The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फ्रेनॉलॉजी – कवटीचा आकार आणि मानवाचा स्वभाव यांचा संबंध दाखवणारे स्युडो सायन्स

by द पोस्टमन टीम
18 February 2025
in आरोग्य, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


मानवी मेंदू आणि त्याचं कार्य हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. तळ न लागणारं असं हे मानसशास्त्र नेहमीच कुतुहलाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. याच अभ्यासातून एकोणिसाव्या शतकात एक अजब शास्त्र – फ़्रेनोलॉजी, अस्तित्वात आलं होतं. अल्पावधीतच हे शास्त्र लोकप्रियही झालं. या लोकप्रियतेत या शास्त्राचा जन्मदाता गॅलचं उत्तम वक्तृत्व महत्वाची भूमिका बजावत होतं. त्याचे या विषयावरचे बहारदार आणि मनोरंजक कार्यक्रम लोकांना आकर्षित करू लागले होते. मानसिक कार्ये मेंदूच्या विशिष्ट भागात स्थानिकीकृत आहेत आणि मानवी वर्तन या कार्यांवर अवलंबून आहे हे त्यानं जगाला पटवून दिलं.

व्हिएन्ना येथील क्रॅनियोस्कोपी (त्याच्या अनुयायांनी याला कालांतरानं फ़्रेनॉलॉजी हे नाव दिलं) या विषयावरील त्याच्या लोकप्रिय व्याख्यानांमुळे धार्मिक नेते नाराज झाले. १८०२ साली ऑस्ट्रीयन सरकारनं धर्माच्या विरोधात ही भाषणं मानत त्यांचा निषेध केला आणि त्याच्यावर बंदी घातली. त्यानंतर तीन वर्षांनी त्याला देश सोडण्यासही भाग पाडले.

फ़्रेंच शल्यचिकीत्सक पॉल ब्रोका यांनी मेंदूतील स्पीच सेंटरचे अस्तित्व दाखवून दिल्यावर मेंदूतील स्थानिकीकृत कार्यांची गॅलची संकल्पना बरोबर सिध्द झाली. तथापी या निरिक्षणात हे देखील नोंदविले गेले की, कवटीची जाडी बदलत असल्यानं कवटीचा पृष्ठभाग मेंदूच्या स्थलकृतीचे प्रतिबिंबीत करत नाही त्यामुळे फ़्रेनॉलॉजिचा मूळ आधारच अमान्य होतो.

आज हे फ़्रेनोलॉजी हे शास्त्र स्युडोसायन्स- छद्म विज्ञान म्हणून ओळखले जाते; परंतु, त्या काळातील व्यक्तिमत्वाच्या प्रचलित शास्त्रांमधे महत्वाचा शोध किंवा सुधारणा होती. फ़्रेनॉलॉजिनं प्रथमच मेंदूला “मनाचा अवयव” म्हणून ओळख मिळवून दिली. एखाद्या व्यक्तिचे व्यक्तिमत्व हे त्याच्या कवटीच्या आकारावरुन “वाचले” जाऊ शकते, हा विचार मांडला गेला.

अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील काही विचारवंत आणि चिकित्सकांचा असा विश्वास होता की एखाद्या व्यक्तिच्या कवटीचा आकार त्याच्या मानसशास्त्राचा संकेत देऊ शकतो. वैद्यकीय इतिहासाच्या या जिज्ञासेत फ़्रेनॉलॉजी या दीर्घकाळापासून बदनाम असलेल्या विज्ञानाचा समावेश होतो.



आज असं म्हटलं जातं की फ़्रेनॉलॉजी हा एकोणिसाव्या शतकातील अमेरिकेचा बौध्दिक रोग होता. एडगर ॲलन पो आणि वॉल्ट व्हिटमन यांनी लोकप्रिय व्यक्तिमत्व सिध्दांताचे तुकडे आपापल्या कृतींमधे समाविष्ट केले. ज्यानं प्रथम ही कल्पना लोकप्रिय बनविली तो, डॉक्टर फ़्रांझ जोसेफ़ गॅल (१७५८-१८२८), याचा असा विश्वास होता की, एखाद्या व्यक्तिच्या मेंदूच्या आकारावरुन त्याच्या व्यक्तिमत्वाबाबतचे संकेत मिळतात आणि त्याचा त्याच्या कवटीच्या आकारावरही परिणाम होतो. मात्र जेंव्हा गॅलननं हा शोध लावला तेंव्हा त्यानं फ़्रेनोलॉजी हा शब्द वापरला नव्हता. हा शब्द कालांतरानं वापरात आला. 

१८०० च्या दशकाच्या सुरवातीस ब्रिटिश चिकित्सक टीआयएम फ़ोर्स्टरनं याचा वापर केला. गॉलचा असा विश्वास होता की कवटीचा आकार एखाद्या “पूर्वपरिस्थिती”बद्दल संकेत देतो असे नाही तर मेंदूचा प्रत्येक भाग वेगळ्या वैशिष्ट्यांशी जोडला गेला असतो. त्याच्या मते मानव आणि प्राणी या दोघांच्याही मेंदूबाबत हे लागू होतं. त्यातही मानवी मेंदूमधे अधिक वैविध्यपूर्ण मानसिक आणि भावनिक क्षमता असल्याचं त्याचं मत होतं.

हे देखील वाचा

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

गॅलनं वर्णन केलेल्या काही इतर विभागात खालील गोष्टींचा समावेश होतो-

पिढी पुनरुत्पादन किंवा प्रसाराची प्रवृत्ती, अभिमान किंवा उदात्तता, उन्नती, गोष्टींची स्मृती, वस्तिस्थिती, शिक्षणक्षमता, परिपूर्णता, चित्रकलेची प्रतिभा, संगीत प्रतिभा, संख्यांच्या संबंधीत विद्याशाखा, बोलीभाषा विद्याशाखा. 

गॅलनं असंही मत मांडलं होतं की, मेंदूचे दोन गोलार्ध व्यावहारिकदृष्ट्या अदलाबदल करण्यायोग्य असतात तसेच त्यांची कार्येही समान असतात. त्याचा असा विश्वास होता की, समजा एका गोलार्धाचे नुकसान झाले तर त्याची भरपाई दुसरा गोलार्ध करू शकेल. १९ व्या शतकात गॅलच्या या अभिनव कल्पना संपूर्ण युरोपभर झपाट्यानं पसरल्या.

फ़्रेनॉलॉजिस्ट आणि पेशानं वकील असणार्‍या स्कॉटिश जॉर्ज कॉम्बे यांच्या १८२४ साली प्रकाशित झालेल्या ‘एलिमेंटस ऑफ़ फ़्रेनॉलॉजी’ आणि इतर विविध पुस्तकात या ‘विज्ञाना’बाबत लिहिले आहे. या पुस्तकात मेंदूचे विविध भाग विविध भूमिका बजावतात असं मत त्यांनी मांडलं.

मेंदू हा भिन्न कार्ये करणार्‍या भागांचे संयोजन करणारा असतो, असायला हवा. हे मत सुस्पष्ट करताना त्यानं पाच गुंतागुंतीची कारणं दिली-

  1. मनाच्या सर्व शक्ती एकाच वेळेस तितक्याच विकसित होत नाहीत. परंतु जिवनाच्या विविध कालखंडात त्या एकापाठोपाठ दिसून येतात.
  2. समजा कला हा विभाग धरला तर ज्या व्यक्तीकडे संगीत प्रतिभा आहे ती चित्रकलेत निपूण नसण्याच्या शक्यता आहेत. उलट भिन्न प्रतिभा मेंदूच्या विविध भागात “वसते” जी कमी अधिक प्रमाणात विकसीत असू शकते.
  3. एक किंवा अधिक विद्याशाखा जागृत आहेत आणि बाकी सुप्तावस्थेत/निद्रावस्थेत आहेत अशावेळेस सर्वांनी एकाच अवयव साधनाद्वारे कार्य केले तर एकाचवेळेस विरुध्द स्थितीत असणार नाही.
  4. मानसोपचार समस्या विशिष्ट वर्तन आणि कार्यांवर परिणाम करतात.
  5. मेंदुच्या कृत्रिम जखमांचा सर्व मानसिक शक्तींवर समान परिणाम होत नाही.

असं म्हणतात की कॉम्बेचा या सगळ्यावर इतका दृढ विश्वास होता की त्यानी लग्नासाठी जोडीदार शोधतानाही होणार्‍या पत्नीचीही अशा प्रकारची मुल्यांकन चाचणी केली होती. या शास्त्रानुसार स्त्री आणि पुरुष यांच्या कवटीच्या आणि क्षमतेच्या भिन्नतेवरही जोर देण्यात आला होता.

फ़्रेनॉलॉजी वैज्ञानिकदृष्ट्या व्यवहार्य नसली तरिही यातील काही मुख्य कल्पनांनी वास्तविक वैज्ञानिक क्षेत्राच्या विकासात मोलाचा हातभार लावला- न्युरोसायन्स. उदाहरणार्थ, गॅलीच्या काही मूळ संकल्पनात मेंदूचे विविध भाग विविध कार्य कशाप्रकारे करतो याबाबत सांगितलं गेलं होतं याचा उपयोग मेंदूचे कार्य समजून घेण्यासाठी उपयोगात आणलं गेलं. थोडक्यात, मेंदुच्या अभ्यासाने या कल्पनेला पाठींबा दिला की, पाच ठळक व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांचा जैविक पाया आहे. व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये हे आरोग्यापासून करिअर आणि नातेसंबंधातील यशापर्यंत सर्व गोष्टींचे विश्वसनीय अंदाज आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारताला सध्या भेडसावणारी एक महत्वाची समस्या म्हणजे ब्रेन ड्रेन..!

Next Post

९ वर्षांचा हा नायजेरियन मुलगा जगातला सर्वात लहान अरबपती आहे..!

Related Posts

आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
Next Post

९ वर्षांचा हा नायजेरियन मुलगा जगातला सर्वात लहान अरबपती आहे..!

धोनी हेडनला म्हणाला, "काय म्हणशील ते देतो, पण ही 'मंगूस बॅट' नको वापरू..!"

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.