The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या कोल्ड ड्रिंकच्या अपयशाचे धडे बंगलोरच्या मॅनेजमेंट कॉलेजमध्ये दिले जातात

by द पोस्टमन टीम
12 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कोल्ड्रिंक्स प्यायला कुणाला आवडत नाही! लहान असो की वृद्ध व्यक्ती, प्रत्येकाचं एक फेवरेट कोल्ड्रिंक ठरलेलं असतं. उन्हाळ्यात तर कोल्ड्रिंक पिण्यासारखा आनंद नाही. १९७७ साली भारतात कोल्ड्रिंक्स बनवणाऱ्या फारशा कंपन्या नव्हत्या. कोका कोलासारख्या मोठ्या अमेरिकेन कंपनीने देखील त्याकाळी भारतातून काढता पाय घेतला होता.

त्याकाळच्या जनता सरकारने कंपनीला त्यांच्या कोल्ड्रिंक्सची रेसिपी उघड करण्याचा आणि फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्टची कठोर अंमलबजावणी करण्याचा दबाव आणल्याने कंपनीने भारतीय बाजारपेठेतून आपले उत्पादन मागे घेतले. त्यामुळे आपसूकच भारतीय उद्योजकांना कोल्ड्रिंक्स क्षेत्रात निर्माण झालेल्या पोकळीचा लाभ घेता आला. याकाळात भारतात कोल्ड्रिंक्सचे अनेक ब्रँड बाजारात आले.

यातही मॅकडॉवेलच्या थ्रील ब्रँडने बाजारात चांगलीच बाजी मारली. त्यांच्या “हम तुम और थ्रील, गाये मेरा दिल” या पंचलाईनने तर धमालच केली.

१९७० आणि १९९१च्या काळात कोल्ड्रिंक्सच्या क्षेत्रात अनेक देशी उत्पादने मोठ्या प्रमाणात दाखल झाली. यात रिमझिम, स्प्रिंट, ड्युक, थम्सअप, लिम्का आणि कॅम्पा कोला अशा अनेक कंपन्या होत्या.

जनता सरकारने देखील स्वतःचा डबल सेवन नावाचा कोला ब्रँड लॉंच केला. १९७७ साली इंदिरा गांधींना सार्वजनिक निवडणुकीत हरवून जनता पक्ष केंद्रात सत्तेत आला होता. त्यावरून त्यांनी कोल्ड्रिंक्स ब्रँडचे नाव डबल सेवन असे दिले. मात्र या भारतीय कंपन्यांना जास्त काळ बाजारपेठेत तग धरून राहणे जमले नाही. उदरीकरणाच्या धोरणानंतर तर अनेक छोट्या कंपन्या मोठ्या कंपन्यांमध्ये विलीन झाल्या.



मॅकडॉवेलने १९८३ साली थ्रील हे नवे कोल्ड्रिंक बाजारात आले. यानंतर लगेचच कंपनीने दोन नवे फ्लेवर बाजारात आणले एक लिंबू फ्लेवरवाली स्प्रिंट आणि दुसरा ऑरेंज फ्लेवरवाली रश. पार्लेची थम्सअप, लिम्का आणि गोल्ड स्पॉट ही पेय आणि थ्रील यांच्यात नेहमीच रस्सीखेच चालत असे. यातच दिल्लीतील कॅम्पा कोला आणि कॅम्पा ऑरेंज या दोन पेयांची भर पडली.

मॅकडॉवेलच्या अन्न आणि पेय विभाग प्रमुख किसन मेहता यांच्यामते, “सरकारच्या कर धोरणांमुळे त्यांना खूपच फटका बसला. एकतर सगळी शीतपेये ही एकसारखीच असतात, त्यात फार तर तुम्ही एखादा एक्स्ट्रा ट्विस्ट आणू शकता आणि वरचे पॅकिंग अधिकाधिक आकर्षक करू शकता, बस्स!”

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

त्यावेळी थम्सअप आणि कॅम्पा कोला यांचीच बाजारात चलती होती. थ्रील हे त्यावेळी तिसऱ्या स्थानावर होते.

परंतु, थ्रीलची पंचलाईन इतकी जबरदस्त होती की, थोड्याच काळात तरुण ग्राहक या पेयाकडे जास्ती झुकू लागला.

आपले शीतपेय अधिक लोकप्रिय करण्यासाठी मॅकडॉवेलने शक्य ते सर्व प्रयत्न केले.

कॅम्पा कोलाचे स्लोगन होते ‘द ग्रेट इंडियन टेस्ट’ आणि थम्सअपचे स्लोगन होते ‘टेस्ट द थंडर’, या दोन्हींना टक्कर देण्यासाठी थ्रीलने ‘स्पेस एज कोला’ हे स्लोगन निवडले.

आपल्या स्पर्धकांची बरोबरी करण्यासाठी थ्रीलचे प्रयत्न सुरु होते. ब्रँडसोबत ग्लॅमर जोडले गेल्यास तरुणवर्ग अधिकाधिक आकर्षित होईल या हेतूने जाहिरातकारांनी थ्रीलच्या छापील जाहिरातीत मोठ्या मोठ्या स्टार्सचे चेहरे घेण्यास सुरुवात केली.

१९८१ साली ‘एक दुजे के लिए’ नावाचा चित्रपट आला होता. कमल हसन आणि रती अग्निहोत्री या कलाकारांना घेऊन चित्रित केलेला हा चित्रपट त्याकाळी खूपच गाजला. या चित्रपटाच्या यशाचा फायदा करून घेत थ्रीलने अभिनेत्री रती अग्नीहोत्रीला घेऊन थ्रीलने आपली जाहिरात केली.

गुलाबी टॉप आणि त्यावर स्टोल घेतलेली रती अग्निहोत्री शेअर माय थ्रील म्हणत हे कोल्ड्रिंक पिण्याची विनंती करते आहे अशी ती जाहिरात होती.

पुढे या जाहिरातील ओळी अशा होत्या, “द ग्रेट कोला टेस्ट ऑफ थ्रील – इट्स गॉट द स्टार्स स्पार्कलिंग”

या काळात कोल्ड्रिंक्समधील स्पर्धा अतिशय तीव्र होती. त्यासाठी शीतपेय उत्पादकांनी आणखी आक्रमक होत जाहिराती करणे सुरु ठेवले. कोल्ड्रिंक्सच्या प्रमोशनसाठी ते वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीचा वापर करत होते.

प्रमोशनसाठी काही कोल्ड्रिंक्स कंपन्यांनी बक्षिसांचे दावे केले. काही कंपन्यांनी मारुती डिलक्स कार, तर काहींनी ऑलिम्पिक खेळांचे तिकीट देण्याचे आमिष दाखवले. काहींनी कलर टीव्ही आणि व्हिडीओ गेम्सचीही ऑफर दिली.

थ्रीलदेखील या प्रकारच्या प्रमोशनमध्ये मागे नव्हता. त्यांनी लहान मुलांसाठी अमेरिकेतील डिस्नीलँडचे फ्री पासेस देण्याचे आमिष दाखवले.

इतके खटाटोप करूनही थ्रील जास्त काळासाठी बाजारपेठेत आपला जम बसवू शकला नाही. स्पेस एज ड्रिंक असे तांत्रिकदृष्ट्या प्रगत नाव देऊनही फक्त सेलिब्रिटी लोकांनी शिफारीश केलेले कोल्ड्रिंक एवढीच थ्रीलची मर्यादित ओळख बनली.

मार्केटमध्ये कोलाची मागणी वाढती असतानाही थ्रीलला आपले स्थान टिकवून ठेवणे जमले नाही. स्पर्धकांच्या तुलनेत थ्रील बराच मागे राहिला.

थ्रीलची विक्री जेमतेम ३ दशलक्ष ते चार दशलक्ष इतकी झाली तर त्याचवेळी पार्लेच्या थम्सअपची विक्री मात्र ४० दशलक्ष इतकी होती. १९७६ मध्ये ५ दशलक्ष टर्नओव्हर असलेल्या पार्लेचा टर्नओव्हर १९८४ पर्यंत पाचपट झाला होता.

१९९० नंतर उदारीकरण करण्यात आले. त्यानंतर कोका कोलाने भारतीय बाजारात पुन्हा एन्ट्री केली. कोका कोलाच्या एंट्री नंतर इतर भारतीय कोल्ड्रिंक्सची देखील हळूहळू पीछेहाट झाली.

कमी कालावधीत मोठी झेप घेऊनही थ्रीलचे उत्पादन कायमचे बंद करण्याची वेळ आली. अपयशी ठरलेल्या भारतीय कंपनीचे एक उदाहरण म्हणून थ्रीलच्या अपयशाबाबत बंगलोरच्या मॅनेजमेंट कॉलेजमधून अभ्यास करण्यात आला.

फक्त सेलिब्रिटी लोकांची पसंत इतक्या पुरतीच ब्रँडची जाहिरात मर्यादित राहिली. यामुळे सामान्य लोकांशी या ब्रँडला कनेक्ट होता आले नाही.

शिवाय, कराचा बोजा जास्त असल्याने कमी दरात उत्पादन विकणेही शक्य नव्हते. देशी स्पर्धकांशी तुलना करता थ्रीलने अगदी अल्पावधीसाठी मार्केटमध्ये धमाल केली पण, त्यांना हे स्थान टिकवणे जमले नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नेहरूंनी खरंच नेपाळला भारतात विलीन करून घेण्याची संधी सोडून दिली होती का…?

Next Post

अनेक अज्ञात वीरांच्या कहाण्या हे विरगळ आपल्याला सांगतायत

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

अनेक अज्ञात वीरांच्या कहाण्या हे विरगळ आपल्याला सांगतायत

शिवाजी महाराजांच्या इतिहासाबरोबरच सिंहगड अनेक पक्ष्यांचं घर देखील जपतोय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.