The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तब्बल वीस वर्षं ती एका निर्जन बेटावर अडकली होती

by द पोस्टमन टीम
15 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


ही गोष्ट आहे, १८११ किंवा १८१४ सालची. एका अशा स्त्रीची जी तब्बल अठरा वर्षे एका निर्जन बेटावर एकटीच अडकून पडली होती. तिचे कुटुंब, आप्त इतकेच काय तिचा संपूर्ण कबिला तिच्यापासून दूर गेला होता. जिथे ती आणि तिची जमात बांधव राहत होते, ते बेटच पूर्णत: रिकामे केले गेले. जसे आपण आपल्या घरातून पाली किंवा झुरळ झटकून टाकतो, अगदी तसेच तिच्या जमातीच्या लोकांना विनाकारण त्यांच्याच भूमीतून हुसकावून लावण्यात आले होते. का आणि कशासाठी? याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.

कॅलिफोर्निया खाडीतील सॅन निकोलस बेटावर अंदाजे दहा हजार वर्षापासून निकोलीनोस जमातीचे लोक राहत होते. परंतु अचानक एक दिवस स्थानिक अलास्कन आणि रशियन शिकारी लोकांनी या बेटावर ह*ल्ला चढवला. इतर अनेक आदिवासी लोकांप्रमाणेच ही जमातदेखील इतर स्थानिक लोकांपासून दूर या एकाकी बेटावर राहत होती. अलास्कन लोकांनी या बेटावर ह*ल्ला केला तेव्हा इथे या जमातीचे फक्त ३०० लोक राहत होते. या ह*ल्ल्यात तीनशेपैकी फक्त डझनभर लोक शिल्लक राहिले होते.

१८३५ साली ज्यावेळी या जमातीतील सर्वच लोकांना या बेटावरून हलवण्यात आले तेव्हा बेटावर फक्त वीस लोक उरले होते.

कॅथलिक धर्मगुरूंनी अचानकच हा फतवा काढला की या बेटावरील निकोलेनो जमातीच्या सर्वच लोकांना तिथून हाकलून देण्यात यावे. पण, धर्मगुरूंनी हा फतवा नेमका कशामुळे काढला, याचे कारण आजतागायत कुणालाही कळू शकलेले नाही.

धर्मगुरूंना या लोकांचे धर्मांतर करायचे होते म्हणून असा आदेश दिला की, इतक्या छोट्या संख्येने राहणाऱ्या या लोकांना स्वतःचे संरक्षण करणे शक्य होणार नाही म्हणून असा आदेश दिला हेही कोणाला माहिती नाही. धर्मगुरुंचा यामागे कोणता उद्देश होता तो आजही स्पष्ट झालेला नाही.



पण, या वीस लोकांना एका बोटीतून हलवले जात असतानाच त्यातील एक स्त्री चुकून मागे राहिली. जसे धर्मगुरुंनी हा निर्णय घेण्यामागे काय कारण होते हे आजही कळू शकलेले नाही त्याचप्रमाणे ही स्त्री एकटीच कशी मागे राहिली याचाही उलगडा होऊ शकलेला नाही. असे म्हणतात की ती आपल्या बाळाला शोधायला गेली आणि जहाजातील लोकांना वाटले ती जहाजावरच आहे. त्यामुळे तिचा जास्त शोध न घेता जहाज तातडीने त्या किनाऱ्यावरुन हलवण्यात आले.

या स्त्रीचे नाव होते वाआना मरिया. अर्थात हे काही तिचे खरे नाव नव्हते, तर हे नाव तिला नंतर देण्यात आले होते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

वाआना सोडल्यास त्या बेटावरील तिच्या जमातीच्या सर्व लोकांना हलवण्यात आले होते. परंतु या सगळ्यातून एकटी वाआना कशी आणि का मागे राहिली? हे रहस्य मात्र शेवटपर्यंत रहस्यच राहिले. याबद्दल कुणालाच निश्चित उत्तर देता येणार नाही.

एका दाव्यानुसार ती आपल्या दोन वर्षाच्या मुलाला शोधत होती आणि म्हणून ती मागे राहिली. तर कोणाच्या म्हणण्यानुसार वाआनाने चालत्या बोटीतून उडी मारली. काहीही असो पण, सत्य तर केवळ हेच होते की एका निर्मनुष्य बेटावर वाआना एकटी राहिली होती. तेही तब्बल दोन दशके!

१८३५ साली सॅन फ्रान्सिस्को बेटावरून या जमातीला हलवताना यांच्यातील एकटी स्त्री मागे राहिले असल्याचे नंतर निदर्शनास आले आणि या एकट्या स्त्रीचा शोध घेण्याची मोहीम सुरु झाली. या जहाजाचे कप्तान जॉर्ज नीडव्हर यांना शेवटी १८३५ मध्ये वाआनाचा शोध लागला. जॉर्ज नीडव्हर यांनी लिहिलेल्या आपल्या आत्मचरित्रात या क्षणांचा उल्लेख केला आहे.

त्या निर्जन, निर्मनुष्य बेटावर जेंव्हा वाआना सापडली त्यावेळच्या त्यांच्या भावना काय होत्या, हे त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे. त्यांनी तिचे वर्णन करताना म्हटले, “तिथे एक म्हातारी व्हेलची कातडी काढण्यात व्यस्त असलेली आम्हाला दिसली.”

कप्तान आणि त्यांचे इतर साथीदार यांना पाहून घाबरण्याऐवजी तिने त्यांच्याकडे पाहून एक स्मित दिले. हसत हसत ती खाली वाकली आणि ती एका अपरिचित भाषेत काहीतरी पुटपुटली. ती अगदी मध्यम उंचीची होती. जवळपास पन्नाशीत असेल. पण, तरीही धडधाकट आणि उत्साही होती. तिच्या अंगावर माशाच्या कातड्यांपासून बनवलेलेच कपडे होते.

या बेटावर वाआना गेली अठरा वर्षे एकटीच राहत होती. तरीही या एकाकीपणात तिच्या चेहऱ्यावरील हास्य अजिबात विरले नव्हते. तिच्या सर्व आप्तजनांना घेऊन गेलेले ते जहाज परत कधीच त्या किनाऱ्यावर परतले नव्हते. एकाकीपणाची ही अठरा वर्षे तिने कशी व्यतीत केली असतील याची कल्पनाही कुणाला करता येणार नाही.

त्या बेटावर जे काही उपलब्ध होईल त्या संसाधनाचा जमेल तसा वापर करून ती कशीबशी आपला उदरनिर्वाह करत होती. सील मासे आणि बदकांची शिकार करून त्यांच्या कातड्यापासून तिने स्वतःसाठी कपडे आणि एक छोटी झोपडी बांधली होती. या झोपडीत तिने व्हेल माशांच्या हाडापासून बनवलेले इतर साहित्य होते. कधीकधी जवळच असलेल्या एका छोट्या गुहेतही ती राहायला जात असे.

परंतु ज्यावेळी ती निडीव्हर आणि त्यांच्या क्रुला भेटली तेंव्हाही ती अज्ञातात हरवलेलीच होती. तिची भाषा अपरिचित असल्याने ती काय सांगते किंवा काय बोलते हे कुणालाच कळत नव्हते. ती जी भाषा बोलत होती ती कदाचित त्यांच्या जमातीची बोली भाषा असावी. ही भाषा बोलणारे तिच्याशिवाय कोणीच त्या उरले नव्हते कारण तिच्या जमातीच्या लोकांना पुढे सॅन गेब्रीएल मिशनमध्ये हलवण्यात आले होते. परंतु त्यांना इथले वातावरण मानवले नाही. इथे आणल्यानंतर त्यांना एका आजाराने घेरले आणि अपुऱ्या प्रतिकारशक्तीमुळे त्या सर्वांचाच मृत्यू झाला.

वाआनालाही त्या बेटावरून सांता बार्बारा मिशनमध्ये आणले गेले. पण, यामुळे काही तिचा एकाकीपणा संपला नाही. तिच्या जीवनाच्या अखेरपर्यंत तिचा एकाकीपणा तिच्यासोबतच चिकटून राहिला. ती कुणाशी काय बोलते हे समजून घेणारे कुणीच नव्हते किंवा आजूबाजूचे काय बोलताहेत हेही तिला समजत नव्हते.

या अठरा वर्षात तिने नेमके काय केले, तिला काय त्रास जाणवला, तिने या एकाकीपणाला सामोरे जाण्यासाठी नेमके काय केले, अशा कुठल्याच प्रश्नाचे उत्तर तिच्याकडून मिळू शकले नाही.

माणसात येऊनही तशी ती एकटीच होती. ती पुन्हा माणसांच्या सहवासात आली असली तरी, हा सहवासही ती जास्त काळ अनुभवू शकली नाही. कारण या ठिकाणी आणल्यानंतर अवघ्या सात आठवड्यातच तिचे निधन झाले. तब्बल दोन दशके संपूर्ण एकाकी जीवन जगल्यानंतर जेव्हा तिचा शोध लागला आणि तिला सेंट बार्बारा येेथे माणसांच्या सहवासात आणले गेले, तेंव्हापासूनच ती सतत आजारी पडू लागली. तिच्यातील प्रतिकारशक्ती कमकुवत होत चालली होती.

इथे आल्यानंतर तिच्या पचनशक्तीत बिघाड निर्माण झाला. १९ ऑक्टोबर १८५३ रोजी तिचा मृत्यू झाला. ती कोण, तिचे नाव काय (कारण वाआना मारिया हे नाव तर तिला नंतर देण्यात आले होते) अशी अनेक एक गूढ रहस्ये तिच्यासोबतच संपून गेली.

जेंव्हा ती पहिल्यांदा सेंट बार्बरा येथे आली तेंव्हा लोकांमध्ये तिच्याविषयी प्रचंड उत्सुकता होती. लोक खास तिला पाहण्यासाठी येत. परंतु तिच्याशी गप्पा मारणे मात्र त्यांना शक्य नसे. ते लोक तिला जंगली स्त्री असेच संबोधत. मग एका कॅथोलिक प्रिस्टनीच तिला वाआना मारिआ हे नाव दिले.

सेंट बार्बरा मिशनमध्ये आणल्यानंतर तिचे धर्मांतर करण्यात आले. अर्थात तिच्या परवानगीविनाच. १९ ऑक्टोबर १८५३ रोजी ती अखेरच्या घटका मोजत होती तेंव्हा एका प्रिस्टनी तिचं धर्मांतर केलं. तिला भाषाच समजत नव्हती त्यामुळे तिचे धर्मांतर केले जातेय हे तरी तिला समजले असेल की नाही कुणास ठावूक.

सेंट बार्बरा मिशनमध्ये तिला आणले जात असताना जुआनाने आपल्यासोबत काही वस्तू आणल्या होत्या. यात एक हाडापासून बनवलेली सुई देखील होती. ज्याचा वापर करून ती कपडे शिवत असे. सॅन फ्रान्सिस्कोच्या संग्रहालयात या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या, परंतु १९०६ साली इथे जोराचा भूकंप झाला, त्यातच या साऱ्या वस्तू गायब झाल्या. तिच्यानंतर तिच्या अस्तित्वाच्या ज्या काही खुणा मागे राहिल्या होत्या त्याही कायमच्या संपून गेल्या.

स्कॉट ओ’डेल नावाच्या एका इंग्लिश लेखकाने ‘आइसलँड ऑफ ब्ल्यू डॉल्फिन्स’ नावाची एक कादंबरी लिहिली आहे. ही कादंबरीही खूपच गाजली. पण यातील नायिका ही काल्पनिक पात्र नसून प्रत्यक्षातील जुआना होती हे मात्र फारच कमी लोकांना माहिती असेल. जुआनाचे संपूर्ण आयुष्य म्हणजे गूढ, रहस्यमयी कहाणीच आहे. वास्तवातील तरीही कल्पनेच्या पलीकडील कहाणी!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

उणे १० अंश तापमानात भारतीय सैनिकांनी जर्मनीच्या ना*झी सैनिकांचा सामना केला होता

Next Post

महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन मार्टिन ल्युथर किंगने अश्वेतांसाठी मोठा लढा उभारला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन मार्टिन ल्युथर किंगने अश्वेतांसाठी मोठा लढा उभारला होता

स्वातंत्र्यलढ्यातील दुसरं जालियनवाला बाग ह*त्याकांड म्हणून ओळखला जाणारा किस्सा ख्वानी बाजार

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.