The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१५ वर्षाच्या मुलीने लिहिलेली प्रौढ कादंबरी ‘द आउटसायडर्स’ इंटरनॅशनल बेस्ट सेलर बनलीय

by Heramb
11 November 2024
in वैचारिक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपण रोज वृत्तपत्रांमध्ये, अनेक वेबसाइट्सवर आणि अन्य ठिकाणी पुस्तकं, कित्येक लेख, लेखांचे नमुने वाचत असतो. पण काही लोकांमध्ये त्यांच्या लेखणीतून जगात अमूलाग्र बदल घडवून आणण्याची आणि त्यांच्या कल्पनांद्वारे समाजावर प्रभाव टाकण्याची ताकद असते. असे क्रांतिकारी लेखक लोकांच्या जीवनावर आणि समाजावर कायमस्वरूपी प्रभाव टाकून संस्कृतीच्या संकल्पनांची पुनर्रचना करू शकतात.

‘एस. ई. हिंटन’ हीसुद्धा अशीच एक लेखिका आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी, एस. ई. हिंटनने एक कादंबरी लिहिली. या कादंबरीत तिने पौगंडावस्थेतून जाणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या आयुष्याचा आढावा घेतला. हे करत असतानाच तिने समाजाचा युवा संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचाही प्रयत्न केला. एस. ई. हिंटनने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ‘द आउटसायडर्स’ ही तिची बेस्ट सेलर – सर्वाधिक विकली जाणारी कादंबरी लिहून पूर्ण केली. यापूर्वी कोणत्याही लेखकाने किशोरवयीन मुलांबद्दल ‘एस. ई. हिंटन’ एवढे लेखन केले नव्हते.

‘द आउटसायडर्स’ कादंबरी १९६७ साली प्रकाशित झाली. या कादंबरीचा प्रसार युनायटेड स्टेट्सच्या बाहेर जास्त झाला नाही, कारण बहुतेक ठिकाणी अशा प्रकारचे साहित्य आधीपासूनच उपलब्ध होते. पण या कादंबरीच्या बाबतीत विशेष म्हणजे लेखिका स्वतः किशोरवयीन असल्याने ती किशोरवयीन जीवनातील अत्यंत अवघड संकल्पनांना सोप्या भाषेत मांडते. शिवाय ती स्वतःच्या आयुष्याची तुलना कादंबरीतील पात्रांबरोबर करून आपल्या साहित्याशी अनोखा संबंध प्रस्थापित करू शकते. हिंटनच्या लेखनातील हीच सत्यता तिला तिच्या किशोरवयीन वाचकांशी थेट ‘जोडते’.

‘द आउटसायडर्स’ची हस्तलिखित आवृत्ती पूर्ण झाली, तेव्हा हिंटन शालेय विद्यार्थिनीच होती. सुरुवातीला, हिंटनने स्वतःच्या लेखनाला “ए डिफरंट सनसेट” असे शीर्षक दिले होते परंतु नंतर तिच्या कादंबरीला ‘द आउटसायडर्स’ हे शीर्षक निश्चित करण्यात आले. तिच्या ग्रॅज्युएशनच्या दिवशी, हिंटनने वायकिंग प्रेसला ‘द आउटसायडर्स’च्या प्रकाशनाचे कॉन्ट्रॅक्ट देऊ केले. ही अजरामर कादंबरी २४ एप्रिल १९६७ रोजी प्रकाशित झाली आणि किशोरवयीन वाचकांसाठी साहित्य रचनेच्या पद्धतीमध्ये क्रांतीच घडली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 



पुस्तकांच्या वाचनातूनच लिहिण्याची प्रेरणा मिळते असं म्हणतात. हिंटनच्या बाबतीतही काही वेगळं घडलं नाही. अशा प्रकारची कादंबरी लिहिण्याची प्रेरणा तिला सततच्या वाचनातूनच मिळत होती. ज्या कथा-कादंबऱ्या किशोरवयीन मुलांसाठी म्हणून लिहिल्या जात होत्या, त्यातील कथा आणि पात्रांचा किशोरवयीन मुला-मुलींशी आणि त्यांच्या आयुष्याशी काहीही संबंध नसल्याचे तिला लक्षात आले. म्हणूनच हिंटनने किशोरवयीन मुलांच्या आयुष्याशी निगडित अशी कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिला स्वतःचे आणि तिच्या आसपासच्या किशोरवयीन मुला-मुलींचे अनुभव व्यक्त करायचे होते.

किशोरवयीन मुलांचे वास्तववादी चित्रण आणि त्यांच्या आयुष्याबद्दल लिहिण्याचे हिंटनचे ध्येय होते. तिचे हेच लेखन फक्त किशोरवयीन मुला-मुलींवरच प्रभाव पाडणारे नव्हते तर इतर लेखकांवरही तिच्या या अभूतपूर्व लेखन कौशल्याने प्रभाव पाडला. हिंटनच्या लेखन शैलीने आणि कार्याने प्रभावित झालेल्या लेखकांनी किशोरवयीन अनुभवांवर आधारित कथा तयार करायला सुरुवात केली. पूर्वीपासून, प्रौढ लोकांद्वारेच किशोरवयीन मुला-मुलींचे अनुभव ‘कृत्रिमरीत्या’ तयार करून विविध कादंबऱ्या आणि साहित्यामध्ये सांगितले गेले आहेत आणि त्यामुळे फक्त प्रौढच अशा कथित ‘किशोरवयींसाठीच्या’ साहित्याशी निगडित राहिले आहेत.

परंतु हिंटनने लेखनाच्या या पद्धतीत क्रांती घडवून आणली. लोकांना किशोरवयीन जीवनाचा आणि त्यासंबंधी येत असलेल्या अनुभवांचा विचार करण्यास प्रवृत्त केले. हिंटनने आपल्या साहित्याच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांना पूर्णतः स्वतंत्र मानून, त्यांना प्रौढांपासून वेगळे केले. आजमितीस, अर्ध्या शतकाहून अधिक काळानंतरही हिंटनच्या पहिल्या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हे देखील वाचा

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी महान शास्त्रज्ञ ‘निकोला टेस्ला’सुद्धा प्रभावित झाला होता

‘द आउटसायडर्स’ ही कादंबरी अशा काही किशोरवयीन मुलांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांना अत्यंत कमी वयातच ‘मोठे’ होण्यास प्रवृत्त करण्यात आले होते आणि अगदी लहान वयातच त्यांना जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. अनाथ असलेले दोन कर्टिस भाऊ, त्यांची ग्रीजर्सची टोळी आणि चेरी व्हॅलिन्स नावाची एक सोळा वर्षांची मुलगी ही या कादंबरीची महत्त्वाची पात्रे आहेत.

कर्टिस बंधूंपैकी एक, पोनीबॉय कर्टिस हा या कादंबरीचा पहिला नायक. तो त्याच्या दृष्टिकोनातून कथाकथन करतो. पोनीबॉयचे अनुभव त्याचे सामाजातील स्थान, त्याची गॅंग मेम्बरशिप आणि वाढती वैयक्तिक ओळख यांद्वारे स्पष्ट होतात.

हायस्कूलमधील अनुभवांमुळे हिंटनने तिच्या कादंबरीत रायव्हल गँग्स आणि ग्रीझर्स यांचा समावेश केला आहे. तिच्या हायस्कूलमध्ये सामाजिक भेदभावांवर आधारित गँग्स होत्या. यांपैकी कोणत्याही गॅंगशी हिंटनला वैयक्तिक रितीने संबंध ठेवता आला नाही, परंतु तिने तिच्या सभोवतालच्या किशोरवयीन मुलांमध्ये झालेल्या विभाजनाचे काळजीपूर्वक निरीक्षण केले.

तिने जरी वैयक्तिकरित्या कोणत्याही टोळीशी संबंध जोडलेला नसला तरी ‘पोनीबॉय’सारख्या एका गॅंग-मेम्बरला आपल्या कादंबरीचा नायक बनवणे तिला महत्त्वाचे वाटले. जेणेकरून लोकांना त्यांच्या आसपास असलेल्या निम्नवर्गातील विद्यार्थ्यांच्या गॅंग्सची मानसिक स्थिती समजू शकेल. पण हिंटन उच्च वर्गातील विद्यार्थ्यांना तिरस्काराने पाहत असे असा त्याचा अर्थ होत नाही. उलट हिंटनच्या मते, सर्वच किशोरवयीन मुलांना त्यांच्या जीवनात काही न काही अडचणी येतातच आणि हे मत तिच्या लिखाणातूनसुद्धा दिसून येते.

कादंबरीत पुरुष नायक दाखवण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते पुरुष वाचकांसाठी अधिक रसमय होते. शिवाय, कोणत्याही कादंबरीत पुरुष नायक असणे हे सामान्य होते आणि इतर महिला लेखकांनी याच कारणामुळे आपल्या कादंबऱ्यांसाठी पुरुष नायक निवडले आहेत.

वाइकिंग प्रेसमधील तिच्या संपादकाने हिंटनला तिचे ‘सुसान एलॉईस हिंटन’ हे नाव न वापरता एस. इ. हिंटन या नावाने पुस्तक प्रकाशित करण्यास सांगितले, इतके त्याकाळात भेदभाव प्रबळ होते. 

हिंटनची ही कादंबरी त्याकाळात चर्चेचा विषय बनली होती. हिंटनने आपल्या कादंबरीचा नायक एका पुरुषाला ठेवले होते आणि तिचे लेखन त्या काळातील इतर लेखकांपेक्षा बरेच वेगळे होते. याशिवाय हिंटनने तिच्या कादंबरीत अनेक निषिद्ध विषयांचा समावेश केला आहे. उदाहरणार्थ, धूम्रपान, मद्यपान, संभोग, इत्यादी. प्रत्यक्ष समाजात या गोष्टी सामान्य असल्या तरी, या गोष्टी साहित्यामध्ये पाश्चिमात्त्य साहित्यात त्याकाळी क्वचितच आढळत. कारण प्रौढ लोक या गोष्टी साहित्यात आणणे निंदनीय मानत असत. या कल्पना किशोरवयीन मुलांचे मन भ्रष्ट करतील असा त्यांचा विश्वास होता.

हिंटनच्या कादंबरीतील आशयाच्या निंदनीय स्वरूपामुळे, या कादंबरीला ऑर्थोडॉक्स/परंपरावादी लोकांकडून होणाऱ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. अमेरिकन लायब्ररी असोसिएशनच्या १९९० ते १९९९ या नऊ वर्षांच्या कालावधीतील ‘सर्वांत आव्हानात्मक पुस्तकां’मध्ये ‘द आउटसायडर्स’ कादंबरी ३८व्या क्रमांकावर होती. तसेच या कादंबरीवर काही शाळा आणि ग्रंथालयांमधून देखील बंदी घालण्यात आली. तरीही, युनायटेड स्टेट्सच्या अनेक शाळांमध्ये ही कादंबरी मध्यम किंवा उच्च स्तरावरील इंग्रजी अभ्यासक्रमाचा भाग आहे.

प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून या कादंबरीकडे पाहावे. थोडक्यात सांगायचं झालं तर ही कादंबरी आणि त्यातील आशय आगीसारखे आहेत. यातून तुम्ही मशाल, दिवा पेटवून अंधःकाराचा नाशही करू शकता किंवा तुम्हाला याचा चटकाही बसू शकतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

थॉमस एडिसनने त्याचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी एका हत्तीणीचा शॉक देऊन बळी घेतला होता

Next Post

सुरियाचा ‘जय भीम’ ‘शॉशंक रिडेम्पशन’ला मागे टाकून IMDb वरचा नं.१ चित्रपट बनलाय

Related Posts

विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

14 January 2025
विश्लेषण

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी महान शास्त्रज्ञ ‘निकोला टेस्ला’सुद्धा प्रभावित झाला होता

21 September 2025
इतिहास

मॅकीयावेलीचे विचार ऐकून हि*टल*र, मुसोलिनीचे पण फ्युज उडाले असते..!

28 January 2025
वैचारिक

थोर तत्वज्ञ प्लेटोला राजकारणात यायचं होतं पण…

25 December 2025
वैचारिक

ज्याच्या विचारावर चीन आज उभा आहे तो कन्फ्युशिअस कोण होता..?

1 January 2026
Next Post

सुरियाचा 'जय भीम' 'शॉशंक रिडेम्पशन'ला मागे टाकून IMDb वरचा नं.१ चित्रपट बनलाय

मंत्र्याला १९८३च्या फायनलची दोन तिकिटं नाकारली, म्हणून इंदिरा गांधींनी डायरेक्ट वर्ल्ड कपच भारतात आणला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.