The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आफ्रिकेतील वाळवंटातून भारतातल्या शेतकऱ्यांवर येणारं ‘अस्मानी संकट’ : टोळधाड

by द पोस्टमन टीम
29 May 2024
in शेती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘टोळ’धाड हा शब्द ऐकला की शेतकऱ्याच्या अंगावर काटा येतो. एखाद्या आक्र*मक राज्यकर्त्याने एखाद्या सार्वभौम भूमीवर आक्र*मण करून त्या सुबत्त प्रदेशाची नासधूस केल्यावर जे चित्र निर्माण होतं अगदी तसंचं चित्र शेतकऱ्याच्या शेतात टोळधाड पडल्यावर निर्माण होत असतं.

शेतकरी आयुष्यभर इतरांच्या हितासाठी झटत असतो पण हे सर्व होत असतांना त्याच्या आयुष्यात बाधा निर्माण करणाऱ्या असंख्य गोष्टी असतात.

बऱ्याचदा निसर्ग साथ देत नाही, ऋतुचक्र बिघडल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर अगोदरच प्रचंड परिणाम होत असतो. पण तरी देखील या दुष्टचक्रातून शेतकरी स्वत:ची यशस्वी पणे सुटका करून घेऊ शकला आणि त्याने याने यशस्वीपणे पीक उगवलं तरी त्याच्यासमोर ते टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असते.

ते आव्हान असते कीटकांचे आणि चराऊ प्राण्यांचे, यात शेतकरी प्राण्यांचा बंदोबस्त मनुष्यबळावर सहजरित्या करू शकतो पण कीटकांचा बंदोबस्त करण्यात शेतकऱ्याला नाकीनऊ येत असते.

हे कीटक शेतकऱ्याचे मोठे नुकसान करतात. शेतकऱ्याच्या पिकांना खराब करणाऱ्या प्रमुख कीटकांपैकी एक आहे ‘टोळ’ हा नाकतोड्या प्रजातीचा कीटक शेतकऱ्याच्या पिकाचा सर्वात मोठा शत्रू असतो.



महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, पंजाब इत्यादी पश्चिमी राज्यात ह्या टोळधाडीचं प्रमाण अधिक होतं. २०२०-२१ साली पाकिस्तानमध्ये सुरु झालेलं टोळधाडीचं सत्र भारतात येऊन धडकलं.

यातून राजस्थान आणि गुजरात सारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

हे देखील वाचा

पडीक जमिनीतून उगवणार सोनं; महाराष्ट्र शासनाची फळझाड/वृक्ष लागवड योजना

‘केळी’सुद्धा जागतिक महामारीचा सामना करत आहे..!

जागतिक अन्नाची गरज भागवण्यासाठी पुढे आलेला ‘लॅब फूड’चा पर्याय सुरक्षित आहे का..?

पंजाब आणि हरियाणानंतर महाराष्ट्रात टोळधाडीचे सत्र सुरु झाले. यामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

पण ही टोळ धाड नेमकी काय असते आणि त्यामुळे नुकसान कसं होतं ते आपण आज जाणून घेऊया..

टोळ आणि टोळधाड म्हणजे नेमकं काय ?

टोळ हा नाकतोड्याचा एक प्रकार आहे. टोळ प्रजातीत जबरदस्त प्रजनन क्षमता असते. ते मोठ्या संख्येने प्रजोप्तादन करतात. इतकंच नाही तर या टोळ जातीच्या कीटकांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेशन करण्याची मोठी ताकद असते.

ते मोठ्या संख्येने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या जाऊ शकतात. त्यांचा ह्याच ताकदीमुळे ते शेतकऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमणात नुकसान करतात. ह्या टोळ प्रजातीचे अनेक प्रकार आहेत.

डेझर्ट लोकस्ट ही वाळवंटात आढळणारी टोळांची  प्रजाती आहे, जी प्रामुख्याने नुकसान होण्यास कारणीभूत ठरते आणि भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे.

याशिवाय मायग्रेटरी लोकस्ट, बॉम्बे लोकस्ट आणि ट्री लोकस्ट ह्या तीन अजून टोळ प्रजाती भारतात आढळतात.

टोळ कीटक पिकाचे नुकसान कशाप्रकारे करतात ?

टोळ कीटकांच्या  झुंडीच्या झुंडी शेतांवर आक्र*मण करतात, ते सरळ सरळ पिकांवर जाऊन बसतात, अगदी शेंड्यापासून ते खोडापर्यंत ते पिकाच्या प्रत्येक भागावर जाऊन बसतात.

कणीस, धान्य, फुलं, पानं, खोड ह्या सर्वांचे हे कीटक इतकं नुकसान करतात की काहीच उरत नाही, ६० % पेक्षा  जास्त पिकाचे नुकसान हे कीटक करत असतात.

त्यामुळे टोळधाडीनंतर शेताचे चित्रच पालटते आणि यासोबतच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. कीटकांच्या संख्येवर टोळधाडीची तीव्रता ठरवली जात असते.

जर कीटकांची संख्या कमी असेल तर तीव्रता इतकी नसते पण जर ती जास्त असेल तर मात्र होणारे नुकसान हे मोठे असते.

टोळधाडीवर भारत सरकार काय करते ?

भारतात टोळधाड ही एक मोठी कृषीविषयक समस्या असल्याने भारत सरकार ह्यावर विविध उपाययोजना राबवत असते. भारत सरकारने टोळ प्रतिबंध योजनेची सुरुवात केली असून १९३९ साली स्थापन झालेल्या वृक्ष संवर्धन आणि जतन संस्थेने टोळधाड सूचक यंत्रणेची निर्मिती केली आहे.

ही संस्था भारताच्या कृषि मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. टोळधाड सूचक यंत्रणा वाळवंटी प्रदेशात टोळ्यांच्या उपद्रवावर आणि नुकसानावर नजर ठेवण्याचं कामी करते.

ही संस्था भारतभरात कार्यरत असली तरी राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागात ह्या संस्थेचे कार्य मोठ्या प्रमाणावर चालते कारण टोळांची संख्या ह्या भागात सर्वात जास्त आहे.

फरिदाबाद येथील केंद्र सरकारच्या वृक्ष संवर्धन आणि जतन महामंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एका लहानश्या टोळधाडीत धान्य इतक्या प्रमाणात त्या कीटकांकडून खाल्लं जातं की त्याच्या समोर हत्तींचा कळप देखील काहीच नाही.

हे कीटक एका ह*ल्ल्यात १० हत्ती, २५ उंट आणि २५०० माणसांना पुरेल इतकं धान्य खातात आणि नष्ट करतात, यावरून तुम्हाला टोळधाड किती नुकसानदायक असते हे समजायला सोपे जाईल.

१९२६ -१९३१  ह्या कालावधीत टोळधाडीमुळे १० कोटी रुपयांचे नुकसान त्याकाळी नोंदवण्यात आले होते, ज्याची आज किंमत लावली तर हजारो कोटींच्या घरात आकडा जाण्याची शक्यता आहे. १९४०-१९४६ या साली नुकसानाची रक्कम प्रतिवर्ष दोन कोटी इतकी होती.

१९५९ ते १९६१ साली आलेल्या शेवटच्या टोळधाडीच्या साथीने ५० लाख रुपयांचे नुकसान प्रतिवर्षी केले होते.

१९६२, १९७५ आणि १९९३ साली देखील काही सौम्य दर्जाच्या टोळधाडीने कृषिक्षेत्राचे मोठे नुकसान केले होते.

टोळांच्या धाडींचा उगम हा आफ्रिकेतील वाळवंटात होतो तेथून ते अरबस्तानमार्गे भारतात येतात आणि इथल्या शेतकऱ्यांचे आयुष्य नष्ट करतात.

आज ह्या टोळधाडीवर सरकार जरी असंख्य उपाययोजना करत असले तरी ही समस्या समूळ नष्ट करणे अवघड आहे.

टोळधाडीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळत असली तरी ह्या समस्येवर अजूनही असा काही विशेष उपाय न मिळाल्यामुळे आपलं पीक नष्ट होताना बघण्यावाचून शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसतो.

शास्त्रज्ञांच्या मते कालांतराने ही समस्या ग्लोबल वार्मिंगमुळे उद्भवणाऱ्या वाळवंटीकरणाबरोबर अधिक गंभीर होऊ शकते!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: agricultureLocust
ShareTweet
Previous Post

वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी या महिलेने झपाट्याने वाढणारी बहुराष्ट्रीय कंपनी उभारलीय

Next Post

‘कोरोना’चा धोका असूनही पाकिस्तान आपल्या नागरिकांना चीनमधून परत का बोलावत नाही?

Related Posts

शेती

पडीक जमिनीतून उगवणार सोनं; महाराष्ट्र शासनाची फळझाड/वृक्ष लागवड योजना

13 October 2024
शेती

‘केळी’सुद्धा जागतिक महामारीचा सामना करत आहे..!

5 March 2025
विज्ञान तंत्रज्ञान

जागतिक अन्नाची गरज भागवण्यासाठी पुढे आलेला ‘लॅब फूड’चा पर्याय सुरक्षित आहे का..?

5 March 2025
विज्ञान तंत्रज्ञान

या तरुणाच्या शोधामुळे शेतातला ताजा भाजीपाला आपल्याला शहरात खायला मिळणार आहे

30 March 2024
विश्लेषण

हिमालयाच्या डोंगरदऱ्यातील शेतकरी सर्रास गां*जाची शेती करतात..!

13 October 2025
शेती

सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान कांद्याचे भाव का वाढतात…?

30 September 2025
Next Post
imran khan

'कोरोना'चा धोका असूनही पाकिस्तान आपल्या नागरिकांना चीनमधून परत का बोलावत नाही?

अवघ्या १६व्या वर्षी कचऱ्यापासून ड्रोन बनवणारा 'ड्रोन बॉय'

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.