The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हातावर लावायच्या रंगीत स्टिकर्सनी बबलगम नाईन्टीज किड्समध्ये फेमस केला होता

by द पोस्टमन टीम
3 September 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


एक काळ असा होता जेव्हा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बबलगमची प्रचंड क्रेझ होती आणि हे क्रेझ पसरण्यामागे एका अफवेचा हात होता. ती अफवा म्हणजे आपले सगळे भारतीय क्रिकेटर्स बबलगम खातात आणि मैदानावर जर बबलगम खाल्लं तर खूप काळ एनर्जी कायम राहते. आता हा असा दावा हास्यास्पदच आहे.

हे खरे होते की खोटे ते माहिती नाही पण, ९० च्या दशकात शाळेला जाणाऱ्या मुलांसाठी मात्र हेच बबलगम एक स्टेटसचे लक्षण मानले जात होते.

त्या काळात अनेकदा टीव्हीला क्रिकेटचे सामने लागायचे तेव्हा सचिन तेंडूलकर पासून राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराज, सेहवाग असे अनेक खेळाडू तोंडात काहीतरी चघळत असलेले दिसायचे. टीव्हीसमोर ते सामने पाहत बसलेल्या बालचमूची पक्की खात्री असायची आपले आवडते खेळाडू बूमर किंवा बिग बबुलचे बबलगम चघळतात.

मग काय क्रिकेटचे सामने संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेच्या बाहेर उभ्या असणाऱ्या ठेल्यावर बिग बबुल आणि बुमर बबलगमची तुफान विक्री होत असे. मैदानांवर क्रिकेट खेळायला जाताना बहुसंख्य मुले बबलगम चघळत चघळत खेळायला जात असत. शाळा सुटल्यानंतर शाळेच्या बाहेर उभ्या असणाऱ्या गाड्यावरून बबलगम विकत घेऊन खात खात घरी जाणे आणि त्याचे फुगे बनवणे हा ९० च्या दशकातील बहुसंख्य मुलांचा नॉस्टॅल्जिया आहे. आजच्या पिढीला त्याच्यातली गंमत समजणे अशक्य.



बुमर आणि बिग बबुल हे दोन मोठे प्रतिस्पर्धी ब्रँड तेव्हा बबलगम बनवत असत. त्यापैकी बुमर बबलगमचा बुमर मॅन नावाचा अधिकृत सुपर हिरो असायचा आणि बबलगम खाऊन तो लोकांना वाचवतो अशा आशयाच्या त्याच्या जाहिराती देखील टीव्हीवर येत असत.

अचानक या जाहिरातींच्या यु*द्धात २००० साली बिग बबल ने आघाडी घेतली. याचं कारण होत २००० साली आलेली बिग बबलची हटके जाहिरात. ही जाहिरात ॲनिमेटेड कार्टून ॲडच्या प्रकारातील जाहिरात होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

याची थीम काहीशी अशी होती –

एका मोठ्या जंगलात उंच टेकडीवर एका सुंदर निळ्या पक्षाचे घरटे आहे. एक माकड तिच्या घरट्या शेजारी कायम अंड्यांची रखवाली करत असतं. त्या पक्षिणीने २ अंडी दिलेली असतात त्यात अचानक कुठून तरी तिसरे अंडे येते. पार्श्वभूमीवर “चिडिया रानी बडी सयानी अंडे दिये खास. इक अजनबी अंडा लेकीन लुडक के आया पास. पर जय हो पंखोवाली मैय्या तुने उसे भी गोद लिया!”

अशा मजेदार जिंगलमधून कहाणी उलगडत जाते.

मग यथावकाश पिल्ले अंड्यातून बाहेर येतात आणि तिसऱ्या अनोळखी अंड्यामधून एक कासव बाहेर येते. “आवारे बालगोपाल. अब उडने का वखत आ गया!” असं म्हणत ती पक्षिण आपल्या पिल्लांना उंच कड्याच्या टोकाशी आणते आणि आपल्या दोन भावांना पाहून कासवसुद्धा पळत पळत येऊन उंच झेप घेण्याची तयारी करू लागतं. ते पाहून सगळीकडे हाहा:कार माजतो.

जाहिरातीत सुरुवातीपासून दाखवलेल्या पण काहीच संवाद नसणाऱ्या माकडाचे डोळे पांढरे होतात, कासवाचे दोन पक्षी बंधू घाबरतात. मम्मी भैय्या को समाझाओ वो अडॉप्टेड है! उड नही पायेंगे असे आपल्या आईला ओरडून विनवतात.

तेवढ्यात कासव कड्यावरून खाली उडी घेते आणि तोंडात चघळत ठेवलेल्या बिग बबल बबलगम च्या सहाय्याने मोठा फुगा निर्माण करून हवेत तरंगत राहते. अचानक दु:खद प्रसंग सुखद प्रसंगात बदलतो. पक्षी, माकड आनंदाने नाचू लागतात आणि पार्श्वभूमीवर स्लोगन झळकते

बिग बबुल – इ है बडे काम कि चीज!

ही इतकी भयानक आणि आगां-पीछा नसलेली जाहिरात जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर आली तेव्हा तिला बघून हसावं का रडावं ते कळेना पण म्हणतात ना एखादी गोष्ट जितक्या विचित्र आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने सांगू तितकी ती अपील होते तशीच ही जाहिरातसुद्धा झाली आणि बिग बबल हे नाव प्रत्येक शाळकरी मुलाच्या तोपर्यंत ओळखीचं झालं.

तसं बघायला गेलं तर भारत हा बबलगमचा मोठा उपभोक्ता देश आहे. इथे एक बेसिक फरक लक्षात घेतला पाहिजे. जे एडीबल किंवा खायचे गम असतात त्याच्या च्युइंगगम आणि बबलगम अशा दोन कॅटेगरी पडतात. च्युइंगगम फक्त चघळता येते त्यातून फुगा बनवता येत नाही. बबलगम हे चघळता पण येते आणि त्यातून आपण फुगा देखील बनवू शकतो. 

भारतात २००० आणि त्यानंतरच्या काही वर्षात बबलगमचे मार्केट ५६% वर जाऊन पोहोचले होते. हे बबलगम कन्फेक्शनरीच्या वर्गात येतात. 

कन्फेक्शनरी म्हणजे मोठ्या प्रमाणात साखर आणि रिफाईन्ड कार्बोहायड्रेट्स वापरून बनवलेले गोड पदार्थ. यात कँडी, चॉकलेट, सॉफ्ट चॉकलेट, हार्ड चॉकलेट, बबलगम, चघळता येण्याजोग्या गोड गोळ्या यांचा समावेश होतो.

बिग बबल हे मुळचे भारतीय उत्पादन नाही. “परफेत्ती व्हॅन मिले” नावाच्या इटालियन कंपनीचे हे अपत्य. या कंपनीचे इतर लोकप्रिय उत्पादने म्हणजे अल्पेन ली बे, सेंटर फ्रेश, सेंटर शॉक, हॅप्पीडेंट, फ्रुटीला अशा अगदी तळहातावर मावणाऱ्या आणि कुठेही येता जाता सहज तोंडात टाकता येणाऱ्या गोळ्या, बबलगम, च्युइंगगम आणि लिक्विड फिलिंगच्या आणि हार्ड कव्हरच्या गोळ्या.

ज्यावेळी बिग बबुल भारतात लाँच करण्याची वेळ आली तेव्हा भारतीय बाजारपेठेला आकर्षित करण्यासाठी परफेत्तीने एक नवीन योजना आणली. त्यांनी भारतीय किरकोळ आणि ठोक व्यापारी वर्ग पकडला.

छोट्या छोट्या किराणा दुकानांना आपले टार्गेट ठेवले आणि बिग बबुल गम सुट्टे देण्याऐवजी ते प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरून सरळ या बरण्या दुकानदारांना द्यायला सुरुवात केली. अगदी हाताळायला सोप्या आणि हलक्या बरण्या आणि त्यात आकर्षक वेष्टनामध्ये गुंडाळलेले बबलगम अनेक लहान आणि मध्यमवर्गीय दुकानदारांनी खुशीने आपल्या दुकानात ठेवायला सुरुवात केली.

त्यानंतर बिग बबुलच्या एकेक धडाकेबाज जाहिराती यायला सुरुवात झाली. आता साधा बबल गम, ज्याची आवश्यकता कुणालाच नसते, त्याला लोकांच्या आयुष्याबरोबर कसं रिलेट करायचं? 

यासाठी बिग बबुलच्या मार्केटिंग हेड आणि जाहिरात करणाऱ्या कंपन्यांनी डोकी खाजवायला सुरुवात केली आणि यातून ‘बडे काम की चीज’ या स्लोगन सह एका मार्केटिंग कंपनीचा उदय झाला.

कासवाच्या जाहिरातीनंतर बिग बबुल त्यांनतर मुलाची आणि कावळ्याची कल्पक जाहिरात घेऊन आले, ज्यात एका मुलाच्या अंगावर तो गेटमधून सायकल घेऊन बाहेर निघत असताना रोज एक कावळा नेम धरून त्याला टार्गेट करतो आणि त्याचे अंग घाण करतो. यावर उपाय म्हणून तो छोटा मुलगा एक दिवस बिग बबुल खाऊन प्रचंड मोठा फुगा तयार करून झाडावर बसलेल्या कावळ्या पर्यंत पोहोचतो. आणि त्याच्या अंगावर टूथपेस्ट टाकून त्याचा बदला घेतो. ही देखील जाहिरात तशी खूप गाजली.

बिग बबुलचा मुख्य उपभोक्ता शाळकरी वर्गच कायम राहिला आहे. त्यांनी नंतर बबलगमसोबत वेगवेगळे रंगीत स्टिकर्स आणि जगभरात विख्यात असलेल्या अमेरिकेच्या वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेनमेंटच्या कुस्तीगीरांचे कार्ड्स बबलगमबरोबर फ्री द्यायला सुरुवात केली.

काहीही करून आपला ग्राहक टिकवून ठेवणे हा त्यामागील उद्देश होता. परंतु नंतर लिक्विड फिलिंग असलेल्या फ्रुटपंच कँडीनी बबल गमचे मार्केट खाऊन टाकायला सुरुवात केली. बबल गमपेक्षा चांगले चांगले सोर्स लोकांना उपलब्ध झाले तसे लोकांनी बबलगम या सेगमेंटकडेच पाठ फिरवली.

आज २०२४ मध्ये बबलगम फारसे प्रसिद्ध आहेत अशातला भाग नाही मात्र बबलगमच्या जाहिराती भारतीय जाहिरात क्षेत्रातील सगळ्यात मजेदार आणि विचित्र जाहिराती ठरल्या हे नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरून अडवाणींनी अटलजींना पंतप्रधानपदासाठी पुढे केलं

Next Post

आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या ‘ऑटो रिक्षा’लाही इतिहास आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या 'ऑटो रिक्षा'लाही इतिहास आहे

या भारतीय शास्त्रज्ञांचं योगदान कायमच दुर्लक्षित राहिलं आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.