The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बॉलिवूडच्या चित्रपटांना वैतागला असाल तर हे ‘पैसावसुल’ दक्षिणात्य चित्रपट तुम्ही नक्की पहा !

by सोमेश सहाने
4 July 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


रात्री झोपताना तुम्ही फोन बघता तेव्हा काहीतरी हलकंफुलकं बघायचं असतं. कधीतरी तुम्ही एखादा चांगला दाक्षिणात्य सिनेमा बघितलेला असतो पण म्हणून त्याच हिरोचा दुसरा एखादा सिनेमा बघायला घेता आणि तो प्रचंड बोर असतो.

आज आम्ही अशा चांगल्या, मजेदार दाक्षिणात्य सिनेमांची यादी बनवली आहे. यातील कुठलाच सिनेमा मिस करू नये असा आहे. यातले काही युट्युबवर तर काही ॲमेझॉन, नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत.

१. सिंघम 3

सुरीयाच्या चित्रपटामुळे हिरोचा स्टार झाला तो चित्रपट म्हणजे सिंघम. अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या रिमेकपेक्षा मूळ सिनेमा छान वाटतो. याच्या सिक्वलमध्ये तर गतिमान कथा आणि प्रत्येक सीनसोबत वाढत जाणारी उत्कंठा यामुळे निव्वळ कमाल झाले आहेत. सिंघम 2 मध्ये चक्क आपला हिरो आफ्रिकेत जाऊन “डॅनी” या ड्र*ग डीलरला पकडून आणतो.

सिंघम 3 मध्ये तर ही कथा अजूनच क्लिष्ट आणि रंजक होते.



 सिंघमला येणारा राग शोभून दिसेल असाच अभिनय करणं सुरीयाला चांगलं यश जमलंय.

यात एवढे ट्विस्ट येतात की दर दहा मिनिटाला बदलत असतं. यामुळे सिनेमा जराही बोर होत नाही.

अनुष्का शेट्टीचे सिन कमी आहेत, पण तरीही तिचा प्रेझेन्स सुरीयाच्या पात्राला पूर्ण करतो. यातल्या गतीमुळे हे सगळंच खोटं वाटतं, पण त्यामुळं मनोरंजन कमी होत नाही, फायटिंग सीनला असणाऱ्या संदर्भामुळे मारधाड पण बघू वाटते. हा सिनेमा हिंदीत युट्युबवर उपलब्ध आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

2) सुराराई पॉटरु (Sorarai Pottru)

सिंघम फेम सुरीया आता त्याच्या कारकिर्दीत असं काय करेल जे या आधी केलं नव्हतं? कदाचित याचंच उत्तर शोधत असताना त्याने या सिनेमासाठी हो म्हटलं असावं. एकही फायटिंग सिन नसणारा सिनेमा एक एवढा मोठा स्टार करतोय म्हणून याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. हा सिनेमा ‘सिम्प्लि फ्लाय’ या कंपनीच्या खऱ्या खुऱ्या संघर्षावर बेतलेला आहे.

हा चित्रपट करून सुरीयाने हे सिद्ध करून दिलं की तो फक्त स्टारडम असलेला सुपरस्टारच नाहीये तर एक कसलेला नट आहे. त्यात अपर्णा बालमुरली हिने त्याला दिलेली साथ म्हणजे निव्वळ पर्वणी. सुरीयाच्या भारावून टाकणाऱ्या स्क्रीन प्रेजेंससमोर तिचं काम पण आपल्याला चकित करतं.

आपल्या कामांच्या प्रति प्रचंड पॅशन असलेल्या दोघांचा संसार, रोमान्ससुद्धा तितकाच पॅशनेट दाखविणे हा खूप वाखाणण्याजोगा कलात्मक निर्णय होता.

त्यात भर घालायला त्यांचं एक गाणं आहे, ज्यात ते पॅशन दाखवायला त्यांनी एका खास नृत्य प्रकाराचा वापर केला आहे. त्या गाण्याचं चित्रकरण आणि नृत्य यामुळं सिनेमाला एक छान हाय पॉईंट मिळतो.

‘भाग मिल्खा भाग’च्या बरोबरीने प्रेक्षकांना सगळ्यात जास्त आवडलेला बायोपिक म्हणून हा सिनेमा आठवणीत राहील. हा सिनेमा हिंदीत नाहीये पण तरी बघायला मज्जा येतेच, अमेझॉन प्राईम व्हिडीओवर तुम्ही हा सिनेमा बघू शकता.

3) रटसासन

सिरीयल कि*लरचा आधार घेऊन एक छान सायको थ्रिलर प्रकारचा सिनेमा भारतात बनण्याच्या जवळपास सगळ्याच आशा चित्रपटप्रेमींनी सोडून दिल्या आहेत. इंग्रजीत सायलेन्स ऑफ द लँब्स, सेव्हन अशी बरीच उदाहरण आहेत. हिंदीत ‘द स्टोन मॅन मर्ड*रर’ एक फार प्रसिद्ध नसलेला सिनेमा आहे, शिवाय अनुराग कश्यप विकी कौशल आणि नवाजभाई असलेला “रमण राघव 2.0” हा ही एक या प्रकारचा दर्जेदार सिनेमा आहे.

पण रटसासन या दाक्षिणात्य सिनेमात मनोरंजन आणि थ्रिलचं एक सुंदर कॉम्बिनेशन आहे. ज्यामुळे हा सिनेमा आता लिजेंडरी झालाय. लॉकडाऊनमध्ये जास्त लोकांचं लक्ष याकडे गेलं आणि त्यातून युट्युबवर याचे व्ह्यूज वाढले.

एक पोलीस अधिकारी किशोरवयीन मुलींच्या खु*नाची चौकशी करत असताना या सिरीयल कि*लरच्या रस्त्यात येतो. तिथून पुढे बारीक सारीक पुराव्यांचा तपास करत या कि*लरपर्यंत पोहोचताना पोलिसांची होणारी फजिती आणि त्या कि*लरच्या भूतकाळाबद्दल उलगडत जाणाऱ्या विचित्र गोष्टी यामुळे सिनेमा आपल्याला खिळवून ठेवतो.

यातले ॲक्शन सीन्स, गुन्हे हे खूप वास्तवादर्शी दाखवले आहेत यामुळे ही गोष्ट काल्पनिक वाटत नाही. उलगडत जाणारं कथानक, सतत येणारी धक्कादायक वळणं यामुळे हा सिनेमा या उंचीला आहे. जर या प्रकारात रस असेल तर हा सिनेमा युट्युबवर नक्की बघा.

4) वाडा चेन्नई

धनुष आणि दिग्दर्शक वेट्रीमरन या जोडीने बनवलेले असुरन, विसरनाई हे सिनेमे प्रचंड गाजले, अगदी ऑस्करला नामांकन मिळविण्याच्या स्पर्धेपर्यंत! पण त्यांचा वाडा चेन्नई हा सिनेमा फक्त समीक्षकांनाच नाही तर सामान्य प्रेक्षकांनाही खूप आवडला.

एका झोपडपट्टीमधल्या लोकांमध्ये काम करणारी एक गॅंग आणि त्यांच्या आसपासचं गुन्हेगारी विश्व या अत्यंत छोट्या जगातली ही भयंकर रंजक गोष्ट.

यातलं प्रत्येक पात्र स्वतःच्या नजरेत हिरो असतं, प्रत्येकजण आहे जास्तीत जास्त ताकद मिळवायला झगडत असतो.

वरवर दिसणारी शांतता, पण आत चालणाऱ्या खलबती, कट, संथ हालचाली यातून काहीतरी भयंकर होणार असा सस्पेन्स पूर्णवेळ आपल्या डोक्यात फिरत असतो.

भल्या माणसाचं काम पुढे सुरू ठेवण्याची संधी, तशी इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला असते, आणि हिम्मत करणारा ती मिळवू देखील शकतो, असा या कथेचा सार सांगता येईल. पण कथेची ठेवण ही अत्यंत पॉवर गेम, फसवा फसवी, विनोदी वाटणारा झोपडपट्टीमधला रोमान्स आणि गरिबीतील लोकजीवन अशी आहे. कथेतील पॉवर सेंटर्स अनेकदा बदलतात, अनपेक्षित पात्र समोर येतात, यातून अत्यंत गुंतागुंतीचा पण दर्जेदार सिनेमा आपल्या वाट्याला येतो. गॅंग्स ऑफ वासेपुरनंतर असा गॅंग वॉ*र प्रकारातला वाडा चेन्नई हा सर्वोत्तम सिनेमा असेल. हा सिनेमा युट्युबवर हिंदीत उपलब्ध आहेत.

5) आला वैकुंटपूरमालु

आला वैकुंटपुरम या चित्रपाटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. २६२ करोड रुपये कमवून हा सिनेमा बाहुबलीनंतर सर्वांत जास्त पैसे कमावणारा दाक्षिणात्य सिनेमा ठरलाय. त्यातही हिंदी व्हर्जन नसताना सर्वात जास्त कमाई करण्याच्या यादीत हा सर्वोच्च स्थानी आहे. या आकड्यांवरूनच कळतंय की प्रेक्षकांना हा सिनेमा किती आवडतोय.

अल्लू अर्जुनने एव्हाना ॲक्शनचे सगळे प्रकार दाखवून झालेत तरीही त्याच टिपिकल मारधाड-कॉमेडी-फॅमिली ड्रामा-विनोदी रोमान्स प्रकारचा अजून एक सिनेमा बनवून एवढं मोठं यश मिळवणं हे खरंतर खूपच धाडसी पाऊल होतं. पण हे काही उगाच भाग्याची साथ होती म्हणून झालं नाही.

पटकथेवर बारकाईने काम करून ठराविक अंतराने ट्विस्ट, विनोद, फायटिंग आणि त्यासोबत उलगडत जाणारी कथा या सगळ्यात चांगलीच कसरत केली आहे. कथा शेवटाकडे जाते तोपर्यंत यातलं प्रत्येक पात्र त्याच्या त्याच्या कथेतल्या एका हाय पॉइंटवर असतं, प्रत्येक पात्राचं ओझं जड जड होत जाऊन शेवट त्यांना हलकं करतो. यामुळे प्रेक्षकांची शेवटाकडून असणारी अपेक्षा फक्त हिरोच नाही तर सगळेच पात्र पूर्ण करता.

ॲक्शन सीन्सच्या आधी तयार होणाऱ्या वातावरणात अनेक सिनेमॅटिक प्रयोग केले आहेत.

जसं की एका मीटिंगमध्ये काही जागी फ्रेम फ्रिज होते, लोकप्रिय तेलगू गाणे लागतात आणि त्यात खूपच स्लो मोशनमध्ये मारधाड होत असताना एक रँडम पात्र हिरोशी बोलत असतं. अगदी रेड सुटमध्ये मारामारी करत असताना हे सगळं आपल्याला दर्जाहीन विनोदासारखं वाटण्यापेक्षा प्रयोगशील सिनेमासारखं वाटायला लागतं. “सिंबा”मध्ये वाटलं होतं तसंच. असा हा सिनेमा अत्यंत मनोरंजक आहे.

याचं हिंदी डबिंग झालं नाही याचं एक कारण असं वाटतं की यातला मेन इफेक्ट निघून गेला असता आणि फक्तच संवाद राहिले असते, तरी तेलगूमध्ये नेटफलिक्सवर हा बघताना भाषेचा अडथळा जाणवत नाही. यातील लिजेंडरी ब्राम्हनंदमची एन्ट्री तर अजिबात मिस नका करू.

विनोदी मारधाडीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दाक्षिणात्य सिनेमात बॉलिवूडला लाजवतील असे कित्येक दर्जेदार आणि मनोरंजक सिनेमे आहेत. फक्त त्यातले योग्य ते निवडून बघणं यासाठी एक लिस्ट आवश्यक आहे, नाहीतर “फायटिंगवाले साऊथ इंडियन पिच्चर” कशाला बघायचे म्हणून तुम्ही खूप चांगल्या चांगल्या सिनेमांना मुकाल.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
 फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जेव्हा अलवरच्या राजाने आलिशान रोल्स रॉइसचा वापर कचरा उचलण्यासाठी केला होता

Next Post

युगांडाच्या विमानतळावर घुसून मोसादने आतं*कवाद्यांचा खा*त्मा केला होता!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

युगांडाच्या विमानतळावर घुसून मोसादने आतं*कवाद्यांचा खा*त्मा केला होता!

बालपणी अनौरस आपत्य म्हणून हिणवला गेलेला विल्यम इंग्लंडचा सम्राट बनला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.