The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सकाळी उपाशी पोटी पाणी पिण्याचे फायदे वाचा आणि ही सवय आजच लावून घ्या

by द पोस्टमन टीम
3 August 2024
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भर उन्हातून घरात आल्या आल्या सगळ्यांची पहिली मागणी असते, “मस्त थंडगार पाणी दे प्यायला!” पाणी प्यायल्यावर कसं एकदम शांत शांत वाटतं. आता, तुम्ही कोणाला पण विचारा-आपण पाणी केव्हा पितो? उत्तर काय मिळेल? साहजिकच, तहान लागल्यावर, जेवताना किंवा जेवण झाल्यावर, ठसका लागल्यावर, वगैरे वगैरे.

नेहमी आपल्याला डॉक्टर पण सांगतात की जास्तीत जास्त पाणी प्या! कारण आपल्या शरीरात ७०% पाणीच असतं. त्यामुळे आपला “वॉटर इनटेक” जास्त हवा. काही लोक मोजून एवढे लिटर पाणी पितातच. तुम्ही बघितलं असेल कोणी कोणी सकाळी उठून रिकाम्या पोटी गरम पाणी आणि त्यात लिंबू वगैरे पिळून ते पाणी पितात. त्याचे काय काय फायदे असतात म्हणे.

पण सकाळी उपाशी पोटी पाणी पिण्याचे खरंच फायदे असतात बरं का! काय? तेच आज आपण या लेखात पाहणार आहोत.

पोटाच्या विकारांना टाटा-बाय बाय!

सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्या पोटाला होतो. नियमितपणे तुम्ही सकाळी उपाशी पोटी पाणी पित असाल तर तुम्हाला बद्धकोष्ठाचा त्रास होत नाही. एवढंच नाही तर पोटसुद्धा साफ राहते.



सकाळी उठून किमान २ पेले पाणी प्यायलाच पाहिजे. जेणेकरून पोट निरोगी राहायला मदत होईल. परिणामी रक्त शुद्ध होऊन त्वचा पण चमकेल.

मेटाबॉलिजम सक्रिय करण्यास मदत 

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिजम चांगलं ठेवण्यास मदत होते. आपली पाचनक्रिया पण चांगली होते. उपाशीपोटी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो आणि पचनक्रिया फास्ट होते, अन्न व्यवस्थित पचतं. ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. म्हणूनच लोक सकाळी उठून सगळ्यात पहिले गरम पाणी पितात.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत 

वर वाचलं की वजन कमी करण्यासाठी आणि पोटाच्या विकारांसाठी उपाशीपोटी पाणी पिणं लाभदायक ठरतं. पण एवढाच नाहीये याचा फायदा. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही याचा फायदा होतो. रोग प्रतिकारशक्ती म्हणजे काय? तर, शरीरात होणाऱ्या काही इन्फेक्शन्सपासून वगैरे लढण्यास आपल्याला शरीराला लागणारी मदत म्हणजे ‘इम्युनिटी सिस्टम’.

सकाळी अनाशेपोटी, उठल्या-उठल्या पाणी प्यायल्याने काही विषारी तत्त्व असतील तर बाहेर पडून जातात आणि परिणामतः शरीर हेल्दी राहण्यास मदत होते. तुम्ही करून बघा, तुम्हाला पण निश्चितच फायदा होईल.

मेंदूला ऑक्सिजन मिळण्यास मदत 

सकाळी उठून पाणी पिणे, एवढा छोटासा उपाय तुम्हाला कितीतरी फायदे देतो. असे केल्याने मेंदूला व्यवस्थित ऑक्सिजन मिळण्यास होते. ऑक्सिजन व्यवस्थित मिळालं की आपण दिवसभर फ्रेश आणि तणावमुक्त राहतो. तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास असेल तर दर थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यायल्यास मेंदूशी संबंधित स्नायूंना तणावमुक्त होण्यास मदत मिळते. कारण अनेकदा पाणी कमी पिण्यामुळे स्ट्रेस आणि त्यासंबंधित आजार होऊ शकतात.

त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत 

कित्येक मुली (काही मुलं सुद्धा) आपली त्वचा तजेलदार राहावी यासाठी हजारो रुपये खर्च करतात. पण त्यांना हे माहितीच नसतं की तुमची तब्येत चांगली राहिली, शरीरात पाणी योग्य प्रमाणात असलं तर त्वचा आपोआप तजेलदार राहते.

उपाशी पोटी पाणी प्यायल्याने शरीर साफ होतं. जे काही टॉक्झिक केमिकल्स वगैरे असतात ते निघून जातात. परिणामी त्यांच्यामुळे जे डाग, पिंपल्स वगैरे होतात ते होत नाही. त्वचा तजेलदार होते. त्यामुळे एवढे महागडे उपाय करण्यापेक्षा रोज सकाळी उठून उपाशीपोटी पाणी पिण्याची सवय कधीही चांगली.

जापानी मेडिकल असोसिएशनने देखील उपाशी पोटी पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी उपाशी पोटी पाणी प्यायल्याने डोकेदुखी, अंगदुखी, हृदयविकार, छातीत धडधड होणे, एपिलेप्सी, स्थूलपणा, दमा, टीबी, किडनीचे विकार, पोटाचे विकार, कॅन्सर, नाक-कान-घसा यांच्याशी संबंधित आजार, या सर्वांच्या उपचारात मदत होते.

एवढंच  नाही तर, जर तुम्हाला खूप सुस्त वाटत असेल तर त्यासाठीसुद्धा पाणी प्यायल्याने मदत होते. कारण, पाणी प्यायल्याने रक्तातील रेड ब्लड सेल्सचं प्रमाण लवकर वाढतं आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाही. परिणामतः, तुमची एनर्जी लेव्हल कमी होत नाही.

सकाळी फक्त २-३ पेले पाणी पिण्याचे एवढे फायदे असतात तर मग आजपासूनच ही सवय लावायला काय हरकत आहे?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या माणसाचा IQ न्यूटनपेक्षा जास्त आहे, पण अचिव्हमेंट्स त्याच्या निम्म्याही नाही

Next Post

हा विजयस्तंभ शेकडो वर्षांच्या पावसाने गंजला नाही की नादीरशहाच्या तोफांनी भंगला नाही

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
Next Post

हा विजयस्तंभ शेकडो वर्षांच्या पावसाने गंजला नाही की नादीरशहाच्या तोफांनी भंगला नाही

भटकंती - प्राचीन भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना 'हवा महल'

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.