The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्राचीन ‘रोम’मध्ये लोक नशा करण्यासाठी या माशाचं सेवन करायचे..!

by द पोस्टमन टीम
7 August 2025
in आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


एखादी व्यक्ती आजारपणामुळं अतिशय कृश झाली असेल तर डॉक्टर दूध, अंडी, मासे खाण्याचा सल्ला देतात. माशांचं सेवन करणं आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर आहे. माशांमध्ये ओमेगा -3, विटॅमिन डी आणि बी 2 (राइबोफ्लेविन) ही फॅटी ॲसिड्स सर्वात जास्त प्रमाणात असतात. याशिवाय कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, जस्त, आयोडिन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारख्या खनिजांचा प्रमुख स्रोत म्हणून माशांकडे पाहिलं जातं.

जगभरातील साधारण ३ अब्ज लोकसंख्या आपल्या आहारामध्ये माशांचा समावेश करते. चीन, म्यानमार, व्हिएतनाम आणि जपान यासारख्या देशांमध्ये तर मासे मुख्य अन्न म्हणून खाल्ले जातात. हे देश विविध माशांचे अव्वल ग्राहक देश आहेत. जगभरात हजारो प्रजातींचे मासे आढळतात. त्यातील काही खाण्यायोग्य आहेत तर काही खाण्यासाठी घातक आहेत.

माशांची अशीच एक प्रजाती आहे, जिचा वापर ‘ड्रग’ म्हणून होतो! प्राचीन रोमन लोक तर सर्रास याचा वापर करत. ‘सरप साल्पा’, अशा माशाचं नाव आहे. त्याला सॅलमा प्रॉजी नावानंही ओळखलं जातं. 

या माशाचं रहस्य नेमकं आहे तरी काय हे आपण जाणून घेऊया…



प्राचीन रोमन लोक नेहमीच निसर्गाशी सुसंगत जीवन जगत होते. ते निसर्गाशी इतके एकरूप होते की रोमन साम्राज्यातील मुलंदेखील, कोणती वनस्पती आणि प्राणी उपयुक्त आहेत हे ओळखण्यात तरबेज होते. रोमन लोक खाण्यासाठी, सौंदर्य प्रसाधनांसाठी, कपडे रंगवण्यासाठी, हस्तकलेसाठी आणि वैद्यकीय कारणांसाठी वनस्पती व प्राण्यांचा वापर करत. या रोमन लोकांना आणखी एक रहस्य सापडलं होतं.

ते लोक ‘सरप साल्पा’ नावाच्या माशांचा वापर आपल्या शत्रूंचं मानसिक संतुलन बिघडवण्यासाठी करत. ‘सरप साल्पा’चा अर्थचं ‘ड्रीम फिश’, असा होतो. हे मासे खाल्यानंतर व्यक्तीचा मेंदू ताब्यात राहत नाही. 

आफ्रिकेच्या अटलांटिक किनाऱ्यापासून ते भूमध्य समुद्रापर्यंत, समांतर आणि उष्णकटिबंधीय भागात हा मासा प्रामुख्यानं आढळतो. सोनेरी पट्टे असलेला हा मासा जितका आकर्षक दिसतो तितकाच धोकादायक आहे.

हे देखील वाचा

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

हा समुद्री जीव रोमन साम्राज्यात शत्रूंच्या विरोधात ह*त्यार म्हणून वापरला जात असे तर पॉलिनेशियन लोकांमध्ये समारंभाच्या वेळी वापरली जात असे. आताच्या काळात हा मासा खाऊन हॅल्युसनेशन्स झाल्याच्या घटना तशा कमीच आहेत. २००६ साली ‘क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात हा सागरी जीव खरोखर किती सायकिडेलिक आहे, याची माहिती देण्यात आली आहे.

त्याच लेखातील माहितीनुसार, १९९४ मध्ये एक ४० वर्षीय व्यक्ती फ्रेंच रिव्हिएरात सुट्टीचा आनंद घेत होता. त्यादिवशी त्यानं आपल्या जेवणात एकदम फ्रेश आणि भाजलेल्या ‘सरप साल्पा’चा आस्वाद घेतला. जेवण केल्यानंतर साधारण दोन तासांनंतर त्याला मळमळ सुरू झाली. त्यानंतर हळूहळू त्याचे डोळे आणि डोकं जड झालं. डोळ्यांवर झापड येऊ लागली. तो सतत उलट्या करत होता आणि त्यामुळं त्याला प्रचंड थकवा देखील आला होता.

आपली सुट्टीची ट्रीप अर्ध्यात सोडून तो घरी निघाला. मात्र, अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर त्याला गाडी चालवणं अशक्य झालं. आपल्या आजूबाजूला असंख्या प्राणी गोंधळ घालत आहेत. त्यामुळं गाडी चालवता येत नाही, असं त्याचं म्हणणं होतं. अशा स्थितीमध्ये तो कसाबसा रुग्णालयात दाखल झाला. तिथे त्याच्यावर उपचार केल्यानंतर ३६ तासांनंतर तो एकदम बरा झाला मात्र, पूर्ण शुद्धीत आल्यानंतर त्याला काय घडलं हे आठवण्यात अडचणी येत होत्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला दिसणारे प्राणी आणि ऐकू येणारे आवाज हे त्याचे भास होते.

अशाच प्रकारची एक घटना २००२मध्ये देखील घडल्याची माहिती समोर आलेली आहे. फ्रान्समधील सेंट टोर्पेजमधील एका ९० वर्षीय व्यक्तीनं हा मासा खाल्ला होता. त्यानंतर त्याला माणसांच्या किंचाळण्याचा आणि पक्ष्याच्या किलबिलाटाचे भास झाले. त्यानंतरच्या दोन रात्री त्याला काळजाचा थरकाप उडवणारी स्वप्नं पडली. आपल्या वाढलेल्या वयामुळं आपल्याला एखादा मानसिक आजार जडला असल्याचा समज त्या व्यक्तीला झाला. म्हणून त्यानं ही गोष्ट लवकर कुणाला सांगितली नाही. तीन दिवसानंतर त्याला पडणारी स्वप्न आणि भास दोन्हीही आपोआप बंद झाले.

हे विशिष्ट प्रकारचे मासे खाल्ल्यानंतर होणारे विचित्र भास ही एक दुर्मिळ विषबाधा आहे. ‘इचिथिओलीएनोटॉक्सिझम’ या शास्त्रीय नावानं त्याला ओळखलं जाते. अशा विषबाधेमुळे व्यक्तीची मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टीम) बिघडू शकते. 

त्याचे परिणाम एलएसडी (ड्र*ग)सारखेच आहेत, अशी माहिती रीफ बॉल फाउंडेशनच्या सागरी जीवशास्त्रज्ञ कॅथरीन जादोट यांनी दिली. जगभरात मोठ्या प्रमाणात मासे खाल्ले जातात. प्रत्येकचं व्यक्ती मासे खाण्याअगोदर त्याची बारीक तपासणी करत नाही. असे असताना ‘सरप साल्पा’च्या सेवनामुळं प्रकृती बिघडण्याच्या आणखी घटना का समोर आल्या नाहीत, हा देखील एक प्रश्न आहे.

या माशांमध्ये नेमकं काय आहे?

त्याच्या सेवनामुळं व्यक्तीला भास का होतात, हे शोधणं नक्कीच सोप्पं नाही. २०१२ साली ‘इन व्हिट्रो सेल्युलर अँड डेव्हलपमेंटल बायोलॉजी’मध्ये याबाबत एक लेख प्रकाशित झालेला आहे. हे मासे पॅसोडोनिया सागरी भागातील ‘पायथोप्लॅक्टन’ खातात. पायथोप्लॅक्टन त्यांच्या आहारातील मुख्य घटकांपैकी एक आहे. यामुळं या माशांच्या शरीरात विषाचं प्रमाण वाढतं. या सर्व गोष्टी काही विशिष्ट व्यक्तींवर परिणाम करत असल्यासं या लेखात सांगण्यात आलं आहे. असं असलं तरी माशातील नेमके कोणते विषारी घटक व्यक्तीवर परिणाम करतात हे स्पष्ट झालेलं नाही. एकतर हे घटक म्हणजे ‘इंडोल’ गटातील अल्कालॉइड असू शकतात. ‘अल्कालॉइड’ ही अशी संयुगे आहेत जी काही विशिष्ट शेवाळ आणि पायथोप्लॅक्टनमध्ये आढळतात. या संयुगांची आणि एलएसडीच्या रासायनिक रचनेत साम्य असतं.

‘सरप साल्पा’बाबत अद्याप मोठ्या प्रमाणात माहिती बाहेर आलेली नाही किंबहुना शास्त्रज्ञांनी ती समोर येऊ दिलेली नाही. कारण, त्यात असलेल्या गुणधर्मांमुळं अंमलीपदार्थांच्या दुनियेत त्याचा गैरवापर होण्याची मोठी शक्यता आहे. आपल्यापैकी अनेकजण मासे आवडीनं खात असतील. मात्र, ते खाताना आपण कोणत्या प्रकारचा मासा खात आहोत हे नक्की पाहिलं पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

शाळेत आपण रोज म्हणायचो ती राष्ट्रप्रतिज्ञा नेमकी कोणी लिहिली आहे..? जाणून घ्या..!

Next Post

याला मोसादच्या इतिहासातला आजवरचा सर्वात खतरनाक हेर म्हणून ओळखलं जातं

Related Posts

आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

याला मोसादच्या इतिहासातला आजवरचा सर्वात खतरनाक हेर म्हणून ओळखलं जातं

जिवंत गाडले जाऊनही हे लोक आपली स्टोरी सांगण्यासाठी पुन्हा परत आले होते..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.