The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लुटकेस : डिझनी हॉटस्टारवरचा हा फुल टू एंटरटेनिंग सिनेमा कसा आहे जाणून घ्या

by सोमेश सहाने
5 August 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


एका मुलाखतीत लुटकेसबद्दल बोलताना कुणाल खेमुने असं सांगितलं की, “सिनेमातला चांगला विनोदी सिन फक्त अभिनेता तो सीन कसा साकारतो यावर अवलंबून नसतो. सगळा सेटअप कसा आहे, समोरचा अभिनेता कसा आहे, एडिटरला विनोदाची जाण असणं आणि विनोद जिथे बरोब्बर हाय पॉईंट गाठतो तिथं त्या सीनला कट करणं यावर सगळा परिणाम अवलंबून आहे. प्रभावी विनोदी सिन ही गोष्ट सिनेमात टीम वर्कमुळंच शक्य होते”. यातच लुटकेस सिनेमाच्या समीक्षेचं सार आलंय.

नंदनकुमार या प्रेसमध्ये काम करणाऱ्या सामान्य कामगाराला मध्यरात्री घरी येताना पैशाने भरलेली लाल सुटकेस सापडते. तिथून पुढे काही काळ त्या प्रसंगापर्यंतचे घटनाक्रम दाखविण्यात आणि पात्रांचा परिचय होण्यात जातो. मग अपेक्षेप्रमाणे त्या विश्वातील प्रत्येक गोष्ट त्या लाल सुटकेस भोवती फिरू लागते.

नंदू आणि लता या दांपत्याच्या आयुष्यातील वैफल्य, राजकारणी माणसांची खुर्ची, पोलीस अधिकाऱ्याचं भविष्य आणि गुंडांचं अस्तित्व सगळं काही त्या सुटकेसशी जोडण्यात लेखक-दिग्दर्शकाला चांगलंच यश आलंय.

माणसांचं जग पण जंगलासारखं असतं त्यामुळं नॅशनल जिओग्राफीक चॅनलचं सबस्क्रिप्शन घ्यावंच असं म्हणणारा डॉन, येडा बनून पेडा खाणाऱ्या प्रकारातील मंत्री आणि मेव्हण्यामुळे गोत्यात आलेला गुंड हे सगळे नंदूला शोधत असतात.

फक्त हेच नाही तर अचानक आपला नवरा एवढा खर्च करतोय हे लक्षात आल्यावर लतासुद्धा तिच्या नवऱ्याच्या खऱ्या व्हर्जनला शोधत असते. यापैकी कुठलंच पात्र जॉनी लिवर जसं मुद्दाम वाकडातिकडा उभा राहून विनोदी अस्तित्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत असतो तसं नाटकी नाहीये. फक्त सिनेमात त्यांना बघताना थर्ड पर्सन म्हणून आपण त्यांना विनोदी पद्धतीने बघू अशी सोय केलेली आहे. जशी सोय पु. ल. करतात.



सिनेमा संपेपर्यंत आपण खूप हसतो पण आपल्याला या पात्रांविषयी एक गंभीर मतसुद्धा तयार होतं. या सुटकेसच्या शोधात आपण त्यांच्या आयुष्यातले अंतरंग बघतो. लेखकांनी मुद्दाम प्रत्येक दुवा पूर्ण करण्याची शर्यत न लावता अर्धवट दुव्यांची संपन्न कथा आपल्याला दिली आहे.

राजेश कृष्णन यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा, याआधी “ट्रिपलिंग” या टीव्हीएफच्या सिरीजचे ते दिग्दर्शक होते. त्यांच्या अनेक लेखी मुलाखतीत त्यांनी सांगितलंय की यातले बरेच प्रसंग आणि पात्रं खरे आहेत. त्यांच्या रूपानं अर्थातच हा जॉनर नीट हाताळता येणार निर्माता आपल्याला मिळाला आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पण हा सिनेमा दिग्दर्शकापेक्षा संकलकाचा (editor) जास्त आहे. पहिल्या उताऱ्यात सांगितलं तसं सिनेमात विनोद दाखवताना एडिटरच लेखक दिगदर्शकाच्या जागी असतो, त्याशिवाय विनोद प्रभावी होत नाही.

फरहान अख्तरच्या एक्सेल प्रोडक्शनच्या दिल चाहता है आणि गली बॉय सोडून जवळ जवळ सगळ्या सिनेमाचं आणि ट्रिपलिंगचं एडिटिंग करणाऱ्या आनंद सुबाया यांनी हा सिनेमा एडिट केलाय.

यामुळं सगळ्यात जास्त क्रेडिट त्यांना आणि अर्थातच, कुणाल खेमुच्या अभिनयाला, त्याने ज्या प्रकारे सिनेमाला आधार दिला आहे त्याला जातं. रसिका दुग्गल, विजय राज, गजराज राव, रणवीर शौरी, ही लोकं सजग होऊन सिनेमा बघणाऱ्यांसाठी नवीन स्टार आहेत. त्यांचा अभिनय हा नेहमीच चौकटी मोडणारा, वास्तवादी असतो. फक्त यांच्यासाठी हा सिनेमा डोक्यावर धरावा असे एक दोन नाही तर तब्बल 10 अभिनेते यात आहेत.

आपण सुशांतसिंगच्या आठवणीत दिल बेचारा बघितला. घराणेशाहीचा किंवा कसलाच आधार नसणाऱ्या या कलाकारांच्या मागे उभा राहणं, त्यांचे सिनेमे हिट करणं हे सुशांतच्या आठवणीत करायला हवं.

सामान्य आयुष्याला अत्यंत विनोदी पद्धतीने पण खोटं वाटणार नाही असं दाखवण्याचं अवघड काम स्क्रीनवर खूप साध्या सोप्या पद्धतीने दिसतं. हे खूप अवघड असेल म्हणूनच की काय यासारख्या सिनेमांची संख्या कमी असते. काही जागी विनोद सोपे करून सांगायचा प्रकार झालाय पण सिनेमागृहातील कलेक्टिव्ह एक्सपिरियन्ससाठी ते गरजेचं असेल असा या मागचा हेतू वाटतो.

“दिल्ली बेल्ली” चित्रपटापासून भारतात चांगल्या ब्लॅक कॉमेडी किंवा अडल्ट कॉमेडी असणाऱ्या सिनेमांची एन्ट्री झाली. याचं बिघडलेलं स्वरूप “ग्रँड मस्ती”सारख्या सिनेमात दिसतं तर “कालाकंडी” सारखा प्रयोगशील सिनेमा करण्याचं धाडस सैफअली खानसारखे अभिनेते करतात तेव्हा ते सिनेमे बघायला आपण थिएटरमध्ये जात नाही.

पण त्यात अजून पुढं जात लुटकेस सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा लॉकडाऊनमुळे डिजनी हॉटस्टार या ऑनलाइन माध्यमावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. कुठलाही मोठा स्टार नसताना दर्जेदार विषय आणि मांडणी (जी या माध्यमाची गरज आहे) यामुळे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल असं वाटतंय.

काही अत्यंत छोटे कंटीन्यूटी एरर, अपूर्ण राहिलेले दुवे, पात्रांचा पूर्ण न झालेला प्रवास अशा क्षुल्लक चूका आहेत. पण या कठीण परिस्थितीत वास्तववादी विनोद साकारून प्रेक्षकांना हा सिनेमा हसवतो म्हणून दोषही विसरू वाटतात. किंबहुना ते बघताना अडथळा निर्माण करत नाही.

असा हा फुल टू धमाल, डोक्याला जास्ती ताण न देणारा चित्रपट नक्की बघा!


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : 
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

म्हणून बाबरी मस्जिद पाडल्यानंतर भैरोसिंह शेखावत सरकार बरखास्त करण्यात आले

Next Post

भटकंती : डोंगरदऱ्यांत लपलेलं जर्षेश्वराचं मंदिर

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

भटकंती : डोंगरदऱ्यांत लपलेलं जर्षेश्वराचं मंदिर

हा पठ्ठ्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन्ही अ*णुबॉ*म्ब ह*ल्ल्यातून वाचलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.