The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मूर्ख वाटतील असे व्यवसाय करून या माणसाने गडगंज संपत्ती कमावली होती..!

by द पोस्टमन टीम
4 September 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, ज्यांची पात्रता नसतानाही त्यांना यश मिळतं. अशा लोकांना आपण ‘नशीबवान’ म्हणतो. अमेरिकेमध्ये असाच एक व्यक्ती होता. जेमतेम शिकलेला हा माणूस पुढे जाऊन एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि लेखक बनला. वेंधळा असूनही श्रीमंती त्याच्या पायाजवळ लोळण घेत होती. या व्यक्तीचं नाव होतं ‘टिमोथी डेक्सटर’. न्यूकॅसलला कोळसा विकण्यासाठी आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात बेड वॉर्मर्स विकण्यासाठी तो प्रसिद्ध होता! त्यानं एकही विरामचिन्ह न वापरता एक अर्धवट पुस्तक लिहिलं होतं आणि विशेष म्हणजे त्याच्या आठ इडिशन्स निघाल्या.

टिमोथी डेक्स्टरचा जन्म २२ जानेवारी १७४७ रोजी मॅसाच्युसेट्स प्रांतातील माल्डेन येथे झाला. त्याचे पूर्वज आयर्लंडमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्याला वयाच्या आठव्या वर्षीच शाळा सोडावी लागली. पैसे मिळवण्यासाठी तो जमीनदारांच्या शेतात गडी म्हणून काम करू लागला.

वयाच्या १४व्या वर्षी त्यानं चार्ल्सटाउन येथील आपलं शेतीतील काम सोडून ब्रीचेस आणि ग्लोव्हज् तयार करण्याच्या एका कारखान्यात काम सुरू केलं. तेथील काम सोडताना त्याच्या मालकानं त्याला एक ‘फ्रिडम सूट’ भेट दिला होता.

डेक्सटरनं आपला हा फ्रिडम सूट आठ डॉलर्स आणि २० सेंटला विकला. त्या पैशातून त्यानं १७६७ च्या सुमारास न्यू ब्युरपोर्टला स्थलांतर केलं. त्यावेळी न्यू ब्युरपोर्टकडे अनेक कारागीर आणि व्यापारी आकर्षित होत होते. त्यामुळं त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढला होता. परिणामी त्याठिकाणाला व्यावसायिक महत्त्व प्राप्त झालं होतं. १७६७ या एका वर्षामध्ये न्यूब्युरपोर्टमधील जहाज बांधकाम व्यावसायिकांनी ७० जहाजं बांधली होती.



यावरून आपल्याला त्या ठिकाणच्या व्यावसायिक महत्त्वाची कल्पना करता येईल. त्याठिकाणी गेल्यानंतर एका वर्षाच्या आतच डेक्सटरनं काही जमीन विकत घेतली. त्यानं एलिझाबेथ फ्रोथिंगहॅम नावाच्या श्रीमंत महिलेशी लग्न केलं. ती त्याच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठी असलेली विधवा होती. तिला चार मुलं देखील होती.

आपल्या पत्नीच्या घराच्या तळघरात डेक्टरनं एक दुकान काढलं. याठिकाणी तो मूसहाइड ट्राऊझर्स, हातमोजे, ब्लबर (तेल तयार करण्यासाठी वापरली जाणारी माशांची चरबी) विकत होता. न्यूब्युरपोर्ट मोठं बंदर असल्यानं डेक्सटरचा व्यवसाय देखील चांगला सुरू होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

अमेरिकन क्रांतीच्या अखेरीस त्यानं हजारो डॉलर्सची बचत केली होती. नंतर ही सर्व रक्कम त्यानं कॉन्टिनेंटल चलनावर खर्च केली. त्यावेळी या चलनाला महत्त्व नव्हतं. मात्र, क्रांतीनंतर जेव्हा काँग्रेसनं चलनविषयक धोरण बदलण्याचा निर्णय घेतला तेव्हा डेक्सटर अचानक श्रीमंत झाला. आता हे त्याचं नशीब होतं की हुशारी?

संपत्तीमध्ये वाढ झाल्यानंतर डेक्टरनं प्रतिष्ठित स्टेट स्ट्रीटवर एक भव्य घर विकत घेतलं. त्यानंतर त्यानं मेहिताबेल व काँग्रेस नावाची दोन जहाजं बांधून घेतली आणि व्यापार सुरू केला. त्याच्या व्यापारांबद्दल अनेक किस्से सांगितले जातात. त्यानं न्यूकॅसलला कोळसे पाठवण्याचा व्यवसाय केला. अनेकांना त्याची ही गोष्ट हास्यास्पद वाटली. कारण न्यूकॅसलमध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा उपलब्ध होता.

मात्र, डेक्सटरचं नशीब म्हणा किंवा हुशारी, न्यूकॅसलमधील खाण कामगारांनी संप पुकारला आणि या संपादरम्यान डेक्सटरचा कोळसा चढ्या किमतीनं विकला गेला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं उष्णकटिबंधीय प्रदेशात असलेल्या वेस्ट इंडीजमध्ये बेड वॉर्मर्स विकले! ज्या ठिकाणी कमालीची थंडी आहे त्याठिकाणी बेड वॉर्मर्स विकण्यात तथ्य आहे मात्र, ज्याठिकाणी उष्णता आहे त्याठिकाणी वॉर्मर्स विकणं म्हणजे निव्वळ मुर्खपणा म्हणता येईल. मात्र, पुन्हा डेक्सटरचं नशीब म्हणा की हुशारी, त्यानं विकलेले बेड वॉर्मर्स वेस्ट इंडीजमधील लोकांनी गुळ उद्योगात वापरले.

त्याच्या व्यापाराविषयीच्या गमती इतक्यातच थांबत नाहीत. त्यानं शहर प्रशासनाकडून शेकडो मांजरी खरेदी केल्या आणि विकल्या होत्या! न्यूब्युरपोर्टमध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या मांजरी होत्या. या मांजरी रहिवाशांसाठी उपद्रवी ठरत होत्या. ही समस्या सोडवण्यासाठी टाऊन मीटिंगनं या मांजरी मारण्याचा निर्णय घेतला. मात्र, डेक्सटरनं या भटक्या मांजरी विकत घेतल्या आणि त्या कॅरिबियन बेटांवर पाठवल्या.

विशेष म्हणजे तेथील गोदाम मालकांनी म्हणेल ती किंमत देऊन या मांजरी खरेदी केल्या. कारण गोदाम मालक उंदरांच्या समस्यांनी त्रस्त होते. डेक्सटरला कॅरेबियन बेटांवरील उंदरांच्या प्रादुर्भावाविषयी माहिती असेल तर, मांजरी खरेदी करणं ही त्याची हुशारी होती मात्र, जर याबाबत त्याला माहिती नसेल तर पुन्हा हे त्याचं नशीबच म्हणावं लागेल.

कालांतरानं त्यानं एक इस्टेट खरेदी केली आणि स्वत:ला लॉर्ड घोषित केलं. इस्टेटमधील मोकळ्या मैदानावर त्यानं एक संग्रहालय तयार केलं. ज्यामध्ये लुई XVI, ॲडम-इव्ह, टौसेंट लूव्हचर आणि जॉन हॅनकॉक सारख्या वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्त्वांचे ४० नक्षीदार लाकडी पुतळे होते.

एका भव्य कमानीवर अमेरिकेच्या पहिल्या तीन राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. काहींच्या मते त्यानं हे संग्रहालय बांधून वेडेपणा केला होता तर काहींच्या मते त्याच्या या वेडेपणाच्या मागे कारण होतं. त्यानं एसेक्स-मेरीमॅक ब्रिजमध्ये गुंतवणूक केली होती आणि त्या पुलावरील वाहतूक बंद पडत होती. या संग्रहालयाची निर्मिती करून त्यानं पुलावरील रहदारी वाढवण्याचा प्रयत्न केला होता, असं म्हटलं जातं.

१८०२ मध्ये, डेक्सटरनं २४ पानांचं एक पुस्तक प्रकाशित केलं! त्यात त्यानं चर्चमधील पाद्री, राजकारणी आणि आपल्या पत्नीवर टीका केली होती. या पुस्तकामध्ये भरमसाठ चुका होत्या आणि एकही विरामचिन्हं नव्हतं. ‘ज्ञानी लोकांच्या मेंदूला खाद्य’ असा त्यानं आपल्या पुस्तकाचा उल्लेख केला होता. सुरुवातीला त्यानं हे पुस्तक विनामूल्य वाटलं. परंतु ते मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालं आणि त्याच्या आठ आवृत्त्या झाल्या!

डेक्सटरच्या वेडेपणाची आणखी एक विचित्र गोष्ट अमेरिकन लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यानं आपल्या मृत्यूपूर्वीचं स्वतःच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्या मृत्यूनंतर लोकांची काय प्रतिक्रिया असेल हे त्याला पाहायचे होते. असं म्हटलं जातं, या कार्यक्रमानंतर त्यानं आपल्या पत्नीला मारहाण केली होती कारण ती पुरेशी रडली नव्हती! पुढे २६ ऑक्टोबर १८०६ रोजी लॉर्ड टिमोथी डेक्सटरचा वयाच्या ५९व्या वर्षी मृत्यू झाला. आपल्या मृत्यूनंतर त्यानं न्यूब्युरपोर्टमधील गरीबांच्या देखरेखीसाठी आपली संपत्ती ठेवली.

गडगंज संपत्ती असूनही एका त्याला एका गोष्टीमध्ये अपयश आलं ते म्हणजे, त्याला उच्चभ्रू समाजानं स्वीकारलं नाही. त्याला एक “नशीबवान मूर्ख” समजलं जात होतं. आजही अनेकांच्या मनात डेक्सटरविषयी एक प्रश्न रेंगाळतो. तो म्हणजे, तो खरोखरचं नशीबान होता की अतिशहाणा होता?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

त्रावणकोर संस्थानाच्या आर्थिक विकासाला चालना देणारी महाराणी सेतू लक्ष्मी बाई

Next Post

या ब्रिटिश अधिकाऱ्याने पहिल्या आधुनिक संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या ब्रिटिश अधिकाऱ्याने पहिल्या आधुनिक संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली होती

१८१ सदस्य असलेलं जगातलं सगळ्यात मोठं कुटुंब तरीही गिनीज बुकमध्ये नोंदच नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.