The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका फुलाच्या छंदाने हॉलंडची अर्थव्यवस्था कोलमडली होती

by द पोस्टमन टीम
20 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


बाजारात एखादी नवी फॅशन आली की, सगळे लोक तिच्या मागे वेडे होतात. सर्वांनाच त्या प्रकारची वस्तू, कपडे दागिने, आपल्याकडेही पाहिजे असे वाटते. एकाचे पाहून दुसरा मग तिसरा असे करत करत ही फॅशन संपूर्ण समाजात रूढ होत जाते.

पण, हॉलंडमध्ये सुमारे सतराव्या शतकात अशाच एका फॅशनच्या नादी लागून काही लोकांचे दिवाळे निघाले होते. असे म्हटले जाते की, या फॅशनने देशाची अर्थव्यवस्थाही कोलमडली होती.

काय आहे यामागची खरी कहाणी?

सतराव्या शतकात हॉलंडमध्ये फुलांच्या महागडे कंद विकत घेण्यावर लोकांनी एवढे पैसे उधळले की शेवटी त्यांना हा महागडा छंद चांगलाच महागात पडला.

परंतु ट्युलिपच्या या कंदामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्याचा जो दावा चार्ल्स मॅकी या स्कॉटीश लेखकाने केला आणि त्याने आपल्या कादंबऱ्यांमधून या स्थितीचे जे वर्णन केले ते शुद्ध काल्पनिक आणि अतिरंजित स्वरूपाचे असे मत इतिहासतज्ञ ॲन गोल्डगार हिने व्यक्त केले आहे. नुसते मतच नाही तर ऍनने या बाबतीत ट्युलिप मानिया : ‘मनी, ऑनर अँड नॉलेज’ हे पुस्तक लिहून यातील सत्यतेवरही प्रकाश टाकला आहे.



चार्ल्स मॅकीने आपल्या मेमॉयर्स ऑफ एक्स्ट्राऑर्डीनरी पॉप्युलर डील्युजन अँड द मॅडनेस ऑफ क्राऊड्स या पुस्तकात संपूर्ण डच सोसायटी या फुलासाठी कशी वेडी झाली होती आणि या फुलांच्या महागड्या कंदावर लोक आपल्या संपूर्ण वर्षाची कमाई कसे उडवत होते याचे रसभरीत वर्णन केले आहे.

त्याच्या मते या ट्युलिप कंदाचे वेड लागले नसेल अशी एकही व्यक्ती हॉलंडमध्ये नव्हती. अगदी राजघराण्यातील सरदार उमरावांपासून ते चिमणी कामगारापर्यंत सगळ्यांना या ट्युलिप कंदाने वेडे केले होते. मॅकीने याला ट्युलिप मॅनिया असे नाव दिले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मॅकी आपल्या या प्रसिद्ध पुस्तकात लिहितो, “एखाद्या मधाच्या भांड्यावर माशा घोंघावत याव्यात तसेच लोक या ट्युलिपच्या कंदावर तुटून पडत होते. या लोकांमध्ये घरंदाज कुटुंबातील व्यक्ती होत्या, मेकॅनीक्स होते, शेतकरी होते, कोळी होते, नोकर होते आणि अगदी चिमनी कामगारही होते. सगळेजण जणू ट्युलिप्सच्या पुरात बुडून गेले होते.”

१६३७ साली हॉलंडमध्ये अचानकच आलेल्या या ट्युलिप्स कंदाच्या लाटेत देशाची अर्थव्यवस्था अक्षरश: वाहून गेली होती, असा दावा देखील मॅकीने केला होता.

समाजाच्या सर्व थरातील लोक या ट्युलिप्स कंदाच्या व्यापारातून आपली आर्थिक स्थिती बदलण्याचा प्रयत्न करत होते. मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी या व्यवसायात पैसे गुंतवल्याने त्यांचे दिवाळे निघाले होते आणि अमीर उमरावांची तर पाक राया गेली होती. असेही वर्णन मॅकीने केले आहे.

परंतु, इतिहासतज्ञ ऍन गोल्डगार हिच्या मते मात्र मॅकीने केलेल्या या वर्णनात सत्याचा थोडाही अंश नसून त्याने अतिरंजित आणि बटबटीत पद्धतीने वस्तुस्थिती मांडली आहे. मॅकीचे हे वर्णन म्हणजे जणू एखाद्या कादंबरीतील कल्पना विलास आहे. गोल्डगार या किंग्ज कॉलेज लंडन येथे आधुनिक इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत. परंतु मॅकीने केलेले हे अवास्तव दावे सत्य म्हणून का स्वीकारले गेले यावरही त्यांनी बरेचसे संशोधन केले.

“लोकांना इतर लोकांच्या मूर्खपणाच्या कथा ऐकायला फार आवडतात म्हणूनच मॅकीने लिहिलेले हे अतिरंजित वास्तव सत्य म्हणून स्वीकारले गेले”, असे गोल्डगार म्हणतात. विशेष आणि खेदाची बाब म्हणजे जॉन केनेथ या अर्थशास्त्रज्ञाने देखील आपल्या अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ फायनान्शियल युफोरिया या पुस्तकात मॅकीने दिलेलीच माहिती संदर्भ म्हणून वापरली आहे.

परंतु ट्युलिप मॅनियामुळे संपूर्ण निराशाजनक परीस्थिती उद्भवली होती, हे संपूर्णत: चुकीचे आहे. पण त्यांच्या मते तरी यामुळे अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झाला नव्हता.

सतराव्या शतकात हॉलंडमध्ये उपहासात्मक काव्याची मोठी परंपरा होती. या काव्यातून किंवा गीतातून एखाद्या प्रचलित गोष्टींवर भरपूर उपहास केला जात असे. याच परंपरेतून काही कविता लिहिल्या गेल्या ज्यात ट्युलिप फुलांच्या व्यापारावर, ते विकत घेणाऱ्यांवर आणि ट्युलिप्सच्या व्यापारातून आपण खूप श्रीमंत होऊ आणि प्रतिष्ठित डच समुदायात आपल्यालाही स्थान मिळेल असे स्वप्न पाहणाऱ्या या सर्वांची यथेच्छ चेष्टा टिंगलटवाळी करण्यात आली होती.

दुर्दैवाने मॅकीने याच उपहासात्मक कवितांचा अभ्यास करून आणि त्यातील माहिती खरी मानून लिखाण केले. ज्यावर इतर लोकांनीही डोळे झाकून विश्वास ठेवला.

ट्युलिप मॅनियाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी गोल्डगार यांनी स्रोतांच्या मुळाशी जाऊन अभ्यास केला. तिने या ऐतिहासिक घटनेची सत्यता पडताळण्यासाठी ऍमस्टरडॅम, एनखुंझेन आणि हार्लेम या शहरातून जुनी माहिती गोळा करत फिरली. इथल्या सार्वजनिक वाचनालयातील हस्तलिखितांचा अभ्यास केला.

कोर्टातील खटल्यांची कागदपत्रे आणि मृत्युपत्रे यांचाही अभ्यास केला. या माहितीतून गोल्डगारला जो सत्याचा साक्षात्कार झाला त्यात कुठेही अवास्तव आणि ट्युलिप कंदाविषयीचा वेडेपणा नव्हता.

परंतु, एका विशिष्ट समुदायात आणि बाजारपेठेत याबद्दल इतके आकर्षण होते की ऐषोआरामाच्या हव्यासापोटी या वर्गाने ट्युलिप कंदाच्या किंमती वाढवून ठेवल्या होत्या.

सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात डच सामाजाचा उत्कर्ष झाला होता. त्यांच्यात सुबत्ता आणि समृद्धता आली होती. स्पेनसारख्या स्वतंत्र झालेल्या देशांनी डच इस्ट इंडिया कंपनीशी केलेल्या व्यापारामुळे डच समृद्ध झाले होते. सोबतच महागड्या वस्तूंची खरेदी, भपकेबाजपणा हे अवगुणही या समाजात शिरले होते. परंतु, मॅकीने वर्णन केल्याप्रमाणे कुठेही या फुलांच्या किमतीत अवास्तव वाढ झाली नव्हती.

हळूहळू डच समाजातील ही ट्युलिपची क्रेझ कमी झाली. परंतु कुठेही अर्थव्यवस्था कोलमडून जाण्याइतके भयावह परिणाम घडून आले नव्हते.

गोल्डगार यांच्या मते, “लोकांना फॅन्सी वस्तू विकत घेण्यास त्यांचे प्रदर्शन करण्यास आवडते.”

आजच्या काळातसुद्धा ही गोष्ट पाहायला मिळते. त्याकाळच्या अमीर-उमरावांनी आणि व्यापाऱ्यांनी या ट्युलिप्सच्या कंदांना जास्तच प्रसिद्ध करून ठेवले होते.

पण, कोणत्याही वस्तूबद्दलची क्रेझ काही कायमची टिकून राहत नाही. ट्युलिप्सच्या फुलांच्या बाबतीतही तेच झाले. यात कुठेही अर्थव्यवस्थाकोलमडून जाण्याचे काहीच कारण नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ब्रिटिशांसोबत भारतात आलेल्या गोष्टी : भाग ७ – जीवन विमा

Next Post

या रिअल लाईफ डॉनला पकडण्यासाठी सरकारने साडेपाच कोटीचे बक्षीस ठेवले होते

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या रिअल लाईफ डॉनला पकडण्यासाठी सरकारने साडेपाच कोटीचे बक्षीस ठेवले होते

फक्त मुलंच नाही तर मुलींनासुद्धा येज्दीने आपलं वेड लावलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.