The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेवटपर्यंत अदृश्य राहिलेल्या या क्रू*र खु*न्याने संपूर्ण लंडन शहर हादरवून टाकलं होतं!

by द पोस्टमन टीम
4 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगात अनेक क्रू*र लोक होऊन गेले. त्यापैकी एक होता “जॅक द रीपर!”

जॅक द रीपर नाव मिळालेला हा माणूस म्हणजे व्हाईटचॅपल मधल्या बायकांसाठी जीवावरचा धोका होता. १८८८ च्या शिशिर ऋतूत त्याने अनेक स्त्रियांना अत्यंत क्रू*रपणे ठार मारले होते.

जॅक द रीपर ह्या मारेकऱ्याने त्याचा पहिला बळी ३१ ऑगस्ट १८८८ रोजी घेतला. व्हाईटचॅपेलच्या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह सापडला. तिचा मृतदेह ज्या अवस्थेत होता ते बघून एखादा शूर माणूससुद्धा घाबरला असता.

मारेकऱ्याने तिचा गळा कापला होता आणि तिचे पोट अक्षरश: फाडून तिचा कोथळा बाहेर काढला होता. त्यानंतर याचप्रकारे तीन महिन्यांच्या कालावधीत आणखी चार स्त्रियांचे मृतदेह अशाच भयंकर स्थितीत व्हाईटचॅपलमध्ये आढळले होते. त्यामुळे या तीन महिन्यांना “ऑटम ऑफ टे*रर” असे म्हटले जाऊ लागले.



एक नव्हे तर पाच महिलांचा असा भयंकर मृत्यू बघितल्यावर संपूर्ण इंग्लंडमध्ये घबराहट पसरली. सुखवस्तू श्रीमंत इंग्लिश लोकांना आपल्या सुंदर दुनियेबाहेरसुद्धा एक क्रू*र जग आहे याची दखल घ्यावी लागली.

या पाच महिलांना इतक्या क्रू*र पद्धतीने कुणी व का मारले असावे याचा सर्वत्र शोध घेतला जाऊ लागला. श्रीमंत व्हिक्टोरियन सोसायटीपासून ते अगदी इंग्लडची राणी व्हिक्टोरियालासुद्धा ह्या केसविषयी उत्सुकता होती. लंडन शहराच्या लोकांसाठी जॅक द रीपर हा भीतीदायक विषय झाला.

अँटी सेमाइट लोकांनी या खु*नांसाठी पूर्वेकडील ज्यू लोकांना जबाबदार ठरवले. गरीब लोकांनी श्रीमंतांना दोषी ठरवले तर श्रीमंतांनी गरिबांना!  त्या पाच स्त्रियांचा दुर्दैवी मृत्यू हे प्रेससाठी तर खाद्यच ठरले. आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरी दारिद्र्य कमी करण्यासाठी ह्या केसचा वापर केला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

रीपरची केस म्हणजे खरं तर एक विडंबनच होते. जे ब्रिटिश लोक ‘पॅक्स ब्रिटानिका’चा अभिमान बाळगत होते, त्याच ब्रिटनच्या राजधानीत एक माथेफिरू भयानक गुन्हेगार मोकळा फिरत होता आणि कुठलेही सुरक्षा अधिकारी त्याला जेरबंद करू शकत नव्हते.

जितक्या अचानकपणे हे खु*नाचं सत्र सुरु झालं होतं, तितक्याच अचानकपणे पाच भयानक खु*नांनतर तर थांबलंसुद्धा! त्यामुळे हे गूढ आणखीनच वाढले. त्यानंतर जवळजळ १४० वर्षांनंतर जॅक द रीपर हा सर्वात कुप्रसिद्ध आणि चर्चिला गेलेला सिरियल कि*लर आहे.

एकोणिसाव्या शतकात गरीब घरातल्या स्त्रियांचे आयुष्य अत्यंत कठीण होते. बऱ्याच स्त्रिया ह्या अत्यंत कमी पगारावर घरकाम करत असत किंवा मिठाईच्या दुकानांत काम करत असत. त्यांना इतके कमी पैसे मिळत असत की त्यांना घर घेणे शक्यच नव्हते.

त्यामुळे रात्री झोपायला त्यांना व्हाईटचॅपल मधल्या लॉजिंग हाउसेसमध्ये तीन-चार पेन्स देऊन झोपता येत असे. पण रोज रोज इतके पैसे घालवणे त्यांना शक्य होत नसे. त्यामुळे त्यातील बऱ्याच स्त्रिया देहव्यापाराकडे वळल्या होत्या.

लंडनच्या पूर्वेकडील भाग हा वेश्याव्यवसायासाठी कुप्रसिद्ध झाला होता.  याच ठिकाणी रीपरने ठार केलेल्या महिला देहव्यापार करीत असत.

जेव्हा जॅक द रीपर रात्रीच्या अंधारात खू*न करत सुटला होता तेव्हा इतर खु*नीसुद्धा गुन्हे करतच होते.  या सगळ्यांना “व्हाईटचॅपल म*र्डरर्स” असे म्हटले जाऊ लागले. त्यावेळी अशा एकूण ११ गरीब महिला या खु*न्यांच्या कटाला बळी पडल्या.

म्हणजेच तेव्हा गरीब आणि घरकाम करून जगणाऱ्या महिलांची सुरक्षा वाऱ्यावरच होती. त्यांना कुणीही वाली नव्हता. या ११ महिलांपैकी ५ महिलांचे खू*न जॅक द रिपरने केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे खून ऑगस्ट १८८८ ते नोव्हेम्बर १८८८ ह्या कालावधीत झाले.

३१ ऑगस्ट १८८८ च्या पहाटे मेरी ॲन निकोल्सचा मृतदेह व्हाईटचॅपलच्या रस्त्यावर सापडला. ४३ वर्षीय मेरी जिला पॉली देखील म्हटले जात असे हीचा जॅक द रिपरने पहिला बळी घेतला होता.

एका लोहाराची मुलगी असलेली पॉली लहानपणापासूनच गरिबीतच वाढली. नंतर तिचे लग्न झाले व तिला पाच मुले झाली आणि त्यानंतर तिला नवऱ्याने सोडले. त्यामुळे मुलांचे व स्वतःचे पोट भरण्यासाठी तिने घरकाम करणे, देहव्यापार करणे व लहानमोठ्या चोऱ्या करणे असे उद्योग सुरु केले.

मेरीचा खू*न झाल्यानंतर एकाच आठवड्यात ॲनी चॅपमन या ४७ वर्षीय विधवा महिलेचा मृतदेह ८ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता हॅनबरी यार्डमध्ये आढळला.  तिच्याही शरीरावर मेरीप्रमाणेच जखमा होत्या पण तिच्या शरीरातले काही अवयव देखील गायब होते.

सप्टेंबर महिना अखेरीस खु*न्याने ह्याच पद्धतीत एलिझाबेथ स्ट्राईड, वय ४५ आणि कॅथरीन एडोज, वय ४६ या आणखी दोन स्त्रियांना ठार मारले. त्यानंतर ९ नोव्हेम्बर १८८८ रोजी पंचवीस वर्षीय मेरी जेन केली हिचा मृतदेह आढळला.

तिचा मृतदेहसुद्धा अत्यंत वाईट अवस्थेत होता. या सगळ्या स्त्रिया गरीब घरातील असल्याने खु*न्याने अगदी सहज त्यांना ठार मारले कारण बिचाऱ्यांना कुणीच वाली नव्हता.

केसचा तपास करताना स्कॉटलंड यार्ड सुरुवातीपासूनच हबकले होते. जॅक द रीपर बद्दल एक गोष्ट त्यांना नक्की लक्षात आली होती की तो एकटाच काम करतो आणि तो फक्त स्त्रियांना ठार मारतो.

एडमंड रीड नावाच्या एका गुप्तहेराने अशी थेअरी मांडली की या पाचही महिला देहव्यापार करत असत. त्या सगळ्याच गरीब होत्या आणि सगळ्याच एकमेकींच्या घरापासून जवळच्या अंतरावरच राहत असत. 

सगळे खू*न हे पब बंद झाल्यानंतर रात्री उशिरा झाले. तसेच कुणीही या स्त्रियांच्या मदतीसाठी केलेला टाहो ऐकला नाही की त्यांच्यावर वार झाल्यानंतर त्यांचे विव्हळणे ऐकले नाही. इतकी दाट लोकसंख्या असलेल्या या भागात असे घडणे जवळजवळ अशक्य आहे. कुठल्याही स्त्रीच्या शरीरावर प्रतिकार केल्याच्या खुणा आढळल्या नाहीत.

फक्त एकाच व्यक्तीने एकदाच खु*न्याला बघितले होते. ८ सप्टेंबरच्या पहाटे ॲनी चॅपमनला कुणीतरी एका विदेशी व्यक्तीबरोबर बघितले होते आणि त्या व्यक्तीने गडद रंगाची शाल लपेटून घेतली होती.

ॲनी त्या व्यक्तीला पहाटे साडेपाचच्या दरम्यान भेटली असल्याचे सांगितले जाते. आणि त्यानंतर अर्ध्याच तासात तिचा मृतदेह आढळला. तिचे ओरडणे, विव्हळणे कुणीही ऐकले नाही आणि तिच्याही शरीरावर प्रतिकार केल्याची कुठलीही खूण नव्हती.

या सगळ्या घटनांमध्ये एक सारखी गोष्ट होती ती म्हणजे खु*न्याने सुरीचा वापर केला होता आणि त्याने जवळजवळ सारख्याच पद्धतीने त्या स्त्रियांच्या शरीराची विटंबना केली होती.

यातील तीन स्त्रियांच्या शरीरातील अवयवसुद्धा गायब होते. त्यामुळे ही सनसनीखेज बातमी लगेच वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली होती. आणि त्यामुळे लंडनच्या पूर्वेकडील भागात लोकांमध्ये घबराट पसरली.

२७ सप्टेंबर १८८८ रोजी सेंट्रल न्यूज एजन्सी आणि पोलिसांना एक पत्र मिळाले. ते त्याच खु*न्याचे पत्र होते.त्यामुळे लोकांच्या भीतीत आणखी वाढ झाली. त्याने त्या लोकांना चुकीच्या दिशेने तपास केल्याबद्दल टोमणा लगावला होता आणि असे लिहिले होते की ,

““I am down on whores and I shan’t quit ripping them till I do get buckled.” त्यानंतर तीनच दिवसांनी एलिझाबेथ स्ट्राईड आणि कॅथरीन एडोज यांचे मृतदेह आढळले होते.

अनेक लोकांचे असे म्हणणे होते की हे पत्र म्हणजे एक अफवा आहे. किंवा फसवे आहे. पण त्याने जॅक द रीपर म्हणून खाली सही केली होती. त्यानंतर अशी शेकडो पत्रे सापडली. पण ती सगळी फसवी निघाली.

ऑक्टोबर महिन्यात मात्र जे पत्र सापडले ते मात्र खु*न्यानेच पाठवले असण्याची दाट शक्यता आहे कारण त्या पत्राबरोबर त्याने मानवी मूत्रपिंड पाठवले होते जे कदाचित त्यातील एखाद्या महिलेचे असावे.

मेरी जेन केलीचा मृतदेह सापडल्यानंतर डॉक्टर थॉमस बॉण्ड ह्यांना तिच्यावर ऑटोप्सी करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यांनी जो ऑटोप्सीचा रिपोर्ट दिला आहे तो वाचून आपल्या पोटात गोळा येतो.  बॉण्ड यांना मेरी जेन केलीच्या शरीरावर आधीच्या चार महिलांप्रमाणेच असलेल्या जखमा आढळल्या.

खुन्याने त्या महिलांचा चक्क गळा कापला आणि नंतर त्यांची ॲबडॉमिनल कॅव्हिटी कापून कोथळा बाहेर काढला. पोलिसांचा असा अंदाज होता की खु*नी हा डॉक्टर किंवा सर्जन असावा पण बॉण्ड यांनी पोलिसांचे म्हणणे खोडून काढले. त्यांच्या मते सर्जन ज्याप्रकारे शरीरावर कट देतात तसे खु*न्याने केले नव्हते. त्याला किमान खाटीककामाचे ज्ञान देखील नव्हते.

बॉण्ड ह्यांनी खु*न्याच्या मानसिकतेचा अंदाज असा वर्तवला की “खु*न्याची शारीरिक क्षमता खूप जास्त होती आणि तो थंड डोक्याने काम करत होता. कदाचित हा माणूस दिसायला चांगल्या घरातला, मध्यमवयीन व निरुपद्रवी दिसत असावा.”

या केसमध्ये अनेकांवर संशयाची सुई होती. पण कुणाच्या विरुद्ध ठोस पुरावे सापडले नाहीत आणि ही केस बंद झालीच नाही. केसवर अनेक सिनेमे आणि टीव्ही मालिका आल्या.

लेखकांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. ह्या मिस्ट्रीला “रिपरॉलॉजी” असे नाव मिळाले. “रिपरॉलॉजी” म्हणजे म*र्डर केसबद्दलची रिसर्च आणि थिअरीचा अभ्यास होय. अनेकांनी तर असाही तर्क मांडला की जॅक द रीपर हा मनुष्य नसून प्राणिसंग्रहालयातून सुटलेले एक माकड (गोरिला) आहे.

या केसमुळे गरिबांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आला आणि उचलून धरला गेला. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनीसुद्धा स्टार वर्तमानपत्रात लिहिले की या केसमुळे हे तरी मान्य झाले की श्रीमंत लोक गरिबांना हीन वागणूक देतात. राजकारणी लोकांपेक्षा खु*न्याने त्यांची समस्या आणि दुःखे जगापुढे आणली. ते  पुढे म्हणतात ,

“Allow me to make a comment on the success of the Whitechapel mu*rd*erer in calling attention for a moment to the social question . . . The one argument that touches your lady and gentleman, is the knife.”

शेवटपर्यंत न सापडलेला हा खु*नी, आजपर्यंत रहस्य म्हणून समोर उभा आहे…


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: MURDERER
ShareTweet
Previous Post

या कीटकांनी आता उत्क्रांतीच्या रेट्यात थेट कीटकनाशकांना ठेंगा दाखवणं शिकून घेतलंय!

Next Post

या नागपूरच्या पत्रकाराने स्पेनच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेतला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या नागपूरच्या पत्रकाराने स्पेनच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेतला होता

स्वतःच्या अंधत्वावर मात करून शेकडो अंध मुलींची आई बनलीय 'मुक्ताबेन'!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.