The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मौल्यवान रत्नांचे इतके साठे असूनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये भाव का नाही?

by द पोस्टमन टीम
16 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या फारच खालावली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानी रुपयाचा दर घसरलाय, रोजच्या भाजीपाल्याचे दर तर अगदी गगनाला भिडले आहेत.

आता मौल्यवान रत्नांच्या साठ्याबाबत बोलायचेच झाले तर जागतिक क्रमवारीत पाकिस्तानचा पाचवा क्रमांक लागतो. असे असूनही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मात्र पाकिस्तानला कोणीही विचारत नाही. पाकिस्तानमध्ये बहुमुल्य रत्नांचे आणि खनिजांचे विपुल साठे असतानाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानची थोडी देखील पत नाही. ही फारच आश्चर्याची बाब आहे. 

पाकिस्तानमध्ये आढळणारी ही रत्ने इतर देशांच्या तुलनेत खूपच किंमती आणि मूल्यवान आहेत. तरीही यांना आंतरराष्ट्रीय बाजारात योग्य ती किंमत दिली जात नाही.

पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान या ठिकाणी सर्वात जास्त रत्नाच्या खाणी आढळून येतात. पाकिस्तानच्या पेट्रोलियम आणि नैर्सार्गिक संसाधन मंत्रालयाने स्वतः ही माहिती दिली आहे.

रुबी, नीलम आणि पन्ना यांसारख्या दुर्मिळ रत्नाच्या खाणी याठिकाणी आढळतात. पाकिस्तान नैसर्गिक संसाधानांनी संपन्न असलेला देश आहे.



अलीकडेच इथे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅसचा खूप मोठा साठा सापडला आहे. तेलासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून राहण्याची आता पाकिस्तानला गरज नाही, इतका मोठा साठा आहे.

असे असूनही पाकिस्तानमध्ये या हिऱ्यांच्या बाजारपेठेत म्हणावी तितकी उलाढाल होत नाही. यामागे बरीच कारणे आहेत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पाकिस्तान सरकारने आपल्या देशातील या रत्नांच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण, सरकारला त्यात यश आले नाही. १९७९ साली पाकीस्तानमध्ये या मौल्यवान वस्तूंच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी जेमस्टोन कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान नावाची संस्था निर्माण केली. परंतु फक्त १८ वर्षातच ही संस्था बंद पडली.

पाकिस्तानमधील या रत्नांचा व्यापार जोरात चालवा यासाठी आता काही खाजगी संस्था स्वतःहून पुढाकार घेत आहेत. यासाठी पाकिस्तानमध्ये ‘पाकिस्तान जेम्स अँड ज्वेलरी डेव्हलपमेंट कंपनी’ (PGJDC) आणि ‘ऑल पाकिस्तान कमर्शियल एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ रफ अँड अनपॉलिश्ड प्रेशियस अँड सेमीप्रेशियस स्टोन्स’ (APCEA) अशा दोन मोठ्या संस्था काम करत आहेत.

पाकिस्तानमध्ये जी काही दुर्मिळ रत्ने सापडतात त्यांचे दरवर्षी प्रदर्शन भरवले जाते. १९९४ पासून पेशावरमध्ये हे प्रदर्शन भरवले जाते. परंतु याचे नियोजन मात्र नीट केले जात नाही. हे प्रदर्शन पाहण्यासाठी कुठल्याही आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना निमंत्रित केले जात नाही. या प्रदर्शनाची मोठ्या प्रमाणात जाहिरातही केली जात नाही.

त्यामुळे बाहेरच्या देशातील व्यापाऱ्यांना या प्रदर्शनाची कोणतीच माहिती मिळत नाही. म्हणूनच पाकिस्तानातील या हिऱ्यांच्या व्यापाराविषयी फारशी चर्चा होताना दिसत नाही. याचा कुठेही गवगवा केला जात नाही. आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात ही बाजारपेठ पूर्णपणे अपयशी ठरली आहे.

कराचीमधील दक्षिण बंदरावर पूर्वी पाकिस्तानमधील रत्नांची मोठी बाजारपेठ भरत होती. सोव्हिएत संघाने ऐंशीच्या दशकात अफगाणिस्तानवर ह*ल्ला केला. या ह*ल्ल्यानंतर कराचीचे महत्त्व कमी होत गेले. त्यानंतर पेशावरमध्येच ही बाजारपेठ भरू लागली. पाकिस्तानच्या पेशावरमध्येच अफगाणिस्तानची रत्ने आणि इतर बहुमूल्य वस्तू विकण्यासाठी पाठवली जातात.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या दरम्यान सुमारे २४०० किमीची दुरंड लाईन नावाची सीमा आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधील मूल्यवान वस्तूही पाकिस्तानच्या या पेशावरमधील बाजारपेठेतच आणल्या जातात. म्हणजे पाकिस्तानातील रत्नांच्या खजिन्यात आता आणखी भर पडत आहे. या रत्नांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांची शुद्धता प्रमाणित करण्यासाठी पाकिस्तानने प्रयोगशाळा उभारल्या आहेत.

लाहोर, कराची, पेशावर, क्वेटा, गिलगीट, मुझफ्फराबाद अशा पाकिस्तानच्या मोठ्या आणि प्रमुख शहरात या प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी याच्या खाजगी प्रयोगशाळाही उभारण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानच्या अनेक प्रांतात वेगवेगळ्या खनिजांच्या आणि रत्नांच्या खाणींचा विपुल साठा आहे. पाकिस्तानची ही नैसर्गिक संपन्नता त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप मोठा सन्मान मिळवून देऊ शकते. मात्र पाकिस्तान सरकार या बाजारपेठेकडे म्हणावे तितक्या गांभीर्याने लक्ष देत नाही.

पाकिस्तानच्या हिमालय, हिंदुकुश आणि काराकोरम या भागात रत्नांचे साठे आणि इतर खनिजांच्या खाणी मिळतात. स्वातच्या आसपास पन्ना रत्नाचे भलेमोठे भांडार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. खैबरपख्तुनख्वा प्रांतातील मरदान शहरात गुलाबी पुष्कराजच्या खाणी आहेत.

स्वात खोऱ्यात मिळणारा हा पुष्कराज जगातील सर्वांत शुद्ध आणि मूल्यवान रत्न असल्याचे मानले जाते. याच्या एका ग्रॅमची किंमत कोटीच्या घरात आहे.

तज्ञांच्या मते पाकिस्तानमध्ये ७० दशलक्ष कॅरेट पेक्षा जास्त रत्नांचे साठे आहेत. कोहिस्तान भागात १० दशलक्ष कॅरेट इतके पेरीडॉट रत्नाचे साठे आहेत. याला मनी-स्टोन असेही म्हटले जाते.

पाकिस्तानचा पुष्कराज अव्वल दर्जाचा असूनही त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फारशी मागणी नाही. याउलट टांझानिया आणि श्रीलंकेतील पुष्कराजला भरपूर मागणी आहे. पाकिस्तानमधील रत्नपारखी हिऱ्याला किंवा रत्नाला पैलू पाडण्यासाठी आजही पारंपरिक पद्धतींचा वापर करतात. यामुळे ही रत्ने ओबडधोबड दिसतात.

याउलट इतर देशात मात्र रत्नांना पैलू पाडण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जातो ज्यामुळे ही रत्ने तितकी शुद्ध नसली तरी चकचकीत आणि आकर्षक दिसतात. व्यापारी अशा चकचकीत आणि आकर्षक दिसणाऱ्या रत्नांचीच जास्त खरेदी करतात.

पाकिस्तानी हिरे आणि रत्ने अव्वल दर्जाची आणि शुद्ध असूनही ते ओबडधोबड दिसतात. म्हणूनच त्यांची किंमत कमी होते. इतर देशांतील व्यापारी पाकिस्तानातील ही रत्ने आपल्या देशात नेऊन त्यांना चांगले पॉलिश करवून घेतात. त्यांच्या आकारात बदल करतात आणि त्यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून ती विकतात.

रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीतून पाकिस्तानला दरवर्षी ३.७ अब्ज डॉलर एवढीच कमाई होते. इतर आशियायी देशाच्या तुलनेत ही रक्कम खूपच कमी आहे. पाकिस्तानमध्ये रत्नाचे भांडार असूनही त्यांच्या व्यापाराकडे म्हणावे तितके लक्ष देण्यात येत नाही.

इथल्या रत्नपराखींनी आणि जोहारींनी रत्नांना आणि हिऱ्यांना पैलू पडण्याचे आणि त्यांना आकार देण्याचे आधुनिक तंत्र आत्मसात केल्यास पाकिस्तानच्या या हिऱ्यांना आणि रत्नांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत मिळेल.

हे हिरे अस्सल आणि शुद्ध असूनही केवळ त्याच्या रंगढंगामुळे मार खातात. इथले व्यापारी त्या रत्नांवर काम करून त्यांना चांगले रूप आणि आकार देण्याऐवजी, कच्च्या मालाची निर्यात करतात. अशा कच्च्या मालाला जास्त किंमत मिळत नाही.

व्यापाऱ्यांनी यामध्ये थोडी जास्त गुंतवणूक करून पक्का मालच विकायला काढला तर यात कितीतरी पटीने जास्त पैसे मिळू शकतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ही चकाचक दिसणारी इमारत कॉर्पोरेट ऑफिस नसून एक ग्रामपंचायत कार्यालय आहे

Next Post

७४ वर्षांनंतरही पाकिस्तानात केवळ दोनच नवीन मंदिरांची निर्मिती झाली आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

७४ वर्षांनंतरही पाकिस्तानात केवळ दोनच नवीन मंदिरांची निर्मिती झाली आहे

भूल ना जाना इसीइ बल्ब ही लाना...!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.