The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या कंपनीने जगभरातील करोडो लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर प्रभावी उपाय शोधलाय

by द पोस्टमन टीम
23 August 2025
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जेव्हा केव्हा आपण जगासाठी धोकादायक गोष्टींचा विचार करतो, तेव्हा आपल्या नजरेसमोर द*हश*तवाद, अस्थिर देश, बेरोजगारी यांसारख्या गोष्टी येतात. मात्र, जागतिक समस्या म्हणून एखादा गढुळ पाण्याचा ग्लास कधीच आपल्या नजरेसमोर येत नाही. आता तुम्ही म्हणाल गढुळ पाणी ही काय विचार करण्याची बाब आहे का? तर हो!

आजही जगभरातील कोट्यवधी लोकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे. त्यातून आरोग्याच्या समस्या उभ्या राहतात. या टाळण्यासाठी लोक मग वॉटर प्युरिफायरसारख्या गोष्टी जवळ करतात. पण, प्युरिफायरसारखी गोष्ट घरातच वापरता येते. घराबाहेर जर शुद्ध पाणी मिळवायचं झालं तर बॉटल विकत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यात आपल्या खिश्याला कात्री बसते. या समस्येवर ‘लाईफस्ट्रॉ’ नावाच्या कंपनीनं एक भन्नाट उपाय शोधला आहे. कंपनीनं एक पोर्टेबल वॉटर प्युरिफायर तयार केलं आहे.

‘लाईफस्ट्रॉ’च्या पोर्टेबल वॉटर प्युरिफायरबद्दल जाणून घेण्याअगोदर, गढुळ पाण्याची समस्या किती मोठी आहे ते पाहूया… ‘पाणी’ हा घटक शाश्वत विकासाच्या मुळाशी आहे. सामाजिक-आर्थिक विकासासाठी, निरोगी पर्यावरणासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी पाण्याचं अस्तित्त्व अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

१९९७ ते २०११ या काळात मोठ्या प्रमाणात परिसंस्थांचं नुकसान झालेलं आहे आणि यामागे पाण्याचं प्रदुषण हा प्रमुख घटक कारणीभूत आहे. सध्या जगभरातील २.१ अब्ज लोकांना पिण्यासाठी सुरक्षित पाणी उपलब्ध नाही. युनायटेड नेशन्सच्या अभ्यासानुसार, दरवर्षी जितके लोक यु*द्ध किंवा हिं*सेमध्ये मरतात त्यापेक्षा जास्त लोक अस्वच्छ पाण्यामुळं मरतात.

जगातील गरीब राष्ट्रे पाण्यामुळे होणाऱ्या कॉलरा, टायफॉइड आणि आंत्र ताप या आजारांनी ग्रस्त आहेत. दररोज अंदाजे ६ हजार लोक अशा आजारांमुळे मृत्यूमुखी पडतात. पाण्यातील बॅक्टेरियल किंवा विषाणूजन्य दूषित घटक आतड्यांमध्ये विष पसरवू शकतात. त्यामुळं अतिसार आणि उलट्या होऊ शकतात. जागतिक स्तरावर, अतिसार हे आजारपणांचं आणि मृत्यूचं मुख्य कारण आहे.



आजही जवळपास ७८ कोटी लोक पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छ स्त्रोतांचा वापर करत नाहीत. याचं एक कारण गरिबी देखील आहे. अशुद्ध पाणी पिण्यायोग्य करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि महागडी आहे. त्यामुळं आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडातील विकसनशील व गरिब राष्ट्रांतील लोकांसाठी शुद्ध पाणी ही एक चैनीची गोष्ट ठरते.

मोठ्या आर्थिक बोजाशिवाय गरीब राष्ट्रांतील अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी एक सुरक्षित, प्रभावी मार्ग शोधण्याचं आव्हान जगासमोर आहे. वेस्टरगार्ड फ्रँडसेन या स्विस कंपनीनं हे आव्हान स्विकारलं आहे. कंपनीचा असा विश्वास आहे की, त्याचं ‘लाइफस्ट्रॉ’ नावाचं उत्पादन अशुद्ध पाण्याच्या समस्येवर उत्तम उपाय आहे.

हे देखील वाचा

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

‘लाइफस्ट्रॉ’ हा पाणी शुध्दीकरण आणि शुद्धीकरण साधनांचा एक ब्रँड आहे. या ब्रँडनं सुरुवातीला लाइफस्ट्रॉ नावाचं एक वॉटर फिल्टर डिझाइन केलं. हे एक स्ट्रॉ जास्तीत जास्त ४ हजार लिटर पाणी फिल्टर करू शकतं. सरासरी एका व्यक्तीला हे पाणी तीन वर्षांसाठी पुरेसे आहे. या स्ट्रॉ फिल्टरमुळं पाण्यातील सर्व जीवाणू, मायक्रोप्लास्टिक्स आणि परजीवी घटक नाश पावतात. नंतर कंपनीनं एक पोर्टेबल बाटली विकसित केली. एखाद्या स्पोर्टस् वॉटर बॉटल सारखी तिची रचना आहे. या पोर्टेबल फिल्टर व्यतिरिक्त, गुरुत्वाकर्षण शक्तीवर चालणारे हाय-व्हॉल्यूम प्युरिफायर्स देखील कंपनी तयार करते. हे हाय-व्हॉल्यूम प्युरिफायर्स कौटुंबिक आणि सामुदायिक वापरासाठी डिझाइन केलेले आहेत.

एक लाइफस्ट्रॉ ९.२५ इंच (२३.५ सेंटीमीटर) लांब आणि एक इंच (२.५ सेंटीमीटर) रुंद असते. या युनिटचं बाह्य कवच टिकाऊ प्लॅस्टिकचे बनलेले आहे. त्याला एक दोरी जोडलेली असते जेणेकरून वापरकर्ते ती गळ्यात लटकवून आरामात फिरू शकतात. त्याचा वापर करण्यासाठी, एखादी व्यक्ती हा लाइफस्ट्रॉ थेट पाण्याच्या मूळ स्त्रोतामध्ये टाकून पाणी पिऊ शकतो. जसं आपण स्ट्रॉनं ज्युस पितो अगदी तसंच या लाइफस्ट्रॉच्या मदतीनं पाणी पिता येते.

लाइफस्ट्रॉच्या पहिल्या आवृत्तीमध्ये बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी आयोडीनचा वापर केला गेला होता. परंतु २०१२च्या नवीन आवृत्तीत कोणतही रसायन वापरलं गेलं नाही. त्याऐवजी, मेकॅनिकल फिल्टरेशनची प्रक्रिया समाविष्ट करण्यात आली. जेव्हा या स्ट्रॉच्या मदतीनं आपण पाणी वर शोषतो, तेव्हा ०.२ मायक्रॉनपेक्षा कमी छिद्र असलेल्या पोकळ तंतूंमधून पाणी फिल्टर होऊन वरती येते. पाण्यातील सर्व घाण, जीवाणू किंवा परजीवी त्या तंतूंमध्ये अडकून राहतात. पाणी पिऊन झाल्यानंतर अगदी सहज हे फिल्टर साफही करता येते. त्यासाठी फक्त एक जोराची फुंकर मारायची असते. 

वेस्टरगार्ड फ्रँडसन कंपनीच्या म्हणण्यानुसार, एक वैयक्तिक लाइफस्ट्रॉ युनिट १ हजार लिटर (२६४ गॅलन) पाणी शुद्ध करू शकतं. तर एका दिवसाला ते २.७ लिटर पाणी शुद्ध करण्यास सक्षम आहे. याचाच अर्थ एक स्ट्रॉ साधारण वर्षभर टिकतो. त्याच्यात कुठलाही रिप्लेसेबल भाग नाही. प्रत्येक वर्षी संपूर्ण युनिटचं नवीन घेता येते.

लाइफस्ट्रॉची पहिली एडिशन २०१०चा हैती भूकंप, २०१०चा पाकिस्तानमधील पूर, २०११चा थायलंडमधील पूरात वाटण्यात आली होती. तर, २०१६च्या इक्वेडोर भूकंपात देखील वारण्यात आलं आहे. केनियामधील मुटोमो जिल्हा दीर्घकालीन दुष्काळाचा सामना करतो आहे. केनिया रेड क्रॉसनं तेथील ३ हजार ७५० शाळकरी मुलांना पोर्टेबल लाइफस्ट्रॉ वितरीत केले आहेत. तर, ६ हजार ७५० घरांना घरगुती फिल्टर पुरवले आहेत. २०१५ मध्ये, रवांडामध्ये देखील लाइफस्ट्रॉ फिल्टर पाठवण्यात आले आहेत.

कंपनी ‘रिटेल गिव्ह बॅक प्रोग्राम’ला देखील निधी देते. त्यामुळं २०१८ पर्यंत केनियाच्या ग्रामीण भागातील १ कोटीपेक्षा जास्त शालेय मुलांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळालं. लाइफस्ट्रॉचं आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये कौतुक झालं आहे. जागतिक बदलासाठी पुरक कल्पनेसाठी २००८ सात्ची अँड सात्ची पुरस्कार त्याला मिळाला आहे. याशिवाय २००५मध्ये टाइम मॅगझिननं याला ‘सर्वोत्कृष्ट शोध’ म्हणून देखील गौरवलं आहे.

जे देश आणि तेथील लोकसंख्या अशुद्ध पाण्याच्या संकटाचा सामना करत आहेत. त्यांच्यासाठी लाइफस्ट्रॉ हा उत्तम पर्याय आहे. त्याच्या सहज-सोप्या रचनेमुळं त्याचा वापर देखील अतिशय सोपा आहे. त्याच्या मदतीनं नक्कीचं पाण्यापासून होणारी रोगराई टाळता येऊ शकते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भाषण चालू असताना छातीवर गोळी लागली, तरीही प्रेसिडेंट रुझवेल्टनी पुढे ९० मिनिटं भाषण दिलं

Next Post

या छोट्या हॉटेलसमोर अमेरिकन फूड जायंट ‘मॅकडोनाल्ड’लाही हार मानवी लागली

Related Posts

आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
आरोग्य

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

15 March 2024
Next Post

या छोट्या हॉटेलसमोर अमेरिकन फूड जायंट ‘मॅकडोनाल्ड’लाही हार मानवी लागली

अजय, शाहरुख, अमिताभ तर करतातच पण 'जेम्स बॉण्डने'सुद्धा एकदा पान मसाल्याची जाहिरात केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.