The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार वर्षं लागली पण ही बाई अमेरिकेतून रशियातल्या तिच्या घरी चालत गेली

by द पोस्टमन टीम
15 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


अमेरिकेतल्या गजबजलेल्या शहरात राहणारी ती एक रशियन निर्वासीत. तिला कधीच अमेरिका आपलीशी वाटली नाही. मग तिनं मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. अपुर्‍या पैशामुळे तिने चक्क चालत जाण्याचा निर्णय घेतला. नुसतं ठरवून ती थांबली नाही तर तिने चालायला सुरवात केली आणि थोडी थोडकी नाही तर तब्बल चार वर्षं पायपीट करुन अखेर मायभूमीला स्पर्श केला. अशी लिलिआन अलिंग ही कविता, कथा आणि चित्रपटाचा विषय बनली नसती तरच नवल होतं.

आज आपण तिची संपूर्ण गोष्ट जाणून घेऊयात..

हजारोंसारखीच ती एक निर्वासीत होती. रशियाहून अमेरिकेत निवार्‍याला आलेली. मुळातच स्वभावानं एकलकोंडी आणि घुमी असणारी २५ वर्षांची लिलिआन नव्या देशात अजिबातच रुळली नाही. आपला देश, तिथली माणसं, हवा, निसर्ग या सगळ्याची तिला ओढ लागली आणि तिनं मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खर्चही भरमसाठ येणार होता. मग ती तयारीला लागली. रात्रं दिवस काम करत तिनं पैसे साठवायला सुरवात केली. मात्र प्रचंड कष्ट करूनही तिच्याकडे जेमतेम रक्कम जमली.

बोटीनं प्रवास करायचा तर पैसा लागणार होता, जो दोन वर्षं भरपूर कामं करूनही जमत नव्हता. अखेर एक दिवस तिनं गरजेपुरतं सामान बांधलं आणि पाठीवर पिशवी लटकवून ती राहत्या घराला कुलूप लावून मायदेशी निघाली. वाट फ़ुटेल तशी आणि पाऊलं नेतील तसं चालत जायचं तिनं ठरवलं.

तिनं केवळ मायदेशी परतायचं या एकाच ध्यासानं चालायला सुरवात केली. आपल्याला ५ हजार मैलांची पायपीट करायची आहे इतकंच तिला माहिती होतं. त्यासाठी तिची मानसिक तयारी पूर्ण होती.



तिच्या या धाडसी निर्णयानंतर अनेकांनी तिला समजवाण्याचा आणि हे काम अशक्य असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला मात्र या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तिनं चालायला सुरवात केली. त्यानंतर पुढची कित्येक वर्षं युलिंगमध्ये अलिंग एक विक्षिप्त आणि रहस्यमय व्यक्ती म्हणून चर्चीली गेली. भल्या भल्या अनुभवी लोकांनाही जे अशक्य ते तिनं शक्य करून दाखविल्यानं आधी तिला वेडपट ठरवणारेच नंतर आश्चर्यानं तिच्याविषयी बोलू लागले.

प्रवासादरम्यान येऊ शकणारं आजारपण, जीवघेणी थंडी किंवा कायदे या कशाचीच तिनं तमा न बाळगण्याचं ठरवलं आणि पुढचा प्रवास चालू केला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

लिलिआन कोण होती? मुळात ती रशियाहून अमेरिकेला का आली? ती एकटीच होती की तिच्यासोबत तिचे कुटुंबीय, नातेवाईक, परिचित कोणी होतं का? याबद्दल आजही फारशी माहिती नाही. स्वत: लिलिआननंही याबाबतीत कायम मौन बाळगलं होतं.

गंमत म्हणजे तिनं मायदेश गाठल्यानंतरही अभ्यास आणि संशोधनासाठी म्हणून न्यू यॉर्कच्या वार्‍या केल्या आणि पोलिसांनी तिच्या पदभ्रमंतीच्या वाटांचा अभ्यास करत आश्चर्यानं थक्क होत मान्य केलं की एका नवख्या भटक्याच्या दृष्टीनं तिनं केलेली पदभ्रमंती कमाल आहे.

साधारणपणे १९२६च्या अखेरीस किंवा १९२७च्या सुरवातीस तिनं म्हशीच्या पाठीवरून या प्रवासाला सुरवात केली. आधी कॅनडा आणि मग तिनं ब्रिटिश कोलंबिया गाठला. ती जिथे जायची तिथं बघणार्‍यांच्या नजरेत यायची याचं कारण त्या काळात स्त्रिया सहसा ज्या वेषात आणि एकट्या दिसत नसत, त्या वेषात ती फिरत असायची. पायात पुरुषी शूज, अंगावर मळके, ढगळ पुरुषी कपडे अशा अवतारात लिलिआन गावागावातून भटकताना दिसत असे.

त्याकाळात एकट्यादुकट्या पुरुषानं प्रवास करणंही सुरक्षित मानलं जात नसे, तर एक स्त्री एकटी प्रवासाला निघणं किती धोक्याचं असेल याचा विचारच केलेला बरा!

स्वसंरक्षणासाठी तिनं एक लोखंडी कांब जवळ बाळगली होती आणि कोणी अंगावर आलंच तर ती फेकून मारण्याइतकं धाडसही तिच्या अंगी होतंच. कधी कधी उलटही होत असे. ती ज्या गावात जायची तिथले स्थानिक ही कोण विचित्र बाई अशी फिरतेय म्हणून तिच्याकडे शंकेनं बघत असत. बरेचदा तिला पकडून तिची चौकशी होत असे. ती कोण? कुठे चालली आहे? एकटीच का आहे? याची कसून चौकशी होत असे. कोणीही काहीही विचारलं की तिचं एकच ठरलेलं उत्तर असे, “मी सायबेरियात चालले आहे”.

१९२७ च्या मध्यापर्यंत लिलिआननं हेझल्टन, ब्रिटिश कोलंबिया आणि युकॉन टेलिग्राफ़ ट्रेल सर केला. या प्रवासादरम्यान दर वीस तीस मैलांवर तिची गाठ लाईनमनशी पडत असे. प्रत्येक ठिकाणी तिची कसून चौकशी होत असे तिच्या पेहरावाकडे संशयानं बघितलं जात असे. तिच्या प्रवासाच्या अगदी सुरवातीच्याच टप्प्यात तिच्या पेहरावावरून आणि एकूणच अवतारावरून संशय घेत लाईनमननं तिला हटकलं आणि वरिष्ठांना याची कल्पना दिली.

ज्या कॉन्स्टेबलला या लाईनमननं टेलिग्राम केला त्याचं नाव, जे. ए. वॅन. त्याला या स्त्रीला पुढचा प्रवास करू देणं धोक्याचं आणि कायद्याविरुध्द वाटल्यानं तिला अटक करण्यात आली. पुढे तिला ओखला तुरूंगात पाठवण्यात आलं. यात तिला शिक्षा करण्याच्या उद्देशापेक्षा तिची काळजी अधिक होती. या तुरूंगात तिची चांगली देखभाल करण्यात आली. तिला चांगलं खाऊ पिऊ घालण्यात आलं आणि तिची तब्येत जरा चांगली झाल्यावर काही महिन्यांनी तिला सोडण्यात आलं.

या तुरूंगवासादरम्यान तिनं तुरुंगातील कामं करून थोडे फार पैसेही कमावले. तिचा पुढचा प्रवास करण्याचा निश्चय अजूनही डळमळला नव्हता उलट तो जास्त दृढ झाला. जजना तिला थोपविण्याचा कोणतेही कारण दिसत नव्हते त्यामुळे त्यांनी तिला प्रवासाची परवानगी दिली मात्र ती देताना एक वचन घेतलं की वाटेत लागणार्‍या प्रत्येक केबिनमध्ये ती रिपोर्ट करेल. तिनंही हे वचन पाळलं.

या केबिन्समध्ये तिला ताजं जेवण मिळत गेलं, कधी कधी वापरलेले मात्र स्वच्छ कपडेही आणि मुख्य म्हणजे तिच्यासोबत कोणीतरी काही अंतर सोबतीला जाऊ लागलं. १९२८ चा उन्हाळा या प्रवासात सरला. एव्हाना हळूहळू तिच्याविषयी चर्चा सुरु झाल्या होत्या.

डॉसन सिटित पोहोचण्यापूर्वीच तिच्या आगमनाची कुणकुण लागल्यानं स्थानिक वृत्तपत्रांनी तिच्याविषयी चित्र विचित्र वार्तांकनं करत तिच्याबाबत द्वेषाचं वातावरण बनवलं, त्याचा परिणाम असा झाला की तिला शहरात प्रवेश करण्यास मनाई करावी असा दबाव वाढायला लागला. उलट सुलट बातम्यांचा एक परिणाम असाही झाला की तिच्या विषयीचं लोकांचं कुतुहल वाढलं. अखेरीस ती शहरात येऊन दाखल झाली आणि लोकांना ही विचित्र स्त्री कधी एकदा पहातोय असं झालं.

लिलिआन मात्र न डगमगता शहरात आली आणि एका हॉटेलमधे वेट्रेसची नोकरी धरली. आधीचे थोडे आणि या नव्या नोकरीत होणार्‍या कमाईतुन तिनं एक जुनाट, मोडकी छोटीशी बोट विकत घेतली. हॉटेलमध्ये काम करून झालं की बाकी सगळा वेळ ती बोट दुरूस्त करण्यात घालवत असे.

वातावरणातील हाडं गोठविणारी थंडी कमी होऊन हवेत उबदारपणा जाणवू लागला तसा तिनं तिचा पुढचा प्रवास चालू केला. युकॉन नदीचा प्रवाह कापत तिनं अलास्का गाठलं. तिची ही मोडकळीला आलेली बोट नंतर बेरिंग सामुद्रधुनीच्या किनार्‍यालगत सापडली. अलिंगच्या अजब प्रवासाचा हाच काय तो एकमेव पुरावा.

अलास्काला पोहोचल्यावर तिची ही अद्भुत गोष्ट संपली आणि मागे उरल्या काही कथा, काही दंतकथा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

नोबेल पुरस्कार सुरु होण्याला वर्तमानपत्रात चुकून आलेली बातमी कारणीभूत आहे

Next Post

३६५ बायका, ८८ अपत्ये, ४४ रोल्स रॉयल्स आणि स्वतःची क्रिकेट टीम असलेला भारतीय राजा

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

३६५ बायका, ८८ अपत्ये, ४४ रोल्स रॉयल्स आणि स्वतःची क्रिकेट टीम असलेला भारतीय राजा

असा माणूस जो काहीही, कितीही खायचा तरीही भुकेला असायचा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.