The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रिटिशांसोबत भारतात आलेल्या गोष्टी : ग्राईप वाॅटर

by वैभव देशपांडे (UK)
9 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


ब्रिटीशांनी भारतात आणलेल्या काही गोष्टींपैकी अजून एक विचित्र प्रकार म्हणजे “ग्राईप वाॅटर”.

लहान बाळांना पचनाला त्रास झाला की ते सारखे रडतात. तेव्हा त्यांना आराम मिळावा यासाठी त्यांना ग्राईप वाॅटर दिलं जायचं. त्यातील काही औषधी वनस्पतींमुळे बाळाचा त्रास कमी होऊन त्याला झोप लागायची.

पण, २००० साली “जर्नल ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन” आणि अनेक वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखांतून हे सिद्ध झालं की या औषधाचा बाळाच्या पचनक्रियेवर फार परिणाम होत नव्हता. बाळाला झोप लागायची ती त्यात काही प्रमाणात असलेल्या अल्कोहोलमुळे.

ग्राईप वॉटरमध्ये ३.६% इतके अल्कोहोल शिवाय साखर आणि सोडियम बायकार्बोनेट घटक असायचे. आता “अनुभवी” लोकांना ३.६% अल्कोहोल म्हणजे काही फार वाटणार नाही पण लहान बाळाला एवढंसं पण देणं योग्य नाही. 



अनेक शोधनिबंधांमधून हेच निष्कर्षास आलं की ग्राईप वॉटरचं जेवढं मार्केटिंग केलं जातं तेवढी त्याची उपयुक्तता नाही.

अमेरिकेत १९८२ सालीच या “औषधा”वर निर्बंधी घातली होती. १९९२ साली युकेमध्ये (जिथून या औषधाची सुरुवात झाली) अल्कोहोल वगळले तरच हे औषध बाजारात विकता येईल अशी अट घालण्यात आली. १९९३ साली United States Food and Drug Administration (FDA) औषधाचे जुने स्टॉक्स ही मार्केटमधून काढून टाकले.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

विल्यम वुडवर्थ नावाच्या स्कॉटीश फार्मासिस्टने १८५१ साली ग्राईप वाॅटर बनवलं. त्यावेळी पूर्व इंग्लंडमध्ये लहान मुलांमध्ये “फेन फिव्हर”ची साथ आली होती. शिवाय सगळीकडेच मलेरियाची साथ पसरली होती. या दोन्ही आजारांवर देण्यात येणाऱ्या औषधांचे घटक बघितल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की “फेन फिव्हर”वर देण्यात येणाऱ्या औषधामुळे बाळांची अपचनाची समस्या दूर होते.

ग्राईप वॉटरने अपचनावर परिणाम व्हायचा की नाही याची खात्री नाही पण, बाळ मात्र शांत झोपायचं. १८६७ साली त्याने ग्राईप वॉटरचे पेटंट आपल्या नावावर करून घेतलं. वुडवर्थने डायरेक्ट डॉक्टरांना हे औषध विकायला सुरुवात केली. सुरुवातीला हे औषध घेण्यासाठी डॉक्टरची चिट्ठी लागायची पण नंतर मात्र त्याची गरज नसायची जे थोडं रिस्की झालं.

वूडवर्थने “Granny told mother and mother told me” (आजीने आईला सांगितलं आणि आईने मला) अशी पंचलाईन वापरून ग्राईप वॉटरची जाहिरात करण्यात आली. जेणेकरून महिला वर्ग विशेष आकर्षित होईल.

तोवर इंग्रजांनी भारतात आपला चांगलाच जम बसवला होता. अनेक चैनीच्या वस्तू त्यांच्यामार्फत भारतात येऊ लागल्या होत्या. इंग्रज वापरतात म्हणजे चांगलंच असणार अशी धारणा अनेक भारतीयांमध्ये निर्माण झाली होती.

गोरे वापरायचे म्हणून सुरुवातीला अनेक उच्चभ्रू लोक बाळांना ग्राईप वाॅटर देत. नंतर इंग्रजांना तर हाकलून लावण्यात आपल्याला यश मिळालं पण त्यांनी आणलेल्या वस्तूंची सवय काही सुटली नाही. हळूहळू जवळपास सगळ्याच घरात ग्राईप वाॅटर वापरात येऊ लागलं.

साधारण ९०च्या दशकात टीव्हीवर याची जाहिरात लागायची. त्यात एक आजी त्या बाळाच्या आईला बाळ रडतंय म्हणून वुडवर्थचं ग्राईप वॉटर द्यायला सांगते अशी ती जाहिरात होती. म्हणजे अगदी आजीच्या काळापासून ग्राईप वॉटर वापरायचे असं सांगून त्याची विश्वासार्हता वाढवण्याचा प्रयत्न केला होता.

या जाहिरातीचा त्यांना फायदाही झाला. त्याकाळात ग्राईप वॉटर प्रचंड लोकप्रिय झालं होतं.

याआधी “डोंगरे बालामृताची बाटली” म्हणून असंच एक औषध यायचं पण त्यात काही अंशी अफू असतो अशा बातम्या पसरल्यामुळे ते बंद पडलं. मग त्याचं सगळं मार्केट ग्राईप वॉटरकडे वळलं.

आता पुन्हा एकदा विनाअल्कोहोल ग्राईप वॉटर बाजारात उपलब्ध आहे. या सुधारित औषधात आलं, लिंबू आणि काही वनौषधी वापरण्यात आल्या आहेत. आजीबाईच्या बटव्यातील औषध असणारं हे नवीन ग्राईप वॉटर आपल्या बाळाला देण्यासाठी नक्कीच उपयोगाचं आहे.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : 
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नेहरूंचा विरोध झुगारून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला गेले होते

Next Post

“तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे…!”

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

"तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे...!"

वाघांची शिकार करणाऱ्या या शिकाऱ्याच्या नावानेच भारतात आज अभयारण्य आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.