The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या कारणामुळे उभारण्यात आली होती जगातील पहिली रक्तपेढी !

by द पोस्टमन टीम
13 June 2024
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आज जागतिक रक्तदाता दिवस. वेगवेगळ्या संस्था रक्तदानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत कार्यरत असतात. आज लोकही स्वयंस्फूर्तीने रक्तदान करताना दिसून येतात.

पण रक्तदानाची सुरुवात नेमकी कशी झाली? हेच जाणून घेण्यासाठी आम्ही हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ब्लड ट्रान्सफ्युजनची सुरुवात सोळाव्या शतकात झाल्याचे मानले जाते. १६२८ साली पहिल्यांदा विल्यम हार्वे याने  ब्लड ट्रान्सफ्युजनबद्दल माहिती लोकांसमोर आणली. त्यानंतर १६६९ दरम्यान ख्रिस्तोफर रेन याने सिरिंजचा शोध लावला. याच सिरींजचा वापर करून इंग्लंड आणि फ्रान्समधील शास्त्रज्ञांनी जनावरांमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजनची चाचणी केली.

सगळ्यात आधी रिचर्ड लोवर या इंग्लंडच्या डॉक्टरने १६६६ साली पहिल्यांदा एका प्राण्याचं रक्त दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात ट्रान्स्फर केलं होतं.

ब्लड ट्रान्सफ्युजनचा प्राण्यांवरील हा प्रयोग यशस्वी झाला म्हणून १६६७ पासून माणसांत ब्लड ट्रान्सफ्युजन करण्याला सुरुवात झाली. जीन बॅप्टीस्ट डेनिस यांनी पहिल्यांदा माणसांमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन केले होते. झालं असं की त्यांच्याकडे दोन रुग्ण आले होते, एक पंधरा वर्षाचा मुलगा आणि दुसरा एक मजूर.  दोघांनाही रक्ताची खूप गरज होती. त्यांना रक्त पुरवणे एक अवघड काम होते. पण डेनिस यांनी ते काम यशस्वी करण्याचे ठरवले होते.

जीन यांनी एका मेंढीचे रक्त काढले आणि ते या दोन्ही रुग्णांना पुरवले. अशाप्रकारे जगातील पहिला ब्लड ट्रान्सफ्युजनचा हा प्रयोग यशस्वी झाला.

जीनच्या या यशस्वी प्रयोगानंतर अनेक संशोधकांनी माणसासाठी मेंढीचा रक्ताचा वापर केला. हा प्रयोग बऱ्याच लोकांमध्ये यशस्वी झाला होता. पण काही लोकांना मात्र मेंढीचे रक्त मानवले नाही. शिवाय मेंढीचे रक्त माणसाच्या रक्तापेक्षा वेगळे असते, त्यामुळे या ब्लड ट्रान्सफ्युजनचे अनेक दुष्परिणाम देखील बघायला मिळाले. सुरुवातीला ते लक्षात आले नाही पण नंतर मात्र मेंढीच्या रक्तावर बंदी घालावी लागली.

अर्थात अशी बंदी घालूनही ब्लड ट्रान्सफ्युजनचे प्रयोग थांबले नाहीत.

अशातच १८१८ साली ब्रिटिश स्त्रीरोगतज्ज्ञ जेम्स ब्लान्डेल यांनी प्रथमच एका माणसाचे रक्त दुसऱ्या रुग्णासाठी वापरले. हा प्रयोग यशस्वी देखील झाला.

पण याला जास्त प्रसिद्धी तेव्हा मिळाली जेव्हा १९०१ साली कार्ल लँडस्टीनर याने मानवी रक्तगटाचा शोध लावला.

कार्लने माणसातील रक्तगट, कुणाचा रक्तगट कुणाशी जुळतो या सगळ्याचा शोध लावला. या संशोधनामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले.

ऐनवेळी गरज लागल्यास रक्त उपलब्ध व्हावे म्हणून लोक रक्त साठवण्याच्या तंत्रज्ञानावर भर देऊ लागले. १९२१ मध्ये ब्रिटिश रेड क्रॉस सोसायटीच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन रक्त साठवण्यासाठी रक्तपेढीची सुरुवात केली. त्यांनी सर्वप्रथम लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये रक्तदान करत रक्ताची साठवणूक करायला सुरुवात झाली आणि गरजू व्यक्तींसाठी त्याचा वापर करणे सुरू झाले.

 १९३६ साली जगातील सर्वांत मोठी ब्लड बँक उघडली गेली. शिकागो येथील कुक कंट्री हॉस्पिटलमध्ये ब्लड बँक होती. दुसऱ्या महायु*द्धाच्या दरम्यान ब्लड बँकेची गरज सगळ्यांनाच जाणवू लागली.

महायु*द्धादरम्यान मोठ्या संख्येने सैनिक जखमी होत होते. त्यांच्या उपचारासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. अमेरिकेत रेड क्रॉस ब्लड सर्विसेस ही संस्था याच दरम्यान सुरू करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. हेच रक्त लष्करी छावण्यांमध्ये पाठवून सैनिकांच्या उपचारासाठी वापरण्यात आले.

आजच्या काळात देखील ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे अनेकांचा जीव वाचवण्यात डॉक्टर लोकांना यश मिळाले आहे. अमेरिकेत दरवर्षी कमीत कमी ५० लाख लोकांना ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडते. एखादी शस्त्रक्रिया करायची असेल तर रुग्णाला रक्ताची गरज भासतेच.

भारतातही मोठ्या प्रमाणात रक्तदानाची गरज आहे. कोरोनाच्या काळात तर याची जाणीव सगळ्यांनाच झाली असेल. कित्येक लोकांनी आपणहून पुढे येऊन रक्तदान करत कोरोना रुग्णांचा जीव वाचवला आहे.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे! आपणही आपल्याला शक्य होईल तेव्हा रक्तदान करून एखादा जीव वाचावूयात!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.


ShareTweet
Previous Post

एकदा लंडनमध्ये चक्क ‘बिअर’चा महापूर आला होता..!

Next Post

शास्त्रीजी आणि होमी भाभा यांच्या संशयास्पद मृत्यूमागे CIA असल्याच्या चर्चा आजही सुरु आहेत

Related Posts

आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
आरोग्य

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

15 March 2024
Next Post

शास्त्रीजी आणि होमी भाभा यांच्या संशयास्पद मृत्यूमागे CIA असल्याच्या चर्चा आजही सुरु आहेत

सम्राट अशोकाने एक रहस्य लपवण्यासाठी ९ अज्ञात व्यक्तींची एक टीम बनवली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.