The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“नॉट सो कन्वेन्शनल” कपूरला भावपूर्ण श्रद्धांजली!

by सोमेश सहाने
30 April 2020
in मनोरंजन, संपादकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


वयाच्या ६७व्या वर्षी ऋषी कपूर यांचं निधन झालं.

एका मुलाखतीत त्यांनी स्वतःला कशाची भीती वाटते, याचं उत्तर देताना सांगितलं की, “I don’t want to make a fool of myself in my overconfidence”.

४७ वर्ष सिनेमाविश्वात स्वतःला सिद्ध केल्यानंतर सहाजिकच प्रसिद्ध व्यक्तींना थोडा अहंकार येतो आणि त्यात ते वाहत जातात. मात्र ऋषी कपूर याही वयात स्वतःविषयी किती चिकित्सक होते याची पावती त्यांचं हे वाक्य आहे. सिनेमासृष्टीचा अनुभव आणि तीन पिढ्यांचा वारसा असतानाही त्या ओझ्याला मिरविण्यापेक्षा त्यांनी या वयातही स्वतःवर काम करणं पसंत केलं.

त्यांच्या करिअरच्या या टप्प्यावर स्वतःच्या ब्रॅंडवर चित्रपट खेचून आणून तेच पारंपरिक सूत्र चालविण्यापेक्षा त्यांनी नवीन पिढीसोबत काम केलं, त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी मेहनत केली.



या वयात आल्यावर अभिनेते सहाजिकच छोट्या आणि महत्वाच्या भूमिका निवडतात आणि प्रसिद्धीची मजा घेतात. मात्र ऋषी कपूर यांच्या उतरत्या वयात त्यांनी केलेल्या भूमिकांचं निरीक्षण केलं की कळतं की त्यांनी ही परंपरा तोडली.

वयाच्या २०व्या वर्षी “बॉबी” चित्रपटापासून त्यांनी सुरुवात केली आणि तेव्हापासूनच चॉकलेट बॉय, सुपरस्टार म्हणून ख्याती मिळवली. पण त्यांच्या साठीत आपण त्यांना अग्निपथ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत बघितलं. नाबालीक मुलींचा वेश्याव्यवसाय करणारा “रौफ लाला” चं ते पात्र होतं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

आजच्या पिढीतले संजय दत्त, हृतिक रोशन यांच्या बरोबरीने असं राग आणणारं पात्र साकारण्याची धमक “खानदानी सुपरस्टार” असणाऱ्या दुसऱ्या कुठल्या अभिनेत्यात दिसत नाही. अमिताभ किंवा मिथुन अशा भूमिकांच्या जवळ जाणारं पात्र करण्याची रिस्क ही घेत नाही. म्हणून ऋषी कपूर यांचं योगदान महत्वाचं आहे.

 

bobby movie postman
Pinterest

“डी डे” मध्ये त्यांनी दाऊद इब्राहिम सारख्या एका डॉनची भूमिका केली तर हम तुम, लव आज कल मध्ये चार उन्हाळे जास्त बघितलेल्या वडीलधाऱ्या मित्राची.

फक्त हिरोचे वडील किंवा शेजारच्या घरात राहणारा म्हातारा अशा भूमिका त्यांनी टाळून ज्यात त्यांच्या पात्राला यापेक्षा जास्त एक्सप्लोर करता येईल अशा अवघड भूमिका त्यांनी निवडल्या.

त्यांच्या राजकीय आणि सामाजिक मतांमुळंही त्यांचं नाव बऱ्याचदा चर्चिलं गेलं. त्यांच्या ट्विटर हँडल वरून रात्री अपरात्री महत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी जाहीर केलेली मतं बऱ्याचदा बातम्यांमध्ये आली. ज्यामुळे ते वादाच्या घेऱ्यात ही कित्येकदा अडकले.

त्यांच्या भूमिका बरोबर होत्या की चूक यावर वेगळ्याने चर्चा होऊ शकते पण असं विवादात्मक विषयांवर मत नोंदवल्यामुळं बऱ्याचदा चाहत्यांमध्ये त्या अभिनेत्याची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असते. याचा फटका येणाऱ्या आगामी चित्रपटांवरही बसू शकतो आणि पर्यायाने व्यवसायावर. तरीही स्वतःची राजकीय मतं ते मांडत राहिले. स्वतःच्या सामाजिक जबाबदऱ्यांबद्दल त्यांची ही जागरूकता प्रशंसनीय आहे.

सामान्यतः अभिनेते म्हटलं की समाजसेवेसाठी पैसे देणे, कार्यक्रमाला हजेरी लावणे हे अपेक्षित असतं. परिस्थिती विषयी एवढी चिकित्सक मतं असणं, तेवढा अभ्यास आणि लिहीत राहणं हे फक्त ऋषी कपूर यांनाच जमलं.

त्यांनी स्वतःच आत्मचरित्र ही लिहिलं “खुल्लम खुल्ला”, शिर्षकाप्रमाणे पुस्तकात त्यांनी निर्भीडपणे बरेच खुलासे केले. अगदी एक पुरस्कार विकत घेण्यापासून तर दाऊद इब्राहिमला भेटण्यापर्यंत सगळंच. या बेबाकपणामुळे त्यांची उतारवयातील प्रसिद्धी अजूनच वाढली होती.

या सामाजिक भान वाढण्याच्या काळात त्यांनी त्या मतांना साजेश्या भूमिकाही केल्या. अनुभव सिन्हा यांच्या “मुल्क” या चित्रपटात हे स्पष्टपणे कळतं की या पात्राच्या तोंडी असणारे संवाद खरतर ऋषीजींच्या सामाजिक जाणिवेतुन आलेत. धार्मिक मतांवर देशात तेढ वाढत असताना हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

 

Khullam Khulla postman

“कपूर” आडनावाच्या सुपरस्टारने मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायावर चित्रपट करणं ही आजही मोठी गोष्ट आहे. त्यांच्या पिढीतील अभिनेते चित्रपट निवडताना स्वतःच्या कारकिर्दीच्या ओझ्याची जाणीव ठेवतात आणि फार साहसी निर्णय घेत नाहीत, पण ऋषी कपूर त्यांना अपवाद ठरले.

त्या काळात अमर अकबर अँथनी २५ आठवडे चालला होता.

कर्ज, नागीन, कुली या चित्रपटांनीही रेकॉर्ड बनवले. पण ऋषी कपूर यांनी त्या पिढीला मागे सोडत एकविसाव्या शतकात आजच्या पिढीला आदर्श वाटेल अशा कामाचा वारसा तयार करून ठेवलाय. त्यात फक्त त्यांचे सिनेमेचं नाहीतर त्यांचं सामाजिक योगदानही आहे.

त्यांच्या करकीर्दीतील हे त्यांचं हेच वेगळेपण त्यांना परंपरागत कपूर घराण्यातील इतर कलाकारांपासून वेगळं करतं. या वेगळेपणाचा वारसा त्यांचा मुलगा रणबीर कपूर त्याच्या अपरांपरागत निवडीतुन सिद्ध करतोय. रॉक्स्टार, तमाशा, जग्गा जासुस हे रणबीरचे सिनेमे तर ऋषी कपूर यांनाही मूळ प्रवाहापेक्षा वेगळे जाणारे वाटले होते.

अशा या “नॉट सो कन्वेन्शनल” कपूरला आमची भावपूर्ण श्रद्धांजली!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Bollywood Stars
ShareTweet
Previous Post

दैनंदिन अडचणींवर मात करण्यासाठी भारतीय लोकांनी लावलेल्या या शोधांना तोड नाही

Next Post

यांनी बास्केटबाॅलमध्ये जगभर भारताचा दबदबा निर्माण केला होता..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

यांनी बास्केटबाॅलमध्ये जगभर भारताचा दबदबा निर्माण केला होता..!

आपल्या लल्लनटॉप स्टाईलने लोकांची मनं जिंकणाऱ्या सौरभ द्विवेदीची कहाणी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.