The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तमन्नाची हॉटस्टारवर रिलीज झालेली ‘नोव्हेंबर स्टोरी’ वेबसिरीज कशी आहे..?

by सोमेश सहाने
24 May 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


“पोस्टमार्टम करणारे लोक दारू पिऊनच हे काम शकतात इतकं ते त्रासदायक असतं,” अशा गोष्टी आपल्याला फक्त ऐकून माहीत होत्या. पण या सिरीजमध्ये बराचसा वेळ त्या आपण त्या पोस्टमार्टमच्या खोलीतच असतो. मृत शरीरं धुण्यापासून ते अभ्यासण्यापर्यंत आणि नंतर सांडलेलं रक्त घासून धुण्यापर्यंतचे सीन्स यात आहेत. “मला काही वाटत नाही असं काही बघताना” असं म्हणणाऱ्यांनासुद्धा एकवेळ डोळे मिटावेसे वाटतील वाटेल असे प्रसंग यात आहेत.

पण हे एवढं सगळं कशासाठी? यातून उलगडणारे पात्र, कथा मात्र पोस्टमार्टम इतकेच इंटेन्स असतील अशी माफक अपेक्षा ही “नोव्हेंबर स्टोरी” पूर्णपणे साध्य होत नाही. तरी हे आठ एपिसोड्स धरून ठेवतात.

प्लॉट आणि अभिनय

बाहुबली स्टार तमन्ना भाटियाला आधी फक्त बिग बजेट कमर्शिअल सिनेमातच आपण बघत होतो. पण वास्तववादी सिनेमाचं वाढणारं मार्केट बघता, असे ग्लॅमर नसणारे आणि अभिनय कौशल्य उघड करणारे रोल तिने निवडणं यात नवल नाही. प्रत्येकच नटी आता ‘ग्लॅमगर्ल’पासून ‘द गर्ल नेक्स्ट डोअर’ होणार यात शंका नाही. तमन्नाला ते जमलंसुद्धा.

आपल्या वृद्ध पित्याच्या अल्झायमरची ट्रीटमेंट करायला जुनं मोक्याच्या ठिकाणचं घर तिने विकायला काढलेलं असतं. पोलीस एफआयआर अपलोड करायला तिने बनवलेलं सॉफ्टवेअर चालवणं, त्यात होणारं हॅकिंग थांबवणं आणि हे घर विकणं यात ती व्यस्त आणि त्रस्त असते.

पण एके दिवशी तिच्या घरात एका महिलेचा मृतदेह सापडतो, आणि शेजारी तिचे वडील बसलेले असतात. यातून तिचा तिच्या वडिलांना वाचवायचा संघर्ष सुरू होतो. एक प्रसिद्ध पोस्टमार्टम एक्स्पर्ट – येसु या घराशेजारीच रहायला आलेला असतो. त्यामुळे या क्लिष्ट ह*त्याकांडात त्यांनी केलेलं विश्लेषण आणि अल्झायमर पेंशट असणाऱ्या वृध्दाचं क्राईम नॉवेल लेखक असणं या सिरीजमध्ये अजूनच सस्पेन्स आणतं.



यात सगळ्यांचे अभिनय चांगले झाले असले तरी मूळ पात्रच फार खोली आणि शेड्स नसलेले लिहिले गेल्याने अभिनेत्यांना करायला फारसं विशेष काम नव्हतं. पेशंटची मानसिक स्थिती दाखवणं सत्याचा शोध घेणं या सगळ्या गोष्टी अभिनयापेक्षा रॅपिड कट्सच्या माध्यमातून गतीत ठेवण्यात आल्या आहेत.

हॅकिंग, अल्झायमर असलेला लेखक, पोस्टमार्टम एक्स्पर्ट, एक अपहरण, दोन खू*न असं हे चक्र फिरत असतं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पोलिसांचा अँगल

पोस्टमार्टमच्या चाणाक्ष पद्धतीने खू*न करणाऱ्या संशयित आरोपीकडे पोलीस पोहोचतात, पण त्याबद्दल खात्री पटायला आणि पुरावे जमा करायला त्यांची पळापळ होते. सामान्यपणे पोलिसांचा तपास एकतर तर्कहीन पोरखेळ असल्यासारखा विनोदी किंवा ते सुपरहिरो किंवा शेरलॉक होम्स असल्यासारखा दाखवला जातो.

वास्तववादी पोलीस तपास याआधी ‘पाताल लोक’, ‘दिल्ली क्राईम’, यांसारख्या सिरीजमध्ये दाखवला गेलाय. वयोमानानुसार कल्पकता हरवलेला, थकून कुठेही झोप येणारा वृद्ध, सिनेमासारख्या सिरीयल कि*लिंगच्या रंजक थिअरी असणारा नुकताच जॉईन झालेला तरुण, गृहिणीसारखे लॉजिक देणाऱ्या महिला पोलीस आणि या सगळ्यांना घेऊन तपास करणारा मुख्याधिकारी. या अशा प्रचंड खऱ्या वाटणाऱ्या तपास यंत्रणेमार्फत प्रेक्षकांच्या मनात येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न हे पोलीस करत असतात. यातून आपला दृष्टिकोन या कथेत मांडायला, आपण विचार करत असतो त्या मार्गाने चौकशी करायला जणू आपणच त्यात असतो.

एका सीनमध्ये पोलीस अधिकारी सगळ्या स्टाफला आपल्या खोलीत बोलावतो आणि तपास होईपर्यंत रात्रीही घरी जायचं नाही असं सुनावतो. बाकी लोक गणवेशात आणि तो मात्र निवांत लुंगीत असतो. हा सिन एका अर्थाने काहीशी अतिरंजक बाजू दाखवत असेल. पण हतबल झाल्यानंतर केले जाणारे खरे प्रयत्न, आणि पोलिसांची माणूस म्हणून असणारी साहजिक हळवी बाजू यात आहे.

पोस्टमार्टम केलं जातं तो ओटा, ह*त्यारं, ती घाण रूम, सांडलेलं रक्त, हे सगळं काम करणारे लोक यांचं चित्रणंही खूप सहज, खरं आणि त्यामुळे जास्त भयानक आहे.

मानसिक आजार असलेल्या लोकांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल थ्रिलर बनवताना मुख्य आरोपी लपवून तपास करत सत्य शोधणं आणि मग शेवटी सस्पेन्स शिगेला जाईल असा शेवट – असं सगळं ठरलेलं स्ट्रक्चर असतं. यात नावीन्य राखून बनवलेले थ्रिलर म्हणजे दृश्यम, अंदाधुंद, रमण राघव आणि आता दृश्यम २.

नोव्हेंबर स्टोरी मात्र प्लॉट, स्ट्रक्चर, पात्रं किंवा कुठल्याच इतर बाबतीत नाविन्यपूर्ण असं काही दाखवत नाही. थ्रिलर असल्या कारणाने यातल्या तार्किक चुका जास्तच उठून दिसतात. “हे पात्रं असं का करत नाही?” या प्रश्नाचं उत्तर एका चांगल्या थ्रिलरमध्ये स्पष्ट नसलं तर किमान लपलेलं तरी असावं. खरं वाटावं ही कथेची जास्त मोठी गरज असल्याने कॅमेराने काही वेगळेपण साधावं अशी अपेक्षा ठेवता येत नाही.

कलर पॅलेटही साजेसं छान आहे. कथेत सस्पेंसही आहे पण हे विचित्र प्रकार करणाऱ्या पात्रांची बॅक स्टोरी, पर्सनॅलिटी नीट न लिहिली गेल्याने आपण कथा बघत असलो तरी त्यात भावनिक पातळीवर अडकत नाही. यामुळे यातल्या सस्पेन्सचा प्रभाव कमी होतो. एकाच पात्राची स्टोरी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दाखवली आहे पण तिचा प्रभाव समप्रमाणात मेन्टेन न ठेवल्याने त्याबद्दलची उत्सुकताही फार काळ टिकत नाही.

या प्रकारचं काही दर्जेदार बघायचं असल्यास “सेव्हन” हा इंग्रजी सिनेमा नक्की बघा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जर कधी जेरुसलेमला गेलात तर या शिडीला चुकूनही हात लावू नका, नाहीतर दं*गली पेटतील

Next Post

दुसऱ्या महायु*द्धात हा कार्यकर्ता चक्क धनुष्यबाण घेऊन लढला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

दुसऱ्या महायु*द्धात हा कार्यकर्ता चक्क धनुष्यबाण घेऊन लढला होता

'तूतनखामेन'च्या शापित थडग्याचा शोध घेणाऱ्या सर्वांचाच रहस्यमय मृत्यू झाला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.