The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रामनामी – सर्वांगावर रामनाम गोंदवून घेणारा दलित समाज

by Tanmay Kelkar
17 April 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


छत्तीसगढमध्ये एक ‘रामनामी’ नावाची जमात आहे. जमातीच्या नावावरुनच लक्षात येते की यांची रामनामावर श्रद्धा आहे व हे प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त आहेत.

परंतु दुर्दैवी गोष्ट अशी की यांना श्रीरामाच्या अथवा अन्य कोणत्याही देवतेच्या मंदिरात आजही प्रवेश दिला जात नाही. पण यांची रामभक्ती इतकी उत्कट आहे सगुण राममूर्तींच्या पूजेची परवानगी न मिळाल्यामुळे हे प्रभू रामचंद्रांच्या निर्गुण सर्वव्यापी रूपाची पूजा करतात.

जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी रामच भरून राहिला आहे हे दर्शविण्यासाठी आपल्या अंगावर सर्वत्र नखशिखान्त ‘रामरामराम’ गोंदवून घेतात (अगदी डोळ्यांच्या पापण्यांवरसुद्धा). या गोंदवण्याच्या विधीसाठी दिव्याची काजळी व तेल यांचे मिश्रण वापरले जाते.

रामनामी
homegrown

या जमातीच्या चळवळीचा इतिहाससुद्धा संघर्षपूर्ण आहे. १८९० च्या दशकात छत्तीसगडमध्ये गुरू घासीदास स्थापित सतनामी पंथीयांनी परशुराम भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली मंदिर प्रवेशासाठी अहिं*सक आंदोलन केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. (हा काळ महात्मा फुले, महर्षि स्वामी दयानंद सरस्वती इत्यादी जातिभेदविरोधी सुधारकांच्या मृत्यूनंतरचा व राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदयापूर्वीचा आहे). अपार संघर्षानंतरही मंदिर प्रवेश न मिळाल्यामुळे अंगावर रामनाम गोंदवून घेण्यास त्यांनी सुरुवात केली.



त्यातही अधिक संतापजनक गोष्ट म्हणजे अंगावर रामनाम गोंदवून घेतल्याबद्दल त्यांची इतरांकडून टिंगल केली जाते. “आम्हांला मंदिरात प्रवेश घेण्यापासून एक वेळ रोखू शकाल; पण भगवंताची भक्ती करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही” असं यांच्यातले जुनेजाणते लोक आजही म्हणतात. इतका घोर अन्याय होऊनदेखील त्यांच्यापैकी कुणीही हिं*साचार केलेला नाही. रामभक्ती सोडलेली नाही.

आज शहरीकरण, शिक्षणगंगा व आधुनिकतेचे वारे या समाजापर्यंतही पोहोचले आहेत. कित्येक पिढ्यांनंतर आज या जमातीतील मुलं शाळेत शिकतात. पिढीजात शेतमजुरी सोडून नोकरीधंद्यानिमित्त बाहेर पडतात. यातले काही जण आज अंगावर रामनाम गोंदवून घेत नाहीत. पण रामनामी जमातीचा व रामभक्तीचा अभिमान त्यांच्यात आजही जिवंत आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

अशी एक रामभक्त जमात अस्तित्वात असणं ही गोष्ट प्रभू श्रीरामचंद्र या व्यक्तित्त्वाचा/दैवताचा फक्त शहरांमध्ये किंवा गावोगावीच नव्हे, तर जंगलोजंगलीसुद्धा जज भारतीय जनमानसावर किती सखोल पगडा आहे याचे निदर्शक आहे.

ही माहिती थोडी अनोखी व अजब आहे. हा लेख वाचणाऱ्यांपैकी जवळपास कोणीच यापूर्वी या जमातीबद्दल काहीच ऐकलं नसेल. पण हे सगळं लिहिण्यामागे निव्वळ एखादी अजब माहिती जगासमोर आणणे हा एकमेव हेतू नाही.

ज्या प्रभू रामचंद्रांबद्दल सतत पुरुषसत्ताक, दलितद्वेष्ट्या, जातीय व्यवस्थेचे प्रतीक म्हणून सातत्याने अपप्रचार केला जातो त्या रामचंद्रांच्या अनन्य भक्तीत रममाण झालेल्या जमातीवर ही वेळ यावी याहून लाजिरवाणं काय असू शकतं?

या जमातीबद्दल माहीत झाल्यावर मलाही खरोखरच एक हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटली. अगर अपने ही ऐसे हो तो गैरों की क्या जरूरत….?!

रामभक्त हिंदूंचा अशाप्रकारे द्वेष व छळ करणारे हिंदूच हिंदुत्ववादाचा खरा पराभव करणारे आहेत हे हिंदुत्ववाद्यांनी लक्षात घेतले पाहिजे. रामनामी जमात व इतर सर्व दलित दीनदुबळ्या मागास हिंदूंच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व सर्वांगीण पुनरुत्थानासाठी शपथबद्ध व नित्य कार्यरत असले पाहिजे.

न हिन्दु: पतितो भवेत्…..

।। जय श्रीराम ।।

संदर्भ 1    संदर्भ 2


या माध्यमावर व्यक्त केलेली मते टी संबंधित लेखकाची असतात, संपादक मंडळ त्यांच्याशी कदाचित सहमत असेलही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: ramnami
ShareTweet
Previous Post

“साराभाई”मधला हा लोकप्रिय अभिनेता अभिनय सोडून करतोय सेंद्रिय शेती

Next Post

फ्री सोलो – अंगावर काटा आणणारी ऑस्कर विनिंग डॉक्युमेंटरी

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

फ्री सोलो - अंगावर काटा आणणारी ऑस्कर विनिंग डॉक्युमेंटरी

चहाचा इतिहाससुद्धा चहा इतकीच तरतरी आणणारा आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.