The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपलं मनोरंजन करणाऱ्या विदुषकाच्या जडणघडणीचा देखील एक इतिहास आहे!

by द पोस्टमन टीम
31 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


मला आठवतं मी तिसरीच्या वर्गात असताना गावापासून जवळ असणाऱ्या शहरात एक रशियन सर्कस आली होती. तीन-चार दिवस पप्पांचा पिच्छा पुरवल्यानंतर ते आम्हाला सर्कस पहायला घेऊन गेले. आमच्यासोबत त्यांच्या मित्राची देखील फॅमिली होती. त्या काकांचा मुलगा आशिष ती सर्कस आयुष्यभर विसरणार नाही. कारण सर्कस पाहता-पाहता एका विदुषकानं अचानक गंमत म्हणून त्यावेळी ४-५ वर्षांचा असणाऱ्या आशिषला उचलून घेतलं. रंगीबेरंगी पोषाख घातलेला आणि लाल-पांढऱ्या रंगांनी चेहरा रंगवलेला तो विदुषक पाहून आशिषनं इतकी जोरात रडण्यास सुरुवात केली की, सर्कस सोडून अर्ध्यातूनच घरी यावं लागलं.

त्यानंतर कित्येक दिवस त्याला आम्ही त्या गोष्टीवरून चिडवत होतो. मात्र, आजकाल बऱ्याचदा त्याच्याचं सोशल मीडियावर ‘joker quotes’ नजरेस पडतात. जोकरच्या चित्रपटांचा तर तो ‘डायहार्ड फॅन’ आहे. एक वेळी अशी होती की, आशिष विदुषकला पाहून प्रचंड घाबरायचा आणि तोच आशिष जोकरचा फॅन आहे. आशिष आणि माझ्या वयाच्या मुलांनी लहान असताना सर्कसमधील विदुषक पाहिले. ते विदुषक चित्रविचित्र हावभाव करून येणाऱ्यांचं मनोरंजन करत. मात्र, आताच्या मुलांना दिसणारी विदुषकाची ही प्रतिमा त्या सर्वांना हसवणाऱ्या विदुषकापेक्षा फार वेगळी आहे, याचं मला कायम नवलं वाटतं. त्यामुळं कुतुहलापोटी मी विदुषक हा नेमका काय प्रकार आहे आणि त्याचा इतिहास काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

चित्रविचित्र वेशभूषा करून, चेहरा रंगवून आणि शारिरीक हावभावांचा वापर करून लोकांना हसवणारा व्यक्ती म्हणजे विदुषक.

इसवी सन पूर्व २४०० च्या आसपास इजिप्तमधील पाचव्या राजवटीत सर्वात पहिल्या विदूषकाचे संदर्भ सापडले आहेत.

दरबारात पारंपरिक पूजाअर्चा करण्याची आणि लोकांचं मनोरंजन करण्याची दोन्ही कामे एकचं व्यक्ती करत असे. त्या व्यक्तीला विदूषक म्हटलं जाई.



पीटर बर्गरच्या मते ‘त्यावेळी समाजात धर्म आणि जादूसारख्या गोष्टी खोलवर रुजलेल्या होत्या. त्यांचा वापर करून लोकांचं मनोरंजन करण्यात हे विदुषक पारंगत होते. त्यामुळं अनेकदा विदुषक आपल्याला वेड्यात काढत आहेत हे देखील लोकांना कळत नसे. समोरच्या व्यक्तीचा अपमानही झाला पाहिजे आणि त्याला वाईटही वाटायला नको, अशा पद्धतीनं चेष्टा करण्याची कला विदुषकांच्या अंगी होती. यासाठी त्यांना हावभाव आणि शरीराच्या हालचालींवर कमालीचे कष्ट घ्यावे लागत.

मानववंशशास्त्रानुसार, पाश्चिमात्य संस्कृती वगळता इतर काही ठिकाणी विदुषकाला सोंगाड्या किंवा मूर्ख व्यक्ती समजलं गेलं. इतकच काय, ज्या समाजात अशा सोंगाड्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे त्याला ‘क्लाउन सोसायटी’ म्हटलं जाई.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

स्थानिक अमेरिकन पुरणाकथांमध्ये तर एका श्वानाच्या आत्म्याला विदुषक म्हणून पवित्र मानलेलं आहे. जगभरात अनेक स्थानिक जमातींमध्ये विदुषकांचा स्वतंत्र इतिहास सापडतो. रिचर्ड पोचिंको यांनी कॅनेडियन विदुषक शैली विकसित केली होती. त्यांच्या नंतर स्यू मॉरिसन यांनी युरोपियन आणि मूळ अमेरिकन विदूषक शैली एकत्र करून एक नवीन शैली विकसित केली होती. यात विदूषक चिकणमातीचे मुखवटे घालत आणि एखादी पौराणिक कथा प्रेक्षकांसमोर सादर करत.

पोशाख आणि सादरीकरणाच्या भिन्नतेनुसार विदुषकांचे प्रकार पडतात. ऑगस्टे किंवा रेड क्लाउन प्रकार हा आधुनिक विदुषकांचा पहिला प्रकार आहे. ज्यात विशिष्ट मेकअप, रंगीबेरंगी केसांचे विग, चित्रविचित्र पादत्राणे आणि रंगीबेरंगी कपडे यांचा वापर होतो.

त्यांची मनोरंजन शैली सहसा जास्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी डिझाइन केलेली आहे. हे विदुषक आणि सर्कसमधील विदुषक जवळपास सारखेच असतात. १९व्या आणि २०व्या शतकात थिएटर्समध्ये यांचे कार्यक्रम आयोजित केले जातं.

प्रथम मुख्य प्रवाहात जोकरची भूमिका जोसेफ ग्रिमॅल्डी यांनी पहिल्या मेनस्ट्रीम विदुषकाची भूमिका केली होती. त्यांनी स्वत:ची एक व्हाइटफेस मेक-अप डिझाइन देखील तयार केली होती. १८व्या शतकाच्या सुरुवातीला लंडनमधील कॉमिक थिएटरमध्ये ग्रिमॅल्डीचं प्रचंड वर्चस्व होतं. आजही काही ठिकाणी त्यांच्या व्हाइटफेस मेक-अप डिझाइनचा वापर केला जातो.

‘क्लाऊन’ इंग्रजी शब्द सर्वप्रथम १५६०मध्ये वापरला गेला. शब्दाची मूळ उत्पत्ती कशी झाली याबाबत अनिश्चिती आहे. कदाचित ‘क्लम्झी’ या स्कॅन्डिनेव्हियन शब्दापासून तो तयार झाला असावा, असे भाषातज्ज्ञांचे मत आहे. शेक्सपियरच्या ‘ऑथेलो’ आणि ‘द विंटर्स टेल’मधील वेंधळ्या पात्रांचा क्लाऊन असा उल्लेख झालेला आहे.

आपल्या सर्वांना परिचित असणारा सर्कसमधील विदुषक हा १९ व्या शतकात विकसीत झाला. फिलिप अ‍ॅस्टलीच्या लंडन रायडिंग स्कूलपासून आधुनिक सर्कसला सुरुवात झाली. अ‍ॅस्टलीने त्याच्या कार्यक्रमात अधूनमधून प्रेक्षकांना हसवण्यासाठी विदूषकांचा वापर केला.

अमेरिकेत, १९५०च्या उत्तरार्धात ‘बोझो’ नावाचं विदुषक पात्र उदयाला आलं. १९७८मध्ये तर बोझोचा पहिला कार्यक्रम केबल टीव्हीवर आला. आपण प्रत्येक मॅक्डॉनल्ड्सच्या बाहेर जो विदुषक पाहतो तो बोझोपासून प्रेरणा घेऊन तयार केलेला आहे. १९५९ ते ६२ दरम्यान विलार्ड स्कॉट यांनी बोझोचं पात्र केलं होतं. १९६०-७०च्या दशकात अमेरिकेत लहान मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मुलांच्या मनोरंजनासाठी विदुषकांना बोलवण्याची पद्धत सुरू झाली. ८०च्या दशकात तर अगदी लहान मुलांच्या रुग्णालयांमध्ये देखील विदुषकांना बोलवले जाई.

एकीकडे विदुषकांची विविध पात्रं नागरिकांचं मनोरंजन करत होती तर दुसऱ्या बाजूला डीसी कॉमिक्सचा जोकर लोकांच्या मनात आपलं एक वेगळ स्थान निर्माण करत होता. डीसी कॉमिक्सच्या ‘बॅटमॅन’ सुपरहिरोच्या गोष्टीमध्ये जोकर हा खलनायक दाखवला गेला.

बिल फिंगर, बॉब केन आणि जेरी रॉबिन्सन यांनी जोकरचं पात्र तयार केलं होतं. २५ एप्रिल १९४० ला बॅटमॅन कॉमिक बुकच्या पहिल्या अंकात जोकर प्रकाशित झाला. काही भागांनंतर जोकरचं पात्र संपवण्याचं ठरवण्यात आलं होतं. मात्र, त्याची प्रसिद्धी पाहता संपूर्ण सिरीजमध्ये त्यालाच मुख्य खलनायक ठेवण्यात आलं.

आपल्या वेंधळेपणासाठी प्रसिद्ध असलेले हे विदुषक प्रत्यक्षात मात्र, आपल्या हक्कांसाठी जागृत आणि एकत्र आहेत. १९८४ मध्ये ‘क्लाउन्स ऑफ अमेरिका इंटरनॅशनल’ची आणि १९८७मध्ये ‘वर्ल्ड क्लाउन असोसिएशन’ची स्थापना झाली. या दोन्ही व्यावसायिक कलाकारांच्या संघटना आहेत. यात विदुषक, सोंगाडे, जादूगार यांचा सहभाग आहे.

अलिकडच्या काळात सर्कस आणि विदुषकांच्या थिएटर शोंचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळं विनोदी आणि मनोरंजन करणाऱ्या विदुषकांपेक्षा खलनायक जोकर आताच्या पिढीला जास्त जवळचा वाटतो आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इंग्लंडच्या किल्ल्यात घुसून दादाने आधी त्यांचा माज उतरवला आणि मग शर्ट..!

Next Post

हिमालयात दडलेल्या या ‘सांगाड्यांच्या तलावाचं’ रहस्य अजूनही उलगडलं नाही..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

हिमालयात दडलेल्या या 'सांगाड्यांच्या तलावाचं' रहस्य अजूनही उलगडलं नाही..!

जगातली पहिली ह्युमनॉइड रोबोट 'सोफिया' जेव्हा भारतात आली होती..

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.