The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका चहावाल्याने गरज म्हणून बनवलेला बर्म्युडा आता फॅशन झाला आहे..!

by द पोस्टमन टीम
21 June 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


बर्मुडा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तीन गोष्टी येतात. एक बर्मुडा देश, दुसरा बर्मुडा ट्रँगल आणि तिसरी गोष्ट – जी तुम्ही कदाचित आत्ताही घातली असेल- बर्मुडा शॉर्ट्स. यातील बर्मुडा ट्रँगलचे रहस्य अजूनही कायम आहे. त्यामुळे आपण तिकडे न जाता, बर्मुडा शॉर्ट्सकडे जाणार आहोत. अगोदर केवळ घरात घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बर्मुडा, आता आपण अगदी मॉलमध्येही घालून जातो.

बंडी-धोतर किंवा कुर्ता-पायजमा घालणाऱ्या लोकांच्या देशात हा बर्मुडा आला कुठून?

नावावरुन अंदाज आला असेलच, तरी कोणतीही शंका नसावी म्हणून सांगतो- बर्मुडा शॉर्ट्सचा उगम बर्मुडा देशातच झालाय.

हा शोध लावणारा कोणी फॅशन डिझायनर किंवा ‘पिताजी की पतलून एक बिलांग छोटी’ करणारा टेलरही नव्हता. तर तो होता एक चहावाला! (चहावाले भलतेच प्रतिभावान असतात हे आता आपल्याला माहितीच आहे.) 

१९१४ मध्ये बर्मुडामधील नॅथेनील कॉक्सॉन या व्यक्तीने बर्मुडाचा शोध लावल्याचं सांगण्यात येतं.

नॅथेनीलचं बर्मुडामध्ये एक चहाचं दुकान होतं. उन्हाळ्यामध्ये तेथील कामगारांना पूर्ण कपडे घालून काम करणं अवघड जात. त्यामुळे आपल्या कामगारांना आरामात काम करता यावं, यासाठी नॅथेलीनने त्यांच्या पँटची लांबी कमी केली. हेच जगातील पहिले बर्मुडे मानले जातात. मग एका चहावाल्याच्या दुकानात तयार झालेली ही ‘फॅशन’ जगभर कशी पोहोचली? तर याचं श्रेय जातं ब्रिटिशांना.



ब्रिटिशांनी बर्मुडा पोहोचवला जगभरात

जगभरातल्या इकडच्या गोष्टी तिकडं करण्यात ब्रिटिशांचा मोठा वाटा आहे. ठिकठिकाणी आपल्या वसाहती उभारलेल्या ब्रिटिशांनी एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना तिथल्या कामाच्या वस्तू बरोबर उचलून नेल्या. मात्र, यामुळे ब्रिटिश ज्या-ज्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणचा एका अर्थाने फायदाही झाला. भारताबाबतच विचार करायचा झाला, तर आपल्या देशात रेल्वे, टपाल वगैरे गोष्टी ब्रिटिशांनीच तर आणल्या!

पहिल्या महायुद्धादरम्यान बर्मुडावरही ब्रिटिशांचीच सत्ता होती. उन्हाळ्यात पूर्ण कपड्यांमुळे ज्याप्रमाणे नॅथेलीनच्या कामगारांना त्रास व्हायचा तसाच किंवा त्यापेक्षा जास्त त्रास ब्रिटिश सैनिकांना होत होता. तेव्हा त्यांना नॅथेनीलचे हे ‘इन्व्हेन्शन’ दिसलं. त्यांनी उष्णकटिबंधीय (ट्रॉपिकल) प्रदेशांमध्ये असणाऱ्या आपल्या सर्व सैनिकांसाठी हा युनिफॉर्मच करून टाकला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

अमेरिकेत झालं नामकरण

ब्रिटिशांनी वापर सुरू केला असला, तरी बर्मुडाला अद्याप बर्मुडा नाव नव्हतं मिळालं. त्यासाठी १९२०चं दशक उजाडावं लागलं. तोपर्यंत बर्मुडा अमेरिकेपर्यंत पोहोचला होता. १९२०-३०च्या दरम्यान बर्मुडा हे केवळ उष्णकटिबंधीय भागामध्ये घालण्याचं वस्त्र न राहता, स्पोर्ट्सवेअर म्हणून प्रसिद्ध झालं होतं.

न्यूयॉर्कमध्ये ‘दि बर्मुडा शॉप’ या दुकानात हे शॉर्ट्स मिळत होते. त्यामुळे मग त्यांना ‘बर्मुडा शॉर्ट्स’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

त्यानंतर १९४८ मध्ये ‘व्होग’ या फॅशन मॅगझीनने पहिल्यांदा ‘बर्मुडा शॉर्ट्स’ हा शब्दप्रयोग वापरला. त्यानंतर हे नाव जास्तच प्रसिद्ध झालं.

बर्मुडा झाला ‘ऑफिशिअल’

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ‘बँक ऑफ बर्मुडा’ने आपल्या पुरुष कर्मचाऱ्यांसाठी बर्मुडा शॉर्ट्स ऑफिशिअल केले. यालाही तेच कारण होते – उन्हाळ्यात काम करताना होणारा त्रास! बँकेच्या जनरल मॅनेजरने एका स्थानिक टेलरला, ब्रिटिश सैनिकांच्या शॉर्ट्सप्रमाणे दोन शॉर्ट्स तयार करण्याची ऑर्डर दिली. त्यानुसार त्याने दोन-दोन बर्मुडे बनवून दिले. मात्र, कामकाजाच्या ठिकाणी असं अर्ध्या कपड्यात फिरणं बरोबर दिसत नाही म्हणून मग या बर्मुड्यासोबत गुडघ्यांपर्यंत असणारे मोजे घालणं कर्मचाऱ्यांना अनिवार्य करण्यात आलं. महायुद्धानंतरच्या काळात मग कित्येक कंपन्यांनी विविध रंगांमध्ये, विविध प्रकारच्या कापडांपासून बनवलेले बर्मुडे बाजारात आणले.

बर्मुडा पोहोचला घराघरात

१९४८ मध्ये व्होगने दिलेल्या प्रसिद्धीमुळे बर्मुडा मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला. ‘जीन्स’ ज्याप्रमाणे सर्वसामान्य होत होती, त्याप्रमाणेच बर्मुडाचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जात होता. केवळ उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्येच नाही, तर इतर प्रदेशांमध्येही ‘घरात वापरायला’ म्हणून बर्मुडा घेतला जात होता.

कित्येक ठिकाणी महिलांना जीन्सप्रमाणे बर्मुडा वापरण्यावरही बंदी घालण्यात आली होती. मात्र, हे विरोध कालांतराने कमी झाले.

कोणतीही फॅशन ज्याप्रमाणे काही काळच चालते, त्याप्रमाणे बर्मुडाचं फॅडही ६०च्या दशकात कमी झालं होतं. मात्र, ७०च्या दशकात १९५० मधील फॅशन करण्याची टूम निघाली. यामुळे मग पुन्हा बर्मुडा चर्चेत आणि लोकांच्या अंगावर आला. यानंतर कित्येक वर्षे बर्मुडा ट्रेंडिंगमध्ये राहिला. आता तर बर्मुडा घराघरात पोहोचला आहे.

बर्मुडा वेगळा आणि ‘थ्रीफोर्थ’ वेगळी

बर्मुडा शॉर्ट्सना ‘वॉक शॉर्ट्स’ आणि ‘ड्रेस शॉर्ट्स’ म्हणूनही ओळखलं जातं. बर्मुडा शॉर्ट्स स्पेसिफिकली गुडघ्याच्या वरपर्यंतच असतात (गुडघ्याच्या एक सेंटीमीटर वर). गुडघ्याच्या खाली गेले की मग ते ‘कार्गो शॉर्ट्स’ किंवा ‘थ्रीफोर्थ’ होतात. कार्गो शॉर्ट्स हे बर्मुडापेक्षा जास्त लांबीचे असले, तरी ते जास्त ‘मोकळे’ असतात. कित्येकदा त्यांना बर्मुडाच्या तुलनेत जास्त खिसे दिलेले असतात. अगोदर सैनिकांसाठी बनवला जाणारा बर्मुडा, हा आता बहुतांश करून घरात वापरण्यासाठी तयार केला जातो. त्यामुळे त्याला जेवढं साधं ठेवता येईल, तेवढं साधं ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बाहेर घालण्यासाठी, स्पोर्ट्सवेअर म्हणून किंवा मग जिममध्ये घालण्यासाठी असे विशेष बर्मुडेदेखील तयार होत आहेत.

आता माॅलमध्ये जाताना बर्मुडा घालाल तेव्हा त्या चहावाल्याचे आभार मानायला विसरू नका!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आंतरराष्ट्रीय करार मोडून रशियाने अंतराळात तोफ उडवली होती..!

Next Post

२१व्या वर्षी ‘हज’ला निघालेला इब्न बतुता तीस वर्ष जग फिरून घरी गेला..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

२१व्या वर्षी 'हज'ला निघालेला इब्न बतुता तीस वर्ष जग फिरून घरी गेला..!

युट्युबवरचा पहिला व्हिडीओ कोणता असा प्रश्न कधी पडलाय का..? तर हे घ्या उत्तर..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.