The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बिनधास्त बोल्ड लिरील गर्ल आणि सर्फच्या सोज्वळ ललिताजी एकाच डोक्यातून आल्या होत्या

by द पोस्टमन टीम
9 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


वस्तू कोणतीही असो ती कशी उच्च दर्जाची आहे, तिची किंमत कशी किफायतशीर आहे, त्यापासून तुमचा काय फायदा आहे, वगैरे वगैरे अनेक गोष्टी ग्राहकांच्या मनावर बिंबवण्याचे माध्यम म्हणजे जाहिरात!

आजच्या युगात जाहिरातीला ६४वी कला म्हटले जाते, ते अगदी योग्यच आहे. फक्त जाहिरातीमुळे अनेकदा ग्राहकांवर प्रभाव पडतो. त्यामुळे वस्तूच्या विक्रीतही फरक पडतो. १९७० आणि ८०चे दशक हे तसे जाहिरात, टीव्ही, मनोरंजन अशा सगळ्याच गोष्टींसाठी नवीन होते. याच काळात दोन जाहिरातींनी अक्षरश: लोकांना खिळवून ठेवले होते. या जाहिरातींची वारेमाप चर्चा झाली. या जाहिरातींनी भारतीयांच्या दृष्टीकोनातही बराच फरक पाडला.

या दोन्ही जाहिराती म्हणजे समाजमनाची अगदी दोन विरुद्ध टोकं होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण, याचमुळे मध्यमवर्गीय मानसिकतेत कमालीचा फरक पडला.

देशात बदलाचे वारे वाहत होते. एकीकडे देश मुक्त अर्थव्यवस्थेकडे निघाला होता आणि तरीही त्याला आपल्या जुन्या परंपरांशी असलेली नाळ तुटू द्यायची नव्हती.



या दोन जाहिराती होत्या, लिरील साबणाची आणि सर्फ एक्सेल वॉशिंग पावडरची. दोन्ही जाहिराती म्हणजे अगदी एकाच रेषेवरील विरुद्ध दिशेने जाणारे दोन बिंदू होते. पण, आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये एक गोष्ट समान होती. ती म्हणजे दोन्ही जाहिरातींची कल्पना एकाच व्यक्तीच्या होत्या.

दोन्ही जाहिराती लिंटास या जाहिरात एजन्सीने बनवल्या होत्या. आता या जाहिरात एजन्सीचे नाव बदलून लिंटास अँड पार्टनर असे करण्यात आले आहे. जाहिरात क्षेत्रातील बाप माणूस, अलेक पदमसी यांनी या जाहिरातीची कल्पना मांडली होती.

लिरीलच्या जाहिरातीत स्विमिंग सुट घातलेली एक मुलगी अगदी मनमुराद आनंद घेत धबधब्याखाली मजेत अंघोळ करतेय. कसलीही पर्वा न करता ही युवती अगदी मनसोक्त आपल्या स्नानाचा आनंद घेत आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

तर, दुसरी जाहिरात होती सर्फ एक्सेलची. ज्यात एक साधारण गृहिणी दाखवली आहे, जिला नेहमीच आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि घराच्या बजेटची चिंता असते. मध्यमवर्गीय पठडीत मोडणारी ही स्त्री स्वस्त वस्तू आणि मस्त वस्तू यातील फरक दाखवते.

सर्फच्या जाहिरातीत भूतकाळ आणि वर्तमानकाळाचे प्रतिबिंब होते तर लिरीलच्या जाहिरातीत भविष्यकाळाचा वेध होता. या जाहिरातींनी जाहिरात क्षेत्राला आणि भारतीय माणसाला एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले.

१९७०च्या दशकात हिंदुस्तान युनिलेवरने एक नवा लेमन सोप आणला. त्यांचा हा पहिलाच साबण होता. हा साबण म्हणजे ताजेपणा आणि आनंद यांचा संगम असल्याचे त्यांना बिंबवायचे होते. यासाठी एक कंझ्युमर सर्वे घेण्यात आला. या सर्वेमध्ये मिळालेल्या प्रतिसादावरूनच अलेक यांना धबधब्याची कल्पना सुचली.

या सर्वेतून असे दिसून आले की, भारतीय स्त्रियांना स्वतःसाठी फार कमी वेळ मिळतो. यातही अंघोळीचा वेळ हाच त्यांचा स्वतःला दिलेला गोल्डन टाईम असतो. अंघोळीचे काहीच क्षण असे असतात जिथे त्यांच्या वाट्याला पूर्ण एकांत येतो. अंघोळ करता करता शॉवर खाली उभ्या राहिलेल्या मुलीत असा काही जोश संचारतो की शॉवरचे रुपांतर धबधब्यात होते आणि ती मनसोक्त मजा घेत अंघोळ करते.

ही जाहिरात म्हणजे दशकातील एक संस्मरणीय जाहिरात बनली. या जाहिरातीत काम करणाऱ्या त्या अभिनेत्रीचे नाव होते करेन लुनेल. पुढची दहा वर्षे करेनच लिरील गर्ल बनून या जाहिरातीतून झळकत राहिली.

तिने पुढील काळातील म्हणजेच भविष्यातील भारताचे प्रतिनिधित्व केले होते, जिथे बिकनी घालणे ही एक सहज बाब असेल. धबधब्याखाली मोकळ्यावर बिकिनीमध्ये या जाहिरातीचे शुटींग करताना करेनला अजिबात संकोच वाटला नाही. म्हणूनच या जाहिरातीला जास्त प्रसिद्धी मिळाली.

त्याकाळी टीव्ही चॅनेल्सची फारशी रेलचेल नव्हती. सुरुवातीला दूरदर्शनने तर ही जाहिरात दाखवण्यास साफ नकार दिला होता असेही म्हटले जाते. नंतर त्यांनी या जाहिरातीसाठी एक स्लॉट दिला.

जाहिरातीला खूपच प्रसिद्धी मिळाली. अगदी २००९ पर्यंत लिरीलच्या जाहिरातीत धबधबा आणि लिरील गर्ल हे समीकरण ठरलेले होते. यात लिरील गर्ल म्हणून नंतर दीपिका पादुकोण आणि प्रीती झिंटा देखील झळकल्या होत्या. शिवाय जाहिरातीला दिलेले संगीत आणि त्याचे शब्द देखील अतिशय रंजक होते आणि काळजीपूर्वक निवडले गेले होते.

कोणतीही जाहिरात करताना जनमानस कसे असेल याचा अंदाज बांधणे कठीण असते. कुठली कल्पना जास्त रुचेल, भावेल आणि प्रसिद्ध होईल याचा अंदाज येण्यासाठी तुम्हाला एक समाजशास्त्रज्ञ व्हावे लागते.

ललिताजीच्या जाहिरातीत म्हणजेच सर्फ एक्सेलच्या जाहिरातीत देखील सामान्यांशी जुळवून घेण्याची हीच कला अधिक प्रभावी ठरली.

पदमसी यांच्यासाठी ललिताजी हे पत्र अतिशय विलक्षण होते. कारण त्यांच्या आईवरून त्यांना या पात्राची कल्पना सुचली होती.

त्यांची आई नेहमी म्हणायची, “सस्ती चीजे खरीदाने में और अच्छी चीजे खरीदाने में फर्क होता है.” (स्वस्त वस्तू घेणे आणि चांगल्या वस्तू घेणे यात फरक असतो.) याच वाक्याने ब्रँड व्हॅल्यू निर्माण झाली.

सर्फ एक्सेलची किंमत त्याकाळच्या इतर वॉशिंग पावडरपेक्षा जास्त होती. महाग वस्तूची जाहिरात करणे आणि ती खपवणे ही त्याकाळी इतकी सोपी बाब अजिबात नव्हती.

या जाहिरातीत कविता चौधरी यांनी ललिताजींची भूमिका केलं आहे. ती एक अशी स्त्री होती जी आपल्या घरातील निर्णयाबाबत जागरूक आणि ठाम होती. आपल्या या दमदार स्वभावातून त्यांनी सर्फ कसे उत्तम आहे, याची प्रेक्षकांना जाणीव करून दिली.

थोडीशी महाग असली तरी सर्फ पासून होणारे फायदे लक्षात घेता, त्यावर जास्तीचे पैसे खर्च करणे काही चुकीचे नाही, अशी एक मानसिकता या जाहिरातीतून तयार करण्यात आली. अर्थात, यामुळे सर्फ विकत घेणे हे भारतात एक उच्चभ्रू वर्गाचे प्रतिक बनले.

पदमसी यांनी त्याकाळी अनेक कलात्मक आणि नाविन्यपूर्ण जाहिराती केल्या. हमारा बजाजपासून कामसूत्रपर्यंत हरेक प्रकारच्या जाहिराती त्यांनी केल्या.

पण, लिरील आणि सर्फ या जाहिराती मात्र उत्तम कलाकृती म्हणून त्यांच्या नावावर नोंदवल्या गेल्या आहेत. दोन्ही जाहिरातीत एक सशक्त स्त्री दाखवण्यात आली जी आपले निर्णय स्वतः घेते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

लाखो लोकांचं आयुष्य वाचवणाऱ्या या भारतीय शास्त्रज्ञाचं नोबेल अगदीच थोडक्यात हुकलं होतं

Next Post

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी या क्रांतीकारकाने देशासाठी प्राणांची आहुती दिलीय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी या क्रांतीकारकाने देशासाठी प्राणांची आहुती दिलीय

मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा 'या' डॉक्टरांनी रुग्णसेवा सोडली नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.