The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या दोन स्त्रियांनी देखील टाइम ट्रॅव्हल केल्याचा दावा केला होता, त्यावर पुस्तकही लिहलंय..!

by द पोस्टमन टीम
25 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या इतिहास अभ्यासक असणार्‍या एलिनॉर जॉर्डन आणि ॲनी मोबर्ली या दोन विद्यार्थिनी. पॅरिसच्या राजवाड्यातून भटकताना त्यांनी इतर सहपर्यटकांहून अद्भूत अशा अनुभवाची प्रचिती घेतली. असा अनुभव जो आजवर कोणी घेतला नव्हता आणि भविष्यात कोणी घेण्याची शक्यता विरळ होती.

असा कोणता अनुभव त्यांनी घेतला की जगाला त्यांची दखल घ्यावी लागली?

जगात अनेकदा आपल्या कल्पनेपलीकडच्या घटना घडत असतात. “मानो या मानो” गटात मोडणार्‍या या घटना प्रत्यक्षात घडल्या आहेत यावर ऐकणार्‍याचा विश्वास बसणं कठीणच असतं. मात्र जे या घटनांचे साक्षीदार असतात त्यांच्यासाठी ही घटना शंभर टक्के वास्तव असते. अशीच एक जगाच्या दृष्टीनं विचित्र घटना घडली पेशानं शिक्षक असणार्‍या एलिनॉर जॉर्डन आणि ॲनी मोबर्ली या दोघींच्या बाबतीत.

त्यांनी जो अनुभव घेतला तो भौतिकशास्त्रीयदृष्ट्या अशक्य नसला तरीही या घटनेप्रमाणे काही घडणं शक्य आहे हे प्रयोगाअंती सिध्द व्हायचं आहे.

एखाद्या चमत्कारासारखीच मानली जाणारी घटना म्हणजे टाईम ट्रॅव्हल.

अर्थात भूतकाळ किंवा भविष्यात करता येणारा प्रवास. विज्ञानकथांमध्ये शोभून दिसणारा हा प्रकार शास्त्रज्ञांनी अगदीच अशक्य नसल्याचा दावा केला असला तरीही हे अद्याप सिध्द व्हायचे आहे. असे असताना जर कोणी कोणत्याही माध्यमाशिवाय शेकडो वर्षांपूर्वीच्या कालखंडात जाऊन आले तर? नेमका हाच अनुभव मोबर्ली आणि जॉर्डन या दोघींनी घेतल्याचा दावा केला होता.



तो दिवस होता रविवारच्या सुट्टीचा, १० ऑगस्ट १९०१. प्राध्यापक मोबर्ली आणि जॉर्डन रेल्वेनं व्हर्सिल्स रॉयल पॅलेस आणि परिसराला भेट देण्यासाठी निघाल्या. फ़्रेंच रॉयल फ़ॅमिलीचा हा राजमहाल १७५२ साली त्यांची सामूहिक क*त्तल करेपर्यंत त्यांचं वास्तव्य इथंच होतं. मारिया ॲण्टोने ही त्या ठिकाणी वास्तव्य करणारी अखेरची फ़्रेंच राणी होती. मोबर्ली आणि जॉर्डन यांचा हा प्रवास एरवीसारखा असणार नसून त्या चक्क कालप्रवास करून येणार आहेत याची पुसटशी कल्पनाही त्यांना रेल्वेत बसताना नव्हती. ही ट्रीप आयुष्यभर त्यांच्या लक्षात रहाणार होती.

मोबर्लीचा जन्म १८४६ साली इंग्लड येथील विंचेस्टर येथे झाला होता आणि शिक्षकी पेशा पत्करुन ती प्राचार्य म्हणून कार्यरत होती. जॉर्डन ही मोबर्लीची सहाय्यक म्हणून काम करत असे. दोघींचंही आयुष्य शैक्षणिक कामाला वाहुन घेतलेलं असं होतं. या दोघींचाही ऐतिहासिक घराण्यांशी वगैरे दूरदूरपर्यंत काहीच संबंध नव्हता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

या दोघींनी फ़्रान्सला भेट देण्याचा प्लॅन आखला आणि त्यानुसार १० ऑगस्टला त्या पोहोचल्या. राजमहालाची भव्यता, सौंदर्य बघून इतर पर्यटकांप्रमाणेच त्याही भारावून गेल्या. त्यांनी आजूबाजूला फ़ेरफ़टका मारून तो परिसर बघण्याचं ठरवलं आणि त्या रमतगमत निघाल्या. इथून पुढे खरंतर नियती त्यांचा अनोखा, अद्भुत प्रवास लिहित होती याची त्यांना कल्पनाही नव्हती.

राजमलाहापासून थोडं दूर आल्यावर त्यांना सुंदर बाग आणि एक मोठा व्हिला लागला. मात्र त्या दिवशी एरवीसारखा ट्रिनऑन पर्यटकांसाठी खुला नव्हता. त्यामुळे अर्थातच या परिसरात पर्यटक नव्हते आणि शुकशुकाट होता.

या दोघी रमत या परिसरातून चाललेल्या असतानाच त्यांच्या लक्षात आलं की आपण वाट चुकलो आहोत आणि ट्रिनिऑन बघण्याच्या तंद्रीत परतीचा रस्ता हरवून बसलो आहोत. आता त्या अंदाजानं चालू लागल्या. अनावधानानं त्यांनी वाटेत लागलेल्या पेटिट ट्रिनऑनला भेट दिली.

ग्रॅन्ड ट्रिनऑन समोरून गेल्यानंतर त्यांना दिसला पेटिट ट्रिनऑन (पेटीट ट्रिनिऑन राणी मारियाला तिचा पती किंग लुईसनं भेट दिलेला होता). त्या दोघी या ट्रिनऑनसमोरच्या मोठ्या बागेत आल्या. त्यानंतर त्यांनी जे बघितलं ते डोळ्यांवर विश्वास बसणारं नव्हतं. सगळ्यात आधी त्यांना एक पेंटिंग करत बसलेली स्त्री दिसली. जी मारिया ॲण्टोनेटसारखी दिसत होती. नव्हे, ती तिच होती!

त्यांच्यासमोर चक्क त्याकाळचं सगळं चित्र जिवंत होतं, माणसांची वर्दळ होती आणि त्यांचे पेहराव, दागिने, चालणं-बोलणं, सगळं जुन्या काळातलं होतं. समोर दिसणारं सत्य की भास हा विचार करत असतानाच आजूबाजूचं वातावरण बदलायला लागल्याची जाणीव त्यांना होऊ लागली. हे सगळं बघून त्या अस्वस्थ झाल्या.

इतका वेळ डोक्यावर तळपणारा सूर्य अचानक गायब झाला होता आणि आजूबाजूला दिसणार्‍या व्यक्तींच्या सावल्याही गायब झाल्या होत्या. समोरच्या प्रांगणाकडे बघत असतानाच त्यांना एक भली मोठी हॅट घातलेला इसम दिसला. जो त्यांच्याकडे टक लावून बघत होता.. त्याचं ते निर्विकार चेहर्‍यानं मात्र भेदक नजरेनं बघणं दोघींच्याही अंगावर शहारे आणणारं होतं. त्याच्या नजरेत स्पष्ट दिसत होतं की या अपरिचित पाहुण्यांच्या येण्यानं त्याला त्रास होतो आहे. इतक्यात एक भली मोठी हॅट घातलेला दुसरा माणूस आला.

हे सगळं दिसत असतानाच अचानक इतर पर्यटक आणि गाईड यांचा एक गट तिथे आला आणि ती सगळी माणसं अचानक गायब झाली. दोघीही लगबगीनं त्या गटात सामील झाल्या. त्या गटासोबतच त्यांनी या स्थळाची भेट संपवली आणि परतीच्या प्रवासासाठी रेल्वेत बसल्या. मात्र आपल्याला आलेल्या या विचित्र अनुभवाची कुठेही वाच्यता करणं त्यांनी टाळलं.

परतल्यावर आठवडाभरानं दोघींनी या भेटीबाबत स्वतंत्रपणे लिहून दोघींचंही लिखाण तपासण्याचं ठरवलं, जेणेकरून दोघींना आलेला अनुभव एकसारखा होता का? याची खात्री पटेल.

हे निबंध लिहिल्यानंतर त्यांनी थोडसं संशोधन केलं असता त्यांना एक धक्कादायक योगायोग लक्षात आला. १० ऑगस्ट १७९२ या दिवशी राजमहालावर सैनिकी आक्र*मण झालं होतं आणि राजाच्या स्विस गार्डनेच फ़ितुर होऊन क*त्तली केल्या होत्या. १० ऑगस्ट १९०१ च्या दिवशी या दोघींनी जी वाट निवडली ती वर्तमानकाळात अस्तित्वातच नव्हती तसेच त्यांनी वाटेत जे काही बघितलं त्या खुणा आज अस्तित्वात नव्हत्या मात्र इतिहासात त्या खुणांचे पुरावे आढळतात. जसे की दोघींनीही आपल्याला वाटेत लागलेल्या एका पुलाचा उल्लेख केला जो गार्डन किओस्कमधून जात होता, जो आता अस्तित्वातच नव्हता.

यानंतर संशोधनाअंती ठामपणे सांगता येणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांना सुरवातीला जो विचित्र बघणारा इसम दिसला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून चक्क राणी मारिया ॲण्टोनेटचा मित्र कॉम्त दे विद्रो होता आणि ती पेटींग करत बसलेली राजघराण्यातली स्त्री साक्षात राणी मारिया होती.

या दोघींनी आपल्याला आलेल्या या विचित्र अनुभवावर नंतर १९११ साली ॲन ॲडव्हेन्चर नावाचं पुस्तक लिहिलं ज्याला वाचकांनी कमालीची पसंती दर्शवली. टिकाकारांनी या पुस्तकावर अनेक आक्षेप घेत ताशेरे ओढले असले तरीही वाचकांनी हे पुस्तक डोक्यावर घेतलं. मुळात १९०१ मध्ये राणी मारिया पुन्हा दिसली ही कल्पनाच त्यांना चित्तथरारक वाटत होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव १९३१ पर्यंत या लेखकद्वयीची खरी ओळख लपवून ठेवण्यात आली होती. ही केवळ एकच घटना या दोघींनी अनुभवली असं नाही तर या घटनेपूर्वी आणि नंतरही अशा अविश्वसनीय घटनांचा अनुभव त्यांनी घेतला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी भर दरबारात राजा जॉर्ज पंचमचा अपमान केला होता..!

Next Post

अमेरिकेत येणारे हे ‘चिनुक वारे’ एकाच दिवसात फूटभर बर्फ वितळवतात

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

अमेरिकेत येणारे हे 'चिनुक वारे' एकाच दिवसात फूटभर बर्फ वितळवतात

हि*टल*रने देऊ केलेला मानसन्मान लाथाडून ध्यानचंद यांनी भारतातली उपेक्षा स्वीकारली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.