The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाणून घ्या कसा आहे नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला “क्लास ऑफ ’83”

by सोमेश सहाने
23 August 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


प्रदीप शर्मा (300 पेक्षा जास्त एन्काऊंटर), 26/11 हल्ल्यात शाहिद झालेले द ग्रेट विजय साळसकर, एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रफुल भोसले अशा सगळ्या विवादास्पद महान पोलीस अधिकाऱ्यांना जोडणारा एकच समान दुवा आहे. तो म्हणजे या सगळ्यांनी 1983च्या बॅचमध्ये डीजीपी अरविंद इनामदार यांच्याकडून घेतलेलं ट्रेनिंग. या त्यांच्या क्लास ऑफ 83चं अस्तित्व आता हुसेन झैदी यांच्या पुस्तकामुळे सगळेच मान्य करतात.

मुंबईच्या रक्तरंजित गँगवाॅर आणि एन्काऊंटरला हुसेन झैदी एवढं कोणीच नीट लिहू शकत नाही. असं आयतं सगळं तयार असताना आणि शाहरुख खानसारखा निर्माता पाठीशी असताना यावर बनलेला सिनेमा बिघडणं अशक्य वाटतं ना? पण ती निराशा करण्याचं अशक्य काम “क्लास ऑफ 83” हा सिनेमा करतो.

बॉबी देओलला डीजीपी इनामदार यांच्या पात्रात बघणं सगळ्यांसाठीच अवघड होतं, पण बॉबी त्याच्या सेकंड इनिंगमध्ये अनपेक्षित धक्का देईल असं ट्रेलर बघून वाटत होतं. ही अपेक्षा काही प्रमाणात पूर्णही होते. त्याच्या वाट्याला आलेलं काम त्याने नीट केलंय. पण त्याच्या वाट्याला जे आलंय तेच नेमकं बिघडलेलं आहे.

पटकथा लेखक अभिजित देशपांडे यांनी ही कथा चित्रपटातील पाच पैकी एका पी एस आय सांगतोय अशी लिहिली आहे. जसं 3 इडियट्स आर माधवनच्या आवाजात आहे. पण ही ट्रिक फक्त कथेतील संदर्भ, तपशील सांगायला वापरली गेली असती तर चांगलं झालं असतं. इथं मात्र महत्वाच्या गोष्टी, पात्रांचे बदलणारे स्वभाव हे सगळं तो पीएसआयच बोलून दाखवतो.

मूळ कथेतच सिनेमॅटिक अनुभव येईल, आतुरता शिगेला पोहोचेल असे प्रसंग नाहीत. परिस्थितीत होणारे बदल कलात्मक पद्धतीने सांगण्यापेक्षा एका डायलॉगमध्येच संपवले आहेत.



एन्काऊंट स्पेशलिस्टला ट्रेन करणाऱ्या डीजीपी भोवती जे वलय लिखाणातून तयार व्हायला पाहिजे होतं ते यामुळं तयार होत नाही. बॉबी देओलच्या पात्राची बॅक स्टोरी खूपच छोटी आणि त्याला दिलेली भावनिक किनार तोडकी वाटते, आणि मूळ कथेशी ते जुळून येत नाही.

पाच शिकाऊ अधिकाऱ्यांच्या केलेल्या निवडचे निकष पुरेषे वाटत नाही. आणि तिथून पुढे नाशिकच्या ट्रेनिंगमध्ये होणारी त्यांची जडण घडण ही नीट दाखवली गेली नाही. अचानकच खूप सिक्रेट गोष्टींचे तपशील खुले केले जातात तेव्हा सिनेमा पळवला किंवा मधला भाग कट केला की काय असं वाटतं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

एवढ्या सगळ्या सर्कसचा रिंग मास्टर जो डॉन असतो, त्या पात्राभोवतीसुद्धा कथा फिरत नाही, आणि अपेक्षित असणारे सुंदर, खरे वाटतील असे ऍक्शन सीन्स पण नाहीत.

क्राईम पेट्रोलमुळे प्रसिद्ध झालेल्या अनुप सोनी यांनी मनोहर पाटकर या भ्रष्ट गृहमंत्र्याची भूमिका साकारली आहे. त्यांचा खराब अभिनय कदाचित गोंधलेल्या कथेने झाकला असता पण दर्जाहीन डायलॉगने ते होऊ दिलं नाही.

महाराष्ट्राच्या गृहामंत्र्याला किमान मराठी भाषा बोलता येणं अपेक्षित आहे. “आजपासून मराठी जनतेच्या “रक्षांची” जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे.” असा एक डायलॉग ऐकला की तिथून पुढे ते पात्र बघावंसं वाटत नाही.

पाच अधिकाऱ्यांपैकी 3 जणांना जास्त महत्व आहे, आणि तरीही त्या तिघांच्या पात्राचा प्रवास नीट पूर्ण झालेला दिसत नाही. त्यांचा अभिनय मात्र उत्तम झाला आहे. ते पाच जण मुंबईत जेवायला एका हॉटेलमध्ये जातात तो सिन तर कमाल झालाय. फक्त अभिनयाच्याच बाजूने नाही तर, त्यातले संवाद तेव्हाच्या हॉटेलातील वातावरण, डिम लाईट, छोटे छोटे टेबल्स, वेशभूषा असं सगळंच त्या एका सिनमध्ये छान जमून आलंय.

एकंदर सिनेमाच 1980चा वाटावा यासाठी फिल्मवर शूट केल्यामुळं जे ग्रेन्स दिसतात, तसा फील डिजिटलवर शूट करून आणण्यात एडिटरला आणि कलर ग्रेडिंग करणाऱ्यांना चांगलं यश आलंय. हे थिएटरच्या मोठ्या स्क्रीनवर दिसू शकलं नाही याचं त्यांना नक्कीच वाईट वाटत असणार.

इतर प्रोडक्शन आणि क्लदिग्दर्शनाच्या विभागांत सुद्धा तो काळ साकारण्याचं काम चांगलं झालंय.

पण पटकथेतील गोंधळासोबत प्रभावहीन आणि डायलॉग हे सुंदर दृश्यं बघणं कठीण करतात. उदा. क्या करू सर, मेरा तो ब्लड ग्रुप भी निगेटिव्ह है. लेकीन मेरा तो बी पोसिटीव्ह है दीक्षित. अशा अनेक अत्यंत अवास्तव डायलॉगमुळे आपण पात्रात फार गुंतत नाही. कुठलं पात्रं आपल्याला धरून ठेवेल अशी सोयच केली नाहीये. काही कॅन्टीन्यूटीचे पण प्रॉब्लेम्स आहेतच.

शाहरुखच्या रेड चिली प्रोडक्शनचे ऑनलाइन स्ट्रीम होणारे बार्ड ऑफ ब्लड, बेताल आणि आता क्लास ऑफ 83 हे एकानंतर एक फ्लॉप झालेत.

त्याच्याच जवळपास आलेले स्पेशल ऑप्स आणि घौल यांनी त्या त्या जॉनरमधल्या दर्जाला वर नेलं. पण ही फ्लॉप सिरीज एक दुर्दैवी योगायोग असेल किंवा पडद्यामागचा स्टार या बदलणाऱ्या परिस्थितीत स्वतःला न बदलता स्वतःची हिरोगीरी या सिरीजमधल्या पात्रातून पूर्ण करून घेतोय की काय असंही वाटतं.

काय खरं कारण आहे माहीत नाही पण एवढा सक्षम आणि प्रयोगशील निर्माता सतत फसत राहिला तर त्याच्या आधाराने पुढे जाणाऱ्या चांगल्या कलाकारांचंही नुकसान होत असतं.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या शूर राजपूत राजावरून पाकिस्तानातल्या रावळपिंडीचं नाव पडलंय

Next Post

या एका आजारामुळे अमेरिका सुपरपॉवर बनलाय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या एका आजारामुळे अमेरिका सुपरपॉवर बनलाय

CD चा काळ संपला आणि 'प्लॅनेट एम'चं दिवाळं निघालं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.