The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मॉरीशसचा “ढ” समजला जाणारा हा पक्षी नामशेष का झाला..?

by द पोस्टमन टीम
29 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


वेळेनुसार स्वत:त बदल केला नाही तर कोणत्याही स्पर्धेत आपण आपोआपच मागे पडतो. डार्विनच्या शब्दात सांगायचं तर ‘सर्वायवल ऑफ द फिटेस्ट’ असे सांगणारा हा सिद्धांत आजही कित्येक प्रजातींच्या शेवटाचा उलगडा करण्यात महत्त्वाचा आहे.

वेळेनुसार शरीराच्या रचनेत बदल न केल्याने, मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपाने कित्येक प्रजाती समूळ नष्ट झाल्याचे पुरावे आज सापडत आहेत. त्यातीलच एक बदकांची प्रजाती होती- डोडो.

डोडो पक्षाला ‘ढ’ पक्षी म्हणून ओळखले जात असे. वजनाने जड, उडता न येणारा, घाणेरडा राहणारा हा पक्षी आता नामशेष झाला आहे.

त्यात डच लोकांनी १६ व्या शतकात डोडो पक्षाचे वास्तव्य असलेल्या बेटावर कब्जा केला तेव्हा या पक्षांचा नायनाट वेगाने सुरु होण्यास सुरुवात झाली. पुढील १०० वर्षांच्या आत या प्रजातीच्या शेवटच्या पक्षाने अखेरचा श्वास घेतला.

डोडोला नेहमीच ‘ढ’ समजले जात असले तरीही आताच्या नविन पुराव्यांच्या आधारे या गोष्टीत तथ्य नसल्याचे समजले आहे. बदलत्या हवामानाशी एकरुप होण्याची डोडोची क्षमताच त्याला जवळ-जवळ ८ दशलक्ष वर्षांसाठी पृथ्वीवर टिकवुन ठेऊ शकली असे तज्ञ सांगतात.



अंदाजे ८ दशलक्ष वर्षांपूर्वी हिंदी महासागरात मॉरिशस नावाचे बेट लाव्हारसाच्या परिणामाने निर्माण झाले. त्याच्या काही काळानंतरच ‘डोडो’ पक्षाचे वंशज त्या बेटावर आले असे तज्ञ सांगतात. याच वंशजांचे रुपांतर हळुहळु मोठ्या डोडो पक्षांमध्ये झाले, आकार वाढल्याने त्यांना नंतर उडता येईना झाले.

एखादी प्रजाती पुर्णपणे नामशेष होऊ शकते ही संकल्पनाच त्यावेळी अस्तित्वात नव्हती. काही डोडो पक्षी वाचले असले तरीही ते कळण्याचा कोणताही खात्रीशीर मार्ग त्यावेळी उपलब्ध नव्हता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

शारीरिक पुरावे, अविकसित तंत्र, लोकांनी जास्तीच्या रंगवुन सांगितलेल्या दंतकथा यामुळे पक्षाचे नेमके वर्णन कसे होते ते कळणे त्यावेळी अवघड होते.

१८६५ मध्ये सापडलेल्या मॉरिशसच्या मोठ्या जीवाश्म साठ्यात बरीच काही हाडे सापडली आहेत. त्यात ‘डोडो’ पक्षाच्या सापळ्याशी साधर्म्य असलेले एक जीवाश्म सापडले आहे.

इटिएन थिरीयक्स या मॉरीशसमध्ये न्हावी असलेल्या आणि निसर्गाची आवड असलेल्या अवलियाने हे जीवाश्म शोधून काढले होते. दुर्दैवाने त्यावेळी त्याकडे कोणीही वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न केला नाही.

२०११मध्ये क्लासेंस आणि त्याच्या २ विद्यार्थ्यांनी या जीवाश्मचा अभ्यास करण्याचे ठरवले. मॉरिशसला जाऊन त्यांनी प्रत्येक हाडाचे स्पष्ट छायाचित्र मिळवण्यासाठी 3-D लेजरचा वापर केला. या हाडांचा त्यांनी खोलपर्यंत अभ्यास केला. यावरुन डोडोच्या रचना आणि त्याच्या हालचाली या बाबत त्यांनी काही निष्कर्ष काढले.

त्यांच्या मते, डोडो हा एक दणकट, जाड पायाची हाडे असणारा प्राणी होता. गुडघ्यावर असणाऱ्या मध्यम आकाराच्या कवचामुळेच (जे वैज्ञानिकांच्या निरिक्षणास या अगोदर आले नव्हते) पक्षाला आपले वजन सांभाळणे शक्य होत असावे असे वैज्ञानिकांच्या लक्षात आले.

अगोदर केलेल्या अभ्यासातुन लक्षात आल्याप्रमाणे डोडो अगदी जास्त स्थूल नव्हता हे क्लासेंस याच्या अभ्यासातुन लक्षात आले. डोडो जमिनीवर मोकळेपणाने आरामात फिरू शकत होता.

तसेच डोडोची चालण्याची गती अगदी जास्त नसली तरीही तो एकदम हळु चालत असे असेही नव्हते.

१७ व्या शतकातील एका दर्यावर्दीच्या नोंदीवरुन तर असे लक्षात येते की डोडोचा वेग एवढा होता की त्याला पकडणे कधी कधी अवघड जात असे.

डोडोच्या पंखांचा अभ्यास करताना शरीराशी जोडले जाणाऱ्या स्नायूंंसाठी पंखांवर असणारी खाच त्यांना दिसली. यावरुन डोडोच्या पंखांचे विघटन झाले नव्हते हे लक्षात येते. उडता येत नसले तरी चालताना शरीर सांभाळण्यासाठी या पंखांचा वापर होत असावा असे वैज्ञानिक सांगतात.

वैज्ञानिकांचा दुसरा एक समुह डोडोच्या मेंदूचा अभ्यास करत होता. अमेरीकन राष्ट्रीय इतिहास संग्रहालयाचा एक समुह डोडोच्या कवटीचे सीटी स्कैन करुन ३-डी मॉडेल तयार करत होता.

वैज्ञानिकांनी त्याच प्रकारच्या अजुन ८ प्रजातींच्या मेंदूचे मॉडेल तयार केले होते. यात आधुनिक कबूतरे, मॉरिशसच्या जवळच्या भागात वास्तव्य असलेला परंतु आता समूळ नष्ट झालेला रॉड्रिगेज सॉलिटेअर नावाचा पक्षी यांचा समावेश होता.

वास घेण्याची क्षमता डोडो पक्षात जास्त होती असे या संशोधनात लक्षात आले. यामुळे त्याला पिकलेली फळे आणि बाकीचे अन्न शोधणे सोपे गेले असावे.

डोडोचा मेंदू पुर्णपणे सामान्य आकाराचा होता. मेंदूच्या घनफळाचे त्याच्या शरीराच्या वस्तुमानाशी असलेले गुणोत्तर आत्ताच्या कबूतराएवढेच होते. यावरुन समजले जाते एवढा मंद डोडो पक्षी नक्कीच नव्हता हे वैज्ञानिक ठामपणे सांगतात.

“मेंदूचा आकार हे बुद्धीची क्षमता ठरवण्यासाठी परिपूर्ण एकक नसले तरीही सध्या पक्षी अस्तित्त्वात नसल्यामुळे मेंदूचा आकार आपल्याला त्याच्या बुद्धीमत्तेचा अंदाज घेण्यास मात्र मदत करु शकतो” असे युजेनिया गोल्ड, ज्यांनी या अभ्यास समुहाचे नेतृत्व केले होते, सांगतात.

डोडोच्या लुप्त होण्याची कारणे आजही शोधली जात आहेत. डोडोचे वास्तव्य असलेले मॉरिशस बेट नेहमीच वादळे, ज्वालामुखी या नैसर्गिक संकटांत सापडले आहे.

प्राण्यांसाठी हे ठिकाण नेहमीच धोकादायक समजले जाते. हवामान बदलामुळे दुष्काळ, वणवे या गोष्टी वाढत गेल्या आणि त्यामुळे हजारो प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या.

असाच एक दुष्काळ ४२०० वर्षापुर्वी मॉरीशसला पडला होता. बेटावरील Mare Aux Songes नावाचा तलाव कोरडा पडण्यास सुरुवात झाली तेव्हा बेटावरील सगळे तहानलेले प्राणी तलावाच्या आसपास गोळा झाले. त्यांच्या विष्ठेतुन सायनोबॅक्टेरियाची निर्मिती झाली. यावेळी कमीत कमी २२ प्रजातीतील हजारो प्राणी लुप्त झाले.

तलावाचे रुपांतर विषारी गटारात झाले. प्राण्यांचा मृत्यू तहानेने झाला की विषारी असलेल्या बॅक्टेरियामुळे हे निश्चित सांगता येणार नाही असे तज्ञ सांगतात.

या तलावात बऱ्याच डोडोंचासुद्धा मृत्यू झाला. त्यामुळे या तलावात आजही डोडो पक्षाची हाडे मोठ्या प्रमाणात सापडतात. एमस्टरडॅम विद्यापीठातील केनेथ रिजडिक नावाचे प्राध्यापक डोडोच्या हाडांचा अभ्यास एक दशकापासून करत आहेत.

काही दशलक्ष वर्षांचे वास्तव्य असलेला डोडो हा परिस्थितिशी जुळवून घेणारा पक्षी होता असे ते म्हणतात.

बदलत्या वातावरणाशी एकरुप होण्याची क्षमता नसली तर एवढा मोठा काळ स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवणे शक्य नाही असे ते म्हणतात.

डोडोचे ८ दशलक्ष वर्षाचे वास्तव्य मानवाच्या २,००,००० वर्षांच्या अस्तित्वापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.

डोडो नामशेष झाला कसा?

या प्रश्नाच्या उत्तरावर आजही संशोधन चालू आहे. १६३८-१७१०मध्ये जिथे डच रहात होते त्या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर डोडोंच्या हाडाचे काहीच अवशेष तिथे सापडले नाहीत.

डोडोचा वापर खाण्यासाठी केला जात असे असे सुद्धा म्हटले जाते. परंतु काहींच्या मते जास्तीत जास्त २५० लोकांच्या एका समुहाने पुर्ण पक्षाच्या प्रजातीस लुप्त करणे शक्य नाही.

असे असले तरी डोडो प्रजाती लुप्त होण्याच्या गुन्ह्यात मानव पुर्णपणे निर्दोष आहे असे नक्कीच नाही. पुर्णपणे डोडोला संपवण्यात हातभार लावला नसला तरी अप्रत्यक्षपणे आपण या गोष्टीला चालना दिली हे नक्की.

बेटावर नैसर्गिकरित्या वाढलेल्या प्रजातींमध्ये आपण बाहेरुन नेलेल्या प्रजाती आणुन सोडल्या. त्यात डुक्कर, शेळी, हरिण, माकडे आणि उंदीर यांचा समावेश होता. डुकरांनी डोडोची अंडी खाऊन डोडोची प्रजाती वाढू न देण्यात हातभार लावला असावा.

अन्नासाठी स्पर्धा करण्याची वेळ डोडोंवर आली. अतिशय कमी वेळेत झालेल्या या मोठ्या बदलाला सामोरे जाणे डोडोंना जमले नाही आणि हळुहळु डोडोची प्रजाती लुप्त होत गेली. १७९९ साली शेवटचा डोडो पक्षी नष्ट झाला असे समजले जाते.

असे असले तरी डोडो हा हार मान्य करणाऱ्या प्रजातीमधील पक्षी होता असे नक्कीच नाही. कधी काळी पृथ्वीवर असणाऱ्या जवळ जवळ ९९% प्रजाती आता नष्ट झाल्या आहेत असे वैज्ञानिक सांगतात. त्यामुळे डोडोचे लुप्त होणे म्हणजे पृथ्वीच्या उत्क्रांतीचा एक टप्पा होता.

८ दशलक्ष पृथ्वीवर वास्तव्य करणारा डोडो म्हणजे पृथ्वीच्या उत्क्रांतीच्या टप्प्यातील एक अविभाज्य नैसर्गिक घटक होता आणि राहिल एवढं मात्र नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

तुलसी कॉमिक्सच्या सुपरहिरोसमोर बॅटमॅनसुद्धा झक मारेल

Next Post

हिंदूबहुल असूनही लाहोर पाकिस्तानला का देण्यात आलं?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

हिंदूबहुल असूनही लाहोर पाकिस्तानला का देण्यात आलं?

ब्रिटिशांसोबत भारतात आलेल्या गोष्टी : भाग ७ - जीवन विमा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.