The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

६ ऑस्कर विजेत्या आणि ३१ ऑस्कर नामांकनं मिळवणाऱ्या चित्रपटांच्या या “मुंबईकर” निर्मात्याला आपण विसरलोय

by द पोस्टमन टीम
24 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


भारतीय चित्रपटसृष्टीच्या सीमा पार करून, भारतीय चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आणि स्थान निर्माण करून देण्याऱ्या इस्माइल मर्चंट यांच्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती असेल. भारतीय आणि जगभरातील चित्रसृष्टीत जेम्स आयव्हरी यांच्यासोबत त्यांनी स्थापन केलेल्या ‘मर्चंट आयव्हरी प्रोडक्शन्स’ नावाच्या त्यांच्या प्रोडक्शन हाउसचा दबदबा होता.

इस्माइल यांचा जन्म मुंबईचा. तर जेम्स अमेरिकेचे. पण दोघांच्यातील घनिष्ठ मैत्री अखेरपर्यंत टिकून होती. दोघांनीही एकत्र येऊन चित्रपटसृष्टीत अनेक नवे इतिहास रचले. या दोघांसोबत आणखी एक व्यक्ती होती जी मर्चंट आयव्हरी प्रोडक्शनचा एक अविभाज्य भाग होती. रुथ प्रवर झाबवाला, एक जर्मन ज्यू महिला. भारतीय व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर रुथ कायमची भारतातच राहू लागली. कर्मधर्म संयोगाने या तिघांची भेट झाली.

या त्रिकुटाबद्दल मर्चंट म्हणत की, “मर्चंट आयव्हरीमधील आमचा तिघांचा मेळ अगदी जगावेगळा आहे. मी भारतीय मुस्लीम, रुथ जर्मन ज्यू आणि जिम अमेरिकन प्रोटेस्टंट. कुणीतरी एकदा आम्हाला त्रिमुखी देव असे म्हटले होते. खरंतर, त्यांनी आम्हाला तीन-डोक्याचे राक्षस असे म्हणायला हवे होते.”

मर्चंट-आयव्हरी-झाजवाला या त्रिकुटाने मिळून दोन डझनपेक्षा जास्त चित्रपट केले.

इस्माइल मर्चंट यांचा जन्म २५ डिसेंबर, १९३६ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे मूळ नाव नूर मुहम्मद अब्दुल रहमान असे होते. त्यांचे वडील नूर मोहम्मद रेहमान हे कपड्यांचे व्यापारी होते. गुजराती आणि उर्दूचे शिक्षण त्यांना घरातूनच मिळाले. शाळेत इंग्रजी आणि अरबी या दोन्ही भाषांचे ज्ञान मिळाले.



ते नऊ वर्षांचे असताना भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पाठोपाठ फाळणीचे विखारी बक्षीसही. फाळणीने मर्चंट यांच्या मनावरही ओरखडे उमटले. भारतातील अनेक मुस्लिमांनी स्वेच्छेने भारतात राहण्याचा निर्णय घेतला. मर्चंट यांचे वडीलही भारत सोडून जाण्यास इच्छुक नव्हते. त्यांनीही भारतातच राहण्याचा निर्णय घेतला.

पुढे मर्चंट यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांची ओळख त्याकाळची गाजलेली हिंदी अभिनेत्री निम्मी हिच्याशी झाली. तिच्यासोबत त्यांना अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळत असे. चित्रपटांच्या या झगझगीत दुनियेने मर्चंट यांना आकर्षित केले नसते तरच नवल. कॉलेजमध्ये असतानाच ते विविध प्रकारची नाटके बसवत आणि त्यांची निर्मिती करण्यासाठी पैसे उभा करण्याचे नवनवे मार्गही स्वतःच शोधत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

कॉलेज संपल्यानंतर पुढे एमबीए करण्यासाठी ते न्यूयॉर्कला गेले. तिथेच त्यांनी आपल्या कुटुंबाने दिलेले अब्दुल रेहमान हे नाव सोडून मर्चंट हे नाव स्वीकारले. न्यूयॉर्कच्या वास्तव्यात त्यांना सत्यजित रे यांच्यासारख्या दिग्गज चित्रपट निर्मात्यांचे काम पाहायला मिळाले. पुढे सत्यजित रे यांनाच त्यांनी आपले गुरु मानले. इंग्मर बर्गमन, फेड्रिको फेलिनी आणि विटो दे सिका अशा दिग्गज लोकांचे काम त्यांना जवळून पाहता आले.

१९६० साली त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्याचवेळी त्यांनी ‘द क्रिएशन ऑफ वूमन’ नावाची आपली पहिली शॉर्टफिल्म बनवली.

ॲकेडमिक ॲवार्डसाठी एखाद्या चित्रपटाची निवड व्हायची असेल तर किमान सलग तीन दिवस त्याचे शो झाले पाहिजेत असा नियम होता. त्यासाठी त्यांनी एका सिनेमा शोवाल्याला गळ घातली आणि बर्गमनच्या फिल्मसोबत आपली ही शॉर्टफिल्म दिसेल अशी सोय केली. सोबतच एक प्रसिद्ध भारतीय निर्माता हॉलीवूडमध्ये पदार्पण करत असल्याची पुडी देखील सोडली. त्यांच्या या फिल्मला ऑस्करचे नामांकन मिळाले.

अमेरिकेची अधिकृत फिल्म म्हणून ही फिल्म कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवडण्यात आली. कान्सला असतानाच त्यांना जेम्स आयव्हरीची ‘द स्वॉर्ड अँड द फ्ल्यूट’ ही डॉक्युमेंटरी पाहायला मिळाली. आयव्हरी यांनी या डॉक्युमेंटरीमध्ये कैद केलेला भारत पाहून ते अगदी भारावून गेले.

ही डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर त्यांनी “एखाद्या अमेरिकन कलाकाराने दर्शवलेला असा भारत मी आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता,“ अशी प्रतिक्रिया दिली.

ती डॉक्युमेंटरी पाहूनच त्यांनी आयव्हरीशी भागीदारीची बोलणी केली. भारतीय सेटवर आंतरराष्ट्रीय चित्रपट बनवण्याच्या त्यांच्या कल्पनेला आयव्हरी यांनी दाद दिली. आयव्हरी चित्रपटांचे दिग्दर्शन करतील आणि मर्चंट फंड उभा करण्यापासून ते कलाकार शोधणे, निवडणे, निर्मिती करणे आणि त्याचे वितरण करणे अशी सगळी जबाबदारी पार पाडतील, असे ठरले.

१९६१ साली ‘मर्चंट-आयव्हरी प्रोडक्शन्स’ची सुरुवात झाली. पुढे तब्बल ४४ वर्षे ही भागीदारी टिकली. या जोडगोळीने दिलेल्या चित्रपटांत ॲकेडमिक अवार्डसाठी निवड झालेले ३१ चित्रपट होते आणि त्याच्या ६ चित्रपटांना ऑस्कर मिळाला.

पुढे या प्रोडक्शन हाउसमध्ये रुथ झाबवालाचा प्रवेश झाला. तिने आपल्या ‘द हाउसहोल्डर’ या कादंबरीचे चित्रपटात रुपांतर करण्याची विनंती केली. सुरुवातीला मर्चंट किंवा जेम्स यांना दोघांनाही मोठा चित्रपट कसा दिग्दर्शित करावा याबाबत काहीच कल्पना नव्हती तरीही त्यांनी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. मर्चंट यांची जिद्द आणि सकारात्मकता यामुळे ही कादंबरी चित्रपट रुपात पडद्यावर साकार झाली.

शशी कपूर आणि लीला नायडू यांनी यात मुख्य भूमिका बजावली होती. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. हाउसहोल्डर या चित्रपटाच्या निर्मितीला फक्त १,२५,००० डॉलर इतका खर्च आला होता. इथे मर्चंट यांचे फंड उभारण्याचे कौशल्य दिसते. शिवाय, कमी बजेटमध्येही तितकेच भव्य सेट उभारण्याची कलाही दिसते जी चित्रपटाला समृद्ध करतात.

आपल्या ‘शेक्सपिअर वल्लाह’ या चित्रपटाच्या माधमातून या जोडगोळीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पहिले पाऊल ठेवले. शशी कपूर आणि मधुर जाफरी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. सत्यजित रे यांनी या चित्रपटासाठी संगीत दिले होते. स्वातंत्र्योत्तर भारतातील वेगवेगळ्या खेड्यात जाऊन नाटक करणाऱ्या ब्रिटीश पथकातील कलाकारांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला होता.

यानंतर बॉम्बे टॉकीज (१९७०), हिट अँड डस्ट (१९८३), यासारखे क्लासिक चित्रपटही या प्रोडक्शन हाउसने दिले.

आयव्हरी यांनी दिग्दर्शित केलेला ‘अ रूम विथ अ व्हिव’(१९८५), हा त्यांचा पहिला चित्रपट होता ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला.

या चित्रपटाची कथा झाबवाला यांनीच लिहिली होती आणि त्याची निर्मिती केली होती मर्चंट यांनी. या चित्रपटाची कथा इएम फॉस्टर या इंग्रजी लेखकाच्या याच नावाने लिहिलेल्या एका कादंबरीवर आधारीत होती. १९९३ साली आलेली ‘द रिमेन्स ऑफ द डे’ या चित्रपटाला तर आठ ॲकेडेमिक अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाले होते.

मर्चंट यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांची निर्मिती केली असली तरी भारताबद्दलचे त्यांचे जाज्वल्य प्रेम अखेरपर्यंत तसेच होते. त्यांच्या या प्रेमाचे प्रतिबिंब त्यांच्या अनेक चित्रपटांतून पाहायला मिळते. २००२ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

१९६० साली आयव्हरी आणि मर्चंट यांच्यातील नात्याला सुरुवात झाली होती, २५ मे २००५ रोजी जेव्हा मर्चंट हे जग सोडून गेले तेव्हाच या मैत्रीला पूर्णविराम मिळाला.

२०१७ साली आयव्हरी यांचा ‘कॉल मी बाय युवर नेम’ हा चित्रपट आल्यानंतर आयव्हरी यांनी मर्चंट आणि त्यांच्यातील नात्यावर काही प्रकाशझोत टाकला. अर्थात, भारतात ही गोष्ट जाहीरपणे बोलण्यासारखी नव्हतीच.

“आमच्यात खूप जवळीक होती. अगदी आम्ही दोघे मिळून एकमेकांचे आयुष्य जगलो. पण, त्याच्या पश्चात मला त्याला कसलाही कमीपणा द्यायचा नाही,” असे आयव्हरी एका मुलाखतीत म्हणाले होते.

मर्चंट यांनी भारतीय सिनेमे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे एक व्यावसायिक धाडस दाखवले. त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या कौशल्यापेक्षाही त्यांच्या या धाडसीवृत्तीबद्दलच त्यांचे स्मरण केले जाईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

… आणि म्हणून दुसरं महायु*द्ध अजूनही ऑफिशियली संपलेलं नाही

Next Post

जहाँ प्रेम की चर्चा होगी, मेरा नाम लिया जाएगा

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जहाँ प्रेम की चर्चा होगी, मेरा नाम लिया जाएगा

या भारतीय हॉकीपटूचा "सर्वांत खतरनाक पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट" असा दबदबा होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.