The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

५००० रुपये घेऊन मार्केटमध्ये एंट्री केली आता २०,००० कोटींचं साम्राज्य उभं केलंय

by द पोस्टमन टीम
21 June 2025
in गुंतवणूक, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


दलाल स्ट्रीटचा राजा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते राकेश झुनझुनवाला यांची यशोगाथा पाच हजार रुपयांपासून सुरू होऊन कोट्यावधीपर्यंत जाऊ पोहोचते. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असून शेअर बाजारात गुंतवणूक करत कमाई करू इच्छिणार्‍या प्रत्येकानं ती वाचावी अशीच आहे. आज ते आपल्यात नसले तरीही त्यांची ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

राकेश झुनझुनवाला. शेअर मार्केटमध्ये दबदबा असणारं नाव. भारताचे वॉरन बफ़े अशी ज्यांची ख्याती होती असे झुनझुनवाला या क्षेत्रात करियर करू इच्छिणार्‍यांसाठी रोल मॉडेल आहेत. 

अलिकडेच आलेल्या स्कॅम १९९२ या वेबसेरीजमुळे हर्षद मेहता आणि शेअर मार्केट या दोन गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सामान्य माणसाच्या मते शेअर बाजार हे नेहमीच अनिश्चिततेचं क्षेत्र राहिलेलं आहे. हर्षद मेहतासारखी प्रकरणं हा समज अधिकच पक्का करतात. मात्र झुनझुनवाला यांच्यासारखी नावं हे क्षेत्र आजही अनेकांसाठी आशादायी चित्र निर्माण करतात.

राकेश झुनझुनवालांनी हर्षद मेहताच्या कितीतरी आधी या क्षेत्रात प्रवेश केला. १९८५ साली अवघ्या ५ हजार रूपयांसहित ते शेअर मार्केटमध्ये आले. ते आले त्यावेळी सेन्सेक्स १५० पॉईंटवर होता. आजच्या घडीला सेन्सेक्स ७० हजाराच्या वर आहे. फ़ोर्ब्जसारख्या मासिकानंही त्यांची दखल घेतली. हजारातून अब्जावधी कमावणारा हा ट्रेडर खर्‍या अर्थानं बिग बुल होता.

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० चा. मुंबईत जन्मलेल्या राकेशना शेअर मार्केट नवीन नव्हतं. त्यांचे वडील त्यांच्या मित्रांसोबत नेहमी स्टॉक मार्केटच्या चर्चा करत असत. लहानपणापासूनच हा विषय कानावर पडत आल्यानं राकेशना याची उत्सुकता असायची. त्यांनी एकदा वडीलांना विचारलं की शेअर मार्केटमध्ये रोज चढउतार कसे काय होत असतात? वडिल थोडावेळ विचारात पडले आणि मग त्यांनी उत्तर दिलं की, तू रोजचं वर्तमान पत्र वाचायला सुरवात कर. त्यात शेअरच्या किंमती असतात ज्या रोज बदलत असतात. वडिलांची सूचना गंभीरपणे घेत राकेशनी दुसर्‍याच दिवसापासून वर्तमानपत्रातलं शेअर्सचं पान वाचायला सुरवात केली.



वडिलांनी मुद्दामच त्यांना हे वाचायला लावलं कारण या विषयात खरंच रूची असेल तर त्यांना हा विषय क्लिष्ट न वाटता त्यात अभ्यास करण्याची इच्छा तयार होईल. झालंही तसंच. राकेशना वर्तमानपत्रात वाचता वाचता यात अधिकाधिक रूची निर्माण झाली. त्यांनी यातच करियर करण्याचं निश्चित केलं आणि वडिलांना सांगितलं. मात्र वडिलांनी त्यांना प्रथम महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत पदवी घेण्याचा सल्ला दिला. कारण शेअर बाजार हा नुसताच सट्टे लावत पैसा कमावण्याचा मार्ग नसून त्याचं शास्त्रशुध्द शिक्षण घेत करण्याचं करियर आहे हे यावर त्यांचा विश्र्वास होता.

वडिलांचा शब्द नेहमीच प्रमाण मानणार्‍या राकेशनी हा सल्लाही मान्य केला आणि १९८५ साली त्यांनी सिडेनहॅम कॉलेजमधून चार्टर्ड अकाऊंटंटची पदवी प्राप्त केली.

हे देखील वाचा

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

ज्या क्षेत्रात जायचं तिथला पाया भक्कम केल्यानं त्यांना या धोकादायक व्यवसायातही यश मिळत गेलं, ज्याचा पायाच भक्कम होता. म्हणूनच अनेक स्कॅम आले आणि गेले तरीही झुनझुनवाला हे नाव न डगमगता आजही शेअर मार्केटमध्ये स्थिर आहे. 

मात्र याची सुरवातही तोंडात चांदीचा चमचा धरुन झाली नाही. पदवी मिळविल्यानंतर झुनझुनवाला वडिलांसमोर पुन्हा एकदा या क्षेत्रात करियर करण्याची परवानगी मागायला उभे राहिले. वडिलांनी पुन्हा एकदा शांतपणे सांगितलं की, “आता तू कोणत्याही क्षेत्रात करियर करु शकतोस अगदी शेअर मार्केटमध्येही जाऊ शकतोस मात्र त्यासाठी लागणारं भांडवल माझ्याकडे मागायचं नाही. तू माझ्या एखाद्या मित्राकडून उसने पैसे घेऊ शकतोस किंवा कोणी नाहीच दिले तर मी देईन, मात्र कर्ज म्हणून. जे तुला व्याजासकट परत करावे लागतील.” 

राकेश यांचा निर्णय पक्का होता. त्यांनी ही अटही मान्य केली. मुदतींच्या ठेवीच्या तुलनेत जास्त परतावा देण्याचं मान्य करत त्यांनी त्यांच्या भावाच्या एका ग्राहकाकडून अडीच लाख रुपये घेण्याचं ठरवलं.

राकेश झुनझुनवाला यांनी त्यांची सुरवात अगदी काळजीपूर्वक पावलं उचलत केली. त्यांना या क्षेत्रात करियर कराचयचं असलं तरीही वाकडेतिकडे मार्ग घेत नफ़ेखोरी करण्याची काहीही घाई  आणि इच्छा नव्हती. राकेश यांचा पहिला घसघसीत नफ़ा होता,५ लाख रुपयांचा, जो त्यांनी  वर्षभराच्या अवधीतच म्हणजे १९८६ साली कमावला. त्यांनी ‘टाटा टी’चे शेअर्स ४३ रुपयांना घेतले आणि तीन महिन्यांच्या कालावधीत १४३ रुपयांना विकले.. त्यांनी या शेअर्समधून तिप्पट नफ़ा कमावून या क्षेत्रात त्यांच्या भविष्याची चुणूक दाखवून दिली.

पुढील काही वर्षांत त्यांनी या बाजारात चांगलाच नफ़ा कमावला. १९८६-८९ या दरम्यान त्यांनी २०-२५ लाख कमावले. त्यांची पुढची मोठी गुंतवणूक होती, सेसा गोवा.

सुरवातीला २ रुपयांत शेअर विकत घेऊन त्याची किंमत आधी ३५ रुपये आणि मग ६५ झाल्यावर त्यांनी तो विकून टाकत घसघशीत नफ़ा मिळविला.

राकेश झुनझुनवाला यांची RARE Enterprise नावाची खाजगी स्टॉक ट्रेडिंग कंपनी आहे. त्यांनी त्यांच्या शेअर मार्केटमधील प्रदीर्घ करियरमधे अनेक मोठ्या कंपन्यांत गुंतवणूक केली.

CRSIL, PRAJ IND, Aurobindo pharma आणि ल्युपिनमध्येही त्यांची भक्कम गुंतवणूक आहे. झुनझुनवाला हे अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या बोर्ड ऑफ़ डायरेक्टर्स पदावर होते तसेच ते चित्रपट निर्मातेही होते. त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांत इंग्लिश विंग्लिश, शमीताभ, की ॲण्ड का अशा चित्रपटांचा समावेश असून ते हंगामा डिजिटल मिडियाचे चेअरमन देखील होते.

झुनझुनवाला स्वत:ला व्यापारी आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार दोन्ही समजत असत. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, अल्प मुदतीची गुंतवणूक व्यापार हा अल्प मुदतीचा फ़ायदा मिळवून देणारा असतो, तर दीर्घकालीन व्यापार दीर्घकालीन भांडवल निर्मितीसाठी असतो. 

तुम्हाला या क्षेत्राकडून काय हवं आहे यावर ही गुंतवणूक निवडायला हवी. मात्र त्यांच्या मते या क्षेत्रातील यशाची गुरुकिल्ली हीच आहे की, नफ़ा कमावण्याची घाई असणारे उत्साही गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला नेहमीच एका पायावर तयार असतात मात्र तुम्ही उत्साहासोबतच मनापासून आणि आत्मविश्वासानं  काम केलं तर तुम्हाला कधीच अपयश येत नाही, “All you  need is passion!”


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

डिप्थेरियाच्या साथीत या ‘स्लेड डॉग’ने दहा हजार लोकांचा जीव वाचवला होता..!

Next Post

या राजाने जगातली पहिली लिखित न्यायव्यवस्था उभी केली होती..!

Related Posts

गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

20 November 2024
गुंतवणूक

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

4 November 2024
गुंतवणूक

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

5 November 2024
गुंतवणूक

लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केली नसती तर आज वॉरेन बफेच्या तोडीस तोड असता..!

7 October 2023
विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
Next Post

या राजाने जगातली पहिली लिखित न्यायव्यवस्था उभी केली होती..!

या गुप्तचर संघटना हाताबाहेर गेल्यामुळे सरकारांनीच त्यांच्यावर बंदी आणावी लागली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.