The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पतंजलीच्याही आधी ‘स्वदेशी’चं भांडवल न करता डाबरने आयुर्वेदिक औषधं उपलब्ध करून दिली होती

by द पोस्टमन टीम
29 July 2025
in ब्लॉग, आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आजच्या धावपळीच्या जीवनात औषधं ही मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. मग या औषधांमध्ये काही औषधे अशीही असतात की ज्यांची विदेशातून आयात केली जाते. विदेशातून आयात करण्यामागे कदाचित हेच कारण असावे की ती औषधे आपल्याकडे उपलब्ध नाहीत. जर आजसुद्धा आपल्याला विदेशातून औषधे मागवायला लागत असतील तर विचार करा की एकोणिसाव्या शतकात ही परिस्थिती कशी असेल?

चांगल्या औषधांची मारामार असणारी परिस्थिती असताना त्या काळात एक व्यक्ती अशी होती की ज्याने सहज उपलब्ध होतील आणि सामान्य लोकांना परवडतील अशी औषधे तयार करण्याचा ध्यास घेतला होता. यातूनच डाबर या कंपनीची स्थापना झाली.

डाबरच्या कथेची सुरुवात बंगालमध्ये राहत असलेल्या डॉक्टर एस. के. बर्मन यांनी केलेल्या छोट्या पण दूरदर्शी प्रयत्नाने झाली.

दुर्गम खेड्यातल्या सामान्य लोकांना परवडणारी चिकित्सा देणं हे त्यांचे ध्येय होते. डॉ. बर्मन यांनी त्या दिवसांत कॉलरा, मलेरिया आणि प्लेग यासारख्या कित्येक रोगांवर नैसर्गिक उपचारांची तयारी करण्याचे काम हाती घेतले.

लवकरच त्यांच्या या औषधांच्या प्रवासाची बातमी परिसरातल्या लोकांना कळाली आणि त्यांना विश्वासू ‘दक्तार’ किंवा प्रभावी उपचार घेऊन आलेले डॉक्टर म्हणून लोक ओळखू लागले. यातूनच त्यांच्या उपक्रमाला डाबर असे नाव मिळाले. डॉ. बर्मन यांनी १८८० मध्ये आयुर्वेदिक औषधांची निर्मिती व वितरण करण्यासाठी डाबर या कंपनीची स्थापना केली.



डॉ. एस. के. बर्मन यांची वचनबद्धता आणि अविरत प्रयत्नांमुळे एका छोट्या घरात सुरू झालेली कंपनी वाढत गेली त्यांच्या डाबर या नावानं विश्वास व विश्वासार्हता निर्माण केली.

पुढे डॉ. बर्मन यांनी “सुंदरेश” ही एक ना-नफा संस्था चालू केली. या संस्थेचा हेतू आरोग्य, सेवा, शिक्षण आणि इतर सामाजिक-आर्थिक क्षेत्रात कल्याणकारी उपक्रम राबविणे हा होता. आजही डाबरने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीब्लीटी (सीएसआर) कार्यक्रम सुंदरेशच्या माध्यमातून चालविला असून आजही ही संस्था चालू आहे.

कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील २ खेड्यांमध्ये १,२०० ग्रामीण घरगुती शौचालये बांधून दिली आहेत. सुंदरेशच्या माध्यमातून डाबरची ९ अनौपचारिक शिक्षण केंद्रे व प्रौढ साक्षरता केंद्रे कार्यरत आहेत, जे वंचितांना व अशिक्षित महिलांना शिक्षण प्रदान करतात.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

पुढे १८८४ मध्ये डाबरची स्थापना प्रामुख्याने आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी व वितरणासाठी केली गेली. आज ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या आयुर्वेदिक औषध उत्पादक आणि देशातील पहिल्या ५ एफएमसीजी ब्रँडपैकी एक आहे. भारतातील सर्वात विश्वासार्ह आरोग्य सेवा कंपनी असणाऱ्या डाबर इंडिया लिमिटेडने ग्रामीण भारतातील आरोग्य आणि स्वच्छतेचे स्तर सुधारण्याचे ध्येय सुरू केले.

डाबरच्या आयुर्वेदिक स्पेशलिटीज डिव्हिजनकडे सामान्य सर्दीपासून तीव्र पक्षाघात होण्यापर्यंतच्या अनेक आजारांवर आणि शरीराच्या परिस्थितीवर उपचार करण्यासाठी २०० पेक्षा जास्त औषधे आहेत.

डाबर इंटरनॅशनल ही डाबर इंडियाची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. तर आयुर्वेदिक उत्पादनांच्या धंद्याव्यतिरिक्त डाबर गम मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात देखील आहे जो ‘दाबिस्को’ या नावाने चालतो.

डाबरने निसर्ग-आधारित आयुर्वेदिक औषधांच्या विशेष क्षेत्रात प्रवेश केला, ज्यासाठी बाजारात प्रमाणित औषधे उपलब्ध नाहीत. चांगल्या ऑपरेशन आणि व्यवस्थापनासाठी, त्यांच्या उत्पादनांच्या मिश्रणानुसार ३ स्वतंत्र विभाग तयार केले जातात हेल्थ केअर, प्रॉडक्ट्स डिव्हिजन, फॅमिली प्रोडक्ट विभाग आणि डाबर आयुर्वेदिक स्पेशलिटी लिमिटेड.

१८८० मध्ये डॉ. एस. के. बर्मन कुटुंबाने एक छोटी आयुर्वेदिक औषधी कंपनी म्हणून सुरुवात केलेली डाबर आता २०२० साली ‘डाबर इंडिया लिमिटेड’ ही आरोग्य, तसेच वैयक्तिक काळजी आणि खाद्यपदार्थ उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणारी चौथी मोठी कंपनी आहे.

डाबर च्यवनप्राश आणि हाजमोला ही त्यांची अतिशय लोकप्रिय उत्पादने आहेत.

१२५ वर्षानंतर ही कंपनी एवढी मोठी होईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती पण आज कोलकाताच्या बर्मन कुटुंबाची मालकी असलेल्या डाबर इंडिया लिमिटेडने जगभरात खूप मोठा गौरव मिळवला आहे. आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार क्षेत्रात १२५ वर्षांची झालेली ही कंपनी आता सामान्य नाही. आजही ती देशातील हर्बल आणि नैसर्गिक उत्पादनांची सर्वात मोठी व्यावसायिक कंपनी आहे.

डाबर ही कंपनी जरी बर्मन फॅमिली यांच्या मालकीची असली तरी तिची आज एकाच व्यक्तीकडे मालकी नाही. तर डाबरचे जे १०० टक्के शेअर लिस्ट झाले आहेत त्यातले ६७.८८ टक्के हिस्सा हा बर्मन फॅमिलीकडे आहे.

म्हणजे मुख्य मालक हे बर्मन फॅमिली असून त्यांचे इतर भागीदार आहेत.

ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट २०१४ नुसार व ब्रँड अँनालिटिक्स कंपनी ट्रस्ट रिसर्च अ‍ॅडव्हायझरी यांनी केलेल्या अभ्यासानुसार डाबरला भारताच्या सर्वात विश्वासार्ह ब्रँडमध्ये १०९ वा क्रमांक मिळाला आहे. १९८६ मध्ये, डाबर उत्पादनांची वाढती लोकप्रियता पाहता डॉ. बर्मन यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी उत्पादन प्रकल्प स्थापित करून आपल्या कार्याचा विस्तार केला, ज्यामुळे डाबर आज देशासह विदेशातसुद्धा पोहचली आहे.

इतकं सगळं असलं तरीसुद्धा डाबरची डिजिटल उपस्थिती मर्यादित आहे. जरी ती एक अब्ज डॉलरची एफएमसीजी कंपनी असली तरीही तिच्या फेसबुक पेजच्या लाईक्स फारच मोजक्या आहेत आहेत. त्यांची माहिती स्लाइडशेअर किंवा स्क्रिड यासारख्या वेबसाइटवर सादरीकरणाच्या स्वरूपात उपलब्ध आहे.

डाबरची उत्पादने महाग असतात अशी बऱ्याचदा ओरड असते पण आयुर्वेदिक उत्पादनांत डाबरचेच नाही तर कोणत्याही कंपनीच्या आयुर्वेदिक वस्तू ह्या महागच असतात. अशी औषधे तयार करण्यास जास्त कालावधी व बराच खर्च येत असतो, तसेच यासाठी लागणारा कच्चा माल हा सहजासहजी मिळत नाही व तो स्वस्त देखील नसतो.

याचबरोबर डाबर ही एक व्यावसायिक कंपनी आहे, ज्या कंपनीला सर्व प्रकारचे कर, कायदे लागू आहेत. ही व्यावसायिक कंपनी असल्याने ती किंमत ठरवतांना त्यांच्या नफ्याचे गुणोत्तरही बघितले जाते.

तसेच, डाबर हे एक प्रतिष्ठित नाव आहे, त्याची पण किंमत यात येणारच की! डाबरचे सर्व प्रॉडक्ट हे उच्च गुणवतेच्या असल्याने त्याची किंमत काही प्रमाणात जास्त असते.

आजच्या घडीला कंपनीचे चेअरमन श्री अमित बर्मन हे असून त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली आहे. तसेच अमित बर्मन हे पायलट देखील आहेत. त्यांना हवेत उड्डाण करायला आवडतं. अमित हे आपल्या पिढीजात चालत आलेल्या कंपनीला आजही अतिशय काळजीपूर्वक पुढे घेऊन जात आहेत.

भविष्यातसुद्धा डाबर या स्वदेशी कंपनीने आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून असंच भारतीयांच्या सेवेत राहावं हीच इच्छा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एका दिवसात ४० हजार सैनिक गमावल्यानंतर रेड क्रॉसची स्थापना करण्यात आली होती

Next Post

आजची टुकार पत्रकारिता बघून न्यूजट्रॅकची आठवण झाल्याशिवाय राहत नाही

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
Next Post

आजची टुकार पत्रकारिता बघून न्यूजट्रॅकची आठवण झाल्याशिवाय राहत नाही

जाणून घ्या गणितात नोबेल पुरस्कार का दिला जात नाही...

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.