदाज लावले. त्यानंतर दोन वर्षांनी १९२८ मध्ये तिनं लेखिका म्हणून जोरदार पुनरागमन केलं. तिनं सर्वांत प्रसिद्ध कादंबऱ्यांपैकी एक असलेल्या ‘द मिस्ट्री ऑफ द ब्लू ट्रेन’ या पुस्तकाचं लेखन पूर्ण केलं. यादरम्यान तिचा आणि आर्चीची घटस्फोट प्रक्रिया देखील पूर्ण झाली.

पहिल्या पतीपासून विलग झाल्यानंतर दोन वर्षांनी, बगदादजवळील उर येथील एका पुरातत्व स्थळाला भेट देताना अगाथा आणि पुरातत्त्ववेत्ता मॅक्स मॅलोवनची भेट झाली. तो तिच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान होता. पहिल्या भेटीनंतर अवघ्या सहा महिन्यांतच या जोडप्यानं लग्न केलं.

वैयक्तिक आयुष्यात चढ-उतार येत होते तरी लिखाणावरील निष्ठा तिनं ढळू दिली नाही. मर्डर ऑन ओरिएंट एक्स्प्रेस (१९३४), डेथ ऑन द नाईल (१९३७) आणि अपॉइंटमेंट विथ डेथ (१९३८) या प्रसिद्ध कांदबऱ्या तिनं पूर्ण केल्या. 

१९३९ साली दुसरं महायु*द्ध सुरू झालं. अगाथानं पुन्हा लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटलच्या फार्मसीमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलं. तिथे तिला वेगवेगळ्या प्रकारच्या विषांची आणि औषधांची माहिती मिळाली. तिनं हे नवीन ज्ञान आपल्या पुढील गुन्हेगारी कादंबऱ्यांमध्ये वापरलं.

अगाथा दुसऱ्या महायु*द्धानंतरही लिहित राहिली. साहित्यातील योगदानासाठी १९५६ च्या नवीन वर्षाच्या सन्मान यादीत तिला CBE (कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर) देऊन सन्मानित करण्यात आलं. १९६८ मध्ये तिच्या पतीला पुरातत्त्व कार्यासाठी नाइटहुड प्रदान करण्यात आली. १९७१ मध्ये अगाथाला डेम कमांडर म्हणून बढती देखील मिळाली होती.

७० च्या दशकात अगाथाची प्रकृती खालावू लागली. १२ जानेवारी १९७६ रोजी तिचं ऑक्सफोर्डशायरमधील घरी निधन झालं. ‘स्लीपिंग मर्डर: मिस मार्पल्स लास्ट केस’ ही तिची शेवटची कांदबरी तिच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाली. एक लेखक म्हणून तिची क्षमता अफाट होती. आपल्या कारकिर्दीमध्ये तिनं तब्बल ६६ गुप्तहेर कादंबऱ्या आणि १४ लघुकथा संग्रह लिहिले. याशिवाय तिनं जगातील सर्वांत दिर्घकाळ चालणारं ‘द माउसट्रॅप’ हे नाटक देखील लिहिलं.

ज्या काळात सर ऑर्थर कॅनॉन डोयल यांचा शेरलॉक होम्स गुप्तहेरांच्या जगतावर राज्य करत होता, त्याकाळात अगाथा ख्रिस्ती यांनी स्वत:च्या पात्रांना वेगळं अस्तित्त्व मिळवून दिलं होतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

शेती जमली नाही म्हणून इंजिनिअरिंग केली, आज टाटा ग्रुपचे प्रमुख आहेत

Next Post

तिकडे नामिबियात ‘ॲडॉल्फ हिटलर’ चक्क नगरसेवक झालाय..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

तिकडे नामिबियात 'ॲडॉल्फ हिटलर' चक्क नगरसेवक झालाय..!

जप्त केलेला तीन टन गां*जा पोलिसांनी उघड्यावर जाळला आणि आख्या गावाला ट्रिप दिली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.