The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मासिक पाळीवर बनवलेल्या या चित्रपटाने भारताला पहिल्यांदा ऑस्कर मिळवून दिलाय

by सोमेश सहाने
4 September 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


गुणीत मोंगा यांनी निर्मिती केलेल्या “पीरीयड-एन्ड ऑफ द सेंटन्स” या चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळालं. अमेरिका आणि भारतातल्या लोकांनी मिळून भारतातील महिलांचा सॅनिटरी नॅपकिनसाठी असणारा संघर्ष माहितीपटाद्वारे दाखववला.

पण तिच्याकडे अमेरिकेत होणाऱ्या या बक्षीस समारंभात उपस्थित राहण्यासाठी लागणारे पैसे नव्हते. तिने मनाला येईल त्या श्रीमंत लोकांना इमेल लिहायला सुरू केले, त्यात एक इमेल राष्ट्रपतींनाही लिहिला. तेव्हा राष्ट्रपतींच्या वतीने पृथ्वीराज चौहान तिला भेटले, त्यांनी चित्रपट बघितला आणि गुणीतला अमेरिकेला पाठवायची सोय केली.

काही मित्र-मैत्रिणींनी रेड कार्पेटवर चालायला कपडे डिजाईन करून दिले आणि मग तो क्षण आला जेव्हा डॉल्बी थिएटरमध्ये गुणीत मोंगा ऑस्कर जिंकणारी पहिला भारतीय निर्माती ठरली.

याआधी कुठल्याच भारतीय सिनेमाला ऑस्कर जिंकता आला नाहीये. ऑस्कर ही काही सिनेमाचा दर्जा ठरवणारं एकमेव किंवा सर्वश्रेष्ठ संस्था नाहीये पण ही सर्वात प्रसिद्ध संस्था जरूर आहे.

मदर इंडिया, लगान आणि सलाम बॉम्बे या तीनच सिनेमांना आतापर्यंत मुख्य पाच नामांकनात स्थान मिळवता आलं आहे.



ऑस्करच्या अटी आणि जिंकण्यासाठी लागणारे बलस्थानं आपल्या सिनेमात कमी असतात. शिवाय फक्त दर्जा असून चालत नाही तर आपला सिनेमा आठ हजार परिक्षाकांपैकी जास्तीत जास्त लोकांनी बघावा यासाठी सिनेमाच्या मार्केटिंगवर करोडो रुपयांचा खर्च करावा लागतो.

आमिर खान याने लगान आणि दाक्षिणात्य सिनेमातला स्टार धनुष याने विसरनाई या सिनेमासाठी लॉस एंजेलीसला जाऊन हे सगळं केलं होतं. स्लमडॉग मिलेनियरची कथा आणि अभिनेते भारतीय असले तरी निर्माते आणि दिग्दर्शक विदेशी होते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

किंबहुना ज्या शॉर्ट डॉक्युमेंटरीबद्दल आपण बोलतोय त्यात सुद्धा इराणी दिग्दर्शिका आणि 3 विदेशी निर्मात्यांसोबत गुणीत मोंगा हिने काम केलं आहे. पण किमान या महितीपटाला भारतीय माहितीपट म्हणून ओळख आहे.

गुणीत मोंगामुळेच भारतीय सिनेमाला आतंरराष्ट्रीय मार्केटमध्ये जागा मिळतं आहे, असं म्हटलं तरी वावग वाटणार नाही. कारण कुठलाही आर्थिक किंवा ओळखीचा आधार नसताना तिने आतापर्यंत कित्येक दर्जेदार प्रोजेक्ट्स प्रोड्युस केले आहेत. किंबहुना आतंरराष्ट्रीय ख्याती मिळविणाऱ्या 70% प्रोजेक्ट्समध्ये ती कुठे ना कुठे सहभागी असतेच.

तिला ऑस्कर मिळेपर्यंत कोणाला माहीतही नसेल की ती गँग्स ऑफ वासेपुरमध्ये प्रोड्युसरच काम बघत होती. तिने प्रोड्युस केलेल्या लंचबॉक्सला जर अजून आर्थिक पाठबळ मिळालं असतं तर भारताला पहिलं ऑस्कर त्या सिनेमामुळे मिळालं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे.

“मसान” सिनेमाच्या आधी 25 वर्ष कांस फिल्म फेस्टिव्हलमध्ये कुठल्याच भारतीय सिनेमाला पुरस्कार मिळाला नव्हता. एकही सिनेमा, शॉर्ट फिल्म्स, ऍड शूट न केलेल्या नीरज घैवानसारख्या दिग्दर्शकावर विश्वास ठेवणं, त्याचं महत्व हेरणं, यासाठी गुणीत मोंगाची स्तुती करावी तितकी कमी.

वासन बाला दिग्दर्शित पेडलर्स हा सिनेमा बनवायला पैसे नव्हते म्हणून गुणीतने ही स्क्रिप्ट फेसबुकवर शेअर करून क्राऊड फंडिंगद्वारे 50% रक्कम (1 कोटी रुपये) जमवली. हरामखोर, शाहिद, मॉन्सून शूटआऊट आणि हमीद या सिनेमांनाही तिने असंच मार्केटमध्ये उभा केलं. या प्रोजेक्टशी संबंध असणाऱ्या कलाकारांना त्यानंतर मिळणाऱ्या संधीही यात मोजव्यात. गुणीतचं करिअर अशाच अनपेक्षित यशाने आणि कल्पनेपलीकडच्या कष्टाने भरलेलं आहे.

पीरीयड : एन्ड ऑफ द सेंटेन्स हा ऑस्करप्राप्त माहितीपट पॅड प्रोजेक्ट या सेवाभावी संस्थेच्या एका उपक्रमाचा आढावा घेतो. यासाठी आर्थिक पाठबळ लॉस एंजेलीसच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी काही फंड रेसिंग उपक्रमांद्वारे पैसे जमा करून दिलं आहे. दिग्दर्शन रायका या इराणी-अमेरिकी महिलेने केलं आहे.

दिल्ली जवळच्या एका गावात संस्थेच्यामार्फत सॅनिटरी पॅड बनविण्याची मशीन लावली जाते. त्यानिमित्ताने तिथल्या महिलांना एक रोजगाराची संधी मिळते, आणि गावातच पॅड बनतायत म्हणून पॅड वापरणाऱ्या महिलांची संख्याही वाढते.

पॅडची मशीन या महिलांच्या आयुष्यात येण्याआधी त्यांची याबाबतची उदासीनता, अज्ञान आणि गैरसौय यातून समजते. पुरुषांना तर मासिक पाळी एक रोग आणि पॅड म्हणजे लहान मुलांचे डायपर वाटत असतात. ही गावातील भीषण परिस्थिती त्यातील भावना योग्य प्रकारे टिपून दिग्दर्शकाने दाखविली आहे.

प्रयोगशील सिनेमॅटोग्राफर आणि एडिटर यांच्यामूळे हा माहितीपट फक्त एक नोंदीचं संकलन राहत नाही तर याला एक व्हिज्युअल लँग्वेजपण येते. जसं की पॅड बनविण्याच्या या उपक्रमातून महिलाच महिलांच्या प्रश्नाला एकमेकांच्या मदतीने सोडतात, आणि याचा फायदाही घेतात. ही टीम वर्कची भावना शेतात गवताचा भारा मैत्रिणीच्या मदतीने बांधून डोक्यावर देण्याच्या एकाच सीनमधून आपल्यापर्यंत पोहोचते, हे मुलाखतीतुन सांगण्याची गरज पडत नाही.

यातलं सगळं शूटिंग नैसर्गिक प्रकाशात, त्या त्या पात्राच्या घरात केलं आहे. या विषयाकडे समस्या म्हणून बघण्यापेक्षा हा उपक्रम आणि हा माहितीपट याकडे एक संधी म्हणून, एक नवी आशा म्हणून बघतो. यातली पात्रं नवनिर्मितीत विश्वास ठेवणारी आहेत, यातून दिला जाणारा संदेश व्यावहारिक आहे.

उगाच उपाशी राहून पॅड वापरण्याची प्रेरणा देणारं उथळ नरेटिव्ह इथं नाहीये. एका छोट्या पॅडच्या अभावामुळे उद्भवणाऱ्या गंभीर समस्येला, रोजगाराची छोटी संधी निर्माण करून सोडवणाऱ्या या प्रयत्नाला या माहितीपटामुळं बळ मिळालं असेल. या प्रयत्नासाठी आणि भारताला पहिला ऑस्कर मिळवून देण्यासाठी गुणीतचे आभार मानावेत तितके कमी.

हा माहितीपट तुम्ही नेटफ्लिक्सवर किंवा नेटफ्लिक्सच्या युट्युब चॅनलवर बघू शकता.


या माध्यमावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकाची असतात, संपादक मंडळ त्याच्याशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

चलन तुटवडा भरून काढण्यासाठी आपल्याला बाहेरून नोटा छापून घ्याव्या लागल्या होत्या

Next Post

नेहरूंनी डॉ. राजेंद्र प्रसादांना सरदार पटेलांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी मनाई केली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

नेहरूंनी डॉ. राजेंद्र प्रसादांना सरदार पटेलांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी मनाई केली होती

बाबरीचा बदला म्हणून पाकिस्तानात कित्येक मंदिरं जमीनदोस्त केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.