The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रीक दंतकथा – या बारा अशक्यप्राय कामांमुळे हर्क्युलस अजरामर झाला

by द पोस्टमन टीम
24 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


कोणताही संशोधनात्मक अभ्यास शेवटी नकळत एका गोष्टीवर येऊन थांबतो, चांगलं-वाईट, शुभ-अशुभ, देव-दानव या सर्वांना मिळूनच हे विश्व निर्माण झालंय. पण या बहुरूपी विश्वात मनुष्य हा एकमेव अद्वितीय प्राणी आहे ज्यात वर सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी असतात.

भारतीय तत्वज्ञानात जे शड्-रिपू सांगितले जातात, त्या शत्रूंचे जो जास्त चोचले पुरवतो तो मानव नकळत दानवत्वाकडे वळला जातो, आणि याच शत्रुंना जो हरवून पुढे जातो तो नकळत देवत्वाकडे वळला जातो. संत-महंत, योगी अशा लोकांनी या शत्रूंवर विजय मिळवला म्हणूनच ते पूज्य ठरतात. त्या प्रत्येक संतांचे, योग्यांचे रस्ते वेगवेगळे असतील, पण मुक्काम मात्र एकच!

“एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति” अशीच काहीशी ही भानगड! आपापला भोवताल, समाजमन, राजकीय स्थिती, हवामान आणि अशाच अनेक घटकांमुळे हे रस्ते वेगवेगळे होत जात असतील, पण त्यांचा मुक्काम एकच! असाच एक रस्ता आपण आज अनुभवणार आहोत.

माणूस पूर्वजांच्या पुण्याईवर जगतो, हे वाक्य काही गैर नाही. होय! आपण पूर्वजांच्याच पुण्याईवर जगतो, त्यांनी केलेलं काम, पराक्रम, मिळवलेले विजय, केलेलं संशोधन यांमधूनच पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळते. यासाठीच इतिहास, पुरातत्वशास्त्र वगैरे विषय अस्तित्वात आहेत. आपल्या पूर्वजांनाही ही गोष्ट तंतोतंत माहीत असावी, म्हणूनच आपल्याकडे विविध प्रकारची पुराणं आहेत, आता या पौराणिक कथा या खऱ्या की खोट्या हा चर्चेचा विषय ठरेल, पण त्यातून शिकता येण्यासारखं आणि प्रेरणात्मक असं बरंच काही आहे.



अशाच ग्रीक आणि रोमन पौराणिक कथा आजही उपलब्ध आहेत. या कथांमधील एक प्रसिद्ध आसामी म्हणजे हरक्युलस!

हरक्युलस किंवा हेराक्लीझ हा ग्रीक पुराणकथांमधील एक प्रसिद्ध आणि थोर ग्रेको-रोमन वीरपुरूष! हरक्युलस हा ऑलीम्पस डोंगरांवरील देवांचा राजा अशी मान्यता प्राप्त असलेल्या झ्युस आणि मानवी स्री, पर्सियसची नात राजकन्या असलेली अल्कमेनी यांचा पुत्र होता.

झ्युस हा विषयसुखेच्छेच्या हेतूने नेहमीच एखाद्या स्त्रीच्या मागे असे. आपल्या दैवी सामर्थ्याने त्याने अल्कमेनीच्या पतीचं रूप घेऊन, एकप्रकारे अनैतिकरित्या हरक्युलसला जन्म दिला होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

झ्युसचा पुत्र असल्याने हरक्युलसला जन्मत:च अर्ध-दैवत्वाबरोबरच प्रचंड सामर्थ्य प्राप्त झालं होतं. हरक्युलसने त्याच्या जीवनकाळात अनेक अचाट कृत्यं केली. मृत्यूशी कुस्ती करणं, दोन वेळा मृतात्म्यांच्या विश्वात प्रवास करून येणं त्याच्या अशा अनेक चमत्कारिक कथा ग्रीस आणि कालांतराने रोममध्येही सांगितल्या जाऊ लागल्या.

पण, “जया अंगी मोठेपण तया यातना कठीण” या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे हरक्युलसनेही अनेक यातना भोगल्या. त्याच्या जन्मापासूनच जणू त्याचं आयुष्य खडतर होतं आणि त्याचे इतरांबरोबरचे संबंधही चांगले नव्हते.

झ्युसची धर्मपत्नी हेरामुळे हरक्युलसला या यातनांचा आणि संकटांचा सामना करावा लागला, हरक्युलस हा झ्युसचा अनैतिक पुत्र आहे हे ज्ञात असल्याने हेराने त्याला संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. हेराचा राग शांत करण्यासाठी हरक्युलसचे नामकरण हेराक्लीझ असंही करण्यात आलं, म्हणजेच “हेराची प्रतिष्ठा”, पण हा प्रयत्न विफल ठरला. 

हरक्युलसला दैवीशक्ती प्राप्त असूनही त्याला अनेक निराशाजनक घटनांचा सामना करावा लागला, त्याने अनेक वाईट दिवस पाहिले, इतकंच काय, दुसऱ्यांच्या कट-कारस्थानांमुळे त्याचा मृत्यू व्हावा, यापेक्षा अधिक वाईट शोकांतिका काय असू शकते!

वेळ पडल्यास हाल-अपेष्टा सहन करण्याची क्षमता आणि प्रचंड आत्मबल या गोष्टीमुळे लोकांच्या मनात त्याच्याबद्दल पूज्यभाव निर्माण झाला. हरक्युलस प्रचंड गोंधळाच्या परिस्थितीतही स्थिरत्वाचं प्रतीक बनून लोकांच्या समोर आदर्श बनला.

वर सांगितलेल्या कारणांमुळे हेरा सुरूवातीपासूनच हरक्युलसचा तिरस्कार करीत असे. हरक्युलसच्या जन्मापासूनच हेराने त्याला ठार करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचा जन्म होऊ नये या हेतूने हेराने त्याच्या जन्मस्थानी दोन चेटकीणी पाठवल्या, पण अल्कमिनीच्या नोकर मंडळींनी धूर्तपणे त्या चेटकीणींना दुसऱ्या खोलीत पाठवलं.

त्यानंतर हेराने त्याला मारण्यासाठी पाळण्यात दोन विषारी सापही सोडले, पण हरक्युलसने आपल्या सामर्थ्याने दोन्ही सापांचा गळा आवळून ठार केलं. आपल्या स्वार्थासाठी आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याचं भयावह वास्तव यातून दिसून येतं.

हेराच्या घातक कृत्यांपासून वाचवण्यासाठी अल्कमिनने आपल्या बाळाला जंगलात सोडून दिलं. त्यानंतर अथेना नावाच्या दैवी स्त्रीला ते बाळ जंगलात सापडलं, तिने त्या एकट्या, असहाय्य बाळाला हेराकडे आणलं, आणि त्याला सकस आहारासह पालनपोषणाची गरज असल्याचा दावा केला. हेरानेही त्या बाळाचा स्वीकार केला. हेरा हरक्यूलसला दूध पाजत असताना ते दूध सांडून पसरलं आणि अशी झाली आकाशगंगेची, म्हणजेच ‘मिल्की वे’ची निर्मिती, अशी मान्यता आहे!

“आता तू स्वतः या बाळाची काळजी घे”, असं सांगत हेराने ते बाळ पुन्हा अथेनाकडे दिलं. पुढे हरक्युलसला थेबेस येथील अँम्फिट्रायनच्या दरबारात आणलं गेलं. एव्हाना हरक्युलसला त्याच्या अतुलनीय ताकदींचा अंदाज आला नव्हता. दरबारात त्याला राज्यातील विद्वान शिक्षक लाभले. या शिक्षकांनी त्याला कुस्ती, घोडसवारी, धनुर्विद्या, रथ चालवणं, सारंगी-वादन आणि संगीत अशा अनेक गोष्टी शिकवल्या.

एके दिवशी एका वाद-विवादाच्या प्रसंगी हरक्युलसने आपल्या लिनस नावाच्या संगीत शिक्षकाला सारंगी या वाद्याच्या सहाय्याने ठार केले.

थेबन सैन्याने हे मिनियन्सच्या वाद्यपथकासमोर हार मानली ही बाब हरक्युलसला अन्यायकारक वाटली. हरक्युलसच्या नेतृत्वाखालील सैन्याने मिनियन्सच्या सैन्याला रणांगणात धूळ चारली, आणि थेबन सैन्याने हारलेल्या भू-भागावर पुन्हा त्यांचं राज्य प्रस्थापित झालं.

कृतज्ञता म्हणून थेबेसचा राजा क्रिऑन याने आपल्या मेगारा या मुलीचा विवाह हरक्युलसशी लावून दिला. यानंतर हेराने अतिशय धूर्तपणे हरक्युलसचा बुद्धिभ्रंश घडवून आणला. या गैरसमज आणि गोंधळात त्याने आपली पत्नी मेगारा आणि तीन मुलांची ह*त्या केली. डेल्फी येथील पुजाऱ्याने या गुन्ह्याचं प्रायश्चित्त म्हणून हरक्युलसला टायरिअसच्या युरेस्थियस या राजाची बारा वर्षे सेवा करावी लागेल असं सांगितलं.

पुढे युरेस्थियसने हरक्युलसला प्रचंड अवघड आणि अचाट अशी बारा कामे करायला सांगितली. हरक्युलसने आपल्या सामर्थ्याने आणि शौर्याने ती कामे पूर्णही केली:

  1. हरक्युलसने नेमिअन या सिंहाला ठार मारले. हा सिंह कोणत्याही शस्त्राने मरणारा नव्हता. एका गुहेमध्ये फसवून या सिंहाला हरक्युलसने ठार केले. या सिंहाचे कातडे विजयाचे प्रतीक म्हणून हरक्युलस वस्त्राप्रमाणे अंगावर घेत असे व यामुळे तो अजिंक्य झाला होता.
  2. लेर्नाच्या नऊ डोकी असलेल्या हायड्रा नावाच्या भयंकर सापाला हरक्युलसने आयओलाउस या जवळच्या भावाच्या मदतीने ठार मारले. याची डोकी कापल्यानंतर ती लगेच वाढत असत. त्यामुळे हरक्युलसने डोके छाटल्यावर आयओलाउस अग्नीने दाहकर्म करून मान सीलबंद करीत असे. यामुळे डोके परत वाढण्यास अटकाव होत असे. हायड्राला एक अमर डोके होते. ते हरक्युलसने छाटून दगडाखाली पुरले. हायड्राला ठार केल्यावर हरक्युलसने हायड्राचे रक्त आपले बाण विषारी करण्यासाठी वापरले.
  3. आर्काडियाच्या झुकांडी देऊन पळून जाणाऱ्या काळविटाला हरक्युलसने अपहरण करून कैद केले. आर्टेमिसला पूज्य असलेल्या या काळविटाचे खूर पितळी, तर मृगशृंगे सोन्याची होती. ब्रिटिश संग्रहालयात इसवी सन पूर्व ५४०चे चंबूसारखे एक पात्र आहे. त्यावर सदर हरणाची मृगशृंगे तोडणारा हरक्युलस दाखविला असून त्याच्या दोन बाजूंना अथेना व आर्टेमिस दाखविल्या आहेत.
  4. एरिमँथस डोंगरावरील अक्राळविक्राळ रानडुक्कर हरक्युलसने पकडले.
  5. एलिसच्या ऑगिअस राजाचे जनावरांचे तबेले हरक्युलसने एका दिवसात धुऊन त्यांचे शुद्धीकरण केले. यासाठी त्याने अल्फीअस व पेनीअस या नद्यांच्या पाण्याचा प्रवाह वळवून तो प्रचंड जोराने त्या तबेल्यांतून नेला. या तबेल्यांमुळे घातक साथीचे रोग पसरत असत.
  6. स्टायंफलस सरोवरालगतच्या वनामधील हिंस्त्र पक्ष्यांचा थवा हरक्युलसने शिकार करून नष्ट केला. या राक्षसी न*रभ*क्षक पक्ष्यांना बाणासारखी पिसे होती, ते पिसं फेकून न*रभ*क्षक पक्षी लोकांना मारीत असत. हे पक्षी भयानक करकोचा व शहामृग यांचा संयोग झाल्यासारखे होते.
  7. क्रीट बेटावर द*हश*त निर्माण करणाऱ्या मिनॉस राजाचा मस्तवाल बैल हरक्युलसने पकडला. हा बैल मुखातून ज्वाला ओकीत असे.
  8. हरक्युलसने बिस्टोनीस राजाच्या थ्रेस येथील न*रभ*क्षक घोड्या पकडल्या. त्या यूरिस्थेनीसला आणल्या व त्याने त्या माणसाळविल्या.
  9. हरक्युलसने ॲमेझॉन्सच्या हिप्पोलाइट राणीचा पराभव करून तिचा कमरपट्टा मिळविला.
  10. प्राचीन जगाच्या अगदी पश्चिम सीमेपर्यंत जाऊन हरक्युलसने एरिथिइआ बेटावर सत्ता गाजविणाऱ्या तीन देह असलेल्या गेरिऑन या भयंकर राक्षसाचे पशुधन पकडले. या राक्षसाला तीन धडे, सहा हात व सहा डोकी होती.
  11. प्राचीन जगाच्या अंतिम टोकाशी असलेल्या हेस्पराइड्स बागेतील जीवनवृक्षावरील सोन्याची सफरचंदे हरक्युलसने चोरून आणली. या कामात त्याला ॲटलासने मदत केली, तेव्हा ॲटलासच्या खांद्यावरील पृथ्वी हरक्युलसने आपल्या खांद्यावर घेतली होती. न झोपणारा लेडॉन व ॲटलास राक्षस हे या बागेचे रक्षक होते.
  12. हरक्युलस मृतात्म्यांच्या जगात उतरला व तो सेर्बेरस या तीन डोक्यांच्या रखवालदार कुत्र्याला वरील जगात घेऊन आला.

या बारा कामांमुळेच बारा राशी तयार झाल्या अशीही आख्यायिका सांगितली जाते.

बारा साहसे पूर्ण केल्यावर काही काळाने हरक्युलसने राजकन्या दीआनिरा हिच्याशी विवाह केला. नेसस या नराश्वाने दीआनिरावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, म्हणून हरक्युलसने त्याला विषारी बाण मारून ठार केलं. मरणपंथाला लागलेल्या नेससने दीआनिराला सांगितले की, माझे रक्त तू साठवून ठेव; कारण या रक्ताने माखलेले कपडे घातल्यावर हरक्युलस तिच्यावर शाश्वत प्रेम करील.

यानंतर अनेक वर्षांनी हरक्युलस ओकालियाच्या युरिटस राजाच्या आयोले या कन्येच्या प्रेमात पडला, मात्र दीआनिराला आयोले ही आपली प्रतिस्पर्धी होईल असे वाटले. म्हणून तिने नेससच्या रक्ताने माखलेला झगा हरक्युलसला पाठविला. मात्र हे रक्त हरक्युलसच्या बाणामुळे विषारी झाले होते व त्यामुळे हरक्युलस मृत्यू पावला.

या विषाने त्याच्या अंगाचा इतका दाह झाला की, त्याने स्वतःला माउंट ओएटा (ग्रीक ओइटा) येथे सरणावर ठेवायला सांगितले. त्याचा पार्थिव भाग नष्ट झाला व दैवी भाग स्वर्गात गेला. तेथे तो देवाचे घर असलेल्या ऑलिंपिसमध्ये जाऊन देवरूप झाला.

तो हरक्युलस तारकासमूहाच्या रूपात दिसतो, असेही मानतात. स्वर्गात त्याने हेराशी समेट करून हेबेशी (वरुण देवता) विवाह केला, असेही मानले जाते.

आपल्या शौर्य आणि धैर्याच्या जोरावर त्याने अनेक अशक्यप्राय कामं पार पाडली, त्यामुळेच आजही कठीण कामांना इंग्रजीत “हरक्युलियन टास्क” किंवा “लेबर” अशी विशेषणं लावली जातात.

आजच्या ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवातही हरक्युलसने केली अशीही कथा आहे.

संकटातून सोडवणारा देव म्हणूनही आज युरोपातील कैक भागात त्याची पूजा केली जाते. कितीही कठीण काम असलं तरी मानवाने आपली जबाबदारी झटकून टाकू नये हीच मोठी शिकवण हरक्युलस आपल्याला देऊन जातो.

तत्वज्ञानातील साम्य अशा विविध आणि बहुरंगी कथा-दंतकथांतून प्रकट होत राहतं. असेच तत्वज्ञानाचे विचार या न त्या रूपात माणसाने जोपासले आणि खऱ्या अर्थाने मनुष्यपण जपले..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

फ्रान्समध्ये झालेल्या एका कोर्ट मार्शलमुळे इज्राइलच्या निर्मितीची सुरुवात झाली होती..!

Next Post

डुप्लिकेट वस्तू बनवणाऱ्या चीनने तयार केलाय चक्क कृत्रिम सूर्य, पाहा खासियत

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

डुप्लिकेट वस्तू बनवणाऱ्या चीनने तयार केलाय चक्क कृत्रिम सूर्य, पाहा खासियत

रॉयल एअर फोर्सच्या या ह*ल्ल्याने हि*टल*रच्या कॉन्फिडन्सला धक्का दिला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.